हे नाते जन्मांतरी चे भाग 15

Nate janmamtri che bhag 15. This is story of minu. A happy go lucky girl, her friends, her family. Some love story little suspense. Thank you Ira.

हे नाते जन्मांतरी चे भाग 15...

             मागील भागात आपण पहिले की मीनू अर्जुन ला कॉल करत नाही म्हणून अर्जुन अस्वस्थ होतो. आई बाबा ना कसल्या तरी गोष्टी च खुप टेन्शन आलेले आहे.  दक्ष खेड ला काही कामा निम्मित येतो आणि मीनू ला भेटतो.  तेव्हा त्याला अशी शंका येते की कदाचित मीनू अर्जुन ला लाईक करते. अर्जुन संध्याकाळी दक्ष आणि मुनि चा सेल्फी दक्ष च्या स्टेटस ला पाहतो.....

आता पुढे....     
 
            "मीनल ....  आणि  दक्ष....? "
          
             तो फोटो कडे पाहत बसला.त्याने चटकन मीनू अन त्याचा chat ओपन केला.  तर 2 दिवसा पासून तिचे च मेसेज होते gn...  gm... चे.  त्याने पटकन  मेसेज पाठवला.

              "डीपी छान आहे,  कुठे काढला? " इंडिरेक्टली चौकशी करायला त्याने विचारलं.

               मीनू तेवढ्यात ऑनलाईन आली.  आज अर्जुन ने स्वतः हुन मेसेज केला हे पाहून ती हुरळून गेली.  आणि डीपी च कौतुक पण "हमममम...  सुधरत आहेत DySP साहेब..." ती गालातच हसली.       
     
               "hello सर,  थँक यू. " तिने रिप्लाय केला.

                "कुठे काढला आहे फोटो? " अर्जुन ने विचारलं.

                 "आमच्या गावात आहे एक महादेवा च मंदिर....  खुप सुंदर आहे. " ती उत्साहाने बोलत होती.  अर्जुन chat करत आहे हा विचार करूनच ती हवेत होती.

                   "हो का........  कोण होतं सोबत???  फ्रेंड्स???? " अर्जुन ने जरा हिचकिचत विचारले.

                  तसे मीनू च्या डोक्यात प्रकाश पडला.  अर्जुन ने दक्ष बरोबर ची सेल्फी दक्ष च्या स्टेटस ला पहिली असणार.  तिला आता हसायला आलं.  तिला ट्रेकिंग च्या वेळेस ती दक्ष शी bye बोलत असताना चा अर्जुन चा चेहरा आठवला.  "हममम ....  म्हणजे जेलस पण फील होतं यांना  तर...  "ती ओठ मुडपत हसली. तिने आता अर्जुन ला मुद्दाम त्रास द्यायचं ठरवलं..."हममम ...  आहे... म्हणजे आहे एक फ्रेंड.... " तिने मुद्द्दाम त्याला कॉन्फयुज्ड करायला असे type केले.

                   "हो का? .....  एक फ्रेंड???  की स्पेशल फ्रेंड?? " अर्जुन आता चिडायला लागला होता.  त्याची का चिडचिड होतेय हे त्याला समजतं नव्हतं.  खरं तर समजत होतं पण त्याला ते एक्सेप्ट नव्हतं करायच.

                    "हो.....  म्हणजे....  आहे... तसा स्पेशल फ्रेंड च म्हणावं लागेल. " तिने लाजणारे ईमोजी पण टाकले. तिला हसायला येत होतं.

                   "हो का?  आणि हे ईमोजी च काय अर्थ असतो?  आणि मग तू माझ्याशी का बोलत आहे?  तुमच्या स्पेशल फ्रेंड बरोबर च बोला ना.  bye.  " आता अर्जुन खरंच च चिडला. 
      
