हे घर माझ ही आहे..... भाग 1

एवढी शिकलेली सून पण तिला काहीही येत नाही, समजत नाही असं वागायच्या सासुबाई, बाहेरच्या जगात जावू??

हे घर माझ ही आहे..... भाग 1
.......

हे घर माझ ही आहे..... तुमच्या घरात..... मला ही थोड्या प्रेमाची गरज आहे......थोडा विश्वास ठेवा...... मलाही आपलंसं करा

घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,

एका सुनेची व्यथा....

कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही

©️®️शिल्पा सुतार

.......

निशा सचिन एक सुशिक्षित जोडपं, लग्नाला 5-6 वर्ष झाले होते, त्यांचा छोटासा सौरभ , सचिन निशा आई बाबा मालती ताई आणि सुरेश रावांन सोबत रहात होते, त्यांनी हे घर बांधल होत, सुरेश राव बॅंकेत होते सर्विस ला, आता रिटायर होते,

सचिन निशा च लव मॅरेज, दोघ एकाच ऑफिस मध्ये जॉब करायचे, मोठ्या पदावर होते ते, दोघ इंजिनीअर, खूप काम असायच ऑफिस ला,सध्या सौरभ च्या जन्मानंतर निशा ने दुसरी कडे नौकरी धरली होती, वेळ ही थोडा कमी होता, संध्याकाळी यायची ती घरी, धावपळ व्हायची तिची खुप, आता हल्ली खूप थकत होती ती, पण घरच्यांना ते समजून घ्यायच नव्हत

एवढी शिकलेली सून पण तिला काहीही येत नाही, समजत नाही असं वागायच्या सासुबाई, बाहेरच्या जगात जावून बघा किती अवघड आहे जॉब करण, येण जण, थोडी मदत कोणी करत नाही, केलेल्या कामात चुका काढण खूप छान जमत त्यांना...

तरी निशा कधीच काही बोलायची नाही त्यांना, सासुबाई म्हणतील तेच व्हायच घरात, त्यांना वाटल तर त्या करायच्या काही काम, नाही तर निशा करून घ्यायची...

आज डब्यासाठी करायला भाजी नव्हती म्हणून निशा पटकन सकाळी स्कूटर वर जाऊन भाजी घेऊन आली, स्कूटर पटकन लावली, चपला काढून स्वयंपाकाला लागली

"निशा स्कूटर कशी लावली आहेस आणि चपला सुद्धा नीट काढल्या नाहीत, हे अस मला अजिबात आवडत नाही तुला माहिती आहे, कस हे तुझ काम, आधी सगळं नीट कर बरं",....... मालती ताई ओरडल्या

"मला उशीर होतो आहे ऑफिस ला जायला, बाकीच आवरत बसली तर स्वैपाक राहून जाईल , आणि मी नीट काढल्या आहेत चपला, नाहीतरी आता निघतेच आहे मी ऑफिस ला जायला ",........ , निशा आवरत होती, सासुबाई रागाने बाहेर गेल्या,

नुसत आपल कसतरी आवरायचं, सासूबाईंच्या सांगण्याला काही किंमत आहे की नाही, नुसती आपली घाई घाई घाई घाई......

चपला नीट ठेवल्या म्हणून नाही तर त्यांचं ऐकलं नाही म्हणून सासूबाईंना राग आला होता...

निशा ऑफिस ला गेली...

"सचिन इकडे ये तुझ्या बायकोने बघ स्कूटर कशी वेडीवाकडी लावली आहे, ति नीट कर आधी, आज मी तीला सकाळपासून दोन-तीन वेळा सांगितलं तरीही तिने ऐकलं नाही",...... मालती ताई

या छोट्याशा प्रसंगावरून सासुबाई दिवसभर रागात होत्या,

"कश्याला चिडतेस सारखी मालती, छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या",....... सुरेश राव

संध्याकाळीही त्या निशावर खूप चिडचिड करत होत्या, जेवण झाल आवरून झाल, त्यांच्या चिडचीडी मुळे निशा ही नाराज होती, पण तिने तसं दाखवलं नाही, दुसऱ्या दिवशीच्या प्रेझेंटेशनची तयारी करत बसली, सचिन तिच्या शी उगीच बोलण्याचा प्रयत्न करत होता,

