हे घर माझ ही आहे..... भाग 6

तुला इतर वेळी बाहेरच खाल्लं तर खूप त्रास होतो, आता स्वतःला करावे लागणार आहे तर बाहेरचही चालत, आई तू स्वतःला जपते तस निशा शी नीट वागली तर काय बिघडणार आहे, आई तुला असं नाही वाटत आहे का तू निशाशी अजिबात नीट नाही वागत


हे घर माझ ही आहे..... तुमच्या घरात..... मला ही थोड्या प्रेमाची गरज आहे......थोडा विश्वास ठेवा...... मलाही आपलंसं करा

घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,

एका सुनेची व्यथा....

कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही

©️®️शिल्पा सुतार
........


सकाळी चहा नाश्ता करून सचिन निशा सौरभ, तिघे निशा च्या माहेरी गेले

निशा च्या आईच घर आल, सौरभ पळत आत गेला

निशा आई बाबांना भेटली, सगळे आत गेले,

सचिन निशाचे बाबा बोलत बसले

आईने इडली सांबार चा बेत केला होता, सगळ्यांनी नाश्ता केला, सौरभ खेळण्यासाठी घाई करत होता, आईने छान चहा केला,

"मला निघावं लागेल आता, घरी मावशी येते आहे, मी उद्या येईन दुपारी निशा सौरभ ला घ्यायला",...... सचिन

"ठीक आहे, दुपारी इकडे या जेवायला",..... बाबा

Ok,...... सचिन निघाला तिकडून

घरी जरा वेळाने मावशी आल्या, मालती ताई सुरेश राव वाट बघत होते, त्यांनी चहा नाश्ता घेतला मावशी सोबत थोड्या गप्पा झाल्या...

"घरात कोणी नाही का" ,...... मावशी

"निशा सौरभ सचिन तिच्या आई कडे गेले आहेत, सचिन येईल थोड्या वेळाने, निशा उद्या येईल",...... मालती ताई

"ठीक आहे तिला इतर वेळी जमत नसेल ",..... मावशी

सासुबाई वाट बघत होत्या स्वैपाकावाली बाई का आली नाही?

सचिन आला तेवढ्यात गप्पा मारत बसला

जरा वेळाने मालती ताईंनी सचिनला विचारल,....." स्वैपाक वाली बाई का नाही आली ",

" माहिती नाही मी विचारतो निशाला",..... सचिन

सचिन ने निशाला फोन लावला

" पोहोचला का घरी सचिन",....... निशा

"हो आताच पोहोचलो, अग ती स्वैपाकाला बाई लावली ती आली नाही अजून? काय कारण असेल", ?........ सचिन

"ती आता सोमवारी येणार आहे, मी नाहिये तर नाही येणार ती ",...... निशा

" म्हणजे आज का नाही येणार ती",....... सचिन

"तिने अट अशी घातली होती की मी घरात असेल तेव्हा येईल ती कामाला, सासुबाई खूप त्रास देतात तिला बोलतात आणि कामावरून काढून टाकतात, तर ती घाबरते",...... निशा

" आता बघ ना ती येईल का ",....... सचिन

" ठीक आहे ",...... निशा

जरा वेळाने परत निशाने फोन केला,......." नाही म्हणते ती आणि ही आपली कामाची वेळ नाही, ती लांब आहे दुसर्‍या एरियात",..

" आता काय करायचं ",..... सचिन

" बघा तुमच तुम्ही, आईंनी स्वतःवर ही वेळ ओढावली आहे, त्यांना मुंगी बनून साखर नाही खायची हत्ती बनुन लाकड तोडायची",....... निशा

"ठीक आहे ",..... सचिन

"चल आम्ही क्रिकेट खेळतो आहोत सारखा मला फोन करू नकोस ",..... सचिन

सौरभ छान रमला होता, त्याची आजोबांशी मस्त गट्टी जमली होती

"आई आज बाई नाही येणार ",..... सचिन

" का येणार नाही आता ती",.... मालती ताई

" अग तुला आवडत नाही ना ती, तूच नाही सांगितल ना तिला, की बाईच्या हातच तुला आवडत नाही, ती आता सोमवारी येईल निशा आली की ",...... सचिन

"मग आता रे सचिन"?,..... मालती ताई

"आपण बाहेरून जेवण मागवू, पण तुला त्रास होईल आई, नको, अस कर तूच कर काही तरी, मी आहे मदतीला ",...... सचिन

" नको अरे, आता कुठे करत बसणार, किती वेळ झाला, नाही होणार त्रास मला, तू अस कर दोन भाज्या भात पोळ्या मागवून घे",....... मालती ताई

सचिन ने बाहेरून जेवण मागवले....

