हे नाते जन्मांतरी चे भाग 10

This is story of minu. A happy go luky girl. Story of her family, her friends. Sone love stories, some suspense. Thank you so mch for your response. To enjoy story. Please stay tune. Thank you. Thank you ira.

हे नाते जन्मांतरी चे भाग 10 


मागील भागात आपण पहिले की मीनू ला ऍक्सीडेन्ट होतो. आणि तिला हॉस्पिटल मध्ये नेलं जाते. आणि अर्जुन ला सुद्धा MLC साठी हॉस्पिटल मधून कॉल येतो.
     
  आता पाहू पुढे.... 

      "Yar,  मीनू ला खुप लेट झाला ना? " हे चौघे तिकीट घेऊन मूवी सुरु व्हायची वाट पाहत होते.  

      "हो ना. पण ती म्हणाली होती की गर्दी असेल,  उशीर होईल.. " रिद्धी म्हणाली.  "पण किती लेट?  5 मिनिट मध्ये मूवी सुरु होईल. आणि तिची स्टार्टींग मिस झाली ना,  तर काय झालं सुरुवातीला ला,  असे विचारात बसेल सर्व पिक्चर पाहताना."  लक्ष्मी म्हणाली.  तसे सर्व हसले. "हो, तेवढं आहे. मीनू मूवी साठी कायम excited असते. "

       सर्व जण थेटर मध्ये जाऊन आपलपल्या जागा शोधून बसतात. आदी तिला कॉल करतो.  "Yar पाऊण तास झाला तरी मीनू आली नाही.... "  पण मीनू चा फोन स्वीचऑफ येत होता. "रिद्धे,  तिचा फोन स्वीचऑफ येत आहे. " "हममम,  चार्जिंग नसेल. येईल ती. " रिद्धी म्हणाली .

         इकडे .....

          त्या स्त्री मीनू ला हॉस्पिटल मध्ये घेऊन आल्या,  तसे समोर रिक्षा थांबलेली पाहून वॉर्डबॉय पटकन स्ट्रेचर घेऊन आला व मीनू ला कॅजुअल्टी मध्ये घेऊन गेला.  त्या काकू रिक्षा वाल्याला पैसे देण्यासाठी जातात,  तसे बोरबर आलेला व्यक्ती त्यांना अडवतो व खिशातून वॉलेट काढतो, " मी भरतो पैसे मॅडम." तो पैसे देऊ लागतो तसे रिक्षावाला म्हणतो की, " तुमच्या वागण्या वरून लक्षात आले की तुम्ही अनोळखी असून पण त्या पोरी ला दवाखान्यात घेऊन आलात.  तुम्ही एवढी मदत करत आहात तर मी तुमच्याकडून पैसे कडे घेऊ शकतो?  येतो मी. " हात जोडत तो बोलला आणि रिक्षा घेऊन निघून गेला.  

        इकडे मीनू ला कॅजुअल्टी मध्ये आणताच डॉक्टर ने तिला पटकन चेक  केले.  
        
            "नर्स BP लो आहे.  पटकन IV कनेक्ट करा." तसे नर्स ने पटकन मीनू च्या हाता ला सलाईन लावले.  तिच्या डाव्या हातावर,  कोपऱ्याच्या खाली चांगलीच सूज होती.  डोक्या च्या डाव्या बाजूला पण मार लागून सूज आली होती. 
       
         "सिस्टर,  MLC इन्फॉर्म केली का? " 

         "हो डॉक्टर." 

         "रिलेटिव्स ला बोलवा,  कन्सेंट वर सही घ्या. "

          "सर,  बाहेर एक स्त्री आणि एक पुरुष आहेत.  पण ते अनोळखी आहेत.  हिचे कोणी नातेवाईक आत्ता सोबत नाही आहेत."

           "Ok ते नंतर पाहू.  आपण प्रोसिजर कंटिन्यू करूयात."  तिच्या आय कार्ड वरचे डॉक्टर म्हणाले "miss. मीनल शशिकांत देसाई." "सिस्टर,  CT brain ला घ्या पेशंट."