" मी ठीक आहे सचिन, तू काळजी करू नकोस, सवय झाली मला आता आईंच्या स्वभावाची",...... निशा

सासुबाई निशाला त्या घरात थोडाही बदल करू देत नव्हत्या, जस काही हे तीच घर नाही आहे, कुठलाही अधिकार नव्हता तिला, तिने सकाळी एखादी गोष्ट तिच्या मनाप्रमाणे ठेवली की संध्याकाळी ती आपोआप पूर्वपदावर यायची, कुठल्याही गोष्टीत त्या निशाला डिसिजन घेऊ देत नव्हत्या आणि परत बाहेर सांगायला मोकळे की आमचा स्वभाव खूप चांगला आहे, आम्ही सुनेला सगळ्या गोष्टीचे मोकळीक दिली आहे, ती जॉब ला गेली की सगळ मलाच आवराव लागत, आम्ही सुनेला मुली प्रमाणे वागवतो,

पण खरी परिस्थिती वेगळीच होती, सगळी कामे निशा एकटी करत होती, सचिन जॉब मध्ये बिझी , तस बाहेरचे कामे करायचा तो, निशा ची धावपळ व्हायची खूप , सकाळी स्वैपाक परत सौरभ च सगळं आवरून  जावं लागायचं, संध्याकाळी परत आहे सगळा स्वयंपाक आणि आई बाबांचे बरेच ओळखीचे होते, कोणी ना कोणी सदोदीत आलेल असायचं, एवढ्या सगळ्यांचा आवरायला निशाची दमणूक  व्हायची, यामुळे निशाने नंतर वर कामाला बाई लावली

निशा सकाळी उठली, ओट्यावरचा पसारा बघून तिच्या कपाळावर आठ्या आल्या, आईंची मदत नको वाटते आता, एक तर त्यांना अंदाज नाही उगीच मध्ये मध्ये करतात, बडबड करत ती स्वैपाकाला लागली,

"अगं निशा मी भाजी  कापून ठेवल होती, तीच कर बर का" ,...... मालती ताई

त्या नेहमी मदत करायच्या घरात, का तर त्यांच्या मनाच सगळं व्हायला पाहिजे म्हणून, स्वैपाकाची सुरुवात करून द्यायच्या , एकदा त्यांनी बघितलं काय स्वयंपाक होतो आहे, मग त्या बाहेर जाऊन बसायच्या, उगीच काम वाढायचं, त्यांनी अर्धवट केलेल्या काम नंतर निशाला पुर्ण करत बसाव लागायच

निशा ची प्रचंड धावपळ होत असे, रोज अगदी चहा घ्यायला सवड मिळायचा नाही, सौरभ लहान होता पाच वर्षाचा त्याकडेही बरच दुर्लक्ष होत होत, मध्ये येणार्‍या परीक्षा, शाळेत जाव लागायच मधुन, वेळच नाही स्वतःसाठी

सकाळी ऑफिस ला जायची धावपळ, निशाने सचिनला चहा दिला, चालता चालता तिचा पाय टेबलाला लागला, सचिन पळत आला

"हे टेबल सारख का इथे असत? मागे मी तुला बोललो होतो ते पुढच्या खोलीत ठेव म्हणून",...... सचिन टेबल सरकवत होता

"अरे मग तू ठेवून बघ टेबल पुढे, आई परत संध्याकाळी इकडे आणून ठेवतील पैज लाव",...... निशा

"तू जास्त सांगते आई बद्दल निशा, आता हा टेबल पुढे राहील, बघतो कस आणते ती टेबल इकडे, किती अडथळा होतो त्या मुळे" ,........ सचिनने ते टेबल पुढे नेवून ठेवल

भराभर आवरून निशा ऑफिसला गेली नंतर वर कामाला झाडूपोछा करायला कामवाली बाई आली, तिने सगळे घर आवरलं

अरे हा टेबल पुढे कोणी ठेवला, मला नाही आवडत हा टेबल इथे, हे निशाच काम असेल,..... सासुबाईंनी टेबल परत किचन मध्ये नेला

संध्याकाळचा चहा झाला की सासुबाई सासरे बागेत फिरायला निघायचे, त्या आधी निशा यायचीच ऑफिस हुन मग संध्याकाळच्या स्वैपाक बरीच काम असायची तिला त्यात सौरभचा होमवर्क त्याला खेळायचे असायचा, आई दिवस भर घरी नाही तर सौरभ तिला सोडायचा नाही

