Login

हे महापुरुषांनो.....

सामाजिक विषयावर भाष्य करणारी कविता

हे महापुरुषांनो.....

होऊन गेले महापुरुष ठेऊन इथे आठवणी
चरीत्र त्यांचे किती निर्मळ शुद्ध झाले गढूळ पाणी
पवित्र केले या भूमीला प्रेमळ त्यांच्या मनाने
फासावरती गेले बिचारे मातृभूमीच्या अभिमानाने
लढले, झिजले, मरण पावले करून रक्ताचे पाणी ||


भला माणूस हा इथे जन्मतो भ्रष्ट होतो आचारी
लूट करीतो दीन-दुबळ्यांची सोडत नाही कष्टकरी
कलंकित करतो या भूमीला थारा नाही माणुसकीला
काय करावे, कसे जगावे समजत नाही दुबळ्या मनाला
मानव म्हणावे का याला? हा प्रश्न माझ्या मनी ||१||

होतील पूर्ण आशा आपुल्या म्हणून केला पुढारी
खाऊन जनतेला हा राक्षस चक्क बसला मातेच्या उरी
आठवण येते महापुरुषांनो आता तुमची
कुणी लिहिली हि असली नाशिबे आमुची
तुमचे चरित्र, तुमचे विचार कधी येतील यांच्या जीवनी ||२||

केले स्वतंत्र तुम्ही या मातृभूमीला
ना स्वातंत्र्य, ना पारतंत्र्य इथे आम्हाला
कसे जगावे कळेना या मनाला
आपल्याच हाताने संपवावे लागते जीवनाला
तुम्हीच सांगा \"बापू\" कधी जन्मणार इथे शहाणी |३|

शाम भोसले