हे नाते जन्मांतरी चे भाग 13

Thanks friends. For your support and love. This is 13th part of He Nate Janmantri che. This story about minu... a happy go lucky girl, her family, her freinds. Love story, little suspens. Plz stay tuned for more parts and entertainment. Tha

हे नाते जन्मांतरीचे भाग-13

     मागील भागात आपण पाहिलं की,  सर्व गँग ट्रेकिंगसाठी जाते,  त्याचवेळी ट्रेकिंगसाठी अर्जुन पण तिथे आलेला असतो,  मीनू अर्जुन वर नाराज असते, आणि त्याच नादात फिरत असताना तिचा पाय घसरतो,  आणि ते कठड्यावरून पडणार तेव्हाच तिला कोणतरी सावरत. 

    आता पूढे- 

     काही वेळा ने मीनू ने डोळे उघडले..... तिच्या हृदयाची धडधड बऱ्या पैकी कमी झाली.  तीच लक्ष वर...  तिच्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या एक चेहऱ्याकडे गेले.  एका अनोळखी व्यक्ती च्या मिठी मध्ये आपण आहोत हा विचार मनात येताच ती पटकन त्याच्या पासून दूर होयचा प्रयत्न करू लागली.  इकडे याच्या गावी पण नव्हते की मी हिला पकडले आहे आणि ही सुटायचा प्रयत्न करत आहे.......  त्याच्या लक्षात आले तसे त्याने तिच्या भोवती चे हात सोडले व तो तिच्या पासून 2 पाऊले मागे जाऊन उभा राहिला. 

         " sorry......  ते तुम्ही पडणार होतात.....  ते तुम्हाला सावरायच्या नादात......  चुकून झालं.... " तो गडबडून गोंधळून बोलला.  
          " Thank you so much sir." मीनू अदबीने त्याला बोलली.
          तसे गँग पळत जवळ आली..... " मीनू ठीक आहे ना?  काय करत होती इतक्या कडे ला?  वेडी आहेस का?  आज हे नसते इथे तर? " लक्ष्मी पॅनिक होत बोलली.  
         "Sorry खरंच....  माझं चुकलं... " मीनू नाराजीने बोलली.  
          "थँक्स sir तुम्ही मदत केली." विनू अन आदी ने पण त्याचे आभार मानले. सर्व मीनू आणि त्याच्या भोवती गोळा झाले होते.  
          अर्जुन सावकाश तिथे चालत आला.  
"थँक्स mr. दक्ष.... " त्याने येऊन त्या अनोळखी व्यक्ती बरोबर शेकहॅण्ड केल.  तसे बाकी लोक पाहत राहीले. 
        "अर्जुन सूर्यवंशी...... " दक्ष मोठ्या ने ओरडलाच.  "कधी आलास???  And Don't tell me की तू कॉलेज ग्रुप बरोबर ट्रेक करत आहेस. " तो हसतच बोलला.  
         " 6 महिने होत आले.  इकडे ट्रान्सफर झालेली. " अर्जुन जरा नजर चोरत हसतच बोलला.  त्यांच्या बोलण असं चालू होत जसे की बाकी कोणी नाही च तिथे.  
         "काय???  न तू आत्ता तोंड दाखवत आहेस?  ते पण ऍक्सिडेंटली??? " दक्ष वैतागून बोलला. 
बाकी सर्व त्यांच्या तोंडाकडे पाहत होते.  
          "तुझ्या फ्रेंड्स ची ओळख करून दे ना? " दक्ष हसत बोलला.  (दक्ष नाईक.  चंद्रपूर मधल्या मोठ्या बिझनेसमन चा मुलगा........  त्याचे मोठे हॉटेल्स पण आहेत शहरांत.  चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला दक्ष मनाने मात्र सोन्या सारखा आहे......  अर्जुन चा कॉलेज चा बेस्ट फ्रेंड आहे.  त्याचा बद्दल पुढे पुढे माहित होईल च.)
