हे घर माझ ही आहे..... भाग 2

"तू असा विचार करू नको सचिन, तु का माझी माफी मागतो आहेस? मला तुझ्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही, उलट माझं नशीब चांगलं की तू चांगला आहेस, नाहीतर अशा घरात जिथे आई चांगल वागत नाहीत, नवराही खराब असता तर मी काय केलं असतं, तू माझी सपोर्ट सिस्टिम आहेस, I really respect you so much, love you

हे घर माझ ही आहे..... तुमच्या घरात..... मला ही थोड्या प्रेमाची गरज आहे......थोडा विश्वास ठेवा...... मलाही आपलंसं करा

घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,

एका सुनेची व्यथा....

कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही

©️®️शिल्पा सुतार
........


निशा ऑफिस हून घरी पोहोचली, घरी कोणी नव्हतं, सासूबाई सासरे सौरभ ला घेऊन बाहेर गेले होते, निशाने जरा पडून घेतलं,

जरा वेळाने आईला फोन केला

"कशी आहे आई काय सुरू आहे",...... निशा

"तुझे बाबा आठवण काढता आहेत तुझी सौरभ ची, उद्या येतेस का जरा वेळ घरी, सौरभ साठी थोडा खाऊ आणला आहे",....... आई

"हो येईन मी ",..... बर्‍याच वेळ निशा आईशी बोलत होती, एकदम मूड छान झाला तिचा,

जरा वेळाने उठून स्वयंपाक करायला घेतला, आज मस्त पनीर बटर मसाला करू, सगळी छान तयारी केली

तेवढ्याच सासूबाई आल्याच फिरून...

" काय करते आहेस ग स्वैपाक, अगं पनीर कशाला काढलं बाहेर, उसळ करुया छान,  मस्त मोड आले बघ ना" ,...... मालती ताई

"मग तुमच्या साठी उसळ करु आई, आम्हाला पनीर हव आहे, सकाळी सचिन सांगून गेला आहे, काही तरी छान कर स्वैपाक, परत उसळ बघीतली की तो चिडेल " ,..... निशा

"उसळ  तशीच पडून राहिल ना , एवढी भाजी आमच्या कडून खाली जाईल का" ?......... मालती ताई

"उद्या करु मग उसळ आणि जरी आज हवी असेल तर थोडी करू, राहिली तर राहू द्या ना थोडी फ्रीज मध्ये राहील , दोन दा करू",....... निशा ने सांगून पाहील

" किती ते प्रकार, एक काहीतरी कर ",....... मालती ताई ही हट्टी होत्या

" तुम्ही रोज म्हणतात ना की फक्त भाजी पोळी होते आपल्या कडे, विशेष नाही होत स्वैपाक, करू द्या आता मग दोन भाज्या ",..... निशा

" वाया गेलेल मला आवडत नाही ",....... मालती ताई

" मलाही नाही",...... निशा

" मग कोणती करते भाजी ",...... मालती ताई

" तुम्हाला उसळ, आम्हाला पनीर, आम्हाला आमच्या मनाप्रमाणे एकदाही जेवायला करता येणार नाही का?
",..... निशा आता चिडली होती


झाल राग लोभ झाला, निशाने पनीरची भाजी केली, उसळ कोण खाणार म्हणून उसळ अशीच राहिली, सासुबाईंनी करूच दिली नाही उसळ, जेवण झाल, सगळ्यांना भाजी खूप आवडली, सचिन सौरभ, बाबा खुप खुश होते, सासुबाईंनी खूप लोणच खाल्ल जेवतांना, नंतर त्यांना त्रास व्हायला लागला,

पनीरची भाजी खाऊन ऍसिडिटी झाली असा त्यांनी समज करून घेतला , त्या रात्री हॉलमध्ये फेऱ्या मारत होत्या, त्यांना फेर्‍या मारताना बघून सचिन काळजीत पडला ,

"काय झाल आई",...... सचिन

"काही नाही रे थोडी छातीत जळजळ होते आहे, भाजी जरा तिखट तेलकट होती ",...... मालती ताई

"कशाला खाल्ली तू मग पनीरची भाजी, लोणच ही बर्‍या पैकी घेतल होत तू ", ?........ सचिन

"कुठे रे एवढस तर घेतल होत, आणि कुठे माझ्या एकटी साठी दुसरा स्वयंपाक करणार, जाऊ दे वाटेल बर ",..... मालती ताई

" अस कस जाऊ दे ",..... सचिन काळजीत होता

निशा.... निशा...

