हे बंध रेशमाचे पर्व 2 - भाग 8

Love story

( आनंद आणि नेहाच्या तर समोरासमोर बसून नुसत्या खाणाखुणा चालू होत्या. थोड्या वेळाने सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे गेलं तशी नेहा लाजली आणि तिथून लांब पळाली. नदीच्या इथल्या झाडाजवळ जाऊन ती उभी राहिली. तोच मागुन येऊन कोणीतरी तिच्या तोंडावर जोरात हात ठेवला आणि तिला मागे खेचलं...) 

नेहा क्षणभर घाबरली. मग तिच्या हातावरची पकड हळूहळू सैल होऊ लागली तसं तिनं मागे वळून पाहिलं.

" तू....?? " ती नेहाची मामेबहीण मेघना होती. 

" अग येडपट मारशील एखाद्याला अशी घाबरवून.." नेहा तिला जोराने फटके देऊ लागली.

" ताई बास बास किती मारशील. आ जाडे लागतंय. हळू ना..." ती कळवळली.

नेहाने मग मारणं थांबवलं आणि तिला मिठी मारली. दोघीही खुप दिवसांनी भेटल्या. खरंतर अप्पासाहेबांनीच तिला बोलावुन घेतलं होतं. मग त्या दोघी सगळे गप्पा मारत होते तिथे गेले. मेघनाने आप्पासाहेबांना नमस्कार केला. नेहा आणि आनंदच लग्न झालं तेव्हा मेघनाला यायला जमलं नव्हतं. त्यामुळे ती आत्ता सगळ्यांना भेटायला आली होती. मेघना कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती आणि मुलांना कराटे देखील शिकवायची. त्यामुळे ती चांगलीच डॅशिंग होती. अप्पानी तिची परांजपे काका काकू आणि आशिष सोबत ओळख करून दिली. संध्याकाळी भरपेट नाश्ता खाऊन सगळे वाड्यावर परतले. 

" बरं मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायच आहे." अप्पांच्या बोलण्याकडे सगळे लक्ष देऊ लागले.

" काय झालं अप्पा..?? सगळं ठीक आहे ना..?? " नेहाने काळजीने विचारलं. 

" काही झालेलं नाही. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. " 

आनंद आणि नेहा काहीच न कळून एकमेकांकडे बघत होते. 

" तर आम्ही असं ठरवलं आहे की मागच्या तीन चार वर्षात जे काही झालं ते सगळं विसरून पुन्हा एकदा तुमचा संसार नव्याने सुरू करायला तुम्हाला मदत करणार आहोत.."

" म्हणजे...? " 

" म्हणजे हेच की आम्ही तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा लग्न लावुन देणार आहोत...." अप्पा म्हणाले. 

" काय...? " आनंद आणि नेहा जवळजवळ ओरडलेच. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही ओसंडून वाहत होता. 

" पण कशाला...? आमचं आता सगळं नीट सुरू झालंय की.. हो की नाही नेहा ...?? " त्याने कोणाला दिसणार नाही अशा पध्दतीने तिला डोळा मारत विचारलं. त्यावर तिने डोळे वटारले. 

" काहीही काय अप्पा... परत लग्न कशाला...?? ही काय हिंदी सीरिअल आहे का..?? " नेहा म्हणाली. 

" अग असंच जरा गंमत. तुला याच्याशी पुन्हा लग्न करायचं नाहीये का...?? " अप्पा म्हणाले. 

" मी असं कधी म्हटलं...?? " ती पटकन म्हणाली आणि आपण काय माती खाल्लेय ते तिच्या लक्षात आलं. त्यावर सगळेच हसले. 

" अप्पा काका , ही आयडिया फर्स्ट क्लास आहे. तसं पण मी बाहेर होतो सो मला दादूच लग्न एन्जॉय नाही करता आलं. आता तर अजिबातच सोडणार नाही मी..." आशिष. 


" येस. मी पण. " मेघना.

सगळे मग लग्नाचं काय काय करायचं याचा विचार करायला लागले. तर दुसरीकडे आनंद आणि नेहाला आता काय बोलावं ते सुचत नव्हतं. 


" आपण मस्त डेस्टिनेशन वेडिंग ठेवूया...." आशिष म्हणाला. 

" नको. कशाला उगीच खर्च....." नेहा

" किती कंजूस आहेस वहिनी. दादाचा चेहरा बघ कसा फुललाय परत लग्न करायचं म्हणून..." आशिष त्याला चिडवत म्हणाला त्यावर तो जरा लाजला. 

" ok मग आपण मस्त डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करू. त्याची सगळी जबाबदारी माझी..." आशिष म्हणाला. 

" हो. भरपूर मजा करा रे मुलांनो. आनंद तर लग्नाच्या वेळी असुन नसल्यासारखा होता..पण यावेळच लग्न त्याच्या चांगलं लक्षात राहायला हवं. म्हणजे मध्येच विसरणार नाही.." वृषालीताई आनंदचा कान पिळत म्हणाल्या. 

" आ... हळू ना...अरे पण यात किती वेळ वाया जाईल. काय नको लग्न वगरे. त्यापेक्षा आम्ही फिरायला जातो बाहेर.... " तो म्हणाला. 

