हे घर माझ ही आहे..... भाग 10 अंतिम

आणि अति अन्याय सहन केला तर समोरच्यालाही आपल्याला त्रास द्यायची सवय लागते, एकदा सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे, आपण हे जे सुरु आहे ते मला आवडत नाही, सौम्य शब्दात विरोध करायला काही हरकत नाही, नाही ऐकल तर मग पुढची ॲक्शन घ्यावी....


हे घर माझ ही आहे..... तुमच्या घरात..... मला ही थोड्या प्रेमाची गरज आहे......थोडा विश्वास ठेवा...... मलाही आपलंसं करा

घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,

एका सुनेची व्यथा....

कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही

©️®️शिल्पा सुतार
........

सचिन निशा ने सामान नेल नवीन घरी, सौरभ खूप खुश होता, सुरेश राव घर बघायला आले एकटे, मालती ताई घरी होत्या, सौरभ या रूम मधुन त्या रूम मध्ये धावत होता, दोन बेडरूम होत्या, त्यातली एक रूम सौरभ ने निवडली

"आजोबा ही रूम आपली",..... सौरभ

"हो बेटा मी आलो की इथे मग खेळू आपण दोघ",..... सुरेश राव

"म्हणजे तुम्ही इथे नाही राहणार का"?,...... सौरभ

"नाही बेटा मी इथे नाही राहणार, मधुन मधून येईन इकडे",..... सुरेश राव

" तुम्ही जुन्या घरी राहणार का आजोबा इकडे का नाही राहणार",..... सौरभ

" तिकडे तुझी आजी एकटी आहे ना मग मला रहावं लागेल आजी सोबत, ती एकटी कशी काय राहिल ",..... सुरेश राव

" आजी का नाही येत इकडे ",.... सौरभ

" येईल तीह बेटा ",...... सुरेश राव

सचिन निशा सामान लावण्यात बिझी होते,

" सौरभ ला सांभाळाव लागेल थोड्या दिवस तो आजी आजोबांना मिस करेल ",..... सचिन

" हो ना, नाही तर नेत जाऊ त्याला आपण तिकडे घरी मधुन मधुन",...... निशा

हो.....

मीनाला आता इकडे कामाला बोलवून घेतलं होतं, ती स्वयंपाक करत होती, निशा चे आई बाबा आलेच तेवढ्यात घरी

" खूप छान फ्लॅट मिळाला आहे हवेशीर आहे एकदम",..... बाबा

सुरेश राव घरातच होते, निशा चे बाबा आणि सुरेश राव बोलत बसले, निशा ची आई सामान लावायला मदत करत होती

" चला मला निघायला हवं आता",..... सुरेश राव घरी गेले

"आई-बाबा आता जेवूनच जा",...... सचिन

निशा चे आई बाबा जेवायला थांबले, सौरभ आजोबांन बरोबर खेळत होता, निशा ची आई आणि सचिन सामान लावत होते

जेवण झालं निशाचे आई बाबा गेले

"सचिन किती वेगळ वाटत आहे ना घरात",...... निशा

" हो ना आपल घर आपण मिस करतो आहोत पण काही इलाज नाही होईल सवय या घराची ",.......सचिन

सुरेश राव घरी आले, मालकी ताई स्वयंपाकाला लागल्या होत्या

"कस आहे हो घर सचिनच ",...... मालती ताई

"खूप छान आहे हवेशीर फ्लॅट आहे तू यायला हव होतं",...... सुरेश राव

" येईल हो मी, नंतर येईल पण मुलं गेले घरातुन तर घर सुन झाला आहे, आता मला त्रास होतो ते गेल्या पासून, नको तिथे हळवी व्हायची मी",....... मालती ताई

" जाऊदे आता मालती तु विचार करत बसू नको, आणी काही दूर नाही ते जाऊ आपण त्यांच्याकडे, सौरभ आठवण काढत होता तुझी बोलला की आजी का नाही आली ",...... सुरेश राव

हो का.......