       "Ok सर." 
 
        सिस्टर तिचे कपडे बदलत असतात तेव्हा तिच्या जीन्स च्या खिशात तिचा मोबाईल सापडतो.  आपटल्या मुळे फोन बंद पडलेला असतो.  वॉर्डन ने तो फोन वॉर्डबॉय कडे दिला. "चंदू हा फोन चालू होत आहे का बघ.  म्हणजे आपल्याला घरी कळवता येईल तिच्या." मीनू ला तसेच CT स्कॅन साठी स्ट्रेचर वर घेऊन निघाले.  तिला बाहेर आणले तसे ती बाई झपझप चालत तिथे आली.  
  
           "काय झालं?  आली का शुद्धी वर? " 

          " नाही,  पण एका बाजूने डोक्या ला मार लागला आहे.  आम्ही स्कॅन करून घेतो.  तो पर्यंत पोलीस येतील.  तुम्ही नाव नंबर देऊन गेलात तरी चालेल." जाता जाता नर्स ने सांगितले. 

            तसे त्यात व्यक्ती ने त्यांच्याकडे पहिले.  त्याच्या डोळ्यात,  "बघा,  या साठी कोणी मदत करत नव्हते. " असा भाव होता. तसे ती त्याला म्हणाली,  "तुम्ही जाऊ शकता.  नाव,  नंबर नाही दिला तरी चालेल.  मी थांबणार च आहे.  पोरींचे नातेवाईक पण सोबत नाही आहेत.  त्यांनी त्यांचे नाव काउंटर वर सांगितले.  सौ.  स्नेहलता.  आणि मोबाईल नंबर दिला.  

        वॉर्डबॉय चंदू ने फोन ऑन केला.  "नशीब चालू झाला. " तो म्हणाला.  पण मोबाईल ला लॉक असल्यामुळे त्याला फोन उघडता आला नाही.  "आता कोणाचा तरी फोन येई पर्यंत वाट पाहावी लागणार."

    इकडे अर्जुन सर आणि साळुंखे MLC साठी हेल्थ केअर हॉस्पिटल ला निघालेले असतात.  हॉस्पिटल चा रस्ता कॉलेज समोरून जात असतो.  कॉलेज आले तसे अर्जुन ला मीनू आठवली.  तसे त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी  स्माईल आली.  "काम अर्जुन.....  असं कोणाच्यात इन्व्हॉल्व्ह होणं स्वभावात नाही तुझ्या..... focus on your work.... " असे मनात बोलत त्याने मीनू चा विचारलं कसा बसा बाजूला केला.  

           10 मिनिट होऊन गेले.  मीनू अजून आली नाही,  म्हणून लक्ष्मी ने कॉल केला.  तिने कॉल केला तसे चंदू ने फोन  उचलला. 

         "Hello." चंदू बोलला. 

         दुसऱ्याचा आवाज ऐकून लक्ष्मी ला जरा आश्चर्य वाटले.  तसे चंदू  परत म्हणाला,  
 
          "तुम्ही मीनल देसाईंच्या ओळखीच्या का?"

          "हो,  मीनू कुठे आहे?  लक्ष्मी ने घाई ने विचारले. 

          " त्यांचा छोटा ऍक्सीडेन्ट झाला आहे.  तुम्ही please हेल्थ केअर हॉस्पिटल ला येऊ शकता का? " चंदू म्हणाला. 

         तशी लक्ष्मी तटकन उठून उभा राहिली.  "आम्ही आलोच." असे म्हणत तिने फोन ठेवला.  ती उभा राहिली तसे थेटर मधले मागचे लोक खाली बसा म्हणून ओरडायला लागले.  तिने सर्वाना उठवून पटकन बाहेर आणले. 