          "हे आमचे फ्रेंड नाही आहेत.... " लक्ष्मी अग्रेसीवली बोलली.  
           " हो.....  आणि मी यांच्या बरोबर नाही आलेलो.... मी एकटाच आलोय. " अर्जुन शांतपणे बोलला. 
            " आम्ही आमची ओळख करून देतो. " विनू तिरकसपने अर्जुन कडे पाहत बोलला,  "मी विनायक,  हा आदित्य,  लक्ष्मी,  रिद्धी,  आणि ही मीनल." विनू ने सर्वांची ओळख करून दिली.  
           " थँक्स mr. दक्ष. " मीनू ने हसत परत एकदा त्याचे आभार मानले.  तसे दक्ष तिच्याकडे पाहून हसला.  त्याला मीनू छान आवडली होती. 
            एवढं झालं पण मीनू ने अर्जुन कडे पाहिलं पण नव्हतं.  तिने पाणी पिलं.  "चला फ्रेंड्स.....  मी ठीक आहे....  आणि सॉरी...  परत एकदा मी गोंधळ घालून तुम्हाला डिस्टर्ब केल." 
            "हो का?  खुप शहाणी.....  आधीच काल पासून तोंड पाडून बसली आहे....  त्याचा नादात झाला असणार आत्ता चा मिसहॅप...  आणि आता तू सेंटी मार.... " रिद्धी मागचा पुढचा....  आजूबाजूला कोण आहे याचा विचार न करता बोलली. तसे अर्जुन चा चेहरा पडला ते मीनू च्या लक्षात आले.  
        दक्ष त्यांच्या बोलण ऐकत मिनूकडे पाहत हसत होता. "काय झालं?  ब्रेकअप??? " त्याने त्याच्या नेहमीच्या हसणाऱ्या अंदाजात विचारलं.  तसे मीनू रागावली.  " नाही mr. दक्ष...  तुमचा अंदाज चुकलेला आहे. चला जाऊयात. " मीनू चिडून बोलली.  
          ती गेली त्या दिशेने ला पाहत दक्ष मोठा श्वास सोडत छाती वर हात ठेऊन बोलला, "I like her... " तसे अर्जुन ने चमकून त्याच्याकडे पाहिले.  दक्ष ची ही नेहमी ची सवय आहे हे त्याला माहित होत तरी पण तो मीनू साठी असे बोलला ते पाहून त्याला अस्वस्थ वाटायला लागल.  
          "चल चॅम्प....  आता बोल....  का कॉन्टॅक्ट नाही केला एव्हडा दिवस?  ते पण इथे असून?  एकटं ट्रेक?  बेस्ट फ्रेंड असताना?" दक्ष ने प्रश्न विचारायला सुरुवात केली. 
           " बस की....  किती प्रश्न????  एव्हडा दिवसातून भेटलो आहे... बोलू जरा...  चल बसू.. " 
दोघे निवांत बसले होते.  खुप दिवसांनी भेटलेले मित्र...  काय बोलू किती बोलू असं झालेलं. 
         जरा पलीकडे गँग नि पण बसायला घेतलं.  विनू च्या आणि आदी च्या घरून नाश्ता दिला होता. त्यांच्या जोरात खायचं काम चालू होत.  
         " मला नव्हतं वाटलं अर्जुन sir इथे भेटतील. " विनू खात खात बोलला. 
          " हो मला पण..... आजपण असं वाटलं की ते घाबरले मीनू पडली असती तर....  पण आता माझा त्यांच्यावर विश्वास नाही." लक्ष्मी बोलली. 
           " ते आपल्यावर पाळत तर ठेवत नसतील ना?  म्हणजे बघा ना मित्रा बरोबर बसले आहेत पण लक्ष इकडेच आहे." रिद्धी त्यांच्याकडे पाहत म्हणाली. 