रात्री सचिन घरी आला निशा पोळ्या करत होती

"कसा आहे पाय तुझा",..... सचिन

"दुखतो आहे",.... निशा

निशा ने डोळ्याने सचिन ला टेबल दाखवला, निशा हसत होती

"कोणी आणला हा टेबल परत ईकडे",..... सचिन

"कोण असणार दुसर आईंन शिवाय, पण मी काही बोलली की तुला फार राग येतो",....... निशा

सचिनने तो टेबल त्यांच्या रूम मध्ये नेवून ठेवला

सासुबाई आल्या किचन मधे,...... "झाला का स्वयंपाक? एवढ्याश्या भाजी पोळीला किती उशीर",

" हो झाला आहे, सौरभचा अभ्यास घेत होती",..... निशा

" बालवाडीच्या मुलाला असा किती असणार अभ्यास आटपत जा ग लवकर, अरे इथला टेबल कुठे गेला ",....... मालती ताई

सचिन आला,.... "मी ठेवला तो टेबल आमच्या रुम मध्ये",

" का त्याची जागा इथे आहे, निशाने सांगितल असणार तुला असा फेरबदल ",..... मालती ताई

" नाही निशा काही रिकामी नाही, आणि अस काही फिक्स आहे का टेबल ची जागा वगैरे ",...... सचिन

" हो तो टेबल इथेच राहील आण तो इकडे",..... मालती ताई

दोघांच भांडण झाल...... तो पर्यंत निशा सोफ्यावर जावून बसली

सचिन ने ताट वाटी घेतली

" काय रे तुला का आता सगळी काम ",..... मालती ताई

" आई अग निशा ला टेबल लागला पायाला, पडायची ती गरम भांडी घेवून",...... सचिन

" कुठे काय लागल तिला? आता तर नीट होती? तू आल्यावर जास्त करते ती",....... मालती ताई

"नाही ती काही बोलली नाही मीच सांगतो आहे तुला",... सचिन

निशा हे ऐकत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं

सचिनने ते बघितल ती रुम मध्ये निघून गेली

निशा निशा....

" तू जा जेव सचिन मला नाही जेवायच ",.... निशा

" का नाराज होते ",..... सचिन

" मग काय करू मी? बघीतल ना सचिन आईनं माझ्याबद्दल अजिबात प्रेम नाही, मी फक्त एक मोलकरीण आहे इथली, मला काहीही झाल की नाटक का? " ,.....निशा

"जाऊ दे निशा डोळे पुस चल जेवून घे",.... सचिन

"तू त्यांना समजावत का नाही, किती त्रास होतो मला असा, मला नाही जेवायच, तू जा जेवून घ्या तुम्ही सगळे घरचे",..... निशा

" हे अस बोलता का? आता चल बर, नाही तर मी पण नाही जेवणार, नंतर जेवल्यावर बाहेर जाऊ ice cream घेवू, तुला पायाच मलम ही आणू ",...... सचिन

जेवण झाल,

" छान झाली होती ह आज भाजी ",.... सचिन

" बरी होती, त्यात काय? , नुसती पोळीभाजी होते आपल्या कडे",....... मालती ताई

निशा आवरायला आत निघून गेली

आवरुन झाल, निशा सचिन सौरभ फिरायला निघाले

" सचिन आपल्या घरात अजिबात शांती नाही, काही प्रगती नाही रे अश्यात, बाहेर ऑफिस मध्ये ही टेंशन घरी ही तेच, घरी रीलॅक्स नाही होता येत, प्रेम मिळत नाही आईं कडून, काय कराव समजत नाही, त्या अश्या आहेत का पूर्वी पासून",..... निशा

"नाही ग अशी नव्हती ती, आता हल्ली अस करते ",...... सचिन

" म्हणजे त्या तुमच्या सगळ्यांशी चांगल्या वागतात, मीच नको आहे का त्यांना, मग करायच नव्हत त्यांनी मुलाच् लग्न",....... निशा

" निशा नको ना तो विषय, तू त्रास नको करून घेवू, हा आपला वेळ आहे ना ",...... सचिन

"तुझ्याशी कोणी दिवस रात्र फटकून वागल तर? कस वाटेल तुला?, तोच विचार येईल ना मनात ",....... निशा

"हो बरोबर आहे, नाही आवडणार कोणी अस वागल तर ",..... सचिन

"तस होत माझ, मला ही प्रेमाची गरज आहे, विश्वास ठेवा माझ्यावर थोडा ",........ निशा नाराज होती
.......

