Feb 24, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 33

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 33

हे बंध रेशमाचे - भाग 33

 

 

 

नेहाने ते बिल पुन्हा एकदा व्यवस्थित पाहिलं. गरीब किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांवर संजीवनी हॉस्पिटल मध्ये कमी खर्चात उपचार केले जातात हे तिला माहीत होतं. त्यामुळे एवढं बिल बघून तिला आश्चर्य वाटलं. तिनं पुन्हा एकदा रिसेपशनिस्टला बिल दाखवलं.

 

" Excuse me.... मॅडम हे बिल बघता का जरा. एवढं बिल कसं काय दिलंय...." नेहाने तिला विचारलं.

 

" कसं काय म्हणजे....तुमचा पेशंट दोन दिवस ICU मध्ये होता...बाकीची ट्रीटमेंट , गोळ्या , औषध.... सगळं मिळून बिल दिलंय..... तुम्ही बिल भरा बघू लवकर...." ती काहीसं त्रासून म्हणाली. 

 

" अहो पण.....या सगळ्याचे चार्जेस जास्त आहेत आणि यांची एवढी परिस्थिती नाही...कुठून आणतील ते आजोबा इतके पैसे....तुम्ही प्लिज बिल कमी कराल का...? " नेहा

 

" ओ मॅडम.....परिस्थिती नाही तर आणता कशाला मोठ्या हॉस्पिटलला पेशंट्सना....तुम्हाला चांगले उपचार हवेत मग बिल नको का भरायला...." रिसेपशनिस्टने करवाजून सांगितलं.

 

" पण हॉस्पिटलची पॉलिसी आहे ना सगळी ट्रीटमेंट रिजनेबल चार्जेसमध्ये करून देण्याची....आणि तुम्ही सगळे डॉक्युमेंट बघूनच बिल तयार करता ना मग ?"  नेहा

 

" आता नाही ओ मॅडम तसलं काही...डॉक्युमेंट फक्त नावाला घेतो आम्ही...बाकी सगळयांना चार्जेस सेमच आहेत...तुम्ही आता बिल भरा आणि निघा...मला कामं आहेत...." ती बोलली.

 

" ok...." नेहा त्यावर काहीच बोलली नाही. तिने बिलाचे पैसे भरले आणि बिल नीट पर्समध्ये ठेवून दिलं. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय असं तिला वाटलं पण ती काहीच न बोलता आजींना घेवून बाहेर आली. सोबत आजोबा देखील होते. आजोबांनी नेहाचे आभार मानले. त्यांचे हात नकळत जोडले जात होते पण त्या आधीच नेहाने त्यांना थांबवलं आणि मानेनेच ती नाही म्हणाली.

 

" पोरी तू होतीस म्हणून आज माझी लाज वाचली...मी कुठून आणले असते इतके पैसे....होतं ते सगळं मुलाच्या नावावर केलं....आणि त्याचीच फळं भोगतोय आज..." त्यांनी सदऱ्याच्या बाहीने आपले डोळे पुसले.

 

" आजोबा...मी तुमची लेक नाही का...? तुम्ही असं काही मनातही आणू नका...आता आजींची काळजी घ्या.. चला आपण निघुया..." असं म्हणून तिन रिक्षेला हात करून रिक्षा थांबवली. तिने आजी आजोबांना व्यवस्थित घरकुल मध्ये नेवून सोडलं आणि ती घरी आली. 

 

......................................

 

नेहाच्या डोक्यात मगाच्या बिलाचाच विषय घोळत होता. घरी आली तरी तिच्या डोक्यातून काही ते जात नव्हतं. पेशंटच्या नावाखाली कोणतरी आपली पोळी भाजून घेत असावं असं तिला वाटलं. पण सध्या तिच्याकडे त्यासंबंधी कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे तिने गप्प राहायचं ठरवलं. 'यांना माहीत असेल का हे...पण त्यांना माहीत असत तर त्यांनी असं होऊच दिल नसतं... बाबांची तत्व , इच्छा त्यांच्यासाठी किती महत्वाच्या आहेत ' याच विचारात ती आत आली. वृषालीताई आपल्या मंडळातल्या बायकांसोबत पावसाळी सहलीला गेल्या होत्या. त्यामुळे आता घरात आनंद, नेहा आणि गीता मावशी फक्त होत्या. गीता मावशी देखील आपलं काम झाल्यावर त्यांच्या खोलीत जात. नेहा आपल्याच विचारात हॉल मध्ये आली..हॉल मध्ये आनंद बसला होता. आज त्याला हॉस्पिटल मध्ये एकच ऑपरेशन होतं त्यामुळे घरी नेहा सोबत वेळ घालवता येईल यासाठी तो लवकर आला. पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं...ती आपल्याच तंद्रीत जिन्याने वरती रूममध्ये जायला लागली. आनंद तिच्याकडेच बघत होता. शेवटी न राहवून त्याने तिला हाक मारली..

 

" ओ मॅडम.....काय कुठे हरवला आहात एवढ्या..." त्याने टिचकी वाजवत विचारलं. तेव्हा कुठे तिचं आनंदकडे लक्ष गेलं.

