हे घर माझ ही आहे..... भाग 9

आई शांत हो, निशा तू रूम मध्ये जा, काही अर्थ नाही आता या गोष्टींना, आणि मला निशा ने काही सांगितल नाही, उलट तिला तुमची काळजी वाटते, आणि तुला असं वाटत की तुझं काहीही चुकलं नाही का? यात जो काही दोष आहे तो आमचाच आहे का? हो बरोबर आहे सगळ्यात मोठा दोष तर निशाचा आहे, तिचा हाच दोष आहे कि तिने माझ्याशी लग्न केलं


हे घर माझ ही आहे..... तुमच्या घरात..... मला ही थोड्या प्रेमाची गरज आहे......थोडा विश्वास ठेवा...... मलाही आपलंसं करा

घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,

एका सुनेची व्यथा....

कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही

©️®️शिल्पा सुतार
........

" चालेल सचिन , आपण बघु वेगळ घर, त्यांच्या पासून लांब राहिलेलं बर राहील, कधी कधी लांब राहून प्रेम टिकून राहत, कस करू या पुढे ",...... निशा खुश होती

" घर शोधू या आधी",..... सचिन

" मी काय म्हणते माझ्या आई जवळ नको, इथेच आपल्या घराच्या आसपास घेवू घर म्हणजे आई बाबांकडे लक्ष राहील ",........ निशा

" आणि सौरभ कुठे राहील ",...... सचिन

" त्याला पाळणाघरात ठेवू, आहेत माझ्या ओळखीच्या काकू, खूप चांगल्या आहेत, नाहीतरी तो एक वाजता शाळेतून येतो आणि मी लगेच सहाला घरी येते, दुपारचा तर प्रश्न आहे ",...... निशा

" चालेल काही हरकत नाही, पण आता आपल्याला हे करायचं आहे, बदलायचा नाही, आता काही झाल तरी आणि परत कोणी काही बोललं तरी वापस जायच नाही, मला आता सहन होत नाही सारखं आपलं भांडण भांडण",...... सचिन

" हो चालेल ",..... निशा

निशा सचिन तिच्या आई कडे आले, निशाने आई बाबांना सांगितला त्यांच्या विचार

" तुला काय वाटतय आई ",..... निशा

" तुमचा विचार चांगला आहे कारण काय त्रास होतोय ते तुमच तुम्हाला माहिती, पण एक सांगते की जवळ पास रहा म्हणजे घरच्यांन कडे लक्ष राहील ",...... आई

" तुमच्या कडे कोणाच लक्ष आहे आई, तुम्ही राहता ना एकटे बरेच वर्ष झाले ",...... सचिन

"आम्हाला सवय झाली आहे आता, तुमचे आई बाबा पुर्वी पासुन तुमच्या सोबत होते",...... आई

" म्हणून त्यांना आमची किम्मत नाही",...... सचिन

" बाबा चांगले आहेत खूप, आई का राग धरतात समजत नाही",...... निशा

" आम्ही दोघ घरांच्या मध्ये घर घेवू म्हणजे दोघी घरी लक्ष राहील आणि काही वाटल उशीर झाला तर सौरभ कडे तुम्हाला बघता येईल ",....... सचिन

"हो आम्ही आहोतच, तसा विचार करून निर्णय घ्या ",...... निशा चे बाबा

सचिन च सामान घेवून निशा सचिन घरी यायला निघाले

" आता लगेच नको बोलायला घरी आपल नीट ठरल की सांगू ",...... सचिन

" हो चालेल", ...... निशा

निशा सचिन घरी आले मालती ताई किचन मधे स्वैपाक करत होत्या

दोघ रूम मध्ये निघून गेले,

" जेवायला चला सचिन निशा ",..... सुरेश राव

"हो आलो बाबा ",.... सचिन

"कसा झाला इंटरव्यू सचिन ",..... बाबा

" मिळाला का रे तुला अभ्यासाला वेळ तिकडे",.....मालती ताई

सचिन ने मालती ताईंन कडे लक्ष दिल नाही

सुरेश राव सचिन दोघ बर्‍याच वेळ इंटरव्यू, नवीन कंपनी, opportunities, बद्दल बोलत होते तो पर्यंत निशाने ताट केल

जेवण झालं, कोणी कालच्या भांडण बद्दल बोलल नाही फक्त सौरभ बडबड करत होता, वेगळीच शांतता होती,

