हे बंध रेशमाचे पर्व 2 - भाग 4

Love story

नेहाने तिथे पोचल्यावर त्याला मेसेज केला आणि ती त्याची वाट बघत तिथेच बसली.  काही वेळ असाच गेला. ती सारखं घड्याळ चेक करत होती. थोड्या वेळाने फ्लाईटची अनाऊसमेंट झाली. तशी नेहाला भीती वाटू लागली. कारण आनंदचा अजूनही काही पत्ता नव्हता.. तिच्या मनात शंकांचं काहूर उठलं होतं..!


आता पुढे

फ्लाईटची अनाऊसमेंट झाली तशी ती निघाली. क्यू मध्ये जाऊन उभी राहिली. बॅग्स चेकिंगसाठी पुढे पाठवल्या. ती सारख मागे वळुन बघत होती. पण आनंद कुठेच दिसत नव्हता. तिला काय करावं सुचेना. ती तशीच क्यू मधून पुढे पुढे जात राहिली. तिचा नंबर आला तसं पासपोर्ट नि बाकी डॉक्युमेंट चेक करून त्यांना आत सोडण्यात आलं. एअरहोसटेस्ट एकेक करून सगळ्यांना आत पाठवत होत्या. 

" जस्ट अ मिनिट....... " त्या मुलीला रिक्वेस्ट करून ती येणाऱ्या लोकांना बाजूला करत पुन्हा बाहेर आली तरीही तो दिसला नाही. आता मात्र तीचे हार्टबिट्स वाढले होते. 

" मॅम.... मॅम प्लिज...... " ती एअरहोसटेस्ट तिला आत घेऊन जात होती. नेहाच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होती. 


ती आत जाऊन आपल्या सीटवर बसली. आनंद अजून कसा आला नाही...?? त्याला काही झालं तर नसेल...?? हॉस्पिटल मधून जर त्याला जाऊच दिलं नाही तर...?? एक ना अनेक प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते. तिने त्याला खूप वेळा फोन लावायचा प्रयत्न केला पण तो उचलत नव्हता. ती सीटला तशीच मागे टेकून बसली आणि तिने डोळे मिटले. मागच्या तीन वर्षातल्या आठवणी तिच्या समोर फेर धरू लागल्या. संजीवनी हॉस्पिटलमध्ये झालेलं मितालीचं प्रकरण , त्यानंतर ते दोघे अमेरिकेला आले त्यातही आनंदचा अभ्यास इंटर्नशिप.. या सगळ्यात तीन वर्ष कधी गेली कळलच नाही.. त्यामुळे त्या दोघांना मोकळा असा वेळच मिळाला नव्हता. कारण आनंद रात्री उशिरा घरी परतायचा आणि सकाळी लवकर बाहेर पडायचा. सुट्टीच्या दिवशी देखील डॉक्टर म्हणून इमर्जन्सी आली की त्याला जावं लागायचं. विचार करता करता तिला झोप कधी लागली कळलंच नाही. थोड्या वेळाने तिला जाग आली. तिला तिच्या हातांवर तोच ओळखीचा स्पर्श जाणवला. तिने बाजूला पाहिलं तर तिच्याकडे मिश्किल हसत आनंद तिच्याकडेच बघत होता. त्याला असं जवळ बघून ती जवळजवळ ओरडलीच.


" तू....... ????? " बाजूचे पॅसेंजर देखील दचकले. 

" अग ए हळू जरा....... हो मीच आहे माझं भूत नाही..." तो हसत म्हणाला.

" तू.... तू हसतोयस आनंद.. माझा जीव काढला असतास... किती नाही नाही ते विचार आले माझ्या मनात माझं मला माहित...तू.... तू  ना...." तिने आता त्याला मारायला सुरुवात केली होती. 


" अग हो हो....ऐक तरी माझं.. हॉस्पिटलमध्ये माझा सत्कार केला. हा बघ बुके. सेलिब्रेशन होतं छोटंसं.. म्हणून बोलावलं होतं मला. आणि येताना ही तुझ्या आवडीची चॉकलेट्सही घेऊन आलो..." असं म्हणून त्याने पॅकिंग केलेला चॉकलेटचा डबा तिला दिला... " नि मी आलो होतो लवकर.... फक्त तू काय करतेस ते न्याहाळत होतो... " तो म्हणाला

" म्हणजे...... ?? " तिच्या चेहऱ्यावर आता आश्चर्य दिसत होतं.

" तू फ्लाईट मध्ये बसेपर्यंतच प्रोसिजर कसं पूर्ण करतेस ते मला बघायचं होतं. नि डेफिनेटली तू ते सगळं नीट पूर्ण करून आत आलीस... कारण तुला या सगळ्याची भीती होती की तू कसं करशील सगळं. हीच तुझी भीती मला घालवायची होती.. कधी पुढे मागे गरज पडली मी नसलोच तर....... " तो पुढे बोलणार तोच तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं..

