हे बंध रेशमाचे - भाग 9

A love story

हे बंध रेशमाचे - भाग 9

"आनंद .....??? .....आनंद तू....... ?? दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते.....ती होती आनंदची कॉलेज फ्रेंड .....मिताली ...!!!!

"तू , तू इथे कसा ?" .....

"इथे कसा म्हणजे अग माझंच हॉस्पिटल आहे हे....दोन दिवसांपूर्वी तुझ्या गाडीचा अक्सिडेंट झाला होता ....आजूबाजूच्या लोकांनी ऍडमिट केलं तुला...."

"काय.... मला काहीच आठवत नाहीये.. इतकं अचानक झालं होतं ते सगळं.."

"थॅंक्यू....माझ्यावर उपचार करण्यासाठी ...."

"थॅंक्यू काय.... माझं कर्तव्यच आहे ते ...कालपासून तुझ्या घरी कस कळवायचं हा विचार करत होतो....तुझा चेहरा काल ओळखू देखील येत न्हवता... असो तू आराम कर आता.आपण नंतर बोलू निवांत.."


"हो चालेल.."

"सिस्टर यांच्या घरचा नंबर घ्या आणि कॉल करून कळवा त्यांच्या अक्सिडेंट बदल आणि सुखरूप आहेत हे ही सांगा"

"येस डॉक्टर" त्यांना सूचना देऊन आणि मितालीला आराम करायला सांगून आनंद निघून गेला..


..........................

आनंद कॉलेजमध्ये असताना त्यांचा ग्रुप होता...मिताली, स्नेहा, पियुष, आनंद, निहार.... सगळे एकत्र फार मजा करायचे.आनंद दिसायला हँडसम... त्यामूळे कॉलेजच्या मुली तर त्याच्यासाठी वेड्या होत्या....पण आनंदने कधीच त्याकडे लक्ष दिलं नाही.आपला अभ्यास ,आपले दोस्त यातच तो वेळ घालवायचा...सगळ्या स्पर्धांमधून भाग घ्यायचा....वक्तृत्व, निबंध, क्रीडास्पर्धा आनंद सगळ्यात अव्वल होता.... बॅडमिंटन त्याचा जीव की प्राण...!!! मिताली, पियुष हे सुद्धा बॅडमिंटन खेळायचे.प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्स मध्ये भाग घ्यायचा.कॉलेज सुटलं की समोरचा टपरीवरचा फक्कड चहा.....गरमागरम वडापाव..घरी जाताना रस्त्यावर केलेली मजा मस्ती....सॅकची लपवाछपवी... मग होणारी धांदल...असांमेन्टस कॉपी करणं.. नाईट आऊट...!!! मितालीच्या अचानक भेटण्याने आनंदला कॉलेजचे जुने दिवस आठवले....त्याच विचारात तो घरी कधी आला त्याला कळलंच नाही....


.............................

घरी आल्यावर त्याने आईला मिताली भेटल्याच सांगितलं.कॉलेजची मजा मस्ती सगळं अगदी भरभरून सांगत होता..कितीतरी दिवसांनी तो आईजवळ आपलं मन मोकळं करत होता.. वृषालीताईना बरं वाटलं..दुसऱ्या दिवशी आनंद लवकर हॉस्पिटलला गेला.इतक्या दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणीशी त्याला बोलायचं होतं. त्यामुळे पेशंटची ओ. पी.डी चालू होण्याआधी तो हॉस्पिटलला पोहचला होता......

"काय मग मिताली मॅडम कसं वाटतंय ? ".....आनंदने रूम मध्ये येत विचारलं

"जरा डोकं दुखतंय पण बाकी ok आहे... आणि जुना मित्र भेटलाय सो जास्त खुश पण आहे ...." ती हसत म्हणाली

आनंद येऊन तिच्या बेडच्या बाजूला बसला...
" पण गाडी घेऊन मॅडम एवढ्या जात तरी कुठे होत्या ?"

" अरे एक ऑफिस मीटिंग होती...आणि मला पोचायला उशीर झाला होता सो ओव्हरटेक करायला गेले ....त्यात हे असं झालं ..."

"छान.... काय करतेस म सध्या ?"

"मी MBA केलं.. आपलं कॉलेज झाल्यानंतर .आता एका कंपनीत आहे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून...."

"Wow... thats great... !!!.......पण तुमची स्वतःची सुद्धा फर्म होती ना ? ....तो काहीसं आठवत म्हणाला

"हो आहे ना.पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं.सो सध्या जॉब करतेय..जरा अनुभव घेऊन मग डॅडची कंपनी जॉईन करणार...."

"छान.....चल मी निघतो ओ. पी.डी मध्ये पेशंट आले असतील "........आनंद पेशंट चेकिंग साठी निघून गेला.


....................................


दोन दिवसांनी मितालीला डिस्चार्ज देण्यात आला...तिच्या आई बाबांनी आनंदचे मनापासून आभार मानले..आनंद आणि मितालीने आपले फोन नंबर एक्सचेंज केले.मितालीला घेऊन  तिचे आई बाबा घरी गेले..अचानक भेटलेल्या मैत्रिणीमुळे आनंदच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसांनी हास्याची लकेर दिसत होती.. आपल्या आयुष्यात मित्र असेच असतात...कोणत्याही वळणावर ते भेटले तरी ते सगळ्यांना आनंद देऊन जातात.....!!!! तसच काहीसं आनंदच्या बाबतीत होत होतं..


आनंद आणि मिताली आता फोन वर कॉन्टॅक्ट मध्ये राहू लागले.मग त्यांनी लांब असलेल्या त्यांच्या ग्रुपच्या प्रत्येक मित्राला सोशल मीडियावरून , कॉल करून शोधलं...त्यामुळे त्यांचा पूर्वीचा ग्रुप आता पुन्हा एकदा तयार झाला होता.पण कामामुळे त्यांची भेट होत न्हवती.दरम्यानच्या काळात वृषालीताईंनी अनेकदा आनंद जवळ लग्नाचा विषय काढला होता.पण काहीतरी सांगून तो टाळाटाळ करत असे.मिताली आणि ग्रुपमुळे आनंद पुन्हा एकदा सर्वांमध्ये मिक्स होत होता.मितालीचही घरी येणं जाणं वाढलं होतं. वृषालीताईंची तिच्यासोबत चांगली गट्टी जमली होती.तिच्या येण्याने आनंद मधला बदल बघून वृषालीताईंना हायस वाटलं होतं....


..........................


इकडे नेहाने आनंदचा फोटो पाहिल्या पासून ती तर त्याच्या प्रेमातच पडली होती...!!! अधून मधून वृषालीताई नेहाची फोन करून चौकशी करत.अशी प्रेमळ सासू आपल्याला मिळणार याच नेहाला फार अप्रुप वाटत होतं....!!!! आनंदच्या कामाच्या व्यापामुळे वृषालीताईंना त्याच्याशी बोलता येत न्हवतं..आणि उरलेल्या वेळात तो मिताली सोबत बाहेर जाई.....आज काही झालं तरी आनंदशी नेहाबद्दल बोलायचचं अस ठरवुन त्या आनंदची वाट पाहत बसल्या होत्या........

क्रमशः...

🎭 Series Post

View all