         त्या सर्वांनी त्यांच्याकडे पाहिलं.  दक्ष त्यांच्याकडे पाठ करून बसला होता...  अर्जुन चे तोंड यांच्या कडेच होत.  सर्वांनी असे पाहिल्यामुळे तो चपापला...  आणि त्याने पटकन इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली.  त्याची तशी कंडिशन पाहून मीनू खुद्कन हसली. 
             " हे बर आहे.....  रडणार पण त्यांच्यामुळे....  आणि हसणार पण त्यांच्यामुळे.... " आदी तिला चिडवत बोलला.  तसे नेहमी प्रमाणे गँग ओsss असे सुरात ओरडले.  
             " असे काही नाही....  मी खरं तर काल च ठरवलं आहे  की मी त्यांचा विचार आता करणार नाही." मीनू खाली पाहत बोलली. 
             " खरं सांगू....  काल bro ने एव्हडं सांगितल की ते रूडली बोलले अन ऑल...  पण त्यांचा चेहरा वेगळं चालू सांगत आहे....  आता पण.... " विनू बोलला. 
            "खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत....  असे कोणाबद्दल लगेच मत बनवू नये. " रिद्धी वडिलकी चा सल्ला देत असल्या सारखं बोलली.  
            मीनू च्या डोळ्या समोर अर्जुन ला हत्ती सारखे अजून 2 दात बाहेर आलेले आहेत असे चित्र आले.  तसे ती खळखळून हसायला लागली.  बाकी सर्व मात्र तिला पाहत राहतात.  "कालपासून हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. " आदी दुःखी सुरात बोलला. 
           पलीकडे बसलेला अर्जुन मीनू च्या निखळ हास्य पाहून गालात हसत होता.  
            " तू सारखा काय yar तिकडे बघत आहेस??? " दक्ष वैतागून मागे पाहत बोलला.  त्याला हसणारी मीनू दिसली तसे तो पण हसला.  आपण पण त्यांच्या बरोबर जाऊन बसावं असं दक्ष ला मनोमन वाटल.  " अच्छा...  तुझे फ्रेंड्स का?  चल चल जाऊ त्यांच्याकडे.  काहीतरी खात पण आहेत वाटत....  " दक्ष उठत म्हणाला.  "अरे जाऊदे ना...  आपण एवढ्या दिवसाने भेटलो आहोत....  आपण बोलू ना... " अर्जुन बोलला.  खरं तर अर्जुन ला पण त्यांच्याकडे जायचे आहे.  मीनू ला sorry बोलायचं आहे.....  पण दक्ष असताना अजिबात नाही....  अर्जुन च्या भाषेत दक्ष फाटक्या तोंडा चा आहे.. त्याच्या तोंडातून कोणतेपण शब्द कधी पण गळू शकतात.  तो पर्यंत दक्ष लांब लांब ढांगा टाकत त्यांच्या पर्यंत पोहचला पण........ 
              "Hello new friends... " तो बत्तीशी दाखवत बोलला....  "मला वाटत तुमच्या सुंदर मैत्रिणीचा जीव वाचवल्या बद्दल तुम्ही मला नाश्ता ऑफर करायला हरकत नाही." 
             " हो sir,  प्लीज बस ना.... " विनू बोलला.  तो पर्यंत अर्जुन पण आला. "अर्जुन sir प्लीज तुम्ही पण बसा. " विनू नाईलाजाने बोलला.  
              "My little friends... तुम्ही तुमच्या लाडक्या अर्जुन सरांना सर वैगरे म्हणून सन्मानित करू शकता......  पण मी मात्र साधा,  गरीब,  नॉन गव्हर्मेंट माणूस...  प्लीज तुम्ही मला फक्त दक्ष म्हणा."  दक्ष बोलला.
