हे घर माझ ही आहे..... भाग 8

हो मलाही ते समजत नाही का करतात त्या अस? मुळातच प्रेम नाहिये त्यांना माझ्या विषयी, जेव्हा आपण ठरवतो त्या काही म्हटल्या तरी दुर्लक्ष करू तेव्हा नेमक त्या विरुद्ध वागतात त्या, का अस करतात काय माहिती आणि कोणी पाहुणे आले की माझा अपमान ठरलेलाच असतो, खूप उलटसुलट सांगतात पाहुण्यांना, मला आता अजिबात सहन होत नाहीये हे सगळं,


हे घर माझ ही आहे..... तुमच्या घरात..... मला ही थोड्या प्रेमाची गरज आहे......थोडा विश्वास ठेवा...... मलाही आपलंसं करा

घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,

एका सुनेची व्यथा....

कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही

©️®️शिल्पा सुतार
........

सकाळी निशाने सचिनची बॅग भरली, आई ला फोन करून सांगितले की सचिन तिकडे येतो आहे उद्या आणि परवा अर्धा दिवस,

मीना आली कामाला

"आज पासून सासुबाईंचा स्वैपाक नाही करायचा मीना, आमचा चार लोकांचा करत जा",...... निशा

"काय झाल आता ताई ",..... मीना

"काही नाही ग त्या करतील त्यांच त्यांच",...... निशा

"त्यांची फिक्की भाजी करू का मी",...... मीना

"अग नको मीना, त्या करतील त्यांच, आटोप तू",..... निशा

सचिन निशा आवरून ऑफिस ला गेले

" काय ग आज उशीर झाला निशा ",...... सारिका

" हो ग उद्या सचिन चा इंटरव्यू आहे, तो आज माझ्या आई कडे थांबणार आहे त्याची तयारी करत होते",...... निशा

" घरी ठीक आहे ना ",..... सारिका

" हो, नेहमीच ग, आता काही वाटत नाही आम्हाला, अभ्यास होत नाही ग सचिन चा, त्या पेक्षा आई कडे थांबेल आज तो",....... निशा

सचिन संध्याकाळी लवकर निशा च्या आई कडे गेला

निशा च्या आईने चहा केला, सचिन आणि निशाच्या बाबांनी चहा घेतला

" आई बाबा मी तुम्हाला उगाच त्रास देतो आहे, पण तुम्हाला माहितीच आहे ना आमच्या घरचं वातावरण",...... सचिन

" त्यात काय आलाय त्रास, हे घरही तुमचंच आहे तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा तिकडे येऊ शकतात",....... बाबा

"बाबा मी बसतो अभ्यासाला",........ सचिन

" तुमची व्यवस्था आतल्या खोलीत केली आहे",..... बाबा

सचिन आत गेला, त्याने निशाला मेसेज पाठवून दिला की मी घरी पोहचलो आहे, अभ्यासाला बसलो आता

निशा ऑफिसहुन घरी आली, आई-बाबा बाहेर चहा घेत होते,

" बाबा आज आपण तिघेच आहोत जेवायला तर खिचडी केली तर चालेल का ",....... निशा

" हो चालेल बेटा",..... सुरेश राव

" आई तुम्हीपण खाल का खिचडी",...... निशा

"नाही मी माझी पोळी भाजी करून घेईन",..... मालती ताई

"ठीक आहे",...... निशा

" सचिन कुठे गेला ग",....... मालती ताई

" सचिन आज माझ्या घरी गेला आहे, उद्या इंटरव्यू आहे तर तिकडे च अभ्यास करणार आहे ",..... निशा

"काही सांगून ही गेला नाही तो, इथे आपल्या कडे अभ्यास करायला काय हरकत होती ",..... मालती ताई