दुसर्‍या दिवशी

निशा ऑफिसला पोहोचली, ऑफिसच कामं झाल, लंच ब्रेक मध्ये ती मैत्रिणीबरोबर जेवायला गेली ती....

" काय ग निशा आज परत जेवायला गवार ची भाजी",..... सारिका

"काय करू ग सासूबाई सकाळीच उठून भाजी चिरून ठेवतात, मग नाही म्हणता येत नाही आणि पप्पा म्हणजेच सासरे भाजी आणायला जातात, ते अशाच भाज्या घेऊन येतात, कंटाळा आलाय अगदी, आता हल्ली त्यांची मदत नको वाटते मला",.... निशा

" तू आदल्या दिवशी सांगायचं ना मग त्यांना दुसऱ्या दिवशी जी भाजी करायची आहे ती",..... सारिका

" अगं आमच्या कडे वातावरण वेगळ आहे, काही बोलता येत नाही, आणि त्यांना इतर भाज्या पचत नाहीत, मग ते त्यांना आवडतात त्याच भाज्या आणतात आणि एकच भाजी सकाळी करून ठेवली कि माझंही काम हलक होतं ",..... निशा

" चांगला आहे बाई तू कसं  सहन करते तुझं तुलाच माहिती",..... सारिका

" हो गं हे तर काहीच नाही संध्याकाळी जरा आम्हाला काहीतरी चमचमीत स्वयंपाक करायचा असेल तर एवढा struggle आहे एक तरी आधी त्या नाही म्हणतात, आपण ऐकल नाही तर सासू-सासरे यांसाठी साधा स्वयंपाक मला परत करावा लागतो ",..... निशा

" म्हणजे त्यांना विचाराव लागत का तुला स्वैपाक करतांना",........ सारिका

हो ग......

" तू कामाला बाईक लावून घेत का नाही एखादी",....सारिका

" आहे घर कामाला बाई, पण स्वयंपाकाला बाई आमच्याकडे चालत नाही, ती तेल मसाले जास्त वापरते ते सहन होत नाही घरी ",..... निशा

" चालवून घ्यायचं ग जरा, तू ऑफिस मध्ये एवढं काम करते, सकाळी स्वयंपाक करून येते, बाईला पोळ्या भात वगैरे सांगायच बाईला, भाजी आपणच टाकायची कमी तेलाची आणि तिखटाची ",...... सारिका

" हो ग ही आयडिया छान आहे आणि सुट्टीच्या दिवशी एवढी दमणूक होते तुला काय सांगू, सकाळी सगळ्यांना नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार होतात, तेवढ्यात अकरा वाजतात परत दुपारी सुट्टी म्हणून वेगळ काहीतरी करा आमचं वेगळं त्यांचा वेगळ आणि जर मदतनीस असली तर किती बरं होईल, आजच बोलते मी घरच्यांशी",..... निशा

" बोलते काय निर्णय घे",...... सारिका

" हो मी माझा निर्णय सांगून टाकते की आपण स्वयंपाकाला बाई लावणार आहोत ",..... निशा ला जरा हिम्मत आली

" आपण स्वतः ची काळजी स्वतः घ्यायला हवी, कोणी म्हणणार नाही तुला राहू दे काम आराम कर अस",...... सारिका

"हो ना, तुला सांगते सारिका लग्नाला 7 वर्ष झाले तरी मला अजून माझ्या मनाप्रमाणे काहीही करता येत नाही घरी, उठता बसता बोलणी बसतात परत",...... निशा

"कठिण आहे, इंजिनीयर आहे ना तू? किती अभ्यास केला आहे इंजिनिअर बनण्यासाठी हे माहिती आहे का त्यांना? एवढं कमवते तू, रिस्पेक्ट तर सोड कौतुकही नाही दिसत तुझ्या सासूला",..... सारिका

" हो ग काय करते आता",...... निशा

........

ही कथा फ्री मध्ये आहे, याला subscription नाही

🎭 Series Post

View all