         " झाला हा सुरु....  " अर्जुन मनातल्या मनात डोक्याला हात मारत बोलला, "आता याला आवरणार कोण? " 
         तसे सर्व हसले. "तू किती कूल आहेस दक्ष... " आदी हसत बोलला.  
          "हो ना.....  नाहीतर काही लोक... " मीनू तिरकस अर्जुन कडे पाहत बोलली. 
           दक्ष च्या लक्षात आलं ती अर्जुन ला बोलत आहे.  तसे दक्ष हसला.  "You know मीनल... " तोंडात सँडविच चा तोबरा भरत दक्ष बोलला....  पण तोंडातला घास असल्याने त्याला पुढचं बोलायला 2-3मिनिट थांबावं लागलं.  "तुमचे अर्जुन sir कॉलेज मधले सर्वात हुशार व्यक्तिमत्व....  ग्रॅजुएशन च्या लास्ट इयर ला असताना याने कॉम्पेटेटिव्ह एक्झाम क्रॅक केली आहे.  अतिशय हुशार.  रिया ला पण मग टाकलं याने.... " रिया च नाव येताच अर्जुन चा चेहरा पडला.  ते मीनू ने ओळखलं.  पण या गोष्टी शी दूर दूर पर्यंत संबंध नसलेला दक्ष पुढे बोलला.... "त्या मुळे हा खडूस असला तरी चालते.  पण मनाने खुप छान आहे हा.  नंतर तर रिया पण आमची फ्रेंड बनली.  हो ना अर्जुन.....  रिया...  व्हेरी स्मार्ट गर्ल...." तो अर्जुन कडे पाहत बोलला...  
         "हो ना.....  खुप स्मार्ट....  रिया... " अर्जुन अगदी स्वप्नाळू चेहऱ्याने बोलला...  तसे गँग मधल्या लोकांनी सूचक रीतीने एकमेकांकडे पाहिले.
             अर्जुन जरा भानावर आला,  या दक्ष ला आवरायला पाहिजे... असा विचार करून अर्जुन बोलला,  "so....  मला वाटल की तुम्ही जाणार आहात आज घरी...  काल परीक्षा संपली ना..... "
             "अरे वा.....  DySp साहेब.....  तुम्ही शहराच्या माहिती बरोबर पोरांच्या शाळेच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची पण माहिती ठेवता वाटत....  छान छान..... " दक्ष त्याची खेचत बोलला.  
        तसे लक्ष्मी खोचकपणे बोलली... " हो अर्जुन sir तुम्हला कसे माहिती?"
          "अरे, काल ते मिन..... " त्याने पटकन पुढचं वाक्य गिळलं....."दक्ष ला माहित झालं तर तो माझं जगणं मुश्किल करेल...."  अर्जुन वैतागत मनात बोलला.  " मी ना....  ऐकलं....  साळुंखें बोलताना की आता कॉलेज ला सुट्ट्या लागतील.... " तो सुटकेचा निश्वास टाकत बोलला.  
      "अच्छा हे पोर आज घरी जातील असे पण साळूंखे च बोलले? " दक्ष न समजल्या सारखं इनोसंट चेहरा करत बोलला.  
        "गप ना दक्ष....  मी पोलीस आहे का तू???  किती प्रश्न अन शंका तुला? " अर्जुन वैतागत बोलला. तसे दक्ष आणि बाकी खुप हसले. हसणारी मीनू ला दक्ष आणि अर्जुन दोघे मन भरून पाहत होते.... 
        "आम्ही जाणारच होतो....  पण मीनू खुप नाराज होती..  मग म्हणलं तिला जरा चिअर उप करूयात...  उद्या जाता येईल... " रिद्धी बोलली. 
         "सही बात....  दोस्ती हो तो ऐसी... " दक्ष सँडविच च घास तोडत बोलला. अर्जुन वैतागत होता.  त्याला मीनू ला sorry बोलायचं आहे पण या दक्ष मुळे ते आता तरी अजिबात possible नव्हतं.  
