हे बंध रेशमाचे - भाग 7

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 7

गीता मावशींनी आनंद आणि वृषालीताईना जेवायला वाढलं.वृषालीताईंनी जेवता जेवता आनंदला घराच्या कामाबद्दल सांगितलं..आनंदने आपल्याच एका जवळच्या मित्राला घराचा प्लॅन काढायला सांगितलं होतं...त्यामुळे नवीन घराचं काम चालू करण्याआधी तो व त्याचा मित्र गावी जाऊन येणार होते...जेऊन वृषालीताई आणि आनंद दोघंही आपापल्या रूम मध्ये निघून गेले......रूम मध्ये जाऊन आनंद आपल्या बेडवर पडला...पडल्या पडल्या तो आईच्या बोलण्याचा विचार करत होता..'काय सांगायचं असेल आईला नेमकं आपल्याला'.....विचार करता करता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही

......................


दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद हॉस्पिटलला जायला तयार होऊन आला....वृषालीताई नाश्त्यासाठी टेबलवर त्याचीच वाट बघत होत्या....

"ये बस....खाऊन घे "....आनंद नाश्त्याची प्लेट घेऊन खाऊ लागला....
"आनंद मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी "....वृषालीताई शब्दांची जुळवाजुळव करत बोलल्या

"हो बोल ना "....आनंद आईकडे लक्ष देत म्हणाला

"आनंद  मला वाटतं की तुझी खूप दगदग होतेय, हॉस्पिटल ,अभ्यास ,घर सांभाळताना....धड तुझं खाण्या पिण्याकडेही लक्ष नसत  ..."

"बरं मग ?" .....आनंद 

"मला वाटत तुझं अस आपलं माणूस असावं कोणतरी जे तुझ्याकडे लक्ष देईल तुझी काळजी घेईल "....

"तू आहेस की अजून मग कसली काळजी ".....आनंद हसून म्हणाला

"मी आहेच तरीही मला वाटतं तुझ्या हक्काचं अस आपलं माणूस असावं.....आणि म्हणूनच मी तुझं लग्न ठरवलंय "

"काय ?? .....अग काय बोलतेस तू मला इतक्यात लग्न करायचं नाही तुला माहितेय ....माझं MS पूर्ण झाल्याशिवाय मी लग्नाचा विचारही करू शकत नाही....आणि तू मला न विचारता माझं लग्न कस ठरवलंस ???....."आनंदचा राग अनावर झाला होता

"हे बघ आनंद मला तुझी अवस्था बघवत नाही....श्रीकांत गेल्यापासून तू स्वतःच्याच विचारात असतोस...कोणाजवळ आपलं मन मोकळं करत नाहीस ..आतल्या आत कुढत राहतोस..."

"आई प्लिज,तू मला समजून घे बाबांचं जाणं फार अनपेक्षित होत तुलाही माहितेय....मला यातून बाहेर पडायला वेळ लागेल..... मला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि आत्ता मला त्याशिवाय दुसरं काहीही सुचणार नाही ..."

"आनंद अरे बाबांचीच इच्छा होती की तुझं आणि नेहाचं लग्न  व्हावं ..

"काय.....????? ....नेहा ....?? अप्पा काकांची मुलगी ....????......आनंदच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपत न्हवते ...


"होय....माझी आणि श्रीकांतची सुद्धा तशी इच्छा होती की आपल्या घरात नेहा सून म्हणून यावी ".....

"आई ज्या मुलीला मी पाहिलं नाही...तिचा स्वभाव मला माहीत नाही...अशा मुलीशी मी कसं लग्न करू ...?"


"आनंद अरे नेहा खरच चांगली मुलगी आहे....ती तुला आणि आपल्या घराला नक्की जपेलं....."

"आई हे बघ मला इतक्यात लग्न करायचं नाहीये ..माझ्यासाठी सध्या हॉस्पिटल आणि माझा अभ्यास या पलीकडे महत्वाचं काहीही नाही ".....अस बोलून आनंद रागाने हॉस्पिटलला निघून गेला..

.......आनंदला कस समजवावे तेच वृषालीताईंना कळत न्हवते.....कदाचित कामाचा स्ट्रेस जास्त असेल त्यामुळे त्याची चिडचिड होत असावी असं त्यांना वाटलं...तो घरी आला की पुन्हा एकदा त्याच्याशी नीट बोलू अस त्यांनी ठरवलं...


..............................


आनंद रात्री उशीरा घरी परतला... तोपर्यंत वृषालीताई त्याची वाट बघत बाहेरच लॉन वर फेऱ्या मारत होत्या....सकाळचा त्याचा राग थोडा फार निवळला असावा...

"आई , तू झोपली नाहीस अजून ".....आईजवळ येत आनंदने विचारलं 

"तू आल्याशिवाय कसं झोपणार....सकाळी डोक्यात राग घालून गेलास ...मला कशी झोप लागेल...चल तुला जेवायला वाढते..."

"तू जेवलीस ? "......

"मुलं उपाशी असताना आईच्या घशाखाली घास तरी उतरतो का ...." त्यांना माहीत होतं रागाच्या भरात आनंदने काहीच खाल्लेलं नसणार....

"आई सॉरी ,मी सकाळी खूप जास्त रिऍक्ट झालो....पण मला इतक्यात लग्न करायचं नाहीये..."

"तू घे तुझा वेळ .....माझं काही म्हणणं नाही...." मग दोघेही घरात गेले....वृषालीताईंनी आनंदला जेवायला वाढलं आणि स्वतःही वाढून घेतलं.....दिवसभराच्या कामाने आनंद थकला होता....त्यामुळे जेऊन तो लगेच झोपायला गेला...

'आनंदला त्याचा वेळ घेऊ दे....मग आपण बोलू त्याच्याशी..त्यालाही पटेल आपलं म्हणणं '..मनाशी असं ठरवून वृषालीताई झोपायला गेल्या.


...........................

इकडे आप्पासाहेबांना देखील नेहाशी कसं बोलायच हा प्रश्न पडला होता..नीलिमा गेल्यापासून त्यांनी कधीही आपल्या लेकीला दूर पाठवलं न्हवतं...त्यामुळे त्यांचं बापाचं मन मुलीच्या लग्नासाठी तयार होत न्हवतं....तर दुसरीकडे नेहाला चांगलं सासर मिळतंय याचा आनंदही त्यांना होता....

"बाबा कसला एवढा विचार करताय "...नेहा आप्पांजवळ येत म्हणाली

"काही नाही ग बाळा,तुझं शिक्षण पूर्ण झालं....आता तुझं लग्न झालं की मी जबाबदारीतून मोकळा "....कसतरी चेहऱ्यावर उसनं हसू आणून ते बोलत होते..

"पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये ..." नेहा बोलली

"प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस जावंच लागत ग बाळा दुसऱ्याच्या घरी .....मग नवरा आला की बापाची आठवणही येणार नाही एका माणसाला ....." त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ....

"अस हो काय बाबा .....मी नाही तुम्हाला सोडून कुठे जाणार ".........नेहा आप्पाना मिठी मारून रडू लागली....
आप्पानी तिला प्रेमाने थोपटलं....


क्रमशः..

🎭 Series Post

View all