            "हा कधी गेला yar तिकडे फिरायला.  दक्ष पण ना.  त्याला आठवड्याला खरं प्रेम होतं.  ए तू वेडा आहेस का?  असं काय नसेल.  दक्ष आहे तो.  त्याला तर अशा सध्या सिम्पल पोरींच्यात कधी इंटरेस्ट नसायचा.  अरे कुठून कुठे पोहचत आहेस तू?  तुला समजतं आहे का तू काय विचार करत आहे?  ती मीनल आहे.  तिचे डोळे सरळ सरळ सांगतात she likes you. " दुसऱ्या मानाने मोके पे चौका मारला.  अर्जुन चांगलाच दचकला. "एवढा काय दचकतो?तुला तर सगळं माहित आहे.  उगीच न कळल्या सारखं नको करू तू. ती मुद्दाम करत आहे..  तुला जेलस फील व्हावं म्हणून.... "
 
              yar मी तर फॅन झाले दुसऱ्या मनाची.  कस सगळं च समजतं ना त्याला. "अच्छा असे आहे तर.  माझ्याबरोबर गेम खेळत आहे तर...." अर्जुन विचार करत असतो. 

                तो पर्यंत तिचा मेसेज आलेला असतो,  "हो चालेल तसे पण माझा चॅटिंग चा time आहे आता त्याच्या बरोबर.  bye gn.  आणि एक हसणारे ईमोजी"

           त्याला आता हसायला आलं.  मीनल पण ना....  किती हिला दूर ठेवायचं म्हणलं तरी दूर ठेवता येत नाही.  खुप छान आहे. तो मनात विचार करते बोलला.

                 मीनल जेवण करून मस्त गप्पा मारत बसली होती आई बाबांबरोबर.  नेहमी प्रमाणे बाबा अन मीनू एका टीम मध्ये होते आणि आई एका टीम मध्ये.  हे दोघ मुद्दाम सुनीता ताईंना चिडवून देत होते.  तसे त्यांची चिडचिड वाढत होती.
                
                 "मी काय म्हणतो सुनीता.... तू आता म्हातारी झाली आहेस....  किती चिडचिड करतेय तू... " बाबा अजूनच फोडणी घालत बोलले.

                 "हो ना....  आणि तुम्ही तरुण होतं चालला आहात ना?  पूर्ण एक तास उभ राहून शिकवायला जमत नाही तुम्हांला गुडघ्यांनी.  मला म्हातारी म्हणत आहात. " आई अजूनच जास्त चिडल्या.  म्हातारी म्हणतात म्हणजे काय?  "आणि तू काय दात काढत आहेस???? " मीनू ला तोंडावर हात ठेऊन हसताना पाहून त्या अजूनच चिडल्या.  "बाप लेक दोघे सारखेच.  हात धुवून माझ्या मागे लागतात.

                       "तसे मीनू आई च्या गळ्यात पडली..... " अग तू चिडली ना की असे डोळे फिरवते ना.....  मला खुप मज्जा वाटते.  " ती आई नक्कल करत म्हणाली.

                तसे बाबा पोट धरून हसायला लागले...  आई अजूनच जास्त वैतागली आता.  बाबांना तर काय करता येणार नाही...  तिने चिडून मीनू च्या पाठीत एक धपाटा घातला, " ऍक्टिंग करत आहे आई ची.  काही वाटायला पाहिजे.  मीने मोठी झाली आता.  जरा सुधारा आता आज उद्या लग्न होईल.  तिकडे गेली तर काय सासू ची ऍक्टिंग करशील का?  तुम्हीच लाडावून डोक्यावर बसवलं आहे तिला." आई ने नेहमीच हत्यार बाहेर काढलं.

                आता मीनू आणि बाबा एकमेकांना टाळी देत हसायला लागले.  तसे खळ्ळकन खिडकीची काच फुटली.  सर्वजण एकदम शांत झाले."काच कशी काय फुटली आपोआप.... " असे म्हणत मीनू खिडकी जवळ जाऊन पाहायला लागली.  तर तिथे काहीतरी पडलं होतं.

