हे नाते जन्मांतरी चे भाग 12

He nate janmatri che part 12. As you all know, this is my 1st story, in this part I am trying to explaine emotions of Arjun, hero of our story. Hope you like this part. I am very glad that you all love this series. Plz stay tuned for more parts.

हे नाते जन्मांतरी चे भाग 12

          मागील भागात आपण पहिले की अर्जुन मीनू मुळे खुप गोंधळलेल्या अवस्थेत आहे.  मीनू त्याला भेटायला जाते तर तो तिला बोलतो मला तुझ्या बद्दल फक्त सहानभूती होती.  तू याचा गैरसमज करून घेऊन नको....  दुखावलेली मीनू तसेच पावसात भिजत निघून येते..... 

आता पुढे.... 

           मीनू घरी आली.  तसेच भिजलेल्या कपड्यानिशी ती बेड वर बसली आणि तिने पाय दुमडून पोटाजवळ घेतले.  गुढग्यावर डोकं ठेऊन तीने अश्रुना वाट मोकळी करून दिली.  ती हुंदके देत रडू लागली.  किती तरी वेळ ती रडून झाल्यावर ती शांत झाली.  सावकाश उठून तिने ओले कपडे बदलले.  फ्रेश झाली.  स्वतः साठी कॉफी बनवून घेतली.  पण कॉफी मुळे तिला परत अर्जुन च बोललेलं आठवलं.  तसे तिने भरलेले डोळे पुसत ती कॉफी तिने बेसिन मध्ये फेकून दिली.  रूम मध्ये येऊन,  मोबाईल वर गाणे ऐकत ती तशीच पडून राहिली.  जरा वेळाने बाकी चौघे आल्याचा आवाज ऐकून ती सावरून बसली आणि मोबाईल मध्ये बिझी असल्याच नाटकं करू लागली.  

       रिद्धी आणि लक्ष्मी ओरडत,  गोंधळ घालतच मीनू कडे आल्या. 
         "Guess bro..... "
         "काय? " मीनू मोबाईल मधून वर न पाहत च बोलली. 
           "आपण उद्या ट्रेकिंग ला जात आहोत." लक्ष्मी मीनू च्या गळ्यात हात टाकत म्हणाली. 
           "काय?  अग आपण घरी चाललोय ना उद्या? मी तस सांगितले पण आहे बाबा ना. " 
            "मी तुला विचारात नाही,  सांगत आहे डिअर. " लक्ष्मी अटीट्युड मध्ये तिला म्हणाली. 
            "हमममम...... " मीनू ने खाली पाहतच हुंकार भरला. 
             "काय??????  इकडे बघ. " रिद्धी जवळ जवळ ओरडतच बोलली.... ती एव्हडया जोरात ओरडली की आदी आणि विनू हॉल मध्ये बसले होते ते पण पाळत रूम मध्ये आले. रिद्धी मीनू च्या समोर उभी राहिली आणि तिला बोलली, 
         "मीनू वर पहा..... " तसे मीनू ने घाबरत च वर पाहिलं. 
          " तू रडली आहेस??? " रिद्धी मोठे डोळे अजूनच मोठे करत बोलली.  
            " नाही.....  क... काहीतरीच  काय....?  वेडी आहेस का?" मीनू नजर चोरत बोलली. 
            ती रडली आहे नक्की हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते. 
            " काय झालं मीनू? " लक्ष्मी ने प्रेमळ पणे विचारलं. 
            "काही नाही म्हणलं ना." मीनू मुद्दाम खेकसत मोठ्याने बोलली.  तिला वाटलं असं राग आल्या सारखं वागलं तर परत कोणी काही विचारणार नाही.  " चला व्हा बाजूला. मी जरा बाबा ना फोन करून सांगते की उद्या नाही परवा येणार आहे." असे म्हणत बाकीच्यांकडे दुर्लक्ष करत ती बाल्कनी मध्ये गेली.  तिला परत रडायला आले.  तिला ट्रेकिंग ला पण नवतं जायचं.  पण  नाही गेले तर सगळ्यांचा प्लॅन कॅन्सल होणार.  " मी माझ्या फ्रेंड्स वर रागावले. कोणामुळे?  अर्जुन सरांमुळे? " आता तिला खुप च गिल्टी वाटायला लागले.  आता मी अर्जुन चा विचार पण करणार नाही.  असे मनात पक्के ठरवून तिने बाबा ना फोन केला.  