           चला निघुयात...  10 वाजत आले...  विनू बोलला तसे सर्व गँग निघाली. Bye दक्ष...  bye अर्जुन sir...  पोर सर्वाना दोघांना bye बोलून निघाले.  
       तसे मीनू थांबली अन परत वळली.  अर्जुन ला खुप आनंद झाला.  ती जवळ आली.... आणि ती दक्ष चा हात हातात घेत बोलली, "दक्ष आज तू नसतास तर...... thank you so much.... " ती मनापासून दक्ष चे आभार मनात बोलली.  तिला परत स्वतः च्या एवढ्या जवळ पाहून दक्ष ची तर कधीच विकेट पडली होती.  तर ती दक्ष बरोबर एवढं हसून हातात हात घेऊन बोलत आहे ते पाहून अर्जुन ला खुप जेलस फील होत होतं.  
          "Its ok डिअर.....  " दक्ष नेहमी च्या चार्मिंग स्माईल ने बोलला "ok bye...  पाहू परत कधी भेट होते ते. "
          त्याला परत एकदा bye बोलून ती गेली. 
अर्जुन?  अर्जुन ला साधं bye पण केल नाही.  " याच्याशी एव्हडं हसून बोलली.  मला साधं bye पण नाही?  मानलं माझं चुकलं.....  पण म्हणून असं वागायचं का???? " तो मनातच चरफडत  बोलला.  
            ती गेली त्या दिशेने पाहत दक्ष बोलला,  "चल अर्जुन आपण पण निघू. आणि भेटत जा बाबा.  स्वतः कडे लक्ष दे अर्जुन." अर्जुन ने हसून मान हलवली.  दोघे गप्पा मारत खाली उतरले.  एकमेकांना hug करून ते निघाले.  
           दक्ष ने कानात एअर पॉड्स घातले.  बुके सुरु केली.  छान मेलडी सॉंग्स ऐकत तो निघाला.  आज त्याला खुप भारी फील होत होतं.  त्याला तिचा सकाळ चा चेहरा आठवला....  कार मधून बाहेर पाहणारी उदास पण सुंदर मीनल..... तिचे हवेवर उडणारे केस.... स्वतः च्या च विचारात गुंग....  आणि नंतर वर गेलो तर तिच्या च मागे फिरत राहिलो....  ती पडणार तेव्हा तिला सावरताना....  ती माझ्या मिठीत होती काही मिनिटा साठी......  ते आठवलं तसा तो जरा लाजला..... 

******
       
       अर्जुन घरी आला... पूर्ण दिवस काय करायचं हा विचार तो करत होता...  पोलीस स्टेशन ला जाऊ का?  अजून 11 पण नाही वाजले..   नको च.....  आई ला सरप्राईज देऊ.....  तो मनातच विचार करत हसला.....  आणि निघाला.  
            त्याला एवढ्या लवकर आलेलं पाहून स्नेहलता ताई ना खुप आनंद झाला.  अर्जुन चा आजचा मूड पाहून त्या खुप खुश होत्या.  अर्जुन ने सकाळी घडलेलं सर्व सांगितले.  आज अर्जुन एवढा भरभरून बोलत होता.  किती तरी वर्षातून तो एवढा भरभरून बोलत आहे.  देवा माझ्या अर्जुन ला सुखी ठेव....  स्नेहलता ताई ने देवा ला प्रार्थना केली. 
          पूर्ण दिवस आई बाबांबरोबर घालवल्या नंतर अर्जुन ला पण खुप फ्रेश वाटले.  काही झालं तरी मीनल ला उद्या सॉरी बोलायचच हा विचार करत तो झोपी गेला.  खरं तर त्यांना आजच्या प्रसंगा मुळे खुप इंसेक्युअर वाटत होतं.  लवकरात लवकर तिच्याशी बोलाव लागेल...त्याने ठरवलं.  
