हे बंध रेशमाचे - भाग 31

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 31

आनंदने मागेववळला आणि तो डोळे विस्फारून पाहतच राहिला..

" नेहा.....!!!!!....नेहा तू....??? " त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ती फक्त हसली.

" I can't believe......You are looking so geougious....!!!!...."  त्याच्या बोलण्यातून त्याला झालेला आनंद लपत नव्हता. 

" कसं वाटलं सरप्राईज....??" तिनं हसत विचारलं.

" खूप छान....माझ्या आत्तापर्यंतच्या बर्थडेचं सगळ्यात भारी सरप्राईज आहे हे..." तो म्हणाला.

" Wish you happy birthday dear....Sorry for late wish..." ती एका हाताने कान पकडून म्हणाली. 


 
" मला वाटलं सगळे विसरले तशीच तुही विसरलीस माझा बर्थडे..." तो लटक्या रागाने म्हणाला.

" असा कसा विसरेन माझ्या नवऱ्याचा बर्थडे..." असं म्हणून तिनं त्याला मिठी मारली.

ती दोघ बोलत असतानाच आनंदची सगळी गॅंग आली.
"हम्मम्म.....आम्ही डिस्टर्ब तर नाही ना केलं....आत आलो तर चालेल ना..." निहारने घसा खाकरत विचारलं. तसे दोघेही बाजूला झाले. 

" अरे या ना....You most welcome " आनंद म्हणाला.

आनंदचे सगळे फ्रेंड्स आले. मिताली, स्नेहा, निहार पियुष, केदार...सगळ्यांनी त्याला मिठी मारून विश केलं. त्याच्यासाठी आणलेले गिफ्ट्स त्याला दिले. मग परब मॅडमनी सगळ्यांना केक कापायला यायची विनंती केली. आनंद आणि नेहा दोघांनी मिळून केक कापला. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या. आनंदने नेहाला केक भरवला.. तिनेही त्याला आपल्यातलाच छोटा तुकडा काढून भरवलं. आणि मग त्याच्या सगळ्या मित्रांनी एकच गलका केला. केक त्याच्या गालाला कपाळाला फासला. आनंद ओळखुही येत नव्हता. सगळे फ़्रेंडस त्याला केक भरवत होते आणि उरलेला त्याच्या तोंडाला फासत होते. एकच धमाल उडाली. मग कोणीतरी जाऊन सेल्फी काढू लागले. सगळ्यांनी वेगवेगळ्या पोजेस मध्ये ग्रुप फोटोज काढले. नेहा देखील खूप खुश दिसत होती. मग आनंद आपला चेहरा साफ करण्यासाठी वॉशरूमकडे गेला. इकडे सगळे केक खाण्यात बिझी होते. नेहा आणि परब मॅडमनी केक सगळ्यांना दिला. लहान मुलं आणि आजी आजोबांना खुर्च्यांवर बसवून त्यांना केक आणि आणलेले स्नॅक्स दिले. आणि बाकीच्यांसाठी सेल्फ सर्व्हिस आहे हे सांगितलं. एका बाजूला त्यासाठी काऊंटर ठेवले होते. प्रत्येकजण आपल्याला हवे ते घेऊन खाऊ लागला. इतक्यात नेहाच्या लक्षात आलं की मिताली कुठेच दिसत नाहीये. ती मग आनंद गेला त्या वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली. तर आनंदच्या मागोमाग मितालीही तिकडे जाताना तिला दिसली. ती हळूच तिच्या मागे जावुन एका कॉर्नरला टेकून तिला दिसणार नाही अशा पद्धतीने उभी राहिली. आनंद आपला चेहरा पुसत बाहेर आला. समोर त्याला मिताली दिसली.

" Happy birthday dear.." मिताली त्याला मिठी मारत म्हणाली. तसं मग आनंदने आपले हात बाजूला केले. ती अशी पटकन मिठी वगरे मारेल असं त्याला वाटलं नव्हतं. 

" हा थॅंक्यू मितु..." तो तिला बाजूला करत म्हणाला. तरी ती त्याला तशीच चिकटून उभी होती.

" मितु सोड मला....सोड..." त्यानं काहीसं ओरडून तिला दूर केलं.

" का तू मला असा दरवेळी झिडकरतोस....काय कमी आहे माझ्यात..." ती रागाने बोलत होती.

"हे बघ मितु....तू माझी फक्त चांगली मैत्रीण आहेस बाकी काहीही नाही..." आनंद म्हणाला.

" आनंद आपण किती गोष्टी शेअर केल्या एकमेकांसोबत.....वेळ घालवला... आठव प्लिज.... आता तू माझ्याशी धड बोलतही नाहीयेस..." मिताली

" असं काहीही नाहीये....मी सांगतोच की तुला पण सगळं..." आनंदलाही तिचा राग आला.