सचिन लक्ष देवून होता उगीच आई ला काही त्रास झाल तर, पण तस काहीच झाल नाही आणि ते बाहेरच जेवून सासुबाईना अजिबात त्रास झाला नाही
.......

" निशा कोणाचा फोन होता ग",..... निशा ची आई

" अग आई सचिन चा फोन होता, तो पोहचला घरी आणि मीना का नाही आली सासुबाई विचारात होत्या",..... निशा

"त्यांना आवडत नाही ना तिच्या हातच काम मग आता कशाला",..... आई

"तेच तर ना आता स्वतःला कराव लागत ना, मग ठीक वाटत सगळ, आई ती मीना आता सोमवारी येणार आहे मी गेली की येईन",....... निशा

" काय ग तुझ्या सासुबाई च वागण? एवढ विचित्र कधी कोणी बघितल नाही",....... आई

" अग खुप त्रास देतात त्या, काय काय सांगू तुला",....... निशा

" आता ठीक आहे ना सचिन आणि तुझ",..... आई

"हो आम्ही ठरवल आता आमच्या नात्यावर परिणाम नाही होवू देणार आम्ही कुठल्याही गोष्टीचा",...... निशा

आईच्या चेहर्‍यावर समाधान होत......
......
मालती ताई किचन मध्ये आवरत होत्या, तिथे सचिन गेला

"आई ठीक आहे ना तू, अॅसिडिटी वगैरे नाही ना होत ",...... सचिन

"हो मी ठीक आहे ",..... मालती ताई

" तुला इतर वेळी बाहेरच खाल्लं तर खूप त्रास होतो, आता स्वतःला करावे लागणार आहे तर बाहेरचही चालत, आई तू स्वतःला जपते तस निशा शी नीट वागली तर काय बिघडणार आहे, आई तुला असं नाही वाटत आहे का तू निशाशी अजिबात नीट नाही वागत",...... सचिन

" काही बोलली का निशा तुला? आज सासुरवाडी ला जावून आल्या पासून तू खूप बोलतो आहेस मला ",....... मालती ताई

" हे अस आहे तुझ आई, मी काय लहान बाळ आहे का कोणी मला काही शिकवायला",....... सचिन रागाने आत निघून गेला

मालती ताई काहीही बोलल्या नाहीत मावशी जवळ येऊन गप्पा मारत बसल्या

" काय झालं काय म्हणत होता सचिन ",..... मावशी

" अगं जेव्हा निशा बाहेरुन जेवण मागवते तेव्हा मला कधी कधी बाहेरच्या जेवणाचा त्रास होतो आणि आज त्रास झाला नाही, बाहेरून जेवण मागवलं तरी मी ठीक होती म्हणून सचिन म्हणत होता की मी निशा शी चांगली वागत नाही, तिला सपोर्ट करत नाही ",...... मालती ताई

" हो का ग अस आहे का, काही भांडण झाल का? का नाही आली ग बाई स्वैपाक करायला",...... मावशी

" अग ती मला घाबरते मला, मी तीला परवा काढून टाकल होत कामावरून, काल ही आमच भांडण झाल तर बाईने सांगितल जेव्हा निशा घरात असेल तेव्हा येईल मी ",.... मालती ताई

"अग पण तू का अशी वागतेस का काढला तिला",..... मावशी आश्चर्य चकित झाल्या होत्या

" इनमिन चार माणस घरात, त्यांचा ही आवरत नाही का आता निशा कडुन ",...... मालती ताईंनी परत तेच सुरू केलं

" बिझी असते ना ग निशा, तुला बाईच्या हातच आवडत नाही मग तू करत जा सगळा स्वैपाक ",....... मावशी

" अगं ती निशा आहे ना आज घेवून गेली होती सचिन ला तिच्या सोबत तीच काही काहीच्या काही भरवत असते सचिनच्या कानात म्हणून हा बोलतो माझ्याशी अस",..... मालती ताई

"म्हणजे तुझ काही चुकतच नाही का मालू, काय ग अस तू माझी बहिण आहे तरी मला अस वाटतय तुझ चुकतंय ",...... मावशी