 

" तुम्ही...?? ....तुम्ही कधी आलात..?? माझं लक्षच नाही.  सॉरी..." ती खाली येत म्हणाली.

 

" हो तेच...माणसं एवढी समोर आहेत तरी दिसत नाहीयेत..." तो तिला चिडवत म्हणाला

 

" असं काही नाही....मी ते जरा वेगळ्या विचारात होते..." आनंदला आत्ताच सगळं  सांगावं की न सांगावं या विचारात ती होती...योग्य वेळ आली की सांगू असं तिनं ठरवलं. 

 

" हॅलो....कुठे हरवलीस परत..." त्याने पुन्हा टिचकी वाजवली.

 

" अं....?? नाही काही नाही...." ती दुसरीकडे बघत म्हणाली.

 

" तुला आवडलं नाही का मी लवकर घरी आलो ते..." तो तोंड फुगवून म्हणाला.

 

" नाही हा असं काही....पण आज लवकर कसे आलात.." तिने हॉस्पिटलचा विचार तेव्हढ्यापुरता सोडून दिला आणि छान हसून ती म्हणाली..

 

" अग आज एकच ऑपरेशन होतं... ओपीडी पण फार नव्हती..पटपट सगळं आवरलं आणि आलो...म्हटलं लाडक्या बायको सोबत जरा वेळ घालवता येईल..." तो तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. 

 

" हो का....छान..." नेहा

 

" चल आज बाहेर जाऊ फिरायला...रात्री पण बाहेरच जेवू....किती दिवसात गेलो नाही....चल.." तो खूप आनंदात होता.

 

" हो चालेल...मी आवरून येते पटकन..." असं म्हणून ती वरती आपल्या रूममध्ये गेली.. पाठोपाठ आनंद देखील खोलीत गेला. 

 

" मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय...थांब हा देतोच..." असं म्हणून त्याने वोर्डरोब मधून एक बॉक्स तिच्याकडे दिला.

 

" काय आहे यात ??..."  ती उत्सुकतेने म्हणाली.

 

" बघ तर उघडून...." आनंद

 

नेहाने बॉक्स उघडला. त्यात एक ब्लॅक कलरची जीन्स आणि अबोली कलरचा टॉप होता. त्याला बाजूने व्हाइट कलरची नेटेड डिझाईन होती. तिला तो टॉप खूप आवडला.

 

" आवडला का...?" त्याने विचारलं

 

" हो छान आहे खरंच खूप....पण मी जीन्स ट्राय नाही केली कधी चांगली दिसेल का मला...?? " ती गोंधळून म्हणाली

 

" तू कोणत्याही ड्रेसमध्ये छानच दिसतेस गं...तू तयार होवून ये मी खाली थांबतो.." तो म्हणाला आणि हॉल मध्ये निघून गेला. 

 

थोड्या वेळाने नेहा तयार होवून आली. जीन्स टॉप मध्ये ती एकदम स्मार्ट आणि छान दिसत होती. चालतच ती आनंदजवळ आली. "एकदम मस्त दिसतेयस..." तो हळूच तिच्या कानात म्हणाला. त्यावर ती गोड हसली. त्याने पुढे केलेल्या हातावर तिने अलगद हात ठेवला आणि दोघेही गीता मावशींना सांगून बाहेर पडले.

 

................................

 

आनंदने गाडी एका शांत  रस्त्याला वळवली. दुकानं, गजबजलेली माणसं सगळी हळुहळु मागे पडत होती. त्याने एका लांब पसरलेल्या हिरवळीवर गाडी थांबवली. ती एक छोटीशी टेकडी होती..दोघेही गाडीतून खाली उतरले. नेहा थोडी चालत पुढे गेली.... आजूबाजूला छान हिरवी झाडी....पायाखाली वाढलेलं गवत...मधूनच ऐकू येणारी कोकिळेची साद....दूर कुठेतरी पाण्याचा होणारा खळखळाट....आकाशाच्या काळ्या निळ्या पाठीवर उडणारे पक्ष्यांचे थवे.... सगळं पाहून तिला प्रसन्न वाटलं...तिने हात पसरून मोकळा श्वास घेतला.... आनंद गाडीला टेकून तिथेच उभा राहिला...तिच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता बघून त्यालाही छान वाटलं.....मग तो चालत ती उभी होती तिथे तिच्या बाजूला येवुन उभा राहिला...

 

" कशी वाटली ही जागा...." त्याने तिच्याकडे बघत विचारलं..

 

" खूप खूप मस्त......!!!!!......असं वाटतंय तासनतास इथेच बसून राहावं....." ती म्हणाली.

 

" हम्मम.....मला पण मोकळं वाटतं इथे आल्यावर....माझं मन थाऱ्यावर नसलं की मी इथे येतो....बरं वाटतं.... खूप शांत....!!!!.....निसर्गाच्या जवळ गेलं की मिळणारी ही शांतता आणि प्रसन्नता आपल्याला कोणत्याच बागेत मिळणं कठीण आहे...."  तो म्हणाला. 