सुरेश राव आवरायला गेले,

मालती ताईंने डोळे पुसले, त्या विचार करत होत्या खरं चुकलं का माझं खूपच? खूपच मोठी शिक्षा मिळाली मला, माझा एकुलता एक मुलगा बोलत नाही माझ्याशी, पण माझ्या मनात एवढं काही नव्हतं, जे काही घडलं ते घडतच गेल, लक्ष्यात आल नाही माझ्या, मी जरा स्वतावर कंट्रोल ठेवायला हवा होता, निशा ला सांभाळायला हव होत, खरच निशा मला कधीच उलटून बोलली नाही, उलट सचिनच बोलायचं मला, तरी मला सचिनच काही वाटायचं नाही आणि निशाला त्रास दिला मी, मी असं करायला नको होतं, जाऊदे पण आता जरी आपण कोणाला काही सांगितलं तरी त्यांनाही खरं वाटणार नाही, उगीच वाटेल त्यांना की मी आता इमोशनल आहे म्हणून माफी मागते आहे, त्यापेक्षा जे झालं आहे ते स्वीकारण चांगल आहे, जाईन मी सचिन कडे नंतर, पण मी हक्काने बोलत होते मुलांना, जास्त झाल वाटत, मुल मोठे झाले, जरा कंट्रोल ठेवायला हवा होता

"चल ग मालती जेवून घेवू, हे घे येताना तुझी आवडती मिठाई आणली आहे आणि नंतर शतपावली करू",...... सुरेश राव

"अहो मिठाई काय आणलीत तुम्ही? मूल नाहीत आणि काय खाणार आपण",..... मालती ताई

"या पुढे आपल्या दोघांना रहायच आहे, आता सारख मुल नाहीत हे सोडून दे, खा ग जे आवडत ते",..... सुरेश राव मालती ताईनच मन जपायचा प्रयत्न करत होते

सुरुवातीला मालती ताई यायच्या नाहीत सचिन कडे , सुरेश राव यायचे सौरभ ला भेटायला, बसायचे खेळायचे त्याच्या सोबत, हे सचिन च्या मनात होत आई येत नाही, आईला भेटावसं वाटत होत त्याला

" तू जावून ये घरी सचिन भेट आईंना",..... निशा

"हो जाऊ रविवारी आपण ",..... सचिन

बरेच दिवस झाले सगळ सुरळीत सुरू आहे आता, निशा सचिन कडे तिचे आई बाबा येतात, मस्त राहतात सगळे आनंदात आहेत.......

एक दिवस संध्याकाळी सुरेश रावांन बरोबर मालती ताई ही सचिन च्या घरी आल्या...

सचिन ने दारातुन बघितल आई आली आहे, सचिन पळत जाऊन आईला भेटला, मालती ताईंना प्रेमाने आत आणलं, सचिन स्वतः आई जवळ बसला, त्याला झालेला आनंद स्पष्ट चेहर्‍यावर दिसत होता, सौरभ ही खूप खुश होता, निशा येऊन मालती ताईंना भेटली,

त्या जास्त काही बोलल्या नाहीत, फिरून सगळं घर बघितलं, दोन चार गोष्टी सांगितल्या, त्यांनी सचिन निशा साठी छान मिठाई आणि गिफ्ट आणल होत,

" छान लावल आहे घर तुम्ही दोघांनी ",..... मालती ताई

"आई-बाबा आता आले आहात तर जेवून जा",..... निशा

"हो चालेल",...... मालती ताईंनी होकार दिला

सचिन गुलाबजाम घ्यायला गेला...

