हे बंध रेशमाचे पर्व 2 भाग 9

Love story

( तिला रिप्लाय देऊन तो मागच्या सारखं तिच्या रूम मध्ये जायला निघाला. वाड्याच दार उघडुन तो बाहेर आला. तिच्या खोलीच्या बाल्कनीत शिडी लावायला शोधत होता. तोच त्याला परांजपे काका फोन वर कोणाशी तरी बोलत असताना दिसले...) 

काकांना बोलताना बघुन आपण इथुन पळ काढलेलाच बरा  हे आनंदच्या लक्षात आलं. तोच काकांचा फोन संपवून ते मागे वळले आणि त्यांनी आनंदला पाहिलं. 

" आनंद अरे कुठे निघालास....? " 

" कुठे काय...?? काहीच नाही. " त्याने खांदे उडवले. 

" मग इतक्या रात्रीचा बाहेर कशाला फिरतोयस....??" त्यांनी विचारलं. 

" ते... मी... झोप येत नव्हती म्हणून आलो होतो. पण तुम्ही काय करताय इकडे...?? " त्याने विचारल्यावर काका जरा गडबडले. 

" अरे..... ते... ते हॉस्पिटल मधुन फोन आला होता. इमर्जन्सी होती सो सगळ्या इन्स्ट्रक्शन देत होतो.. " त्यांनी सावरलं. 

" काका , काळजीच काही कारण नाही ना...?? " त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.

" नाही रे. तु रिलॅक्स राहा. मी आहे ना..!! चल झोपायला जाऊ. " 

" हो , काका आई उद्याच मुंबईला जायच म्हणतेय. तुम्ही तिला न्याल का तुमच्या नि काकूंसोबत आधी. मी आणि नेहा नंतर येतो. प्लिज तुम्ही समजवा ना आईला...प्लिज... " तो काकांना मस्का मारत म्हणाला. 

" ओके. मी बघतो काय ते सकाळी. चल झोपु आता.." ते मग हसतच त्यालाही घेऊन आत गेले. दोघेही आपापल्या जागी जाऊन शांत झोपले. 

●●●●●●●●●●●

दुसऱ्या दिवशी सकाळी वृषालीताईंनी जाण्याची सगळी तयारी केली. तोपर्यंत परांजपे काका आणि काकू पण आल्या.

" वहिनी मी काय म्हणते , आपण तिघे पुढे जाऊयात. मुलं मग येउदेत सावकाशीने. " काकू म्हणाल्या. 

परांजपे काकांनी मुद्दामच आनंदला जास्त वेळ झोपायला सांगितलं होतं. त्यामुळे मग आनंद आवरून येईपर्यंत वृषालीताई थांबल्या होत्या. 

" अहो नको. आता ठरलंय ना सगळं...? मग आपण जाऊ. हा आनंद कसा आला नाही अजुन...?? " त्या म्हणाल्या. 

" वहिनी आपण आधी जाऊ मुंबईत. लग्नासाठी काय काय तयारी करायची आहे. ती बघुया मग मुलांना बोलावुन घेऊ. आनंद आणि नेहा खुप दिवसांनी गावी आलेत. राहू दे जरा त्यांना निवांत... " काका 

" असं म्हणताय... ठीक आहे. आपण निघुया म. उशीर होईल पोहचायला. " त्या बॅग चेक करत म्हणाल्या. 

" आप्पासाहेब पण येतायत आपल्यासोबत. मी त्यांना काल रात्रीच तयारी करून ठेवायला सांगितली होती. येतीलच ते थोड्या वेळात... " परांजपे काका मोबाईल चाळू लागले. 

सगळ्यांच्या गप्पा रंगल्या असतानाच आनंद हळूच उठून आत गेला. जाताना हॉल मध्ये बसलेल्या काकांना त्याने अंगठ्याची खुण केली आणि तो आत पळाला. 

