हे बंध रेशमाचे लिहताना

Writer's review

हे बंध रेशमाचे लिहताना......

ईरा ब्लॉगच्या सर्व वाचकांना मनापासून नमस्कार..
हे बंध रेशमाचे या कथेचे पंधरा भाग लिहून पुर्ण झाले आणि वाचकांनी या कथेला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. खरंतर ही माझी पहिलीच कथा आहे. कथा लिहायची हे सुद्धा मला ईराच्या कथा वाचून सुचलं असं म्हणायला हरकत नाही.ईराच्या सगळ्याच कथा फार छान आहेत.

लग्नासाठी आपण मुलीचा फोटो बघतो या एका concept  वरून मला ही कथा सुचलेय. पहिला भाग लिहून झाला त्यावेळी ही कथा किती भांगांची वगरे लिहावी असं काहीच ठरवलं नव्हतं.पण एकेका गोष्टीवरून ही कथा सुचत गेली. आणि मग त्यानुसार त्याचे भाग लिहायला लागले. नेहा आणि आनंद ही आपल्या रोजच्या व्यवहारातील नाव यासाठी ठेवली कारण कथा साधी सोपी हलकी फुलकी असावी असं वाटलं..आधी नेहाचं पात्र सुचलं आणि त्याच्या बरोबर उलट आपल्याला आनंद दिसून येईल. मग या दोघांच लग्न का ठरलं हे आपल्याला कथेतून कळलंच असेल. आता लग्नानंतर काय असा प्रश्न खूप वाचकांना पडला आहे. तर लग्नानंतर आनंद आणि नेहा एकमेकांशी जुळवून घेतात की नाही या साठी तुम्हाला कथेचे पुढील भाग वाचावे लागतील.

काही कामामुळे मला पुढचा भाग पोस्ट करायला वेळ जातोय. लिहायला थोडा वेळ हवाय.वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून खूप समाधान वाटलं.त्यांना ही कथा आवडली यातच लेखिका म्हणून माझं यश आहे. सगळ्या वाचकांना आणि प्रिय ईरा ब्लॉगला खूप खूप धन्यवाद...!! कथेचा 16 वा भाग उद्यापर्यंत पोस्ट केला जाईल...

सायली विवेक.

🎭 Series Post

View all