" मला सांगितल त्याने, उद्या केव्हा आहे इंटरव्यू ",...... सुरेश राव

" उद्या दुपारी तीन वाजता आहे इंटरव्यू",..... निशा

" ठीक आहे",...... सुरेश राव

सुरेश राव मालती ताई फिरायला निघाले

" सचिन ला तिकडे निशा च्या घरी जाऊन राहायची काय गरज होती म्हणजे त्या लोकांना असं वाटेल की आपल्या घरी सचिन चा अभ्यास होत नाही ",....... मालती ताई

"जाऊ दे ना तो जातो आहे तर तिकडे, आणि खरं आहे की आपल्या घरी अभ्यास होत नाही, काल त्याचा किती वेळ वाया गेला, छोटीशी गोष्ट होती की उरलेल जेवण समोर देऊन यायचं होतं, तरी अर्धा-एक तास तुम्ही लोकांनी घालवला, आजचा दिवस महत्त्वाचा आहे, त्याला वाचायचं असेल भरपूर, आता तू प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ काढत बसू नकोस आणि तू खरंच त्या मीना च्या हात च काही नाही खायच ठरवलं आहेस का? चांगला करते ती स्वयंपाक काही हरकत नाही तिच्या हातचं जेवायला, तू ना उगाच दमत बसतेस ",......... सुरेश राव

" नुसती खिचडी मला आवडत नाही ",...... मालती ताई

" अगं पण रोज असतं की पूर्ण जेवण, तेही तू मीनाच्या हातच नको बोलतेस, काय झालं आहे? तू उगीच नाही म्हणते की तुला खरच नाही आवडत",........ सुरेश राव

मालती ताई काहीच बोलल्या नाहीत

जरा वेळाने मीना कामला आली,...… "आज फक्त कढी आणि खिचडी कर ग ",

" का हो ताई आज कमी आहे का स्वयंपाक ",..... मीना

" हो आज फक्त तीन लोकांची खिचडी कर आणि थोडीशी कढी ",....... निशा

आज विशेष काम नव्हतं म्हणून मीना आवरून लवकर चालली गेली, निशा सौरभ ला घेऊन समोरच्या बागेत जाऊन बसली, सौरभ खूप खुश होता

सुरेश राव मालती ताई फिरून आल्या, निशा सौरभ ही घरी आले, सौरभ होम वर्क करत बसला, निशा तिच्या ऑफिस च् काम करत होती

सासुबाई किचन मधे स्वैपाक करत होत्या, बेल वाजली, बाबांचे भाऊ, वहिनी, आले होते, त्यांचा मोठा मुलगा जवळ राहत होता त्याच्या कडे आले असतिल , ते गावाला रहायचे

सगळे आत आले, निशा ने पाणी दिल, सासुबाई किचन मधून बाहेर आल्या

"काय ग तू स्वैपाक करत होती का मालती",...... वहिनी

"हो ताई आता हल्ली माझा स्वैपाक मीच करते" ,.......मालती ताई

वहिनी निशा कडे विचित्र नजरेने बघत होत्या...

"निशा अग चहा ठेव, आता त्या साठी बाई नाही येणार ना, आणि स्वैपाकाला लाग",...... मालती ताई

"नाही मालती आम्ही जेवणार नाही, तिकडे झाला आहे स्वयंपाक आम्ही सहज भेटायला आलो,...... वहिनी

निशा चहा ठेवायला आत गेली

" तुम्हाला सांगते वहिनी आमच्याकडे सगळ्या कामाला बाई आहे, निशा कडून कुठलच काम होत नाही, ती फक्त उठते आणि ऑफिसला जाते आणि येते ",...... मालती ताई

"सून घरी असुन तू का ग करत होती तुझा स्वयंपाक",....... वहिनी

"मोठी कहाणी आहे ती वहिनी, मला नाही आवडत बाईच्या हातच जेवण, नेहमी चांगल खाल्ल आहे आपण, थोडा त्रास झाला तरी मी माझ काम करून घेते ",....... मालती ताई

" काही खर नाही तुझ मालती, माझी सून तर इतक छान काम करते, घरात सगळा स्वयंपाक भांडीकुंडी घरीच आहे, आले गेलेल्याच खूप छान करते ती , अशा शिकलेल्या सुनेपेक्षा साधी सून बरी",....... वहिनी