                 "हे काय आहे" म्हणत मीनू ने तो बॉल च्या आकाराचा कागदाचा बोळा उचलला.  तर तो कागद एका दगडाला गुंडाळून खिडकीवर फेकला होता.  त्यामुले खिडकी फुटून तो आत आला होता.  तिने तो गुंडाळलेला कागद उलगडला...तेवढ्यात बाबा तिथे आले. 

                 ती वाचणार हे पाहून बाबा बोलले, "दे इकडे, लोक पण ना आजकाल....  किती मस्ती करावी कळत नाही यांना." बाबा नि जवळ जवळ हिसकावून च घेतला कागद तिच्या हातातून.  ते जरा थरथरत होते.  त्यांच्या केसा च्या कोपऱ्यातून घाम फुटला होता.  आई पण थिजून जागेवर उभी राहिल्या सारखी वाटत होती.  मीनू ला समजतं नव्हतं की हे दोघे एवढे का घाबरल्या सारखे वाटत आहेत.

             "पाहू तर द्याना बाबा ...... " तिने त्यांच्या हातातून कागद घ्यायचा प्रयत्न केला. 

               तसे बाबा चिडले. "एकदा नाही म्हणालेलं कळलं नाही का? " जा झोप चल 11 वाजत आलेत. "

                  तशी मीनू शॉक होऊन जरा मागे सरकली.  "पण बाबा...  एवढे का चिडत आहात??" ती जरा चिडली.  "बाबा उगीच मला ओरडले..." ती मनात बोलली. 

                "झोपायला जा सांगितले ना." ते जरा रुक्षतेने बोलले. 

               तसे ती पाय आपटत तिच्या रूम मध्ये गेली.  आणि धाडकन जोरात दरवाजा आपटला. (मुद्दाम,  घरच्यांना कळायला हवं ना मी चिडले आहे ते. )

                बाबा आणि आई तो चुरगळलेला कागद घेऊन रूम मध्ये आले. त्यांनी दरवाजा बंद केला.  आणि कागद सरळ करून वाचायला सुरु केल. "देसाई....  ही दुसरी वॉर्निंग.... आम्हाला च्या पद्धतीने पण करता येईल,  तुम्हाला वेळ देत आहे. निर्णय विचार करून घे.  माझी वस्तू घेतल्या शिवाय मी राहत नाही हे माहित आहे ना तुला.?? "   आणि त्याचा खाली कॅपिटल M आणि त्या भोवती सापा ची नक्षी. 

                   तश्या सुनीता ताई तोंडाला पदर लावून रडायला लागल्या.  "का मागे लागला आहेस म्हणावं आमच्या?  का????  अजून काय पाहिजे त्याला?  सुखाने जगू देणार आहे की नाही आम्हला? " त्या दबक्या आवाजात रडत बोलल्या. 

                आज एवढे धीराने वागणारे बाबा पण हतबल झाल्या सारखे वाटत होते.  मी करतो काहीतरी नक्की. असे म्हणत त्यांनी एक फोन लावला.

             "हो माहित आहे रात्र झाली आहे....  पण वेळ च तशी आली आहे. " ते  अगतिकतेने फोन वर बोलले.

              "................." समोरून ती व्यक्ती बोलली." please काहीतरी करा.  मी हात जोडतो. माझ्या परिवारा ला काही झालं तर....... "  बाबा ना आता रडू यायला लागलं होतं.

              "काही झालं तरी तुम्हांला काही होऊ देणार नाही. " समोरून ती व्यक्ती बोलली.  " मी सांगेल तस वागा फक्त.  आणि मी एक नंबर देतो.  वेळ आल्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा. " समोरच्या व्यक्ती ने आश्वासन दिले.

             मीनू पाय आपटचं रूम मध्ये आली.  आणि चिडून बेड वर बसली.  "आज काल ना....  बाबा जास्त च सीक्रेट ठेवायला लागलेत.  त्या दिवशी पण रूम मध्ये काहीतरी सिरीयस चर्चा चालू होती त्यांची. " ती विचार करत बोलली.  "काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्कीच...... " ती बेडवर विचार करत पडली तसेच तिला झोप लागली.