           सकाळी सहा ला च उठून तो आवरून निघाला.... त्याने आज कार घेतली होती.  साधारण 6:30 पाऊणे सातला च तो मीनू च्या रूम बाहेर पोहचल.  (ऑफ कोर्स त्याला MLC मुळे मीनू चा ऍड्रेस माहित आहे. ) 

******
   
      सकाळी 6 पासून रिद्धी मीनू ला उठवत होती. पण मीनू काही उठायचं नाव घेत नव्हती.  "अरे अर्जुन sir तुम्ही इथे?" रिद्धी आश्चर्याने बोलली.  तसे मीनू ने खाडकन डोळे उघडले.  ती पटकन बेड वरून उठत पाळत हॉल मध्ये आली.  तिचे विस्कटलेले केस,  शॉर्ट,  टीशर्ट,  आणि झोपाळलेला चेहरा... आणि तिची उडालेली धांदल पाहून रिद्धी पोट धरून खदखदून हसायला लागली. तिने मस्करी केली हे लक्षात येताच मीनू तिला मारायला पळाली.  
         "असं नुसताच म्हणायचं हा....  मी समोर पण जाणार नाही त्यांच्या अन विचार पण करणार नाही.....  पण तू तर झोपेत पण विचार करते त्यांचा....  काल सगळं लक्ष अर्जुन सरांकडे...." रिद्धी तिला पळत पळत तिला चिडवत होती.  
           तसे मीनू थांबली......  रिद्धी बरोबर बोलत आहे..  तिला पण माहित होतं...  पण ते स्वीकारायला ती तयार नव्हती....  "आता  आवर...  निघायचंय आपल्याला.  मला बस आहे 8 वाजता.  तुला पण ट्रेन आहे. " रिद्धी बोलली.  दोघी नि पटपट आवरलं.  सात सव्वा सात ला दोघी बॅग ओढत बाहेर आल्या.  मीनू लॉक लावत होती. 
              "अर्जुन sir.... " रिद्धी चा आश्चर्यचकित झालेला आवाज आला.  "गुड मॉर्निंग" ती जरा हसत बोलली.  "रिद्धे...  आता नाही हा फसणार...  सकाळी झोपेत होते म्हणून फसले. " ती मागे न पाहताच कुलूप लावत बोलली.  
             "अग....  " रिद्धी पुढे बोलायला लागली तसे अर्जुन ने ओठांवर बोट ठेवत तिला बोलू नको असे सांगितले.  मीनू ने लॉक नीट बसल आहे का ते एक दोनदा ओढून पाहिले.  ती मागे वळली तसे अर्जुन ला पाहून शॉक झाली. खरं तर ती त्याला पाहून आनंदी झाली होती.  पण स्वतः च्या फीलिंग्स गोळा करत ती बोलली...  "गुड मॉर्निंग mr. सूर्यवंशी...  आज इकडे कुठे? " तिने असे तोडून बोलल्या मुळे अर्जुन ला वाईट वाटलं. " ते जरा इकडे काम होतं.....  तुम्ही निघाला आहात का?  सोडू का तुम्हाला? "   "नको" मीनू पटकन म्हणाली.  "हो." रिद्धी घाई घाईत म्हणाली.  " मला आधी बस स्टॅन्ड ला सोडा.  या मिनी मुळे आधी च लेट झाला.  मग तिला सोडा.  तिची ट्रेन नंतर  आहे.  माझी बस जाईल नाहीतर.... " तसे अर्जुन ला हसू आले .  त्याला समजलं की रिद्धी मुद्दाम करत आहे.  तसे मीनू ने मोठे डोळे केले.  ती चिडली होती.  तिने तिची बॅग उचलली आणि कार च्या मागच्या सीट वर जाऊन बसली.  तसे अर्जुन ने थंब्स अप करत रिद्धी ला हळूच बोलला "थँक्स. " तसे ती जरा हळू आवाजात बोलली,  "तिला परत हर्ट केल तर परत कधी मदत नाही करणार." 