" प्लिज चुकूनही असं म्हणू नकोस.. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. तू कायमच माझ्या सोबत असणार आहेस... " तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने ते अलगद टिपलं. तिने त्याला कडकडून मिठी मारली नि तो तसाच तिला हळुवार थोपटत राहिला. 

.........................

रात्री अजुन एका ठिकाणी फ्लाईट चेंज करून ते दुसऱ्या दिवशी दुपारी मुंबईला पोहचले. 
चेंज करून ते दुसऱ्या दिवशी दुपारी मुंबईला पोहचले. परांजपे काकांचा मुलगा आशिष त्यांना न्यायला एअरपोर्ट वरती आला. प्रवासामुळे नेहा थकली होती त्यामुळे ती गाडीतच झोपली. आशिषने गाडी आनंदच्या बंगल्याकडे न वळवता त्यांच्या घरी नेली.

" काय रे आशिष.. घरी सोड आम्हाला. आम्ही जाऊ तिकडेच.... " आनंद म्हणाला.

" नाही हा दादा.. बाबांनी मला सांगितलंय की तुम्हा दोघांना आमच्याकडे आणायला....तिकडे कोण नाहीये. तसंही वृषाली काकू नाही म्हटल्यावर तुम्हालाच गेल्यावर बघावं लागेल सगळं. त्यापेक्षा आमच्याकडे चला नि मग जा घरी.. " तो म्हणाला.


" बरं बाबा... चल. तू काय ऐकणार नाहीस माझं... " आनंद हसला. 


थोड्याच वेळात ते परांजपे काकांच्या घरी आले. आनंदने नेहाला उठवलं. दोघही गाडीतून उतरले तर समोर काका काकू स्वागताला उभे होते. दोघांनीही त्यांना वाकून नमस्कार केला.  तोपर्यंत आशिषने बॅग्स उतरवून आत आणल्या. सगळे आत गेले. परांजपे काकूंनी सगळ्यांसाठी सरबत आणलं. 


" काय आनंद कसा झाला प्रवास...?? " काकांनी विचारलं. 

" छान झाला... " तो म्हणाला. 

दोघेही मग सरबत पिऊन फ्रेश होऊन आले. 

" अरे आनंद आईला कळवलस का तू पोहचलास ते... " 

" नाही काका... आईला सरप्राईज द्यायचं आहे. म्हणून सांगितलं नाही. Actually  आम्ही उद्याच कोल्हापूरला जाणार आहोत आईला भेटायला. थोडे दिवस तिकडे राहून मग घरी येणार... " आनंद म्हणाला. 


" छान... आम्ही पण येतो मग तुमच्यासोबत.. श्रीकांत असताना तो खूप वेळा म्हणायचा गावी जाऊ एकदा म्हणून. पण कधी जमलंच नाही. आता तुझ्यासोबतच जाऊ नि येऊ परत..चालेल ना...?? " काका म्हणाले


" अहो काका चालेल ना काय...पळेल. आईला खूप बरं वाटेल तुम्हाला सगळ्यांना बघून...उद्या मग एकत्रच निघू..." तो म्हणाला.

" हो.. मी आवरून ठेवायला सांगतो घरात..." असं म्हणून परांजपे काका आत गेले. 


" ऐकलंत का... आपण उद्या आनंद सोबत त्यांच्या गावी जाणार आहोत....तेव्हा तयारीला लागा. आशिषला सुट्टी मिळणार असेल तर विचार. नाहीतर आपण दोघे तरी जाऊ... " काका म्हणाले. 


" चालेल. आपणही खूप दिवसात गेलो नाही कुठे. तेवढंच आपल्याला पण हवापालट होईल... " त्या म्हणाल्या. 

मग आजूबाजूला कोण नाही हे बघून काका दबक्या आवाजात बोलू लागले. 

" आपलं काम होईपर्यंत तरी आनंदला हॉस्पिटलला नेता येणार नाही. त्यामुळे तो जास्तीत जास्त दिवस गावी राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपलं काम झालं की त्याला बोलवून घेऊ.... " काका म्हणाले तसं त्यांनी फक्त मान डोलावली. 

बोलून ते जायला वळले तर मागे नेहा उभी होती. 

क्रमशः.... 


सॉरी सॉरी.... खूप सॉरी. चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या तयारीमुळे थोडा वेळ गेला नाहीतर भाग आज सकाळीच पोस्ट झाला असता. पण पुढचा भाग लवकरच पोस्ट करेन. 

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये. कथा शेअर करायची असल्यास नावासाहित शेअर करावी. 

© ® सायली विवेक

🎭 Series Post

View all