" दोन दिवस रहा इथे म्हणजे समजेल तुला कसे वागतात निशा सचिन ",....... मालती ताई

" अग पण मी निशाला ओळखते ती चांगली आहे",...... मावशी

" हो का म्हणून तू येणार होती तरी ती घरी थांबली नाही",.... मालती ताई

" असू दे ग मालती, तिलाही जायचं असेल तिच्या आईकडे, आपण असा हट्ट का करा की नेहमी आपण आलो की ती घरीच थांबली पाहिजे आणि तू तुझा स्वभाव बदलायला पाहिजे मालती नाहीतर एक दिवस मुलगा आणि सून हातचे जातील तुझ्या ",....... मावशी

" मी बरी जाऊ दिल त्यांना असं हातच",...... मालती ताई

" हे बघ मालू तुला अजून लक्ष्यात आलेले दिसत नाही घरात कस वागतात ते, तू वेळीच वागण नीट केल नाही तर त्रास तुला होणार आहे ",....... मावशी

" अग स्वैपाक वाली बाई नीट भाज्या करत नाही ",...... मालती ताई

"करते नीट ती थोड adjust करायला काय हरकत आहे",..... सुरेश राव

"हो ना, अग तरुण सून मुलगा आहे घरात, सारख काय ग त्यांना बोलत असतेस, थोडसं होवुन जायच आपण त्यांच्या सारख, adjust करायचा ग आणि टोमणे मारणे बंद कर बघु तू आधी ",...... मावशी

" तूच दोन शब्द सांगून जा हिला, समजाव जरा",...... सुरेश राव रूम मध्ये निघून गेले

"निशा एवढी शिकलेली आहे केवढ कमावते तुला अभिमान हवा तिचा, आणि तीच कामाला येणार आहे तुला, पुढे तीच करेन तुझ ",........ मावशी

" हो समजल मला, पुरे आता, तुम्ही सगळे फार चांगले जसे आणि मी खराब, जाऊ दे ग त्या निशा चा विषय, एवढ्या दिवसानी आली मस्त वेगळ काहीतरी बोलू आपण ",...... मालती ताई

संध्याकाळी मावशी मालती ताई मस्त फिरून आल्या.....

रात्री मावशीने खिचडी कढी असा छान बेत केला

"आमच्या कडे ही तुला कराव लागतं बघ स्वैपाक वगैरे काम, निशा घरी असती तर बर झाल असत",.... मालती ताई

"तू कशाला तिला करू देते आहे स्वैपाक तू कर ना मग" ,.... सुरेश राव

"हे बघ हे अस आहे आमच्या कडे ज्याला चान्स मिळेल तो मलाच बोलत असतो",..... मालती ताई

"मी करते आहे माझ्या मनाने माझ्या बहिणीसाठी",...... मावशी

सचिन ने छान ice cream आणल नंतर, तो ही मावशी शी बोलत बसला

" मावशी समजवून सांग ना थोड आई ला सारखी त्रासदायक वृत्ती बरी नव्हे ",........ सचिन

" समजवले दुपारी मला नाही वाटत जास्त काही फरक पडेल ",..... मावशी

" का ग अशी करते ही? समजून का घेत नाही तुम्ही दोघी बहिणी ना, तू अशी समजूतदार, आई का ऐकत नाही",........ सचिन

"असतो एखाद्याचा स्वभाव पण चांगली आहे ती, तस आल लक्ष्यात की वागेन नीट ",..... मावशी

"कधी पण कधी? मावशी आता सहन नाही होत ग आम्हाला",....... सचिन

बर्‍याच वेळ दोघ बोलत होते आई आली आवरुन

तस सचिन उठून आत गेला

" काय म्हणत होता ग हा, आता हल्ली माझ्या वर चिडलेला असतो हा ",..... मालती ताई

" मालू तू स्वभाव बदल ग, सचिन नाराज आहे तुझ्यावर, समजून घे ग त्याला आणि निशा ला",..... मावशी

" नीट वागते ग मी तू सारख सारख तेच बोलू नको",...... मालती ताई

"अग आमच्या शी जशी वागतेस नीट तशी निशा शी वाग, मग बघ ती समोरून तुला खूप प्रेम देईल",...... मावशी

दुसर्‍या दिवशी सकाळी सचिन निशा च्या आई कडे आला

खूप खुश होता सौरभ, निशा ही मस्त दिसत होती एकदम रीलॅक्स , पूर्वी सारखी स्कर्ट टॉप वर होती ती

सचिन निशा कडे बघत होता तिला ते लक्ष्यात आल ती लाजली होती

"निशा सचिन ला पाणी दे चहा ठेव",..... आई

निशा चहा घेवून आली,...... "गेल्या का मावशी",

"नाही दुपार नंतर जाईल ती",..... सचिन

"काय झाल तु असा शांत का",...... निशा

"काही नाही...... बोर झाल ग घरी तू आणि सौरभ नाही घरी तर",...... सचिन

निशा तिच्या कामात बिझी झाली पण तिच्या लक्ष्यात आल होत काही तरी गडबड नक्की आहे, जाऊ दे विचारू नंतर