" वहिनी आणि त्यांच्यासाठी असलेलं सरप्राईज जवळजवळ रेडी होत आलंय. त्यामुळे त्या दोघांना इतक्यात मुंबईला नेणं शक्य नाही... " काका दबक्या आवाजात म्हणाले . त्यावर वृषालीताईंनी मान डोलावली. 

" काय म्हणताय काका...... ?? " आनंदने मध्येच येऊन विचारलं तसे सगळे गडबडले. 

" काही नाही ते.... तुमच्या लग्नात सरप्राईज प्लॅन करत होतो आम्ही... हो ना गं... " 

" हो ना. आनंद तुला काय काय आवडत ते सगळं सांग. आपण यावेळी ते लग्नात सगळं ठेऊ. " काकू.

" येस नक्की.... " 

" चला. आनंद तुझी बॅग कुठाय...?? तू येतोयस आज आमच्यासोबत. " वृषालीताई म्हणाल्या. 

आनंदला काहीच कळेना तो एकदा आईकडे एकदा काकांकडे बघत राहिला. त्याच तोंड बघण्यासारखं झालं होतं. 

" मी....??? मी ते...... " 

तो असा भांबावलेला पाहून वृषालीताई हसायला लागल्या. 

" आई काय गं....!! " तो त्यांच्याजवळ जाऊन बसला. 

थोड्यावेळाने आप्पासाहेब देखील आले. नेहा , मेघना , आशिष पण फ्रेश होऊन आले. 

" तुला नेत नाहीये. पण तुमच्या दोघांवर लक्ष ठेवायला एक माणूस ठेवलाय मी ..." त्यांनी हळूच आशिषकडे पाहिलं. त्यानेही खुणेनेच डोळे मिचकावले. 

" आई आम्ही काय लहान आहोत का लक्ष ठेवायला...?? " 

" लहान नाही. पण तुम्हालाही समजु दे तुमच्यामुळे बाकीच्यांना पण कसा त्रास होत होता ते. आता तुमची बारी...." त्या आनंदच्या पाठीवर थोपटत उठल्या. 

" चला गाडी आलेय. " काका म्हणाले. 

मग आनंद आणि आशिषने त्यांच्या बॅग्स गाडीत नेऊन ठेवल्या. आप्पासाहेब , परांजपे काका , काकू आणि वृषालीताई मुंबईला जायला निघाले. त्यांना निरोप देऊन बाकीची मंडळी आत आली.

●●●●●●●●●●●●

2- 3 दिवस असेच गेले. एका संध्याकाळी आनंद असाच निवांत अंगणात बसला होता. थोड्या वेळाने आशिष आला. 

" दादा यार.... खूप बोअर होतंय इकडे.... " 

" हो , मला पण कंटाळा आला. इकडे काहीच काम नाहीये. काम असलं की मोकळा वेळ मिळत नाही आणि मिळालाय तर काम सुचतय... किती बदलत असतात आपले विचार  . " तो स्वतःशीच हसला. 

नेहा आणि मेघना पण त्यांना जॉईन झाल्या. नेहाने सगळ्यांसाठी चहा आणि बिस्कीट आणली. 

" वहिनी , आपण फिरायला जाऊया ना कुठेतरी...." आशिष उत्साहाने म्हणाला.

" येस. गुड आयडिया. कुठे जायचं पण...?? " नेहा.

" कोकणात जायचं का...?? मस्त निळा निळा समुद्र... गर्द झाडी....!!! " मेघना तर मनाने कधीच समुद्रावर पोहचली होती. तिच्या त्या विचारात गुंतलेली असताना तिचा चेहरा खुपच मोहक दिसत होता. आशिष तर दोन क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. आनंदने त्याला जोरात कोपर मारलं. तसा तो कळवळला. 

" आ..... दादया किती जोरात..." आशिष. 

" मग काय लक्ष कुठाय तुझं....?? " 

" कुठे नाही..... " तो गडबडला. 

" ए नको एवढ्या लांब. त्यापेक्षा देवळात जाऊया का...?? " नेहा.