निशा आलीच तेवढा चहा घेऊन ती किचन मधुन सगळं ऐकत होती, तिचा चेहरा पडलेला होता

बराच वेळ मालती ताई आणि वहिनी बोलत होत्या, त्या बोलण्यातच वहिनी त्यांच्या सुनेची तारीफ करत होते आणि निशाला बोल लावत होत्या

" काय ग मालती आधी तू किती भारी भरत होती की तुझी सून इंजिनियर आहे, हिच्यापेक्षा तर आमची नोकरी न करणारी सून बरी",...... वहिनी

"सचिन ने पसंत केलं हिला म्हणून वहिनी, मला तर पसंत नव्हती ही",...... मालती ताई

क्षणोक्षणी निशा चा अपमान होत होता, तरी ती तिथेच बसून चहा घेत होती, काही इलाज नव्हता, सुरेश राव यांना ते लक्ष्यात येत होते, त्यांनी दोन तीन दा मालती ताई कडे रागाने बघितल तरी त्या बोलत होत्या

" निशा बेटा तुला काम असेल तर आत जावून बस ",....... सुरेश राव

"कश्याला आत? कोणी आल आहे तर बस ग आमच्यात",...... मालती ताई

सुरेश राव आणि ते काका गप्पा मारत होते

" सचिन कुठे गेला आहे",...... वहिनी

" तो त्याच्या सासरी मुक्कामाला गेला आहे",..... मालती ताई

" का बरं ",.... वहिनी

"त्याचा उद्या इंटरव्यू आहे ना तर अभ्यास होत नाही म्हणून तिकडे गेला आहे ",..... मालती ताई

"हीच देत असेल डोक्याला ताण",..... वहिनी

"नाहीतर काय",..... मालती ताई

जरा वेळाने पाहुणे गेले तशी निशा रूम मध्ये गेली आणि ती खूप रडायला लागली,

" मम्मी तू का रडते आहेस ",..... सौरभ

" काही नाही बाळा, जा तू जेवून घे ",..... निशा

सौरभ बाहेर गेला, आजोबा मम्मी आत रडते आहे

निशा... निशा...... सुरेश राव हाक मारत होती

"बेटा त्रास करून घेऊ नको, मला माहिती आहे काय झाल ते, मला माफ कर, मी काही करू शकलो नाही पाहुण्यांन समोर ",..... सुरेश राव

"बाबा तुम्ही नका माफी मागू, नेहमीच आहे हे घरी अस होत आपल्या, पण ना आता कंटाळा आला आहे ",..... निशा

"चल जेवून घे",....... सुरेश राव

"तुम्ही बसा बाबा मी जेवेन नंतर",....... निशा

"चल ना, अस नको करू ",..... सुरेश राव

" नको बाबा मी पुढे आली तर काय होईल सांगता येत नाही ",..... निशा

सुरेश राव गेले...

बराच वेळ रडून झाल्यानंतर निशा उठली, तोंड धुतलं तिचं ताट वाढून घेतलं आणि जेवून घेतलं

जरा वेळाने सचिनचा फोन आला, तेव्हा त्याला निशा चा आवाज रडवेला वाटला, पण निशाने त्याला काही सांगितलं नाही, उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, नाहीतर आजच मी बॅग घेऊन माहेरी निघून गेली असती

सुरेश राव मालती ताई रूम मध्ये आले...