         "काय झालं? " आदी ने काळजीने विचारले.  "तू एवढी रेस्टलेस का आहेस? " 

         "मीनू चा ऍक्सीडेन्ट झाला आहे.  आपल्याला हेल्थ केअर हॉस्पिटल ला बोलवलं आहे. " तिने अडखळत घाई घाईत सांगितले.  "चला लवकर." ती म्हणाली.  ते पटपट चालत पार्किंग कडे गेले.  मनात येणाऱ्या हजार शंकांना मोठ्या कष्टाने बाजूला करत ते हॉस्पिटल ला निघाले. 

         मीनू ला स्कॅन करून रूम मध्ये शिफ्ट केल होत.  मॉनिटर वर तिचा BP पण चांगला दिसत होता.  साळूंखे व अर्जुन हॉस्पिटल मध्ये आले.  काउंटर वर जाऊन साळूंखे नि विचारलं,  MLC साठी कॉल होता.  पेशंट कुठे आहे? " 

             "Miss. मीनल देसाई. रूम नंबर 6. पहिला मजला." रिसेप्शिनिस्ट ने सांगितले.  तसे अर्जुन हादरला,  साळूंखेना पण शॉक बसला.  मीनू त्यांना 2 च वेळा वेळा भेटली होती,  पण त्यांना तिच्या बद्दल स्नेह वाटत होता.  

              "मला वाटत आहे सर ही दुसरी मीनल असेल.  चला जबाब घ्यायला गेल्यावर कळेलच. साळूंखे म्हणाले.  ते दोघे पटपट जिना चढून गेले.  मीनू च्या रूम मध्ये गेले तेव्हा तिला नुकतीच शुद्ध येत होती.  आणि समोर तिला साळूंखे काका दिसतात.  

            "आधी फक्त अर्जुन सर दिसत होते.  आता साळुंखे काका पण...... आह.. डोकं दुखत आहे." तिने डोक्याला हात लावायचा प्रयत्न केला.  

             "हलू नका... " तिच्या उश्या शेजारून अर्जुन बोलला.  तिने डोळे वर करून त्याला पाहिलं.  आणि तिला हळूहळू ति पडली होती हे लक्षात आलं. 

       "ओहहह,  मी हॉस्पिटल मध्ये आहे का??? रिद्धी, आदी.. " ती म्हणाली. 
   
         तसे अर्जुन शेजारचा स्टूल घेऊन तिच्या बेडजवळ बसला.  "Miss.  मीनल रिलॅक्स व्हा. तुमचे फ्रेंड्स कुठे आहेत? " 

        "ते... ते.. मी गिफ्ट कुरिअर करायला चालले होते. मी...माझा फोन कुठे आहे?  मी त्यांना कॉल करते.. " मीनू बोलत होती तो पर्यंत धाडकन दरवाजा उघडत रिद्धी आणि बाकी सर्व आत आले.  रिद्धी आणि लक्ष्मी च्या डोळ्यांवरून स्पष्ट कळत होत की त्या रडल्या आहेत. 

                पण अर्जुन अचानक उठला आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. "कुठे होतात तुम्ही?  ही इथे अशी एकटी हॉस्पिटल ला?  तुम्ही मित्र ना तिचे?  मग एवढा वेळ इथे कोणी नव्हते? " अर्जुन अचानक असे प्रश्न विचारात सुटला तसे गँग बावरली.  "सर,  ते आम्ही..... " आणि आदी ने त्याला जे झालं ते सर्व सांगितले.  तसे तो जरा शांत झाला.

                "साळुंखे,  जबाब लिहून घ्या.  या शुद्धी वर आल्या आहेत.  तसे मीनू ने जे घडले ते सांगितले.  "शेवटी माझ्या scooty ला मागून धक्का बसला आणि मी पडले.  माझे डोळे बंद झाले. आणि मी जागी झाले तेव्हा मी इथे होते. "
 
           ती जशी सांगत होती तसे लक्ष्मी आणि रिद्धी मुसमुसत होत्या. पण रिद्धी आता हमसून हमसून रडायला लागली. "Sorry मीनू मी तुला एकटीला सोडल." ती रडत च बोलली.  "अग बर झालं ना उलट.  नाहीतर तुला पण लागलं असत. " मीनू म्हणाली. तसे अर्जुन ने डोळे भरून तिच्याकडे पाहिलं.  "आदी, विनायक चला. जरा डॉक्टरांना भेटू.  साळूंखे तुम्ही यांना कोण इथे घेऊन आले त्यांना एकदा भेटा. मिस लक्ष्मी आणि मिस रिद्धी तुम्ही यांच्याबरोबर इथे थांबा. " अर्जुन सर्वाना बोलला. 