" जास्त काही करू नको ग निशा रोजची पोळी भाजी कर",...... मालती ताई

"हो आई ",...... निशा

सुरेश राव आणि सचिन यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं

मीना आलीच कामाला मीनाने सगळ्यांचा स्वयंपाक केला निशाने सगळ्यांना वाढलं जेवण झाले

" चला आम्हाला निघावे लागेल आता",..... सुरेश राव

" आई अशीच येत रहा नेहमी ",..... सचिन

" हो, तुम्ही दोघ ही या घरी",....... मालती ताई

सुरेश राव मालती ताई घरी आल्या

"आज तू खूप नीट वागली मालती, खूप छान वाटल आज तिकडे सचिन कडे",....... सुरेश राव

"अहो पण जरा उशीर झाला आहे ना मला नीट वागायला",...... मालती ताई

" काही हरकत नाही मालती पण, आता नातेवाईक येतील प्रश्न विचारतील तर आपण काहीही सचिन च्या विरोधात बोलायच नाही, हे असंच चांगलं आहे ते लोक तिकडे राहत आहेत, आपणही कधीतरी जाऊन भेटायचं त्यांना, एकमेकांन ची किम्मत ही कळते अशी ",....... सुरेश राव

" आज बघितलं का हो तुम्ही, सचिन अगदी पटकन येऊन भेटला मला, आणि पूर्ण वेळ माझ्या आजुबाजूला होता तो, काय हव नको ते बघत होता ",...... मालती ताई

" हो ग प्रेमळच आहे तो, मला आज फार बरं वाटत आहे",...... सुरेश राव

" सचिन नाराज नाही हे खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी",........ मालती ताई

" अग आणि मुलांनी काय आपल्याला कायमच सोडलेलं नाही, ते लक्ष देऊन आहेत आपल्यावर, मी नेहमी गेलो की सचिन तुझ्या बद्दलच विचारत असतो, जवळ राहून भांडत बसण्यापेक्षा हे असं बरं, आणि आता आपल्याला ही मिळतो आहे की छान एकांत ",........ सुरेश राव

" काहीही काय हो, तुम्ही ही ना, पण आज खरच छान वाटल त्यांच्या कडे, सौरभ हि किती खुश होता सोडतच नव्हता आपल्याला, बर झाल मी आले तुमच्या सोबत तिकडे ",....... मालती ताई

हो ना......

" आणि तू पण मालती आता जरा घरची कामं बंद कर आपणही स्वयंपाकाला बाई लावून घेऊ आणि दोघं छान राहू, तुझा खूप वेळ जातो आवरण्यात ",........ सुरेश राव

" चालेल, तुम्ही म्हणाल तसं ",...... मालती ताई

" आपण दोघांनीही फिरायला जायचं का",...... सुरेश राव

"चालेल ना, जाऊ या आपणही ट्रीपला, कुठे जायच पण",.......मालती ताई

" माझे मित्र जाता आहेत ट्रॅव्हल एजन्सी सोबत, मी करतो चौकशी, पण आपण दोघ जायचं बर का कोणालाही घ्यायचं नाही सोबत",...... सुरेश राव

मालती ताई छान लाजल्या,........

मधल्या काळात मालती ताईंना खूप त्रास झाला, त्यामुळे सध्या सुरेश राव त्यांचे मन सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, चुकलं होतं थोडं मालती ताईंचं आणि त्याचा त्यांना पश्चातापही झाला, पुरे झाली एवढी शिक्षा म्हणून सुरेश राव आता मालती ताईंना खूप जपतात
...........

सगळे आनंदात राहण्यासाठी दूर जाण गरजेच आहे का? आधी का समजून घेतल नाही त्यांनी एकमेकांना, मालती ताईंनी जरा जास्त ताणल की घराचे दोन भाग झाले,

दुसर्‍याची मुलगी आपल्या घरी लग्न होवुन येते म्हणजे तिच्याशी कस ही वागून चालत नाही, उलट तिला सपोर्ट करा प्रेम द्या, तिच्यावर हक्क गाजवू नका, प्रेमाने वागायला हव, काय होतं ना नवीन सुनेला सुरुवातीच्या काळात एवढा त्रास दिला जातो, अविश्वास असतो तिच्यावर, कि तीला नंतर नंतर सासरच्या लोकांबद्दल प्रेमच वाटेनासं होतं, उगीच लग्न केलं असं वाटायला लागतं......