             
              11 वाजत आलेले असतात दुपारचे. "अग चहा तरी घे मीनू.... " सुनीता ताई ची 4 थी वेळ होती तिला हे सांगायची.

               "हो ग....  थांब तू जरा...  " मीनू टेन्शन मध्ये बोलली.  आज मीनू चा रिझल्ट आहे.  आणि तिला भयंकर टेन्शन आलेलं आहे.  किती पण हुशार असलं तरी रिझल्ट च टेन्शन येणारच ना.  तर त्यात आई च 4 वेळा झालं चहा घे असं सांगून.

                  "मीनू दादा.....  तूच पहिली येणार आहेस....  आम्हाला माहित आहे....  तू शांत राहा बर जरा. " बाबा तिला समजावत म्हणाले. पण आज ती कुठल्याच गोष्टी ने रिलॅक्स होणार नव्हती. तिने काल च अर्जुन च खुप डोकं खाल्लं होतं की मला बेक्कार टेन्शन येत आहे.  एवढं की.....  शेवटी अर्जुन ओरडला तेव्हा तिने चॅट बंद करून झोपली ती.

                 "मीनू दे बर तुझा नंबर,  झाली site ओपन.  बाबा लॅपटॉप समोर बसुन बोलले. "

                  तस तिला अजून टेन्शन आलं.  तिने गडबडीत एक नंबर चुकवला तर तिथे दुसरं कोणाचा रिझल्ट ओपन झाला.  तसे बाबा नि स्वतः तिच्या कडून हॉल तिकीट घेऊन नंबर चेक केला.  आणि रिझल्ट ओपन झाला.  तसे बाबा ओरडले च मोठ्याने.  "सुनीता चल आन पेढे लवकर..... 1st क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं आहे मीनू ने. "

                  तशी मीनू उड्या च मारायला लागली.  सुनीता ताईंनी देवा पुढे पेढा ठेवला.  आणि तिला पेढा भरवला.  त्यांना परत भरून आलं.  "देवा माझ्या परिवारा ला कोणाची नजर नको लागायला.  " त्यांनी तिच्या चेहर्यावरुन हात फिरवून स्वतःच्या जवळ बोट मोडली.  बाबा पण उठले.  त्यांनी मीनू ला मिठीत घेतलं.  तस मीनू ला खुप छान फील झालं.  कस असत ना....  मुली ला तिच्या वडिलांच्या मिठीत जेवढं सुरक्षित वाटत ते दुसरीकडे कुठे च नाही.  मीनू अजिबात जास्त भावनिक वैगरे नाही.  पण आज तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागल.  तिने वर बाबांच्या चेहऱ्याकडे पहिले...  तर त्यांच्या पण गालावरून अश्रू ओघळत होते.मीनू त्यांच्या पासून बाजूला झाली.  तिने आई बाबा ना सोफ्यावर बसवलं. दोघांना पेढा भरवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या पायाशी तशीच बसली.

               "बाबा.....  आई.....  एक विचारलं तर खरं खरं सांगताल?  "  तिने वर पाहत विचारले.  बाबा नि हो म्हणून मान हलवली.

                " कसलं टेन्शन आहे का?  तुम्ही आजकाल जास्त च काळजीत दिसतात.  म्हणजे आता तुम्ही मला असं पकडलं होतं की जसं मला कोणीतरी दूर नेणार आहे तुमच्या पासून........  " आता तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं.  तिने ते पालथ्या मुठी ने पुसलं. 

                 आई पण पदराने डोळे पुसत होती."असं काही नाही बाळा......" बाबा भरल्या कंठा ने बोलले...  त्यांना पुढे बोलायला पण सुचत नव्हतं.  कस असत ना.... बाबा लोक स्वतः साठी कधी एक पाण्याचा टिपूस पण डोळ्यातून काढणार नाही पण मुलींसाठी काहीच सहन नाही करू शकत. 