              ते तिघे डॉक्टरांना भेटायला गेले.  तसे डॉक्टर म्हणाले,  "डोक्या च्या डाव्या बाजूला सूज असल्याने आणि त्या बेशुद्ध असल्याने आम्ही घाईघाईत स्कॅन केल.  तुमची वाट पहिली नाही. " अर्जुन कडे पाहत डॉक्टर म्हणाले.

              "तुम्ही खरंच चांगल काम केल आहे डॉक्टर." अर्जुन म्हणाला.  "त्यांचे रिपोर्ट कसे आहेत?  म्हणजे आता शुद्धीवर आल्या आहेत त्या. " 

             "इंटर्नल काही इंज्युरी नाही आहे.  बहुतेक पडल्यामुळे घाबरून त्यांचा bp अचानक खुप कमी झाला.  त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. मात्र त्यांना मी 2 दिवस ऑब्सर्व्हशन साठी हॉस्पिटल मध्ये ठेवणार आहे.  मात्र त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर आहे.  प्लास्टर 21 दिवस ठेवावे लागेल. आणि scooty घासत गेली असणार.  बऱ्याच ठिकाणी खरचटलं आहे.  पण 2 दिवसानी त्यांना नक्की घरी जाता येईल. " डॉक्टरांनी शांतपणे त्यांना सर्व समजून सांगितलं.  

              "Thank you so much डॉक्टर." अर्जुन उठला आणि डॉक्टरांना शेक हॅन्ड करत बोलला.  विनू व आदी मी पण dr चे आभार मानले.  

           रिद्धी व लक्ष्मी ची बडबड चालू असल्यामुळे सिस्टर त्यांना बाहेर काढतात. " बस झालं आता. पेशंट ला अराम करू दया." त्या दोघी बाहेर आल्या तसे हे तिघे तिथे आले.  काय म्हणाले डॉक्टर.  या दोघीनी विचारले.  तसे आदी आणि विनू त्यांना सांगू लागले. 

         ते पाहून अर्जुन मीनू ला पाहायला आत आला. ती वर फॅन कडे पाहत पडली होती.  तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यात पाणी होत.  तिला दुखत तर होतेच पण आई बाबांची खुप आठवण  पण येत होती.  तिला अस पाहून अर्जुन ला खुप वाईट वाटलं.  "मिस मीनल. " मीनल ने त्याच्याकडे पाहिलं.  तसे ती जरा हसली.  खरं तर तिला डोळे पुसायचे होते पण उजव्या हाताला सलाईन आणि डाव्या हाताला प्लास्टर होत.  त्याला तिची उडालेली तारांबळ लक्षात आली. तसे त्याने खिशातून रुमाल काढून तिचे डोळे टिपले. "बर वाटत आहे का?" त्याने एवढ्या आपुलकीने विचारलेलं पाहून तिला परत भरून आले.  "हो. " ती भरलेल्या आवाजात बोलली.  "दुखत आहे का फार? "  "नाही,  जास्त दुखत नाही. " ती मन हलवत बोलली. "पण आई बाबा खुप काळजी करतील आता." आता तिला हुंदका फुटला.  तसे अर्जुन ने परत तिचे डोळे पुसले.  तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याची त्याला अनावर इच्छा झाली.  पण त्याने स्वतः ला आवरलं.  
 
           तेवढ्यात साळूंखे काका नारळ पाणी आणि फळ घेऊन आले.  "मीनू बाळा,  बर वाटत आहे ना?  " त्यांनी विचारलं.  "हो काका. " ती म्हणाली.  "चालेल हे एवढं नारळपाणी घे आधी.  डॉक्टर बोलले खायला दिले तरी चालेल." "हो काका,  मी घेईल नक्की." ती म्हणाली. "चला येतो आम्ही." काका म्हणाले.  तसे मीनू ने मान हलवत मंद हसत अर्जुन ला निरोप दिला. 