" ए ताई.. देवळात काय....?? काय लहान मुलांचं वनभोजन आहे का.." मेघना हसायला लागली. 

" हा हा हा... सो फनी. देवळात म्हणजे आपल्या इथल्या देवळात नाही. ट्रेकिंगला जायचं का. डोंगरात एक शंकराचं देऊळ आहे. वाटेत थोडं जंगल पण आहे. दोन दिवस जाऊन येऊ हवंतर.... " 

" हो चालेल. मला आवडेल जायला... " आनंद म्हणाला. 

" बघ हा आनंद. तिकडे एसी वगरे काही मिळणार नाही. जंगलात राहावं लागेल... " नेहा म्हणाली. 

" तू सोबत आहेस ना. मग मी तुझ्यासोबत कुठेही यायला तयार आहे... " तो जरा तिच्या जवळ सरकत म्हणाला. 

आशिषने ते पाहिलं आणि त्याने मोठ्याने घसा खाकरला. तसे दोघेही दचकले.

" आम्ही आहोत म्हटलं इथे...." तो हसून म्हणाला. 

" कशाला....?? जा ना म... " आनंदने तोंड वेडावल. 

" तुमच्या दोघांवर स्पेशली लक्ष ठेवायला सांगितलं आहे मला...सो मी कुठेही जाणार नाही.. " 

" हो का... मग मेघनाला सांगू का तुझ्या किती मैत्रिणी आहेत नि तू कसा असतोस ऑफिसमध्ये सगळ्यांवर लाईन मारत सांगु काय...?? " तो आशिषच्या कानात कुजबुजला. 

" ए ए गप... काही काय..... " 

" मेघना मी काय म्हणतो......." आशिषने त्याला पुढे काही बोलू दिलं तर ना. आनंदच्या तोंडावर त्याने आपला हात दाबुन ठेवला. 

" काय चाललंय तुमचं. लहान मुलांसारखं... आशिष सोड त्याला..." नेहा बोलली म्हणुन मग आशिषने आनंदला सोडलं. 

" मी म्हणत होतो की.. मेघना तुझं ते सेल्फ डिफेन्स शिकवतेस ना. ते नेहाला पण शिकवून ठेव. " 

" हो नक्की. सगळ्याच मुलींनी खरतरं महिलांनी पण सेल्फ डिफेन्सचे धडे घेतले पाहिजेत. आजकाल अत्याचार इतके वाढले आहेत की काय विचारायलाच नकोय. लोकांची मानसिकता कधी बदलणार काय माहीत...?? " ती म्हणाली. 

" हो ना. म्हणून मग आई वडील पण मुलींना बाहेर शिकायला वगरे पाठवत नाहीत गं. सतत भीती ती ठीक असेल ना म्हणून.." नेहा म्हणाली. 

" नेहा.. आपण आपल्या ' घरकुल ' मध्ये हीच वर्कशॉप ठेवूया का. मी बोलतो मॅडमशी. " आनंद

" ए हो... कसलं भारी सुचलंय तुला..." ती खुश झाली. 

मग सगळे मिळुन ट्रेकिंगला जायचं प्लॅनिंग करू लागले. 