            त्यांना किती दुःख होतं आहे ते पाहून ती हुंदके देत रडू लागली.  उठून त्यांच्या शेजारी बसली.  "बाबा....  माझ्याकडे पाहा..... " ती त्यांचा चेहरा तिच्या कडे वळवत बोलली.  "मी तुमची स्ट्रॉंग मीनू आहे.  हो ना... " ती त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलली.

            तसे बाबांनी हो असे म्हणत मान हलवली.  "मग मला सगळं सांगा....  आपण मिळून याचा सामाना करू...  पण रडू नका.....  तुम्हाला असे पाहू नाही शकत ओ बाबा.... " असे म्हणत ती ओंजळीत चेहरा लपवून हमसून हमसून रडू लागली.

               तिला असं पाहून शशिकांत रावांनी धीर गोळा केला....  स्वतः ला शांत केल.  सुनीता ताई नि आतून जाऊन पाणी आणलं.  त्यांनी 2 घोट पाणी पिलं.  मीनू ने पाणी पिलं.  मग ते बोलले,  "बाळा....  आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची....  काही झालं तरी आपण चांगल्याचीच  बाजू घ्यायची.... असच शिकलो ना आपण लहानपणापासून?  असच शिकवलं आम्ही तुला....  आमच्या विध्यार्थ्यांना.... "

                तसे मीनू ने होकारार्थी मान हलवली..... 

              "एका गुन्हेगारा च्या विरोधात साक्ष दिली होती बाळा...  खुप वर्षा पूर्वी...  तो जेल मधून बाहेर आलाय....  आणि आता माझ्या मागे लागलाय.... मला नाही माझी काळजी बाळा....  तुझी काळजी वाटते... " ते माये ने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलले.  " तू प्रॉमिस कर.....  तू स्वतः ची काळजी घेशील....  कोणाच्या बोलण्यात फसणार नाही....  लगेच कोणावर विश्वास टाकणार नाही..... प्रॉमिस कर बाळा... "

                  "मी प्रॉमिस करते बाबा....  तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका...  माझे बाबा माझे हिरो आहेत....  आज मला तुमचा खुप जास्त अभिमान वाटत आहे बाबा.... " ती त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली.  परत अचानक लक्षात आल्या सारखी बोलली,  "बाबा......  अर्जुन सरांना सांगायचं का हे....  ते काहीतरी मदत करतील च.... " नवीन आशेचा किरण दिसल्या सारखा तिच्या अश्रुनी भिजलेला चेहरा चमकून उठला.

                 तसे बाबा दचकले... "नको नको...  अजिबात नको...  तू काही करू नको...  उगीच त्यांच लक्ष तुझ्याकडे जायला नको. " ते घाबरत बोलले. 

                     तशी ती पण जरा दचकली.  पण सावरत बोलली,  "नाही सांगत बाबा...  तुम्ही रिलॅक्स व्हा plz."

                    तो पर्यंत आई ने परत चहा आणला.  "आता तरी चहा घेशील ना?  एवढे छान मार्क्स नि पास झाली आहेस. " त्या चेहऱ्यावर मंद हसू आणत बोलल्या.  आईच्या चेहऱ्यावर वरच्या आंनदाने सर्व दुःखा चा विसर पडतोच.

                 "हो नक्कीच घेनार....  तुझ्या हातचा चहा वीक पॉईंट आहे माझा.....  बाबा ना पण आन चहा....  एवढं अश्रू गळाले त्यांनी....  डिहायड्रेशन झालं असेल त्यांना. " ती बाबांच्या कपाळावर ओठ टेकवत हसत बोलली. 