 

" हम्म....." ती एवढंच म्हणाली.... दोघेही कितीतरी वेळ फक्त शांतपणे उभे होते...मग थोड्या वेळाने आनंद तिला म्हणाला, ' ये तुला एक गंमत दाखवतो...' आणि तिला घेवून तो टेकडीच्या एका बाजूला गेला. ती जागा जरा उंचावर होती...खाली खूप खोल गर्द झाडी दिसत होती...

 

" नेहा...........I love you...." ...तो मोठ्याने हात पसरून म्हणाला...थोड्या क्षणातच तिकडून त्याच्या बोलण्याचा प्रतिध्वनी उमटला....तो इको पॉईंट होता...!!! तिला फार छान वाटलं..

 

" ए.....आता तुझी टर्न..." तो तिच्याकडे पाहत म्हणाला. त्यावर तिने मान डोलावली. तिनेही जोरात त्याला love you म्हटलं.....आणि त्याचा प्रतिध्वनी देखील आला.

 

" पण यात माझं नाव नाही....." तो लटक्या रागानं म्हणाला.

 

" पण मी कसं तुमचं नाव घेऊ........" तिनं आपली अडचण सांगितली.

 

" मग काय झालं...?? ....आपल्या वयात काही फार अंतर नाही...आणि सगळीकडे समान हक्क दिलाय मी तुला....मग नावात का नाही....ठरलं तर आजपासून नाही आत्तापासून तू मला फक्त आनंदच म्हणायचं..." तो ठामपणे म्हणाला.

 

" अहो पण........" ती बोलू पाहत होती पण आनंदने तिला बोलू दिलं नाही..

 

" पण नाही आणि बिन नाही.....मार बघू हाक....मला ऐकायचंय तुझ्या तोंडून माझं नाव....प्लिज माझ्यासाठी...!!! " आनंद

 

" ok....." नाईलाजाने ती म्हणाली... आणि थोडं पुढे होऊन ती जोरात ओरडली....I love you Anand..त्याचा इकोही आला पाठोपाठ.... तो खूप खुश झाला ....मग त्या दोघांनी मिळून सेल्फी काढले..सिंगलही खूप फोटोज काढले आणि ते दोघे तिथून निघाले..संध्याकाळ झाली होती...पण तरीही पूर्ण मावळलं नव्हतं...त्यांची गाडी हायवे वर आली..तेवढ्यात नेहाला बर्फाचा गोळेवाला दिसला आणि तिने आनंदला गाडी थांबवायला सांगितली....त्यांनी गाडी रस्त्याच्या एका बाजूला पार्क केली. दार उघडून ती पळतच त्या गोळेवाल्याच्या इथे आली....पाठोपाठ आनंद देखील तिथे आला. 

 

" Are you sure...तुला इथे गोळा खायचाय ?? " तो काहीसं तोंड वाकडं करत म्हणाला.

 

" हो म....मला आवडतो फार.... आम्ही कॉलेजला असताना पैज लावून खायचो गोळा...." ती आनंदला उत्साहात सांगत होती..." भैया एक ऑरेंज फ्लेवर का " ती त्या गोळेवाल्याला म्हणाली.

 

" अग अस रस्त्यावर खाणं चांगलं नसतं... किती unhygienic असत ते...नको खाऊ..." आनंद आपल्या परीने तिला सांगत होता.

 

" तुम्ही डॉक्टर असलात तरी ...मला आत्ता काहीही ऐकायचं नाही.... मी गोळा खाणारे..." ती मस्त हसत म्हणाली. त्यावर त्याने नाईलाजाने मान डोलावली.

 

" तुम्ही पण घ्या ना....खावून तर बघा......भैया और एक काला कट्टा दे ना.." नेहा

 

मग गोळेवाल्याने दोन्ही गोळे तिच्या हातात दिले. तिने मग स्वतःला काला कट्टा घेतला आणि आनंदला दुसरा दिला. तिनें लगेच खायला सुरवात पण केली. तिचं बघून मग आनंद पण हळूहळू खाऊ लागला. अंगावर सांडेल म्हणून तो वाकून खात होता...तिच्या कसा आहे

 'या खुणेवर त्यानेही छान असल्याचं सांगितलं. रस्त्याच्या पलीकडे मितालीची गाडी येवुन थांबली. ती गाडीतून खाली उतरली.. तिन समोर पाहिलं तर तिला आनंद आणि नेहा दिसले...तिने पुन्हा एकदा नीट पाहिलं...कारण आनंद असा रस्त्यावर गोळा वगरे खाईल अशी तिला अपेक्षाच नव्हती.....' बायको वरचं प्रेम खूपच ओतू जातंय. पण याचं बायकोचा तू विश्वास गमवशील तेव्हा ती तुझं तोंड पण पाहणार नाही....' असं मनाशी म्हणत ती तिथून निघून गेली...... 

 

 

क्रमशः.......

 

I hope दोन तीन दिवसांच्या गॅपने भाग पोस्ट झाले असले तरी आजचा भाग वाचून तुमचा तो backlog भरून निघेल...तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत. सगळ्यांचे खूप खूप आभार..पण थोड्या वेगळ्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील...कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा नावसाहित शेअर करावी. 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//