            दोघे बाहेर आले तसे स्नेहलता काकू तिथे आल्या. "बर आहे का पोरी ला?" त्यांनी विचारलं.  तसे साळुंखेंनी यांनीच मीनू ला हॉस्पिटल मध्ये आणले असे सांगून नेमक काय झालं ते सर्व सांगितले.  "तुम्ही खरंच खुप चांगल काम केल आहे.  प्रत्येक नागरिकाने तुमच्या सारखी स्वतः ची जबाबदारी समजून घ्यायला हवी. " अर्जुन मनापासून त्यांना बोलला.  स्नेहलता काकू मीनू ला भेटूनच गेल्या. मीनू ने त्यांचे आभार मानले.  रिद्धी आणि लक्ष्मी त्यांना एवढ्या वेळा थँक्स म्हणाल्या की शेवटी त्या त्यांना आता बस करा म्हणून जरा ओरडल्याच.  

            सगळे जरा रिलॅक्स झाल्यावर विनू ने मीनू च्या बाबांना कॉल केला.  
   
         "Hello,  काका मी विनायक बोलत आहे." 
 
         "हो बोल ना,  आहे नंबर सेव तुझा." 

          " काका,  ते जरा मीनू पडली आहे गाडीवरून........ "

          " पडली?  कसे काय? " ते एवढ्या मोठ्याने बोलले की सुनीता काकू किचन मधून लगबगीने बाहेर आल्या.  "काय झालं?  कोणाचा फोन? " त्या बाबा ना विचारू लागल्या.  त्यांना हातानेच जरा थांबा असा इशारा करून बाबा बोलले,  "जास्त लागलाय का? "

         "नाही,  जास्त नाही.... दवाखान्यात आहे आम्ही,  डॉक्टर म्हणत आहेत 2 दिवस थांबावं लागेल." विनू म्हणाला. 

          "2 दिवस?  अरे बापरे.  तिच्याकडे देतो फोन?  बोलत आहे ना ती?"  बाबा आता पूर्ण रडायच्या मार्गांवर आले होते.  एव्हाना सुनीता ताईंच्या लक्षात आलं होत मीनू ला लागलं आहे म्हणून.  त्या गडबड करू लागल्या. त्यांना पण बोलायचं होत.  

         "नाही नाही काका,  ती पूर्ण ठीक आहे.  तिच्याकडे फोन देतो.  पण तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका.  नाहीतर तिला खुप वाईट वाटेल."

         "हो... हो... दे तिच्याकडे फोन." आई आता रडायच्या बेताला आली होती. त्यांच्याकडे पाहत बाबानी ओठावर बोट ठेऊन आई ला शांत राहा अशी खून केली.  आणि फोन चा स्पीकर ऑन केला. 

             विनू रूम मध्ये आला व मीनू च्या कानाला फोन लावत बोलला  "बाबा आहेत. बोल." तसे तिला परत भरून आले 

              "Hello बाबा..... " 

              " hello मीनू बाळा..." कंठ दाटून आल्याने त्यांना काय बोलाव सुचत नवतं.  त्यांचा आवाज ऐकून मीनू च्या डोळ्यातून परत पाणी ओघळल. तसे लक्ष्मी ने तिचे डोळे पुसले व तिला रडू नको अशी खून केली.  

              "कशी आहेस?  लागलं का जास्त?  

              "नाही बाबा,  एकदम ठीक आहे.  जरा हाताला लागलं आहे." मीनू म्हणाली.

                " जास्त दुखत आहे का ग?" आई ने विचारलं.
 
                 " नाही आई.  काळजी नको ग करू."  मीनू म्हणाली. मीनू शी बोलून शशिकांत रावांचा जीव भांड्यात पडला.  