                 " मुलगी बापाची दुसरी आई असते असे म्हणतात ते उगीच नाही. " बाबा प्रसन्न हसत बोलले.  तसे सुनीता ताई पण बोलल्या, "किती समजूतदार आहे आपली मीनू.  "

               "माझा कौतुक सोहळा संपला असेल तर चहा देशील का आई?  सकाळपासून पाण्यावर आहे फक्त.  किती वाजले बघ. " मीनू नाटकी चिडत बोलली.

              "माझा डायलॉग मला च मार....  आणते हा. " त्या लगबगी ने आत गेल्या.  बाहेर आल्या.  तसे त्यांच्या हातात इडली अन चटणी.

               "wow आई...  तू जगातील बेस्ट आई आहेस..." आई कडे फ्लयिंग किस देत मीनू बोलली आणि पटकन टीपॉय जवळ ओढत सोफ्यावर मांडी घालून बसली.  आई ने बनवलेली इडली तिची खुप फेव्हरेट होती.  आणि सुनीता ताई नि आज आवर्जून बनवली.  कोणी च खाल्लं नव्हतं सकाळ पासून.  तिघे टीपॉय भोवती गोळा होऊन बसले.  मनोसोक्त इडली वर ताव मारून झाल्यावर तिने चहा घेतला आणि मोबाईल हातात घेतला. 

                    तसे तिला रिद्धी चा फोन आला.  तो कॉन्फरन्स कॉल होता.  तिने फोन उचलला तसे सर्व जोरात ओरडले "काँग्रॅच्युलेशन्स bro ssssss.... " एवढे जोरात ओरडले की तिला फोन काना पासून दूर पकडावा लागला.

           "मीने आई बाबा आहेत का तिथे?  कॉल स्पीकर वर टाक  ना..... " लक्ष्मी चिवचिवत म्हणाली.

                 "ok....  ok....  तुमचं सगळ्यांचं पण अभिनंदन.  आणि फोन स्पीकर वर टाकत आहे.  तुम्ही काय वात्रटा सारखं बोलू नका.... " शेवटचं वाक्य ती जरा हळू बोलायचं.  तिने स्पीकर ऑन केला.  "हा बोला....  केला ऑन स्पीकर...  आई बाबा पण आहेत....  " ती फोन समोर टीपॉय वर ठेवत बोलली.

                   " काका ssss... " आदी जोरात ओरडला... "मीनू 1st आली आहे कॉलेज मध्ये...... " "yehhhhh.... " आता सर्व मिळून ओरडले तसे बाबा पण त्यांच्या बरोबर ओरडले....

                    "wow,  m soooo happy... " मीनू पण ओरडतच बोलली.  कॉल कॉन्फरन्स वर असल्यामुळे त्यांचा एव्हडा गोंधळ चालू होता की बस....  "

                    शेवटी रिद्धी ने शहाणपणा करत सगळ्यांना आता कॉलेज ला या...  सेकंड इयर च्या ऍडमिशन ची प्रोसिजर सुरु करावी लागेल असे आठवण करून दिली.

                 " yehhh...  आपण भेटणार लवकरच..... " विनू उत्सहाने ओरडला. 

                    "हा हा चल माहित आहे तुला कोणाला भे..... " आदी बोलत होता की तेवढ्यात लक्ष्मी त्याला तोडत मध्ये बोलली, " काका काकू....... ते......तुम्ही येणार का तिला सोडवायला?  आमचा एवढा छान रिझल्ट लागला आहे..  आणि मीनू कडून पार्टी पण घ्यायची आहे आम्हाला... " लक्ष्मी ने मध्ये बोलत वेळ मारून नेली. 

                 " हो पाहू पोरांनो काय होतं ते...  बहुतेक येऊ आम्हीच तिला सोडवायला. " बाबा हसत बोलले. 

                 एकमेकांना bye बोलत पोरांनी फोन ठेवला.आता जायचं म्हणल्यावर आवरायला सुरुवात करावी असा विचार करत ती रूम मध्ये गेली.  तसे तिला अर्जुन चा फोन आला....  पूर्ण एक महिन्याने अर्जुन ने कॉल केला आहे.  तिने एक्साइटमेंट मध्ये फोन उचला....