          इकडे मात्र तिच्या अश्या वागण्याने बाकी सर्व शॉक झाले होते.  मीनू अशी कधीच वागली नव्हती.  
       "नक्की काहीतरी झाले आहे." आदी ती गेली त्या दिशेने पाहत बोलला. 
       "ती सांगेल नक्की,  तिला जरा वेळ देऊ आपण."   रिद्धी बोलली.  "चला तोपर्यंत मॅग्गी बनवते.  विनू चहा बनवशिल का प्लीज? " असे बोलून ती किचन कडे निघाली.  विनू निघाला तसे आदी त्याचा हात ओढत बोलला.  " वाह,  आत्ताच ती म्हणेल तसे वागायला लागला तू तर.......  अवघड आहे तुझं... "  "गप ना yar....  ऐकेल की ती.  चल मी भारी चहा करतो.  तेवढंच तिला इंप्रेस करता येईल. " विनू हसत बोलला न किचन मध्ये गेला.
    रिद्धी आणि विनू चहा आणि मॅग्गी घेऊन आले.  मीनू पण आई बाबांशी बोलून आत आली.  आता पण ती रडल्या सारखी वाटत आहे.  विनू तिला काही विचारणार तसे रिद्धी ने डोळ्या ने खुणावून नको असे सांगितले.  मीनू पण त्यांच्या सोबत बसली. 
        "सॉरी guys.....  मी ओरडले तुमच्यावर." मीनू खाली पाहत बोलली.  
         " its ok मीनू.  पण तुला तू हवं तेव्हा शेअर करू शकतेस आमच्या बरोबर.  पण तू रडू नको." मीनू च्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत लक्ष्मी बोलली.  आता मीनू ला अजून रडायला यायला लागलं.  कस असत ना.  समजवायला कोणी असेल तर रडू जास्त च येत.  रिद्धी ने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत होऊ दिल. 
तिचा रडण्याचा भर ओसरला तसे रिद्धी म्हणाली,  "तू अर्जुन सरांना भेटायला गेली होतीस? " खाली पाहत मीनू ने मान हलवत हो असे सांगितले.  त्या विचाराने तिला परत रडायला आलं. तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या मांडीवर पडत होत.... 

      "मी.... मी.....  त्यांना फक्त पाहायला गेले होते.  फक्त पाहायचं होत.  पण त्यांनीच मला पाहिलं.  आणि.....  आधी ते मला पाहून एकदम happy झाले आणि मग......"  बाकी सर्व तिने रडतच सांगितले. तीच बोलून झालं.  काही मिनिट तर बाकीच्यांना काय बोलाव ते समजलं च नाही.  
         "सर नक्की sympathy च बोलले का bro?  विनु ने हळुवार पणे विचारलं.  तसे तिने मान हलवत होकार दिला.  
          "We are sorry मीनू...... " लक्ष्मी नाराज सुरात बोलली.  "आम्ही च तुझ्या डोक्यात भरवलं.... " 
          "असं नाही आहे लक्ष्मी.... " ती जरा चिडत बोलली. " तुमचं काहीच चुकलं नाही.... मी स्वतः ... मला स्वतः ला  असं वाटलं....  म्हणजे..... जाणवलं की....  he cares for me.... मला वाटलं की त्यांना पण आवडत.... मी असे अचानक समोर आलेलं...  मला वाटलं की मी पडले गाडीवरून तेव्हा.....  ते.. ते..  मला वाटलं की मी जे फील करत आहे...  ते त्यांना पण फील होत आहे. ....  त्यांनी इंडिरेक्टली मला असे सांगितलं की माझ्यापासून दूर राहा.  मग ते डोळ्यातले  इमोशन्स...  ते सगळं काय होत???  ते व्यवस्थित पण सांगू शकत होते ना??  एवढं रूडली का बोलले?  सहानभूती म्हणे....  मला ते आठवलं तरी स्वतः ची च चिड येत आहे. " मीनू बोलत च राहिली... 