" अजिबात नाही. माझी इच्छा आहे समज. हे लग्न होणारच..." वृषालीताई म्हणाल्या.  


आता काय बोलणार..? मोठ्यांनी सगळं ठरवलं होतं. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आधीच त्या दोघांना आल्यापासून एकत्र वेळ घालवता येत नव्हता. त्यात आता हे मध्येच लग्नाचं ठरत होतं. दोघांनाही काय करायचं कळत नव्हतं. 

●●●●●●●●●●

मग सर्वानुमते लोणावळा फायनल झालं. तिथे त्यांचं मस्त रॉयल वेडिंग करायचं ठरलं. 

" दादा मी तुला लोकेशन पाठवतो तिथलं. तिथेही काही ठिकाणं आहेत त्यातलं एक फायनल कर तू नि वहिनी.." आशिष म्हणाला. त्यावर आनंदने ' कशाला उगीच नसते उद्योग 'असं म्हणत तोंड वाकडं केलं. 

" मला खूप झोप येतेय. आम्ही जाऊ का झोपायला...? " आनंदने सगळ्यांसमोरच असं विचारल्यावर नेहा लाजली. 

" आम्ही म्हणजे कोण कोण....?? " आशिष

" आशु माकडा मी तुझ्यासोबत झोपू का....? " आनंदने त्रासून विचारलं. 

" मला चालेल...." त्याने खांदे उडवले. 

" गप.... " आनंद 

" आनंद आता लग्न होईपर्यंत तू आणि नेहाने एकत्र राहायचं नाही...." वृषालीताई 

" काय......??? " तो ओरडलाच. 

" हो. रीतच आहे तशी. मुलगी सासरी येईपर्यंत दोघांनी भेटायचं नसतं... आणि हो आपण उद्याच मुंबईला जातोय. नेहा आणि बाकीची नंतर येतील..." त्या म्हणाल्या. 

" नंतर म्हणजे कधी....?? " त्याने नेहाकडे बघत विचारलं. 

" लग्नाच्या आधी चार दिवस...." त्या हसून म्हणाल्या.

" आई काय गं.....!! " त्याच तोंड आता रडवेल झालं होतं. 

त्यावर परांजपे काकांना एक आयडिया सुचली. 

" वहिनी मी काय म्हणतो, या दोघांना वेगळंच ठेवायचं आहे ना मग नेहा तोपर्यंत आमच्याकडे राहील..." 

" Good idea... " तो खुश झाला. 

" हो पण भेटायचं नाही... फोन वर बोलू शकता..." ते म्हणाले. 

" ok..." तो तोंड वेडावत म्हणाला. 

आशिष, आप्पासाहेब, वृषालीताई सगळे त्यांच्यावर हसत होते. नेहा तर कधीच लाजुन खोलीत पळाली होती. सगळेजण मग झोपायला गेले. पण आनंद आणि नेहाला मात्र झोप येत नव्हती. आधीच त्याच्या बिझी शेड्युलमुळे त्यांना बोलायला वेळ मिळायचा नाही. त्यात आता घरच्यांनी वेगळाच घाट घातला होता. आनंदची तर नुसती चिडचिड होत होती. अंथरुणावर पडल्या पडल्या तो विचार करत होता तोच त्याचा मोबाईल वाजला. नेहाचा मेसेज आला. 

" जागा असशील ना अजून...?? " 

" हो ,तुझ्याशिवाय झोप लागेल का मला...!" 

" आधी लागायची की...." ती आता त्याची मस्करी करायला लागली. 

" आधीची गोष्ट वेगळी होती आताची गोष्ट वेगळी आहे नेहु...!! " 

" हो का.. आता काय वेगळं आहे...?? " 

" आता तू आहेस ना माझी हक्काची बायको. ती पण आता लांब आहे माझ्यापासून... " 

" अले अले बाळा ललू नतो हा........ " ती हसत होती. 

" नेहा तू हसतेयस...? थांब बघतोच तुला मी...!! बाहेर ये लगेच...." 

" मी नाईई येत जा.......!!! " 

" थांब तू आलोच मी....... " 

तिला रिप्लाय देऊन तो मागच्या सारखं तिच्या रूम मध्ये जायला निघाला. वाड्याच दार उघडुन तो बाहेर आला. तिच्या खोलीच्या बाल्कनीत शिडी लावायला शोधत होता. तोच त्याला परांजपे काका फोन वर कोणाशी तरी बोलत असताना दिसले...

क्रमशः...  


पहिल्या पर्वात आनंद आणि नेहाच लग्न झालं पण ते अगदीच साध्या पद्धतीने. त्यामुळे दोन्ही घरात फार काही मजा मस्ती करता आली नाही. म्हणूनच त्यांच्या लग्नाचा नव्याने घाट घातला आहे. तुम्ही सगळे येणार ना मग आनंद आणि नेहाच्या लग्नाला....??? वाट बघतेय. आनंद आणि नेहाच लग्न कसं व्हावं याबद्दल तुमच्या काही छान आयडिया असतील तर मला नक्की सांगा.. Thank you 

🎭 Series Post

View all