             पाऊणे आठ वाजता ते बस स्टॅन्ड वर पोहचले.  रिद्धी आणि मीनू दोघी पण गाडीतून उतरल्या.रिद्धी ची बस लागली होती.  ती पटकन गाडीत जाऊन बसली.... मीनू तिला सतत सूचना देत होती.  अर्जुन गाडी च्या बाहेर येऊन गाडी ला टेकून उभा राहिला.  तो एकटक तिला च पाहत होता.  ती खिडकीतून रिद्धी बरोबर बोलत होती.  व्हाईट जीन्स, रेड टॉप,  व्हाईट जॅकेट  आणि तिचे कुरुळे केस...  सकाळच्या कोवळ्या उन्हात ती उमललेल्या फुला सारखी दिसत होती.  ती रिद्धी ला बाय करून वळली व गाडीकडे निघाली.  तसे तिला गाडी ला टेकून उभा असलेला अर्जुन दिसला.  "कसला हँडसम आहे हा yar.." तिच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं.  तिला स्वतः कडे पाहून हसताना पाहिलं आणि अर्जुन ला खुप स्पेशल फील झालं.  "एवढ्या छान मुलीला रडवल्या बद्दल मी मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे.  पण आता मी तुला कधीच दुःखी होऊ देणार नाही मीनल....  I Promise." तो मनातच बोलत तिच्याकडे पाहत छान स्माईल करत होता.  
          ती गाडीजवळ आली व मागचा दरवाजा उघडायला लागली.  तसे त्याने दरवाजा वर हात ठेवला. "मॅडम.... काय ड्राइवर वाटलो का मी तुमचा तुम्हाला?  पुढे बसा माझ्या बरोबर... " 
         "Ok mr. सूर्यवंशी....  " ती अटीट्युड दाखवत पुढे जाऊन बसली.  
          तसे तो गालात हसत बोलला..." mr. सूर्यवंशी.....  माफी मिळवायचं अवघड आहे. " तो गाडीत बसला.  त्याने गाडी स्टार्ट केली व त्या बरोबर छान गाणे पण सुरु झाले.  तो शांतपणे गाडी चालवत होता.  तिने हळूच एक नजर अर्जुन कडे पाहिलं...  तर तो तिच्याकडेच पाहत होता.  अचानक eye कॉन्टॅक्ट झाल्यामुळे दोघांची पण तारांबळ उडाली. काहीतरी उगीचच करायच म्हणून त्याने गाणं बदल तर जरा जास्त च रोमँटिक गाणं सुरु झालं.  तस तो अजून गोंधळाला.  त्याने गाणे च बंद करून टाकले. त्याची तशी तारांबळ उडालेली पाहून मीनू ला मात्र हसायला आलं.  
          त्याने स्टेशन कडे गाडी न घेता दुसरीकडे च वळवली. ते पाहून तिने त्याच्या कडे बघत मोठे डोळे करून विचारलं,  "इकडे कुठे? तुमचं काही काम असेल तर नंतर करा. मला लेट होईल... " ती बोलली. 
           " 10 वाजता ट्रेन आहे तुमची..." तो गाडी चालवत बोलला. तशी ती हसली.  " एक कॉफी घेऊयात मिस देसाई... " तो मुद्दाम तिला चिडवत बोलला 
           "नको mr. सूर्यवंशी....  तुमच्या बरोबर ची कॉफी कडू असते.. " ती अटीट्युड ने त्याच्या कडे पाहत बोलली.
           "उंहू...  आज नाही लागणार कडू....  " तो तिच्याकडे रोखून पाहत बोलला.
          तसे ती लाजली... " पुढे पहा ना प्लीज... " ती खाली मान घालून बोलली...  तिला तसे पाहून अर्जुन च्या पोटात हजारो फुलपाखरे उडायला लागली... "आज माझं काय खरं नाही.. " तो स्वतः ला च बोलला.  