        "शांत हो मीनू......  आणि तुला एकटीला च नाही तर आम्हाला पण वाटलं की सर तुला like करतात...... पण मग ते असे का वागले?? " आदी म्हणाला. 
         "जाऊदे फ्रेंड्स....  तसे पण मी असे किती वेळा भेटले होते तेव्हा त्यांना.  त्यांच्या मनात काय असेल याचा माझा मीच अंदाज लावला अन गेले तिकडे.  आता मी नाही अजिबात विचार करणार या गोष्टी चा...... चहा थंड झाला..... मी गरम करून आणते." असे म्हणत ती सर्वांचे कप गोळा करून आत घेऊन गेली.  
            " ती खुप जास्त हर्ट झाली आहे." रिद्धी उदासपणे बोलली.  
            " सहानुभूती म्हणे.....  अरे आपण किती वेळा पाहिलं त्यांना....  गॅदरिंग संपल्यानंतर आपल्याशी बोलले तेव्हा....  किती प्रेमाने पाहत होते मीनू कडे...  आणि तिला लागलं तेव्हा???  कसे आपण सोबत नव्हतो तर रागावून बोलले आपल्याला?  दुसऱ्या दिवशी पण हॉस्पिटल ला आले.  तिच्या शी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पहिली?  सहानभूती होती ही??? " लक्ष्मी रागाने धुसफुसत बोलली. 
          "शांत हो ग लक्ष्मी...  आणि बर झालं तिने सांगितले...  आता तिला पण मोकळे वाटेल.  उद्या मस्त चिअर अप करूयात तिला." रिद्धी बोलली. आज रात्री लक्ष्मी मात्र त्या दोघी ना सोबत तिथे च थांबली. 
        असेच असते ना मैत्री मध्ये.  कुणा एका चा प्रॉब्लेम त्या एकट्याचा नसतोच कधी.  तो पूर्ण ग्रुप चा असतो. 

****

       अर्जुन रात्री एकटाच रूम मध्ये बसलेला असतो.  लॅपटॉप मध्ये मीनू चा फोटो पाहत होता.  तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत तो बोलला,  "sorry मीनल.  पण मला जे योग्य वाटलं तेच मी केल." 
           "पण मग योग्य आहे तर मला एवढं वाईट का वाटत आहे?  आणि ती म्हणाली की मी घरी जाणार आहे.  मग महिनाभर पाहता येणार नाही...  कित्ती निरागस पणे बोलली. ....  किती निर्मळपणा होता तिच्या चेहऱ्यावर....  आणि तू?  तुझं हार्ट तर फुलपाखरू बनून उडायचाच राहील होत...  एवढा आनंद झाला होता तुला....  तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तुला पण दुखलं ना....  मग का तिला त्रास देत आहेस?  तुला पण त्याचा किती त्रास होत आहे...... किती वेळ झाला तिचाच विचार करत आहेस तू...... " त्याच मान त्यालाच उत्तर विचारात होत..  " या इमोशन्स....  या मुळेच हे सर्व नको वाटत......  मी नाही हा भावनांचा खेळ सांभाळू शकत.....  मी नाही एखाद्याच्या प्रेमाच्या योग्य......  " त्याने हतबल पणे ड्रॉवर उघडला.  त्यातली सिगारेट घेऊन ती ओठात पकडली.  व लायटर शोधू लागला.  लायटर सापडला तसे त्याने सिगारेट पेटवायला सुरुवात केली.....      
       " Very bad AJ.  तू प्रॉमिस तोडतोय हा माझं." गाल फुगवून,  रुसून बसलेली ती.....  तिचा चेहरा समोर आला तसे त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.  ओठातली सिगारेट भिरकावून दिली...... हाताची मूठ जोरात भिंतीवर आपटली.  त्याने बेड वर अंग टाकलं..
        आज दोघांना पण झोप येन अवघडच होत.  
       "ती जेव्हा भेटेल तेव्हा तिची मी नक्की माफी मागेल.... " अर्जुन ने मनातच हे ठरवून टाकलं. 
        " परत कधी अर्जुन सूर्यवंशी च्या समोर पण जाणार नाही." मीनू ने जाणू भीष्मप्रतिज्ञा केली.  आणि झोप येण्याची वाट पाहत राहिली... 