निशा तिच्या खोलीत बसलेली होती, सचिन आत आला,

"का केली होती आज पनीरची भाजी, आईला किती त्रास झाला",... सचिन

"तूच बोलला ना चमचमीत स्वैपाक कर रात्री छान, विसरला का",....... निशा

"हो मी बोललो होतो, पण आईला त्रास झाला ",..... सचिन

"मग त्यांनी खायची नाही ना पनीरची भाजी , त्यांचं वय झालं आहे, आपलं नाही, मी त्यांना बोलली होती की थोडी उसळची भाजी करून देवू का त्या नाही बोलल्या",....... निशा

" आई का नाही बोलली उसळच्या भाजीला",...... ? सचिन

"त्यांनाच माहिती? त्यांच म्हणण होत की फक्त उसळ कर पनीर नको",..... निशा

" काय हे अस",..... सचिन

" तूच बघ आता, म्हणजे पुढच्या वेळी घाबरून आपण आपल्या मनाचा स्वैपाक करायला नको ना, टेंशन क्रिएट करतात त्या दरवेळी ",...... निशा

" वया मानाने आपण आता आई-बाबांचा वेगळा स्वयंपाक करायला पाहिजे, त्यांनी आपली भाजी खायचा अट्टाहास नको करायला",...... सचिन

"हो ना, त्या आता हल्ली असंच करतात त्या, आपण आपल्या मनाचं काहीही स्वयंपाक करायचं नाही का? त्यांना चालत नाही म्हणून आपणही काही खायच नाही ना ? मुद्दाम करतात त्या, त्यांच वय झाल आपल नाही ",....... निशा

"जाऊदे शांत रहा तू बरोबर आहे तुझं ",...... सचिन

"आणि अजून एक सचिन मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे,  बाजूच्या मावशींकडे येते ती स्वयंपाक वाली बाई  शोधली आहे, ती उद्यापासून आपल्याकडे स्वयंपाकाला येईल, माझी खूप दमणूक होते, आईंनाही आता काम जमत नाही ",..... निशा

"चालेल मला काही हरकत नाही, तुम्ही बघा तुमचं काय रूटीन आहे ते ,माझी काही मदत लागली तर सांग",... सचिन

सकाळी साडेसहा लाच बेल वाजली  मिना आत आली सासुबाई किचन मध्ये चहा ठेवत होत्या

"कोण ग ही",...... मालती ताई

" आई आजपासून स्वयंपाकाला येईल ही, दोघेही वेळ तिला सांगून द्यायचं काय हवं काय नको ते, तेल तिखट-मीठ किती हव तुम्ही स्वतः काढून देत चला, नाहीतर नाही आवडल तर स्वतः ची भाजी स्वतः करत चला, पण पोळ्या भात वगैरे कोशिंबीर तिला सांगत चला ती भाजी पण कापून देईल ",........ निशा

"हिला कामाला लावलय ना तरी मीच करायच का आता",....... मालती ताई

" तस नाही, मी म्हणत होते की तिखट तेल मीठ सांगून द्या तिला तुम्हाला किती हव ते",....... निशा

"अगं पण कशाला लावलं तिला, मी होती ना तुझ्या मदतीला",..... मालती ताई

यावर काहीही प्रतिक्रिया न देता निशा आवरायला रुममध्ये निघुन गेली

मालती ताई रूम मध्ये आल्या........ " एवढ ही काम होत नाही का आता तिच्याकडून, लगेच काय तर म्हणे स्वैपाकाला बाई, किती ते नखरे, आमच्या वेळी किती कडक वातावरण होत घरात, रुमालाला हाथ लावायची बिशाद नव्हती आमची आणि इथे स्वतःचे निर्णय स्वतः घेता आहेत",.......