निशा च्या आई ने सगळा स्वैपाक सचिन च्या आवडीची केला होत, सगळ काम शांततेत सुरू होत, निशा आईला मदत करत होती, सौरभ ही आजोबांसोबत खूप छान रमला होता, सचिन त्या दोघांचा गेम बघत होता,

" मम्मी आपण इथे राहू या ना या आजी आजोबां कडे, मला आवडत ईथे, तो परत खेळायला पळून गेला",..... सौरभ

सगळे जेवायला बसले, निशा ची आई खूप आग्रह करून वाढत होती, निशा लाही खूप प्रेमाने वाढल,

जेवण झालं,

"जरा वेळ आराम करा सचिन... निशा",.... आई

सचिन निशा रूम मध्ये आले

"काय झाल सचिन, गप्प गप्प आहेस, घरी काही झाल का ",....... निशा

" नाही, तुम्ही दोघ किती खुश आहात इकडे, किती छान वाटतय तुमच्या कडे बघुन, घरात positive वातावरण आहे, मला अस आवडत निशा, नेहमी असे रहा, तुला वाटत असेल तर रहा थोडे दिवस तू इथे" ,....... सचिन

"नको सचिन मी येईन नंतर आता आपल्याला पिकनिक ला ही जायचं आहे आणि तुझा interview ही असेल, आज जाऊ आपण रात्री घरी ",....... निशा

" ठीक आहे ",...... सचिन

" आपण दोघांनी आज movie ला जायचा का , एक छोटीशी डेट",...... निशा

सचिन खुश वाटत होता,..... "आणि सौरभ? त्याला न्यायच का "?,...

" नाही, तो राहील आई कडे ",....... निशा

चालेल........

चहा झाला,

" आई बाबा आम्ही दोघ movie ला जातो आहोत ",...... निशा

"हो जावून या",..... आई

" सौरभ आम्ही दोघं बाहेर जातो आहोत, तू येतोस का"?,....... निशा

"नाही, मला बोर होत तिकडे, तुम्ही जा मी आजी आजोबांन जवळ राहतो ",...... सौरभ

निशा सचिन तयार झाले,......" आई आम्ही डिनर बाहेर करू, आल्यावर जाऊ घरी ",...

" ठीक आहे ",.... आई

आज बर्‍याच वर्षानी दोघ असे छान रोमँटिक डेट वर आले होते, आधी movie ला आले, दोघ हातात हात घालून फिरत होते,

" किती छान वाटतय ना आज सचिन ",..... निशा खुश होती

"मी तर movie सोडून तुझ्या कडे बघतो आहे, मला माफ कर निशा मी तुला शांत छान आयुष्य नाही देवू शकलो मी",...... सचिन

"आता नको तो विषय आणि मी खूप खुश आहे तुझ्या सोबत मला काही त्रास नाही, एन्जॉय कर",...... निशा


Movie बघितला,

" चल आपण तुला छान ड्रेस घेवू एखादा",....... सचिन ,

आज निशा ने छान जीन्स टॉप घातला होता.....

" नाही तर हा असा ड्रेस घे, सकाळचा ड्रेस छान होता तुझा, आज खूप सुंदर दिसते आहेस तू आज",....... सचिन

" अरे हे माझे जुने ड्रेस आहेत",....... निशा

"अस राहत जा ना तू ",...... सचिन

" चालेल का आपल्या कडे"?,...... निशा

"न चालायला काय झाल? तु comfortable हव बास",....... सचिन

थोडी शॉपिंग केली,....." कुठे जाऊ या डिनर ला निशा ",..

एक छान हॉटेल होत जवळ,...." चायनीज खाऊया का",...

हो चालेल..... सचिन

मस्त डिनर केल

" हे अस बाहेर आपण बर्‍याच दिवसांनी आलो नाही",....... सचिन

" हो ना आपण असा वेळ एकमेकाना द्यायला हवा",..... निशा

पुढच्या वेळी सौरभ ला ही घेवून येवू.....

नक्की

.........

पुढच्या भागात बघू काय होतय ते......

जर आपल्यावर काही अन्याय होत असेल त्याविरुद्ध आवाज आपण उठवायला पाहिजे, जर सहन करत राहिलो तर कायम सहनच करावे लागतं,


ही कथा फ्री मध्ये आहे याला subscription ची गरज नाही



🎭 Series Post

View all