"तुझ आज काय चालल होत, वहिनींन सोबत, कशाला निशाचा अपमान करत होती, त्या वहिनी त्यांच्या सुने बद्दल चांगल बोलत होत्या तू निशा चा अपमान करत होती ",..... सुरेश राव चिडले होते

"जे खर आहे ते दिसतच सगळ्यांना, आहेच त्यांची सून चांगली ",..... मालती ताई

" आपल्या घरच्यांना आपण बोललो तर समोरचा ही त्यांच्या मान ठेवत नाही, आणि काय वाईट आहे निशा मध्ये ",....... सुरेश राव

" तुम्हाला अजूनही लक्ष्यात येत नाही हे, आणि मी येवढी काहीही बोलली नाही तिला ",...... मालती ताई

"तू तुझ वागण बदल नाही तर आता वेगळ्या परिणाम ला पुढे जाव लागेल तुला, काहीही कर तुला सांगून उपयोग नाही ",...... सुरेश राव

दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून निशा ऑफिसला गेली सचिनही तयार होऊन ऑफिसला गेला तिथूनच तो डायरेक्ट इंटरव्यू ला जाणार होता

पाच वाजता सचिनचा फोन आला

"कसा झाला इंटरव्यू सचिन",.... निशा

"खूप छान झाला, मला वाटते की माझं काम होऊन जाईल",..... सचिन खुश होता

अरे वा

"तुझं झालं आहे का ऑफिस च काम? मी येतो तुझ्या ऑफिसला तुला घ्यायला, आपण घरी जाऊ",......... सचिन

"तुझे कपडे बॅगा आई कडे आहे ना",..... निशा

" हो ते जाताना घेऊन घेवू",..... सचिन

" चालेल तू ऑफिस जवळ आला की सांग मी खाली येते",...... निशा

सचिन खाली आला निशा त्याला जाऊन भेटली कालपासून तिच्या मनात खूप साठल होतं सचिन ला बघून तिला एकदम भरून आला सचिन ला ही समजलं की नक्कीच काहीतरी झालं आहे

" काय झालं आहे निशा, घरी सगळ ठीक आहे ना, आई काही बोलली का तुला काल ",..... सचिन

" काही नाही सचिन तू आज खूप खुशीत आहे, जाऊ दे ना तो विषय ",.... निशा

"चल आपण कॉफी घेऊया",..... सचिन

"अरे पण आता घरी जातो आहोतच ना मग कशाला इकडे कॉफी घ्या",..... निशा

"मला असं वाटतं की तुला माझ्याशी बोलायची गरज आहे कॉफी घेऊन जाऊ",........ सचिन

दोघ कॉफी शॉप ला आले

" कसा झाला इंटरव्यू नीट सांग सगळं",.... निशा

सचिन ने निशाला सगळं सांगितलं

" पोस्ट वगैरे व्यवस्थित बघितलं ना तु पेपर वर",...... निशा

" हो एकदम व्यवस्थित चेक केलं, आता बहुतेक दुसरा राउंड होईल आणि फायनल होईल काम ",....... सचिन

" कधी आहे आता दुसरा इंटरव्यू",....... निशा

" अजून त्यांचं काहीही मेसेज आलेला नाही बहुतेक पुढच्या आठवड्यात असेल",......सचिन

" ठीक आहे ",... निशा

" मला असं वाटतं की सगळं ठीक नाही तुझ्याकडे बघून, काय झालं आहे का घरी"?,...... सचिन

निशाचा चेहरा एकदम उतरला निशाने काल काय झालं ते मोठे दादा वहिनी आले होते मालती ताई आणि वहिनींनी कसा निशाचा पाणउतारा केला ते सगळ सांगितलं

सचिन खूप चिडला होता,... "काय प्रकार आहे हा? का समजत नाही? बाबा कुठे होते ",...

" त्यांनी समजवल मला खूप काल",...... निशा

"पण आईला समजत नाही का? कोण आपल कोण परक, कोणा समोर अपमान करते म्हणजे काय? तुझी त्यांची बरोबरी होवू शकत नाही ",....... सचिन

"त्यांना ना मी काहीही केल तरी समाधान होणार नाही, माझ म्हणजे नावडतीचे मीठ आळणी अस झाला आहे",...... निशा

" तू बोलली का मग आईला काही ",..... सचिन

" मी काही बोलत नाही तरी त्या इतका सांगतात दुसर्‍यांना अजून जास्त, पाहुण्यांसोबत त्यांना बोलली तर काय करतील, पण आता एवढं नक्की आहे मी तुझ्याशिवाय त्या घरात राहणार नाही तू एक रात्र जरी कुठे गेला तरी मी आईकडे चालली जाईल",..... निशा

