Login

हे भोळ्या शंकरा

शंकराची महिमा सांगणारी कविता
हे भोळ्या शंकरा
तू करूणाकरा
तू कैलास निवासी
भक्तांना पाविसी
मस्तकी लावी विभूती
तू कैलासाचा नृपती
कंठी असे रूद्रमाळ
दैत्याचा तू कर्दनकाळ
देवाधिदेव महादेव तू, जटाधारी
नजर तुझी भस्म करणारी
तुझ्या हाती डमरू अन् त्रिशूल वसे
तूच तिन्ही लोकांचा स्वामी असे
तांडव नृत्य करणारा तू नटराज
देवीपार्वतीच्या मनावर असे तुझेच अधीराज