"काय झालं आता मला समजेल का ",...... सुरेख राव

"अहो आपल्याकडे स्वैपाकाला बाई आली आज, तीच करेन आता दोघी वेळ चा स्वैपाक",....... मालती ताई

"बर झाल लावली तिला कामाला , धावपळ होते तुमची दोघींची",....... सुरेश राव

"बर झाल काय बर झाल, किती पैश्याची उधळपट्टी, अस कितीस काम असत घरात",....... मालती ताई

"जाऊ दे कमावते ती, ती ही इंजिनिअर आहे, दमते ती दिवस भर ऑफिस मध्ये, पगार चांगला आहे तिला , करते खर्च स्वतः साठी, तुला काय अडचण आहे, तू जरा तुझा स्वभाव बदल मालती",....... सुरेश राव

मीनाने स्वयंपाक केला

आज निशा रिलॅक्स होती, ती आवरून ऑफिसला गेली आज खूप बरं वाटत होतं तिला, आज सौरभ ला सकाळी जवळ घ्यायला थोडा वेळ मिळाला होता, त्यामुळे तोही खुश होता, त्याचं आवरून त्याला ही शाळेत पाठवलं,

" सचिन आज संध्याकाळी मी सौरभ ला घेवून आई कडे जावून येते आई बाबा आठवण काढता आहेत ",..... निशा

"हो चालेल लवकर ये घरी, टॅक्सी करून घे",..... सचिन

हो......

संध्याकाळी निशा घरी आली सासुबाई सासरे फिरायला निघाले

"आई बाबा मी सौरभ ला घेऊन माझ्या आईकडे जाते आहे येते मी आठ साडेआठ पर्यंत",..... निशा

" ठीक आहे", ...... सुरेश राव

सासूबाई सासरे फिरायला गेले

"आहो तुम्ही सारखे काय निशा काही म्हटली की हो हो म्हणतात",....... मालती ताई

"मग काय म्हणून मी",..... सुरेश राव

" तिला मुळीच आपला धाक नाही",..... मालती ताई

"अगं पण कशाला हवाय तीला धाक, सगळं तर व्यवस्थित आहे तिचं",...... सुरेश राव

" आता बघितलं ना स्वयंपाकाच्या वेळी पण माहेरी चालली आहे ",...... मालती ताई

"अगं पण स्वयंपाकाला बाई आहे ना? घरी थांबून काय करेल ती ",...... सुरेश राव

"तुम्हाला तर मी काय म्हणते ना ते समजतच नाही ",..... मालती ताई

" बर बोल काय म्हणणं आहे तुझं",..... सुरेश राव

" सारखं काय काम असतं हीच माहेरी? तिचे आई वडील काहीतरी घेऊन येतात सौरभ साठी आणि मग सौरभलाही तेच आजी-आजोबा आवडतात ",...... मालती ताई

"असं काही नाही ह सौरभ आणि माझी ही खूप गट्टी आहे, किती खेळतो आम्ही ",....... सुरेश राव

निशा आई बाबांना भेटून आली, सौरभ खूप खुश होता आल्या आल्या खेळणी ड्रॉइंग बूक crayons सगळ आजोबांना दाखवत होता, निशा ही खूप खुश होती, पिशवीत बराच खाऊ दिला होता आई ने

सचिन घरी आला, सौरभ खुप उत्साहाने त्याला सगळ दाखवत होता, निशा सौरभ खुश आहेत बघून सचिन ला बर वाटल

सगळे जेवायला बसले निशा ने आई कडून आणलेली बर्फी वाढली सगळ्यांना

" मला नको बाई बर्फी, तुझी आई पीठ कच्च भाजते बेसनाच, मागच्या वेळी खूप त्रास झाला होता मला",........ मालती ताई

निशा चा चेहेरा उतरला

"छान आहे ग बर्फी निशा आणि सांडगी मिरच्या दिल्या का तुझ्या आईने मला आवडतात, उद्या तळ मस्त ",....... सुरेश राव

" हो बाबा ही बर्फी आईने केलेली नाही, बाहेरून आणली आहे, मिरच्या आणल्या आहेत आपल्या आवडीच्या ",...... निशा