" हो आता अति झाल",..... सचिन

" जाऊ दे सचिन आपण नको बोलायला अजून, मी तो विषय कालच संपवला",...... निशा

"नाही निशा खूप चुकीच आहे हे, तुला माझ्याशी लग्न करून काय मिळाल ? अजिबात सुख नाही तुला, आई सदोदित तुला त्रास द्यायची संधी सोडत शोधतच असते , आता तर आलेल्या पाहुण्यांन समोर अस वागते ती, तुझ्या बरोबर नीट रहायला काय प्रॉब्लेम आहे, कोण जवळच हे समजत नाही का तिला, बाकीचे घेतात त्यांच्या सुनेची बाजू आईला काही समजत नाही ",..... निशा

हो मलाही ते समजत नाही का करतात त्या अस? मुळातच प्रेम नाहिये त्यांना माझ्या विषयी, जेव्हा आपण ठरवतो त्या काही म्हटल्या तरी दुर्लक्ष करू तेव्हा नेमक त्या विरुद्ध वागतात त्या, का अस करतात काय माहिती आणि कोणी पाहुणे आले की माझा अपमान ठरलेलाच असतो, खूप उलटसुलट सांगतात पाहुण्यांना, मला आता अजिबात सहन होत नाहीये हे सगळं, म्हणे की मी तुझ्या डोक्याला ताण देते म्हणून तू माझ्या आईकडे गेलास अभ्यासाला, मी एक बोलू का, मी थोडे दिवस आईकडे जाऊन राहून येवु का? मी कालच येणार होती तिकडे पण आपला इंटरव्यू महत्त्वाचा होता म्हणून उगीच तुला डिस्टर्ब झाले असतं",...... निशा

" यायचं होतं ना बिंदास सौरभला घेऊन एवढा त्रास कशाला सहन करत बसलीस आणि तू रडली का रात्री",....... सचिन

" हो मग काय करणार किती बोलल्या त्या मला",....... निशा

सचिन विचारात होता काय करता येईल

" मी काय म्हणतो निशा आपण तुझ्या आई च्या घरा जवळ घर घ्यायच का",....... सचिन

म्हणजे......

" आपण वेगळ राहु या का? ह्या रोजच्या कटकटीतून सुटका मिळेल, मला ही खूप कंटाळा आला आहे ग आता, छान आनंदी वातावरण हव अस वाटत, आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ वाया जातो आहे, आणि यात काही प्रगती नाही ",...... सचिन

" पण तू राहू शकशील का तुझ्या आई बाबांन शिवाय, आपण तिकडे गेलो तर आई बाबांकडे कोण लक्ष् देईल ",...... निशा

" राहतील ते त्यांचे एकटे, त्यांना सुखात राहू द्यायच नाही आपल्याला मग काही उपाय आहे का ",....... सचिन

" बाबा चांगले आहेत रे",...... निशा

"हो खूप चांगले आहेत ते, हो पण ही आई का अशी वागते, समजत नाही का तिला ",...... सचिन

" पण सगळे तुला नाही मलाच दोष देतील की निशाने घर फोडलं ",...... निशा

" यांना धक्का द्यायला पाहिजे, आणी देवु दे दोष, असेही ते तुला रोज बोलता, चांगल वागल तरी मग खराब वागल तरी बोलतील, म्हणजे आई बोलते, बाबा नाही, मी आता इथे नाही राहू शकत ",...... सचिन

..........

बघु पुढच्या भागात काय होत ते

तुम्हाला आवडला का सचिन निशा चा निर्णय, काय वाटतय तुम्हाला, असा निर्णय ही घेता आला पाहीजे, आपल्याला काय हव काय नको ते वेळेवर ठरवायला हव ........


ही कथा free मध्ये आहे, याला subscription ची गरज नाही

🎭 Series Post

View all