*****
      
        सकाळी 6 वाजताच विनू गाडी घेऊन आला.  त्याने आज कार आणली होती.  पोरी आल्या तर त्यांना दिसले की आदी न विनू चा वाद चालू आहे.  पोरींनी कार पहिली तसे लक्ष्मी म्हणाली,  " god,  तू कार आणली आहेस?  कार?  आपण bike वर जाणार होतोत ना??? " 
         "तेच म्हणत आहे मी याला." आदी तावातावा ने बोलला.. 
          " अरे ऐकून तर घ्या....." विनू बोलायचं प्रयत्न करत म्हणाला. " मी बाईक च आणत होतो.  तर आई बाबांचे मधेच....  पोरी आहेत सोबत...  कशाला बाईक वर जाता???  तुम्ही दगडं आहात.  पण पाऊस बिऊस आला अन पोरी भिजल्या तर आजारी पडतील त्या.  तुम्हांला काही नाही होणार. तर मी बाबा ना म्हणलं की अहो बाबा बाईक वर जे थ्रिल असत ना असं पावसात भिजत फिरायचं......  ते कार मध्ये नाही आहे ओ....तर चष्म्याच्या वरून माझ्या कडे पाहत काय म्हणाले माहित आहे?????  आता तू शिकवणार का आम्हाला?  थ्रिल कशात असत ते?  काय उन्हाने पांढरे झालेत का केस आमचे?" तो बाबांची मिमिक्री करत बोलला. " काय yar..... " विनू तोंड पाडत बोलला.  
        तसे सर्व हसले.  पोरींना हसतांना पाहून तो अजून वैतागला "यांच्यामुळे बाबा ओरडले मला,  पण या पहा,  मलाच हसत आहेत. "
        "बर झालं कार आणली,  माझा मूड नव्हता scooty चालवायचा. " मीनू निर्विकार पणे बोलत कार चा मागचा दरवाजा उघडून आत बसली. तसे बाकी दोघी पण मागे बसल्या. 
        खुप सुंदर वातावरण झालं होत, सकाळ ची वेळ,  जर थंडी,  आणि कार मध्ये वाजणारे मेलडी सॉंग्स. Perfect combo.  बाकी चौघे छान एन्जॉय करत होते.  मीनू पण नॉर्मल असल्याच दाखवत होती.  पण मनातून मात्र तिला यातलं काहीच नको होत.  शेवटी तिने कानात हेडफोन घातले. गाडी ची काच खाली केली.  सकाळच्या थंड हवे नि तिला जरा तरतरी आल्या सारखं वाटलं.  तिचे कुरुळे केस वाऱ्यावर छान उडत होते.  सकाळच्या उमललेल्या सुंदर फुला प्रमाणे तिचा चेहरा दिसत होता.  पण डोळे मात्र कोमजलेले च होते. 
         सर्वजण चहा घेण्यासाठी एका टपरीवर थांबले... तसे लक्ष्मी आणि रिद्धी ने फोटोज काढायला सुरुवात केली. " मला वाटतंय ट्रेकच्या स्पॉटवर पण आपल्याला भरपूर फोटो काढायला मिळतील. पटकन गाडीत बसला तर बरं होईल. " तसे त्या पळत येऊन गाडीत बसल्या. साधारण  पाऊणे सात च्या सुमारास ते स्पॉट वर पोचले.  