दोघ रूम मध्ये आले सचिन लॅपटॉप वर घर बघत होता

निशा सौरभ चा अभ्यास घेत होती

दुसऱ्या दिवशी सकाळी मिना आली कामाला

"कोणा कोणाचा स्वैपाक करायचा ताई",....... मीना

"रोज नको ग विचारू आमचा कर चार लोकांचा",....... निशा

मीना ने स्वयंपाक केला ती निघून गेली,

निशा सचिन बाहेर आले निशाने सगळ्यांना चहा दिला, बाबा सचिन बोलत होते, मालती ताई नुसत्या बसुन होत्या सचिन कडे बघत, सचिन आपल्याशी बोलत नाही हे त्यांच्या काल पासुन लक्ष्यात आल होत

निशा सचिन ही ऑफिसला गेले

" अहो सचिन बोलत नाही माझ्याशी, मला नाही सहन होत तो बोलला नाही की",....... मालती ताई

"सांगितल असेल निशा ने तू वहिनींन सोबत निशा चा किती अपमान केला ते, तू चुकीच वागली आहेस मालती, दोघ घरात नीट मिसळत नाही कालपासून, पण तू ही अस का करतेस, कोणी आल की जरा तोंडावर कंट्रोल रहात नाही का तुझ्या",....... सुरेश राव

" अहो पण.........

" एक शब्द ही बोलु नकोस, आपल्या घरच्यांचा मान राखण आपल्या हातात असत, तू एवढ्या चांगल्या शिकलेल्या निशा ला एवढ बोलतेस, तरी ती मुलगी उलट उत्तर देत नाही, काल माहिती आतल्या खोलीत जावून रडत होती ती, तेव्हा तू तिची समजूत काढायला हवी होती, चुकीची वागली आहेस तू",...... सुरेश राव

मालती ताई नुसत्या सुरेश रावांन कडे बघत बसुन राहिल्या

सचिनने ऑफिस मधून ब्रोकर ला फोन केला, रिक्वायरमेंट सांगितली टू बीएचके फ्लॅट हवा आहे, एरिया सांगितला, लगेच हवा आहे चार-पाच दिवसात, म्हणजे एक तारखे नंतर राहता येईल लगेच

मी शॉर्टलिस्ट करून सांगतो तुम्हाला मग तुम्हाला येऊन घर बघावे लागेल......

" चालेल, एरिया चांगला बघा शेजार चांगल हव, थोडी माहिती काढा आधी",..... सचिन

हो.....

सचिन ने निशाला फोन केला,.... " आता ब्रोकर शी बोललो मी, या आठवड्यात होऊन जाईल आपल्या घराचं काम, आपण पिकनिक ला जाणार होतो ना, काय करू या त्याच",.......

"पिकनिक ला पुढच्या महिन्यात जाऊ, आता खर्च आहे, आधी हे घराच करून घेवू, पण आपण बरोबर निर्णय घेतो आहोत ना सचिन, आई बोलतील रे मला खूप, भीती वाटते पुढे काय होईल, लोक ही बोलतील नाही नाही ते ",....... निशा

" हो एकदम बरोबर करतो आहोत आपण हे, किंबहुना आपण आधीच करायला पाहिजे होतं, आता आपल आई शी अजिबात पटत नाही, नात्यात थोडं डिस्टन्स हव, म्हणजे कडवटपणा येत नाही, बोलू दे लोकांना काय बोलायचं ते, आपण आपल बघायला पाहिजे, आपल्याला त्रास होतो तेव्हा कुठे जातात हे लोक आणि तू अशी घाबरून जाऊ नकोस निशा, मी करेन बरोबर हॅन्डल सगळ",...... सचिन

आज सचिन संध्याकाळी लवकरच घरी आला, मीना बरोबर निशा किचनमध्ये होती, सौरभ बाजूला बसूनच अभ्यास करत होता, निशा ने चहा केला

आई-बाबा नुकतेच फिरुन आले, आई अजूनही रागात होत्या, खर तर निशा सचिन ला राग यायला पाहिजे तर मालती ताई फुगून बसल्या होत्या

"आई-बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे",..... सचिन

निशा आतुन ऐकत होती काय बोलताय ते

"बोल ना बेटा ",...... सुरेश राव

मालती ताई किचन मधे जात होत्या

"आई तू ही ये इकडे तुझ्याशी ही बोलायच आहे",.... सचिन

मालती ताई येवून बसल्या

"मी आणि निशा ने वेगळं घर घ्यायचं ठरवलं आहे, आम्ही दोघ खूप बिझी असतो ऑफिस मध्ये आणि खूप महत्त्वाच काम करतो आम्ही ऑफिस मध्ये, ऑफिस मध्ये खूप दमतो आम्ही, त्या कामाला मन शांती खूप महत्त्वाची आहे, ती आम्हाला या घरात मिळत नाही आणि घरी कोणी आल की कींवा ईतर वेळी ही माझ्या बायकोचा निशाच खूप अपमान होतो या घरात, त्यामुळे तिची तब्येत खराब होते, आणि मला ही ते आवडलेले नाही, आम्ही वेगळ राहण्याचा निर्णय घेतला आहे, तुम्हाला सांगतो आहोत बाबा तुमचा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला वाईट वाटले असेल तर माफ करा ",...... सचिन

तसा आईला शॉक बसला......