मला माहिती आहे कथेतील सचिन एक नवरा म्हणून खूप चांगला आहे, त्याला समजल बायकोला काय हव ते, काही काही बाकीच्यांच्या नशिबात ते ही नसत, सासुबाई सोबत त्यांना नवरा ही अजून त्रास देतो, माहेरचा सपोर्ट नाही, तुझं लग्न झाल आहे ना तू आता तिकडेच रहा, अस असत,

कधीकधी बायका मुलांकडे बघूनही त्रास सहन करतात, बदलतील हे दिवस हीच एक आशा असते, खूप बायका आजही ही या त्रासाला सामोरे जात आहेत, सहनही करता येत नाही आणि कोणाला सांगता येत नाही असा त्रास आहे हा, घरच्या लोकांबद्दल काय सांगणार काही इलाज उरत नाही....

आणि सुनेच्या घरच्यांना माहेरच्यांना कमी समजू नये, येता-जाता त्याचा पाणउतारा करू नये, कोणी कोणाला काहीही शिकवायला जात नाही, सगळ्यांना आपल चांगलं-वाईट समजतं, उगाच सारखे सारखे टोमणे मारू नये,


काय करता येईल अश्या प्रसंगात जेव्हा स्त्री ला कोणाचाच आधार नसतो, आधी तर स्वतःच्या पायावर उभ रहाण महत्त्वाचे आहे, जे काम मिळेल ते करायला हव, सारखं घरात राहण्यापेक्षा बाहेर जायला एक कारण मिळेल,

आणि अति अन्याय सहन केला तर समोरच्यालाही आपल्याला त्रास द्यायची सवय लागते, एकदा सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे, आपण हे जे सुरु आहे ते मला आवडत नाही, सौम्य शब्दात विरोध करायला काही हरकत नाही, नाही ऐकल तर मग पुढची ॲक्शन घ्यावी....

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी आत्मपरीक्षण पण करण गरजेच आहे की आपली दुसर्‍याशी वागणूक ठीक आहे ना, आपण त्रासदायक नाही ना वागत आहोत घरात , आपल्या वागण्याने दुसऱ्याला त्रास तर होत नाहीये ना, हे बघण गरजेचा आहे आणि जर आपण दुसऱ्याला पण त्रास देत असु तर स्वतःला बदलायला हवं कारण समोरच्यालाही त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे

सासू असो की सून दोघेही एकमेकीला त्रास देऊ शकतात, काही काही घरात सुन खूप सासूला त्रास देतात, त्यांनीही आपली वर्तणूक सुधारायला हवी,

समोरची व्यक्ती किती दिवस त्रास सहन करतील, एक ना एक दिवस बंड करून उठतील,

मग तेव्हा ते सगळे लोक आपल्यापासून दूर जातात आणि आपल्या खराब स्वभावामुळे आपण एकटे पडतो, आणि दुसऱ्याला नीट वाग असं म्हणण्यापेक्षा आधी स्वतःत बदल करावा आणि कोणी काही सांगत आहेत ते थोडा ऐकलं ही पाहिजे

पहिली गोष्ट अपेक्षाच करायची नाही कोणाकडून स्वतःची कामे स्वतः करावी आणि एक माणूस म्हणून दुसऱ्यालाही थोडा मान द्यावा, त्याला जगण्यासाठी थोडी स्पेस लागते त्याचा आदर ठेवावा सून आपल्या सेवेसाठी, घरकाम करण्यासाठी आणलेली नाही, तिला तीच आयुष्य आहे हे लक्ष्यात ठेवावे, सदोदित मध्ये मध्ये करू नये, आणि घरात काही बदल करायचा किंवा निर्णय घ्यायचा अधिकार सगळ्यांना आहे सदोदीत आपलंच म्हणणं खरं करू नये
.........
समाप्त.....

कशी वाटली कथा, वाचकांचे खूप आभार, खूप प्रेम दिल तुम्ही,

या कथेमधुन कोणी बोध घेतला तर किती बर होईल, कोणच आयुष्य नीट होवू शकत, कथा आवडली असल्यास शेअर करा प्लीज

ही कथा फ्री मध्ये आहे याला subscription ची गरज नाही

🎭 Series Post

View all