"हो पण आधी इतकं नाही...आता काय नेहा जास्त जवळची झालेय का माझ्यापेक्षा..." तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. 

" मितु.....ती माझी बायको आहे..." तो ओरडून म्हणाला.

" या आधी तर तिला बायको म्हणून सांगायलाही तुला लाज वाटत होती...मग आता असं अचानक काय झालं की तुझं मत बदललं.. काय आहे काय एवढं त्या गावंढळ आणि मूर्ख मुलीत...." ती तुच्छतेने म्हणाली. 

" Mind your language Mitu....मी नेहाबद्दल काहीही ऐकून घेणार नाही..." त्याला खूप राग आला होता. 

" काय प्रेमात वगरे पडलास की काय तिच्या....नाहीतरी अशा मुलींना दुसरं येतंय काय... आपल्या प्रेमाच्या जाळयात हँडसम मुलांना अडकवायचं आणि मग त्यांना फसवायचं...." ती म्हणाली...तीच बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच आनंदने तिच्या खाडकन कानाखाली वाजवली.

" आनंद......." ती जोरात ओरडली


" तुझी हिम्मत कशी झाली नेहाबद्दल असं बोलायची....ती बायको आहे माझी....त्यामुळे इथून पुढे तिच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं....नाहीतर मी विसरून की तू माझी मैत्रीण आहेस...." तो एवढं बोलून रागाने तिथून निघून गेला. 

पलीकडच्या कॉर्नर जवळून नेहा सगळं ऐकत होती. आनंदच बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. तिनं डोळ्यात आलेलं पाणी टिपलं आणि ती आनंद पाठोपाठ बाहेर आली. मिताली मात्र तिथेच उभी होती. आनंद असं काही करेल याची तिला अपेक्षाच नव्हती.आधीच मागच्या वेळेस त्याने केलेल्या अपमानामुळे ती पेटून उठली होती...आता तर त्याने हात उचलला होता तिच्यावर.....याचा बदला घेतल्याशिवाय ती शांत बसणार नव्हती. मनाशी काहीतरी ठरवून ती डोळे पुसून बाहेर आली आणि सगळ्यांच्यात मिक्सअप झाली. बाहेर हॉल मध्ये म्युझिक चालू झालं होतं सगळे जण छान गाण्यावर नाचत होते. आजी आजोबा, सगळी लहान मुलं नाचत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. थोड्या वेळाने छान रोमॅंटिक गाणं चालू झालं तसे सगळेजण कपल डान्स करू लागले. आजी आजोबा देखील हातात हात घालून नाचू लागले. आनंदने ही नेहाला डान्ससाठी हात पुढे केला. तिनेही अलगद त्याच्या हातावर हात ठेवला. मग त्याने हलकेच तिला जवळ ओढली आणि एक हात तिच्या पाठीमागून कमरेजवळ ठेवला आणि दुसरा हात हातात घेऊन दोघे नाचू लागले. तो मध्येच तिला आपल्या जवळ ओढे...बाजूला करे आणि गोल फिरवून पुन्हा आपल्या मिठीत घेई...ती त्याला डोळ्यांनीच नको नको करून फटकारत होती. लांबून मिताली हे सगळं बघत उभी होती. तिला आनंदचा प्रचंड राग आला. ती आणि पियुष नाचत होते. पण आनंद आणि नेहाचं अस जवळ असण तिला पाहवल नाही..आणि ती कोणालाही काही न सांगता निघून गेली. थोडया वेळाने पार्टी संपली आणि मग सगळेच आपापल्या घरी निघून गेले. आनंदने घरकुल मधल्या सगळ्यांचे आभार मानले. विशेषतः परब मॅडमचे कारण हा सगळा प्लॅन त्यांचा होता. आनंदने सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट्स परब मॅडमकडे दिले आणि मग नंतर सगळ्यांना द्यायला सांगितले. तो दरवर्षी त्याच्या बर्थडेला घरकुल मधल्या सगळ्यांना गिफ्ट्स द्यायचा. मग थोड्या वेळाने सगळ्यांचा निरोप घेवून आनंद, वृषालीताई आणि नेहा घरी आले.

....................................

घरी आल्यावर वृषालीताई आनंद आणि नेहाला गुड नाईट म्हणून आपल्या खोलीत गेल्या. नेहा आणि आनंद तिथेच हॉल मध्ये थोडा वेळ बसले. त्याने नेहाला मिताली आणि त्याच्यात झालेल्या वादाबद्दल सगळं सांगितलं. 

" असुदे....मी ऐकलंय सगळं..." नेहा त्याचा हात हातात घेत म्हणाली.

" काय....?? तू कुठे होतीस....? " त्याने आश्चर्याने विचारलं.