*****

       अर्जुन कसेबसे तास दोन तास झोपला असेल.  पहाटे पहाटे एका खराब स्वप्ना ने त्याला जाग आली.  तसा तो जागाच होता.  तो उठला.  फ्रेश झाला.  आज वर्क आउट चा पण त्याला मूड नव्हता.  स्वतः साठी एक मोठा कप भरून कॉफी बनवली.  आणि गॅलरी मध्ये जाऊन बसला.  तिथल्या फुलझाडांकडे त्याचा लक्ष गेलं. किती दिवसांनी तो त्यांना पाहत होता.  आई च कधी मधी येऊन झाडांना पाणी घालून जायची.  खुप छान बहरली होती झाडे. ती टवटवीत झाडे पाहून त्याच्या हृदयात परत कळ उठली.  आज त्याला खुप दिवसातून आई ची आठवण आली...
       "एवढ्यात भेटलो पण नाही....  " तो मनात बोलला " त्या दिवशी भेटली होती पण....... बोलता नाही आलं.  हो ना?  तुझा स्वतः चा च निर्णय ना हा अर्जुन?  कामाच्या ठिकाणी नो पर्सनल रिलेशन....  सर्वांपासून दूर जातोय का मी???? "
        त्याने मोबाईल हातात घेतला.  6 वाजून गेले होते.  त्याने आई ला फोन केला.  2-3 रिंग मधेच स्नेहलता ताई नि फोन उचलला ( हो यांनीच मीनू ला ऍक्सीडेन्ट झाल्यावर हॉस्पिटल ला नेले होते ) 
        " बोला DySP अर्जुन सूर्यवंशी,  गुड मॉर्निंग." आई हसत बोलली.  तसे अर्जुन च्या समोर तिचा निखळ हसणारा चेहरा आला.  
          "आई.....  फक्त अर्जुन म्हण ना प्लीज... 
" त्याचा गळा दाटून आला. 
          " अर्जुन बाळा,  काय झालं? " त्यांनी काळजी ने विचारलं. 
           आता मात्र अर्जुन च्या डोळ्यातून पाणी ओघळल. " काही समजत नाही ग.... " तो अगतिक होत बोलला.  "कधी कधी वाटत काही गोष्टी घडल्याचं नसत्या तर....." तो रुद्ध  कंठाने बोलला.  त्याने पटकन कॉफी चा मग तोंडाला लावला. आणि कॉफी च्या घोटा बरोबर आलेला हुंदका पण गिळून टाकला.  
       ( पुरुषांनी पण व्यक्त होणे गरजेचे आहे.  आपले माये चे कुणी जवळ असेल तर भावना व्यक्त करायला हव्यात.  जसं मुक्त कंठा ने गातात ना.....  तस मुक्त कंठाने रडता पण आलं पाहिजे.  दुःखा च्या सारी डोळ्यातून कोसळल्या च पाहिजे.  तरच तुम्ही खरे आनंदी होऊ शकता.  हृदयात जर वेदने चा सागर घेऊन फिरत असाल तर जीवनात दुःखा ची....  नैराश्या ची भारती येणारच......) 
          आई च्या डोळ्यातून पाणी आले.  
           "मीनल बरी आहे का रे?  भेट झाली का परत तुमची? " आई ने topic चेंज करायचा प्रयत्न केला. 
           "आई....." अर्जुन ने शॉक होत विचारलं,  "तुला काय माहित? " 
            "काय माहित म्हणजे....... " 
             "म्हणजे..... काही नाही....  ते... " अर्जुन चा चेहरा चोरी पकडल्या सारखा झाला. 
             " अर्जुन....  मी आई आहे...  आणि तुझं तोंड पाहून त्या दिवशी हॉस्पिटल मधल्या वॊर्डबॉय ने पण सांगितले असत की तू तिच्या मध्ये इन्व्हॉलव्ह झाला आहेस.... " आई किंचित हसत बोलली.  
           " असं काही नाही आहे.... किती वेळा सांगू तुम्हाला??? " तो चिडत बोलला. 
           "तुम्हाला?  अजून  कोणाला सांगितलं आहे तू? " आई ने आश्चर्या ने विचारलं. 
            " आई ते...  मीनल आली होती काल पोलीस स्टेशन ला....  " आणि त्याने जे घडले ते सर्व सांगितले.  
             आता मात्र आई चिडली.  " तू असे बोललास तिला???  काहीच वाटलं नाही तिला हर्ट करतांना? " 
             " आई...  मी तर... मी तर फक्त तिच्या चांगल्या साठीच सांगितल..." आता अर्जुन च त त प प होयला लागलं होत.  