"काही हरकत नाही तुमचं आयुष्य आहे तुम्ही निर्णय घ्या, खर आहे मनःशांती गरजेची आहे, खूप त्रास होतो नाही तर, कुठे बघितल आहे घर ",........ बाबा

" अजून नाही बघितल घर आता करू सुरुवात ",...... सचिन

" तुला काही मदत लागली तर सांग",..... सुरेश राव

"हो बाबा तुम्ही रागावले नाहीत ना ",...... सचिन

" नाही बेटा, तू बरोबर करतो आहेस, आधीच करायला हव होत हे, घरात जर बाकीच्यांना समजत नसेल कस वागवायच तर ही वेळ येणारच, तुम्ही जा इथून, काही प्रगती नाही रोज भांडणात ",....... सुरेश राव

तस मालती ताई रागाने सुरेश राव यांच्या कडे बघत होत्या

" आई तू ऐकला ना मी काय म्हटलं ते",...... सचिन

" होय ऐकलं मी, माझी यावर काहीही प्रतिक्रिया नाही, तुम्ही लोकांनी मला विलन करून टाकल आहे, ठीक आहे, पण लग्नानंतर तू खूप बदलला आहेस , तुला आता आई-वडिलांचा पेक्षा तुझ्या बायकोची मुलांची चिंता आहे, काल सासरी राहून आलास ना तू, काही तरी पट्टी पढवलेली दिसते तिच्या माहेरच्यांनी तुला ",....... मालती ताई परत तेच तेच बोलत होत्या

" हे बघा बाबा हे अस आहे आपल्या कडे, किती घाण विचार करत आहे आई तूझे, तू जा बर रूम मध्ये मला नाही बोलायचा तुझ्याशी",....... सचिन

" खर बोलाल की राग येतो ",...... मालती ताई

" अग मी काय लहान आहे का कोणी मला काही शिकवायला, आणि निशा च्या घरचे एकदम चांगले लोक आहेत, तुझ्या सारखे बुरसटलेले विचार नाहीत त्यांचे ",....... सचिन

मालती ताई रागाने येवुन बसल्या,......" बुरसटलेले म्हणजे रे",.....

" मालती तू काही बोलू नकोस, तू जा बर रूम मध्ये ",...... सुरेश राव

" तुम्ही थांबा हो मला बोलू द्या ",....... मालती ताई

" अग तुझ्या आताताई स्वाभावा मुळे ही वेळ आली, अजून काय भांडते आहेस तू, तुला खरच लक्ष्यात येत नाही का काही ",........ सुरेश राव

"हा कसा वागतो हे दिसत नाही का तुम्हाला, असं या वयात आई वडिलांना एकटा सोडून जातो आहे तो",....... मालती ताई रडायला लागल्या, तस सचिन आई जवळ येवून बसला

" कशामुळे जात आहे आई मी तू सांग बरं, मला दोन शब्द"?,........ सचिन

" मला माहिती नाही सचिन तू हा निर्णय का घेतला आहेस ते, पण मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत ",...... मालती ताई

" अग मग भांडते का आमच्याशी, आणि आता निर्णय झाला आहे, मला यावर काहीही बोलायचं नाही",...... सचिन

"निशा ने तुला वाढवून सांगितल आहे काही झाल नाही काल विशेष इथे ",...... मालती ताई

"मालती तू रूम मध्ये चल पुरे आता ",...... सुरेश राव

"निशा..... निशा, ऐ बाई का ग अशी ताटातून करते आमची , माफी मागु का मी तुझी",...... मालती ताई मोठ्याने ओरडत होत्या