             " आम्ही निघत आहोत तुझ्याकडे बाळा.  तू काळजी नको करू." बाबा म्हणाले 

            "तुम्ही गडबड नका करू.  मी ठीक आहे.  तुम्ही उद्या या." मीनू म्हणाली.  तसे विनू ने कानाला फोन लावला.  

            "काका,  घाई नका करू.  आम्ही आहोत.  वाटलं तर तुम्ही सकाळी लवकर निघा."

           "नाही बाबा.  सकाळी पर्यंत दम नाही निघणार मला.  आम्ही निघत आहोत आताच.  पोहचू रात्री पर्यंत." बाबा म्हणाले. 

           "ठीक आहे काका.  या तुम्ही.  आम्ही आहोत इथेच." 

           "बर झालं तुम्ही आहात.  तिची काळजी घ्या पोरांनो." असे बोलताना बाबा ना हुंदका फुटला.  तसे विनू ला पण गलबलून आले.  

             "हो काका,  तुम्ही काळजी नका करू.  ठेवतो मी." असे म्हणत त्याने पटकन फोन ठेवला.  व डोळे पुसले.  तसे आदी समोरून आला.  तो सर्वांसाठी चहा घेऊन आला होता. 

          "अरे काही नाही होत तिला.  आपली मीनू स्ट्रॉंग आहे. डॉक्टर काका पण म्हणाले ना की तिचे रिपोर्ट चांगले आहेत. " ते नाही रे,  मी काकांशी बोललो आत्ता. खुप घाबरले रे ते.  खुप इमोशनल पन झाले होते." विनू म्हणाला.  "हो ना. काकांची खुप लाडकी आहे मीनू." ते दोघे बोलत बोलत आत आले.

            सर्वांनी गप्पा मारत मारत चहा घेतला. मीनू ला आता चांगलेच बरे वाटत होते.  "तसे लक्ष्मी हातातला रुमाल तिला दाखवत बोलली की "हा जेन्टस रुमाल कोणाचा आहे? " तसे मीनू गोरीमोरी झाली. आता सर्व आपल्याला चिडवणार हे तिला लक्षात आलं होत.  तसे ती म्हणाली,  "आपल्याला थांबावंच लागेल का?  मला आता खुप बर वाटत आहे.  दुखायचे पण कमी झाले आहे." "हो वाटणारच बर.  पेन किलर दिले आहे म्हणून. लगेच घरी जायचं म्हणू नको हा." रिद्धी तिला म्हणाली. 

              "Sorry guys,  अर्जुन सर तुम्हाला माझ्यामुळे रागवले." मीनू चेहरा पाडत म्हणाली.  आता हा चान्स आदी सोडणार नव्हता.  तो लगेच बोलला.  "आम्हाला पण वाटली भीती.  पण छान पण वाटलं........तू नोटीस केल का? " तो विनू कडे पाहत म्हणाला... "अर्जुन सर किती अस्वस्थ झाले होते मीनू ला लागल तर....  त्यांना मीनू ची काळजी वाटत होती...." तो असे म्हणताच मुद्दाम सर्व ओsss असे सुरात ओरडले.  तसे मीनू छान लाजली. 

              त्यांचा गोंधळ ऐकून सिस्टर परत त्यांना वॉर्निंग देऊन गेल्या.  2 मिनिट सर्व शांत बसले.  पण सिस्टर गेल्या तसे सर्व परत मोठ्या ने हसले.  मीनू ने एकदा सर्वांकडे पहिले.  एवढे प्रेम करणारे,  सुख दुखत सामील होणारे मित्र दिल्या बद्दल तिने देवाचे आभार मानले.  तिला अर्जुन चा चेहरा आठवला तसे तिच्या चेहऱ्यावर लाली आली.  आता तिला औषधामुळे झोप येत होती. मी उठेल तेव्हा आई बाबा इथे असतील... हा विचार करत ती झोपी गेली...... 

                                     क्रमश :


तुम्ही सर्वांनी एवढा छान प्रतिसाद दिला त्या बद्दल खुप खूप आभारी आहे.  THANK YOU. 
        

🎭 Series Post

View all