" मिताली खूप वेळ झाला कुठे दिसली नाही सो बघायला गेलं...तेव्हा ती तुमच्यासोबत बोलताना दिसली..." तिनं सांगितलं.

" तिला काय झालंय तेच कळत नाही मला....माझा सगळा मड घालवला तिने..." तो काहीसं वैतागून म्हणाला.

" हम्मम ठीक आहे...होतं असं कधी कधी...तुम्ही लक्ष नका देऊ. मी कॉफी करून आणू का मस्त ..? तुम्हाला बरं वाटलं." ती म्हणाली.

" हो मला हवीच होती. तुला कसं कळत मला काय हवंय ते..." तो तिला जवळ घेत म्हणाला.

" हम्मम ....सगळं कळतंय हा...मी आणते कॉफी..." ती हसतच त्याला बाजूला करून किचन मध्ये गेली. 


थोड्या वेळाने ती दोघांसाठी कॉफी घेवून आली. दोघेही तिथेच हॉल मध्ये कॉफी पियत बसले. आजच्या पार्टी बदल बोलत होते. मग नेहाने परब मॅडमनी कसं सगळं प्लॅनिंग केलं. आनंदला फसवलं ते सांगितलं. तिचा मेकॉव्हर पण त्यांनीच केला. ती भरभरून बोलत होती आणि तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. आज तर त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता.

" हॅलो....लक्ष कुठाय...." तिनं त्याच्यासमोर टिचकी वाजवत विचारलं. तसा तो भानावर आला.

" अं....?? तू सांगत होतीस काहीतरी....आज तू खूप सुंदर दिसतेयस असं वाटतंय तुझ्याकडे पाहतच राहावं..." तो पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला. तशी ती छान लाजली. त्यावर त्याने बाण लागल्याची ऍक्शन करत पडल्यासारखं केलं. 

" इश्श......." ती लाजून आत जात होती. तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला आणि तिच्या जवळ जात तो हळूच तिच्या कानात म्हणाला..." तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे.." एवढं बोलून तो पळतच जिन्यातून वरती रूममध्ये गेला. 

तिनं मग कॉफीचे मग उचलले आणि आत किचन मध्ये नेवुन ठेवले आणि मग ती वरती आपल्या खोलीत गेली. खोलीचं दार उघडून ती आत आली..पण तिला आनंद कुठेच दिसेना. पण बेडवर एक चिट्ठी आणि एक गुलाबाचं फुल ठेवलेलं तिला दिसलं त्यावर लिहलं होतं. 


मी हॉस्पिटलला जाताना तू माझ्या सगळ्या वस्तू जिथे ठेवतेस ती जागा...


तिनं ते वाचलं आणि तिच्या लक्षात आलं की आनंदच्या वस्तू पाकीट, रुमाल या ती त्यांच्या वोर्डरोब मध्ये ठेवते. तिनं तिथे जावून पाहिलं तर तिला तिथे आणखी एक चिठी मिळाली. तिने ती काढून वाचली त्यावर लिहलं होतं....


जिथे तू माझ्या आवडीचे छान छान पदार्थ करतेस....


मग ती पळतच खाली किचन मध्ये आली. तिथे फळांच्या बास्केटमध्ये तिला अजून एक चिठ्ठी मिळाली. त्यावर लिहलं होतं...


अशी जागा जी फक्त आपल्या दोघांची आहे...

मग ती पुन्हा एकदा त्यांच्या बेडरूम मध्ये आली. दुसऱ्या एका वोर्डरोब मध्ये तिला एक बॉक्स दिसला आणि त्यावर चिठ्ठी होती. तिने तो बॉक्स बाहेर काढला त्यात एक छानशी मोरपंखी रंगाची साडी होती. चिठ्ठीवर लिहलं होतं.. 

ही साडी तुला जास्त सूट करेल.... ट्राय करून बघतेस का ? 

ती साडी नेसून तयार झाली. साडीच्या बॉक्समध्ये तिला आणखी एक चिट्ठी मिळाली त्यावर लिहलं होतं. 


जिथे उभं राहून आपण असंख्य चांदण्या मोजू शकतो....
तिथे मी तुझी वाट पाहतोय...

याचं उत्तर काही तिला कळेना..टेरेस वर जायचं की बाहेर लॉन वर असा तिला प्रश्न पडला. तीन बाहेर दार उघडून पाहिलं तर सगळं शांत होतं. रात्र खूप झाल्याने फक्त रातकिड्यांचा आणि झाडांची पाने पडतानाचा आवाज येत होता. तीन दार लावून घेतलं आणि ती टेरेस वर पळाली. तिला हे सगळं खूप छान वाटत होतं. आनंदच असं सरप्राईज देणं तिला फार आवडलं.. आता तिला उत्सुकता होती ती त्याच्या सरप्राईजची....!!! 


क्रमशः...

🎭 Series Post

View all