●●●●●●●●●●

कोल्हापूरपासून जवळच एका गावात एक शंकराचं देऊळ होतं. पण ते गावापासून लांब आणि डोंगरात होतं. लोकं सांगत की पूर्वीच्या काळी इथे राक्षस येऊन माणसांना त्रास देत..बायकांना मारत, झोडत.... लोकांचं सोनं लुटून नेत. त्यावेळी शंकराने अवतार घेऊन त्या राक्षसांचा नायनाट केला. त्यामुळे ते देवस्थान फार जागृत मानले जाई. आनंदने सोबत एक वाटाड्या घ्यायच ठरवलं. कारण इकडच्या रस्त्यांची कोणाला काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तिकडे जायला निघाले. सोबत पाण्याच्या चार मोठ्या बॉटल्स.... खाण्याचं सामान... जेवण करण्यासाठी डाळ तांदूळ ... दोन कपडे... फर्स्ट एड बॉक्स... दिशादर्शक यंत्र... बॅटरी, वही, पेन सगळं रेडी होतं. सगळी तयारी करून आनंद आणि आशिष नेहा , मेघनाची वाट बघत होते. थोड्याच वेळात दोघी खाली आल्या. नेव्ही ब्लु कलरची जीन्स त्यावर व्हाइट कलरचा नेटेड डिझाइनचा टॉप... केसांचा पोनिटेल बांधलेला डोक्यावर कॅप आणि डोळ्यांना गॉगल अडकवून येणाऱ्या नेहाकडे आनंद बघतच राहिला. त्याची तर विकेटच पडली. तिच्या मागोमाग मेघना देखील छान गुलाबी टॉप आणि त्यावर मॅचिंग पायजमा घालून तयार होऊन आली. 

" चला निघायचं का...?? "  नेहाने विचारलं. 

" येस मॅडम. आपण म्हणाल तेव्हा... " आनंद म्हणाला. तो तिला पहिल्यांदाच जीन्स टॉप मध्ये बघत होता. मेघना आणि आशिषच लक्ष नाही बघून तो हळूच तिच्या जवळ सरकला. 

" जाम भारी दिसतेयस . असं वाटतंय तुला......... " तो पुढे काहीच बोलला नाही. एकटक तिच्याकडे पाहतच राहिला. पटकन त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले आणि बाजूला झाला. तिला दोन क्षण कळलंच नाही. ती लाजली. गाल गुलाबी झाले होते. 

" चला गाडी आलेय..." आशिष म्हणाला तसे ते भानावर आले. 

थोड्याच वेळात सगळे त्या गावी पोचले. तिथेच राहणारा एक माणूस त्यांना वाट दाखवायला येणार होता. आता खरी ट्रेकिंगला सुरवात होणार होती. गावाच्या वेशीबाहेर असणाऱ्या डोंगराकडे ते निघाले. छोटीशी पायवाट दिसत होती. आंब्याची , काजूची झाडं बाजूला करत हळूहळू ते पुढे सरकु लागले. जसजसे ते आत जाऊ लागले तसतसा अंधार कमी होऊ लागला आणि बाजूच्या झाडांची गर्दी दाट होत निघाली. आनंद आणि आशिषला तर खूप मोठं अडव्हेंचर करायला निघाल्याचा फील येत होता. पायवाटेने जाताना थोड्या थोड्या अंतरावर असणाऱ्या झाडांना नेहाने रिबिनी बांधायला सुरवात केली. बऱ्यापैकी सगळे चालुन दमले होते. थोडी मोकळी जागा बघुन त्या वाटाड्याने सगळ्यांना थांबवले. ' लगेच येतो ' असं सांगुन तो वाटाड्या तिथून निसटला. नेहाने मग आणलेल्या खाऊतून सगळ्यांना थोडं थोडं खायला दिलं. पाणी पिऊन ते वाटाड्याची वाट बघू लागले पण त्याचा काही पत्ताच नव्हता. थोड्या वेळाने अंधार पडायला सुरुवात झाली असती. इतक्यात अचानक जोरात कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि सगळे तिकडे धावले..

क्रमशः.... 

भाग पोस्ट करायला खूप उशीर झालाय मला माहित आहे. पण कथा काय लिहायची हे जरी मनात तयार असलं तरी कथा कागदावर उतरवताना , प्रसंग साकारताना खरा कस लागतो. त्यामुळे तुम्हाला छोटा वाटणारा भाग लिहायला आम्हाला खरंतर खूप वेळ जात असतो. पण तुम्ही हक्काने रागावता म्हणून आमची तक्रार नाही. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून आम्ही सगळे लिहत असतो त्यामुळे भाग पोस्ट करायला उशीर झाला तर रागावू नये. ही प्रेमाची विनंती.

धन्यवाद. 

© ® सायली विवेक

🎭 Series Post

View all