                  "hello... "

                  तिचा उत्साहाने भरलेला आवाज ऐकून अर्जुन पण खुश झाला.  आफ्टर ऑल मीनू happy आहे.
                 "hello मीनल... " मिस मीनल पासून मीनल वर यायला अर्जुन ला पूर्ण 6 महिने लागले.

                 "अर्जुन सर......"  ती जवळ जवळ ओरडतच बोलली. "गेस व्हॉट...  "

                  " तुम्ही 1st आला आहात कॉलेज मध्ये... " तो गालात हसत बोलला.

                  "काय तुम्ही......  तुम्हाला सर्व माहित असत......  माझा मूड घालवला सांगायचा. " ती गाल फुगवत बोलली. खरं तर तिला खुप छान वाटलेलं असत की त्याला तिचा रिझल्ट आधीच माहित आहे.

                   तसे अर्जुन ला हसायला आलं.  किती हक्काने रुसते माझ्यावर. , " ओह्ह मी काय बोललो का आत्ता?  मला तर नाही आठवत..."

                       तसे मीनू खदखदून हसते.  "तुम्ही पण ना..... "

                      "मी पण ना.... काय??? " तो जरा वेगळ्या टोन मध्ये विचारतो.

                       तसा तिचा चेहरा लाल  झाल  "उंहू...  काही नाही... " ती दबक्या आवाजात बोलली. 

                    तसे अर्जुन ला समजलं ती लाजली आहे ते.  त्याला खुप हसायला येत.  ही खरंच किती गोड आहे.  समोर असती तर तिचे गाल... " ए वेड्या...  तुझं काय मधेच?  " तसा तो पुढे बोलला "मग कधी येणार कॉलेज ला?"

                    तसे तिला कॉल वेटिंग वर पडला.  " दक्ष कॉल करतोय,  थांबा त्याला पण घेते कॉन्फरेन्स वर. "

               "मीनल.... " अर्जुन काही बोलणार पण तो पर्यंत त्याचा कॉल होल्ड वर गेला.

                  "मुद्दाम करत असणार मला चिडवायला.  दक्ष कशाला हिला कॉल करेल... "  तो पर्यंत कॉल मर्ज झाले. 

               "काँग्रॅच्युलेशन्स डिअर मीनू...... " दक्ष चा आवाज त्याच्या कानावर पडला.  डिअर??? डिअर म्हणायची काय गरज आहे?  आणि हा कधी पासून मीनू म्हणायला लागला." तो मनात चरफडत बोलला.

                "थँक यू दक्ष." मीनू हसत बोलते. 

                    तसे अर्जुन ला खुप जेलस फील होतं.    
                 "hello दक्ष..... तुला आज बरा वेळ मिळाला?"

             अर्जुन चा आवाज ऐकून त्याचा मूड च गेला.  "hello अर्जुन.... तू तर गायब च झालास.  परत भेटला पण नाही... " दक्ष हसत बोलला. 

                    "hello..... मी पण आहे म्हणलं... " मीनू मधेच बोलली. 

                   तसे दोघे बरोबर च बोलले "तू पण बोल.. " "तुम्ही पण बोला.. " तसे ती हसली.  त्यांनी जरा वेळ अवांतर गप्पा मारल्या न फोन ठेवला.

                    आज मीनू खुप आनंदी होती.  तिने आनंदाच्या भरात सर्व आवरायला घेतलं. तिचा सगळा दिवस कसा संपला ते कळलं पण नाही.

               "काही गोष्टींचा विचार करावा लागेल.....  मी आई बाबा ना असे भीती ने जगताना नाही पाहू शकत.  तुमच्यावर मी कधीच कुठंल संकट येऊ देणार नाही बाबा." स्वतः ला च प्रॉमिस करत मीनू झोपली.

                                                क्रमश :

🎭 Series Post

View all