             " तिच्या चांगल्या साठी?  कोणासाठी काय चांगल काय वाईट हे ठरवायचा हक्क तुला कोणी दिला अर्जुन?" आई ने त्याला फटकारलं. "सहानुभूती?  तुझा चेहरा मी पहिला होता रे अर्जुन त्या दिवशी...  स्वतः शी तरी नको खोटं बोलू.... स्वतः वर सूड उगवल्या सारखं वागू नको. "
          "Sorry आई.... "
           "Sorry मीनल ला बोल....  मला नाही. "
           "हो आई. " तो पडलेल्या आवाजात बोलला. 
            त्याचा पडलेला आवाज ऐकून आई जरा नॉर्मल झाली.  "अर्जुन....  का असे वागत आहेस?  तुला नाही का वाटत जे गेलं ते जाऊ द्यावं?  तेच उराशी कवटाळून बसलास तर कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस....  तुला असे भावना रहित वागताना पाहून आम्हला बर वाटत असेल का रे?  त्या दिवशी वाटलं कदाचित परत तुझ्या आयुष्यात सुख.....पण तू तर तिला एवढ तोडून बोललास.  हे बरोबर नाही बाळा. " 
          आता आई ने फुर्रकन नाक ओढल्याचा आवाज आला. आई रडत आहे हे त्याला कळलं.  आई ला आपल्यामुळे त्रास झाला हे पाहून त्याला खुप लाजल्या सारखं झालं. "चुकलं माझं आई. " 
           "किती दिवस झालं सुट्टी नाही घेतली? " आई ने अचानक कडक आवाजात विचारलं.  
           "ते आई.....  इथे ट्रान्सफर झाल्या पासून नाही घेतली. " तो घाबरत बोलला.  आता आई आपल्याला ओरडणार.....  त्याला माहित होत. 
             "आज तू सुट्टी घे.  जरा बाहेर फिर.  स्वतः साठी एक दिवस काढ रे...  आणि रात्री जेवायला घरी ये." आई न रागवता बोलली.  याच त्याला आश्चर्य वाटलं.  
             "हो आई... घेतो सुट्टी." 
               आई ला आश्चर्य वाटलं.  तिला वाटलं होत तो काहीतरी कारण देईल.  पण त्यांच ऐकलं म्हणून त्यांना बर पण वाटलं.  
             "Bye आई...  रात्री येतो घरी." असे बोलून त्याने फोन ठेवला.  हातातला कॉफी चा कप घेऊन तो आत गेला.  कॉफी तशीच ठेवली.  
            "मी खुप च आत्मकेंद्री झालो आहे का? " त्याने स्वतः शी च विचार केला.  त्याने पटकन एक लिव चा msg केला पोलीस स्टेशन ला. रूम मध्ये आला.  कपाट उघडलं.  त्यातून एक ब्लु जीन्स आणि येल्लो टीशर्ट बाहेर काढलं.  डेनिम च जॅकेट.  तो पटकन तयार झाला.  त्याने केसांवर कंगवा फिरवला.  परफ्युम स्प्रे केला.  तसे तो 2 मिनिट आरश्यात पाहत राहिला.  किती तरी दिवसातून अर्जुन ने असे कपडे घातले होते.  नाहीतर नेहमी युनिफॉर्म च.  उंचापुरा अर्जुन....  नेहमी वर्क आउट मुळे फिट असणारी बॉडी...  त्याचे बारीक कापलेले केस आणि करडे डोळे.  खुप हँडसम दिसत होता या कपड्यांमध्ये तो.त्याने बाहेर येऊन शूज घातले. गॉगल लावला.  खुप दिवसांनी त्याने हेल्मेट हातात घेतलं.  आणि बुलेट ची चावी घेऊन तो निघाला.  त्याने गाडी चालू केली. 
             सकाळ चा शांत रस्ता.  नुकताच सूर्य उगवलेला...  सकाळ चे 7 वाजत आले होते.  तो खुप दिवसांनी गाणे गुणगुणत होता.  आज तो किती तरी महिन्यातून किंवा वर्षातून असे वागत होता.  साधारण अर्ध्या तासात तो त्याच्या आवडीच्या ठिकाणी पोहचला.  डोंगराच्या पायथ्याशी त्याने गाडी लावली.  हेल्मेट काढले आणि छाती भरून मोठा श्वास घेतला.  2-3गाड्या आधीच पायथ्या ला लागल्या होत्या. अर्जुन कॉलेज ला असताना इथे असंख्य वेळा आला होता.  त्याचा फेव्हरेट ट्रेकिंग स्पॉट होता हा.  Yes,   अर्जुन पण ट्रेकिंग ला आला आहे.  खुप सुंदर जागा.  आता तर पाऊस पडून गेलेला.  थोडी थोडी हिरवळी ची चादर डोंगरावर पसरायला लागली होती.  अर्जुन ने कानात हेडफोन घातले.  व सराईत पणे वर चढू लागला.  त्याला वर चढायला जास्त वेळ लागला नाही. 