" आई शांत हो, निशा तू रूम मध्ये जा, काही अर्थ नाही आता या गोष्टींना, आणि मला निशा ने काही सांगितल नाही, उलट तिला तुमची काळजी वाटते, आणि तुला असं वाटत की तुझं काहीही चुकलं नाही का? यात जो काही दोष आहे तो आमचाच आहे का? हो बरोबर आहे सगळ्यात मोठा दोष तर निशाचा आहे, तिचा हाच दोष आहे कि तिने माझ्याशी लग्न केलं, तिने आपल्या कडून प्रेमाची चांगल्या वागण्याची अपेक्षा ठेवली, ऑफिस सांभाळून घर काम केलं, तिचा दोष आहे, तुला तिची किंमत नाही, तुला ती आवडत नाही, हे घर फक्त तुझच आहे, मग तूच राहा इथे एकटी, तुझ्या नावडत्या निशाला घेऊन मी जातो आहे, तुला हव तस हव तिथे सामान ठेव, आणि उगीच आता रडून उपयोग नाही, मी थांबणार नाही",....... आता सचिन उठून आत चालला गेला

बाबाही आईकडे रागाने कडे रागाने बघत होते,........" मी कधीच बोलत होतो तुला की तुझं वागणं बदल, आता भोगा आपल्या कर्माची फळं ",.... तेही उठून आज चालले गेले

मालती ताई उठून किचन मधे गेल्या निशा ही त्यांना बघून रूम मध्ये निघून गेली

त्या त्यांच्या रूम मध्ये आल्या खुर्ची वर बसुन रडू लागल्या तसे सुरेश राव जवळ गेले

" अहो थांबवा ना त्यांना, तुमच ऐकतील ते ",....... मालती ताई

" नाही, आता उपयोग नाही मालती सांभाळ स्वतःला",....... सुरेश राव

"मी नाही राहू शकत सचिन शिवाय",...... मालती ताई

"तुला फक्त मुलगा हवा, सून नको, अस कस चालेल, मुलगा खुश हवा असेल तर सुनेला सांभाळायला हव होत, पण आता आपल चुकल आहे, जाऊ दे त्यांना आणि अजून वेळ गेली नाही, आता काही बोलू नको त्यांना, जाता आहेत जाऊ दे नंतर जात जाऊ आपण त्यांच्या कडे, जवळ घेता आहेत ते घर, काळजी करू नकोस, आणि त्यांच सामान ते नेतील तेव्हा मध्ये मध्ये करू नकोस, त्यांना जे न्यायच ते नेतील ते",........ सुरेश राव परत एकदा मालती ताईंना समजावत होते

सचिन निशा रूम मध्ये आले, सचिन रडायला लागला,..........." सचिन सावर स्वतःला, तुला वाटत असेल तर राहू आपण इथे ",..

" नको निशा मी थोडा इमोशनल झालो होतो इतकच, आपला निर्णय झाला आहे, आणि त्यात बदल होणार नाही",...... सचिन

दोन दिवसानी एक जवळ 2 bhk फिक्स केला, छान होता 5 व्या मजल्यावर, सचिन निशा घर बघून आले, निशा ने घरची साफ सफाई करून घेतली

" निशा तुला काय काय सामान घ्यायचा ते बघून घेवू",........ सचिन खुश होता

" सुरुवातीला फार नको नंतर घेवू सावकाश ",...... निशा

स्वैपाक पुरती भांडी, पुढे सोफा सेट, बेडरूम मधे कॉट अस बेसिक सामान घेतल दोघांनी.....

घरात एकदम शांतता होती, मीना येवून स्वैपाक करायची, सगळे न बोलता जेवून घ्यायचे, सौरभ तेवढा खेळत रहायचा, तेवढाच आवाज येत होता घरात

"आई बाबा आम्ही उद्या शिफ्ट होतो आहोत नवीन घरी ",..... निशा

"तुम्ही येणार का घर बघायला ",....... सचिन

"हो येवू की, या घरातून काही लागत ते घेवून जा",...... सुरेश राव

"तुमच्या रूम मधल सामान घेवून जा",...... पहिल्यांदा मालती ताई बोलल्या

"ठीक आहे आई",.... सचिन ने ही शांततेत घेतल

वीकेंडला तिथे सचिन निशा शिफ्ट झाले.......

........

बघू पुढे काय होतय ते.......

किती कठीण असत ना अश्या परिस्थितीत घर सोडून दुसरीकडे वेगळ राहण, पण कधीकधी हृदयावर दगड ठेवून असे निर्णय घ्यावे लागतात, जरा आपण इमोशनल होऊन हा निर्णय बदलला तर थोड्या दिवसांनी परत घरात तसेच भांडणं सुरू होतात आणि मग आपल्याला आपला डिसिजन चुकला हे लक्षात येत, आणि त्याच गोंधळात आपण अडकून पडतो

ही कथा free मध्ये आहे, subscription ची गरज नाही🎭 Series Post

View all