          त्याने एका छानशा कॉफी शॉप समोर गाडी थांबवली.  दोघे उतरले.  त्याने तिला न विचारता ब्रेकफास्ट आणि कॉफी ऑर्डर केली.  ऑर्डर यायला वेळ होता.
           " मिस मीनल.... " तो जरा धीर एकवटून बोलला... "ते आज सकाळी तुम्ही विचारलं इकडे काय काम काढलं......"
             "हमममम..... " तिने फक्त हुंकार दिला.  
            " ते....  त्या दिवशी साठी माफी मागायची होती.." तो बोलला तसे मीनू चा चेहरा पडला.  ते पाहून त्याला अजूनच वाईट वाटलं.  
"प्लीज.... प्लीज..  आधी ऐकून घ्या....  माझं खरंच चुकलं....  मी तुमच्याशी एवढं रूडली बोलायला नको होतं.... माझी चुक झाली....  मी अजिबात ते नाकारता नाही....  आई...  आई पण बोलली माझं चुकलं..  मी खरंच मनापासून माफी मागत आहे.  मी काल पण तुम्हाला बोलणार होतो...  पण नाही जमलं..... I am realy sorry  miss. Minal." अर्जुन ने गोळा केलेलं गाठोडं एकदम सोडावं त्या प्रमाणे सर्व बोलून टाकलं. त्याने टेबल वरचा ग्लास उचलला आणि घटाघट पाणी पिलं. 
           मीनू च्या डोळ्यात पाणी आलं होतं.  तीने त्याच्या कडे पाहिलं...  "आई म्हणाल्या म्हणून तुम्ही sorry बोलत आहात म्हणजे?"  तिने डोळ्यातून ओघळलेले पाणी पालथ्या मुठी ने पुसलं. 
            " नाही... नाही....  मला रिअलाईझ झालं होतं...  पण आई बोलल्या नंतर मला एवढं बोलण्याचं धाडस आलं." तो तिच्याकडे पाहत बोलला  "मीनल...  बोल ना काहीतरी... " ती काहीच बोलत नाही ते पाहून तो अस्वस्थ पणे बोलला. 
          "Its ok sir....  आणि तसे पण तुम्ही वागता एक आणि बोलता एक.  तुम्ही परत असे वागलात तर. " ती नाक पुसत बोलली.
         "परत असं कधी होणार नाही मीनल... " तो तिच्याकडे पाहत हसत बोलला.  त्याची स्माईल पाहून ती परत त्याच्यात हरवली... "its ok अर्जुन सर... " ती पण मंद हसत बोलली. 
           "व्हेरी गुड... " अर्जुन बोलला.  त्याने हात पुढे केला... "फ्रेंड्स? " मीनू त्याच्या हातात हात देत बोलली "फ्रेंड्स." 
          त्यांचा ब्रेकफास्ट न कॉफी घेऊन झाले. त्याने तिला रेल्वे स्टेशन वर पोहचवलं...  
"मला पोहचल्यावर कॉल करा... माझा नंबर घ्या..." त्याने तिला नंबर दिला. 
           "Ok sir..... bye " ती त्याला bye करत बोलली.  तसे त्याला वाटलं की तिने जाऊ च नये....  पण तिला थांबवून घ्यायचं कारण पण नवतं ना...  "काळजी घ्या... " तिच्याकडे डोळे भरून पाहत तो बोलला. "हो sir...  निघते मी...  bye.. " ती बॅग घेऊन निघाली... 
    तिला जाताना पाहत अर्जुन काही मिनिट तिथे थांबला.... 
             तसे एक माणसाने साधा सा फोन कानाला लावला....  "निघाली आहे पोरगी.... खेड....ला. "
                        क्रमश:
        

             

🎭 Series Post

View all