*****

        मीनू अन  गँग केव्हाच वर पोहचले होते.  रिद्धी धापा टाकून हैराण झाली होती. तिचा चेहरा लाल झाला होता तर तिला पाहून बाकी तिघे हसत होते.  मीनू ने तिला बॅग मधून पाणी काढून दिले.  त्यांच्या आधी पण 4-5 जण आले होते.  तिने बॉटल बॅग मध्ये ठेवली.  तसे ती जरा अस्वस्थ पणे बोलली, 
          "मी.... मी जरा एकटी फिरू का? "
           सर्वाना माहित होत तिचा मूड नाही पण ती त्यांच्या साठी सर्व ठीक असल्याचा दिखावा करत आहे. 
          " हो bro." लक्ष्मी म्हणाली.  "फक्त दूर नको जाऊ." 
           " ok guys,  तुम्ही एन्जॉय करा." असे म्हणत ती एकटी शांतपणे फिरत निघाली.  माझ्या अश्या मूड मुळे त्यांचा पण टाइम नको स्पॉईल होयला हा विचार करत ती एकटी फिरायला निघाली. वरून दिसणारा नजारा खरंच अप्रतिम होता.  डोंगराच्या एका बाजू ला शहर...  तर दुसऱ्या बाजू ला शेती संपत संपत जंगल.  आणि शहरातून जाणारी नदी.  हे सर्व खुप आल्हाददायक होत.  मीनू हे सर्व पाहत कानात हेडफोन घालून आपल्याच नादात फिरत होती. 
       अर्जुन ने बॉटल मधून पाणी पिल आणि बॅग पाठी ला अडकवली. प्रसन्न चित्ताने त्याने इकडे तिकडे पाहिलं..........  तसे त्याचा एक हार्ट बिट मिस झाला....  चेहऱ्यावर सुंदर हसू आलं.  अँकललेन्थ स्काय ब्लु जीन्स,  व्हाईट टीशर्ट, त्यावर स्लीव्ह लेस ब्लु जॅकेट.  पायात शूज.  कानात हेडफोन..... आपल्याच नादात चालणारी मीनू त्याला दिसली.  तिचे कुरुळे केस वाऱ्यावर बेधुंद पणे उडत होते.  एवढे सुंदर वातावरण....... आणि कानात वाजणारे रोमँटिक सॉंग.  आज अर्जुन पहिल्यांदा तिच्यावर खरंच फ्लॅट झाला.  पण तिचा नाराज चेहरा पाहून तो उदास झाला.  ती आपल्यामुळे नाराज आहे हे त्याला माहित होत.  त्याला खुप वाईट वाटलं.  तिला sorry बोलायला तो तिच्याकडे निघाला...  खर तर ती त्याच्याशी बोलेल असे त्याला वाटत नव्हतं.  तो धाधाडत्या हृदयाने तिच्याकडे निघाला. .... 
        मीनू मानतच विचार करत चालली होती.... "मला माझं मान सांगत आहे ते माझ्या साठी नक्कीच काहीतरी फील करतात. ओह्ह मीनू बस ना आता अर्जुन चा जप....  काल ठरवलं ना तू...  नाही करणार त्यांचा विचार...  मग परत का?   तिच्या मनातलं द्वंद्व संपत च नव्हतं.  स्वतःच्या च नादात असल्याने तिला ती कठड्या च्या खुप जवळ आली आहे हे तिच्या लक्षात आले नाही.  काल पाऊस पडल्याने सगळीकडे ओलसर होते. 
         स्वतः च्या च नादात असलेल्या मीनू चा पाय घसरला....  आणि ती जोरात ओरडली.  ती खाली पडणार तोच तिचा हात पकडून तिला कोणीतरी स्वतः जवळ ओढलं.  आणि ती त्या व्यक्ती ला धडकली.  तसे त्याने तिच्या भोवती हाताचा विळखा घातला आणि तिला अजून घट्ट पकडल......... मीनू च हृदय वेगाने पाळत होत...  भीती ने तिचे डोळे बंद होते....  अगदी काही सेकंदात च एवढं सगळं घडलं....  त्याने हळूच तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं.... "मार्व्हलस... " त्याच्या ओठातून आपोआप शब्द बाहेर पडले.  
           मीनू चा आवाज ऐकून सर्व गँग तिथे पळतच आली.....  आणि समोरच दृश्य पाहून सर्व जागेवरच थांबेल...... अर्जुन पण....... 

                   क्रमश : 

         

     

🎭 Series Post

View all