मालती ताई एक ही चान्स सोडत नव्हत्या पाणउतारा करण्याचा,

दोघ खोलीत आले

" मालती तू जेवताना ते बर्फी च अस का बोललीस, सारखं तिच्या आई बाबांना बोलत नको जाऊ, तू बघितल नाही का बर्फी च्या पाकीट वर दुकानाचा शिक्का होता, तरी निशा च्या आईला बोललीस तू, किती घाण सवय लागली आहे तुला ",...... सुरेश राव

"तुम्ही काही झाल की माझ्या वर चिडता",..... मालती ताई

"तुला खरच समजत नाही का मालती तुझी चूक? की मुद्दाम करतेस तू? , तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही",.... सुरेश राव

निशा रूम मध्ये ऑफिस च काम करत बसली होती,

" निशा I am sorry, आईने अस बोलायला नको होत तुला जेवताना, मी नंतर बोलणार आहे आई शी",...... सचिन

" मला ना सचिन आज आईकडे जाऊन खूप छान वाटत होतं, मन इतक प्रसन्न झाल तिकडे जाऊन, जर आपल आयुष्य खरंच रोज अस असत इतक छान तर किती मजा आली असती नाही, तू यायला हवं होतं माझ्यासोबत, मला ना असं आवडतं आनंदी वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण, आईकडे ना कोणालाच एकमेकाला काही बोलायचं नसतं, एकमेकांचा अपमान करायचा नसतो, फक्त आणि फक्त काळजी आणि प्रेम असत तिथे, मला या घरात का नाही मिळू शकत एवढ प्रेम, तुझी काळजी घेतात आई, आणि माझा राग राग करतात, माझे आई वडील करतात का तुला तसं? ते उलट माझ्यापेक्षा जास्त तुझा आदर सन्मान ठेवतात, तुला काय हवं नको ते बघतात, प्रेम करतात, सगळं तुझ्या आवडीचं करतात, एवढ प्रेमाची मी अपेक्षित करत नाहीये तुझ्या घरच्यांन कडून पण थोडंसं तरी मान सम्मान... प्रेम माझ्या वाटेला यावा ही अपेक्षा आहे, पण इथे रोज निराशाच हाती लागते, आता मी ना सचिन या गोष्टीचा विचार करूनच सोडून दिला आहे, आधी मी या गोष्टी खूप मनाला लावून घ्यायची, खूप वाईट वाटायचं मला, पण आता ठीक आहे, जे बोलायचं ते बोला, फक्त मला बोला माझ्या आई-वडिलांना का बोलतात त्या? आई मला इतका त्रास देतात मी कधीही त्यांच्याविषयी वाईट तुझ्या जवळ बोलली आहे का? मला अस वाटतं माझ्या नशिबातच नाही आहे त्यांचा प्रेम ",...... निशा च्या डोळ्यात पाणी होत....

"मी परत एकदा तुझी माफी मागतो निशा",..... सचिन

"तू असा विचार करू नको सचिन, तु का माझी माफी मागतो आहेस? मला तुझ्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही, उलट माझं नशीब चांगलं की तू चांगला आहेस, नाहीतर अशा घरात जिथे आई चांगल वागत नाहीत, नवराही खराब असता तर मी काय केलं असतं, तू माझी सपोर्ट सिस्टिम आहेस, I really respect you so much, love you

सचिन ने निशाला जवळ घेतलं बराच वेळ दोघे गप्प बसून होते.......


.....

बर्‍याच वेळा स्त्रिया स्त्रियांना खूप त्रास देतात..... अगदी नको नको करून सोडतात.... या कथेतील घरातले सगळे चांगले आहेत, सासुबाई नीट वागल्या तर काय होणार आहे..... अस दुसर्‍याला त्रास देतांना काय असेल अश्या बायकांच्या मनात...... का अस करतात..... सून जर खुश राहिली नीट राहिली तर ती अजून घरातल्यांना आनंदी ठेवेल......


ही कथा फ्री मध्ये आहे, याला subscription नाही

🎭 Series Post

View all