Feb 24, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 10

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 10

हे बंध रेशमाचे - भाग 10


रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आनंद हॉस्पिटल मधून घरी आला.गाडी पार्कींगमध्ये लावून तो आपल्याच तंद्रीत घरात जात होता...वृषालीताई लॉनवर बसल्या आहेत याकडे देखिल त्याच लक्ष न्हवतं .

"आनंद , इकडे ये ...." आवाजासरशी त्याने पाहिलं तर आई त्याला बोलवत होती.
"आई , इथे बसून काय करतेस रात्रीची "....
"तुझीच वाट बघत होते बस जरा मला बोलायचंय"
"हा ".....आनंद आईच्या बाजूला येऊन बसला
"तू काय ठरवलंयस नेहाबद्दल ?" 
"आई तुला माझा निर्णय माहितेय ....पुन्हा पुन्हा का विचारतेस ...?"
"हे बघ आनंद निदान माझ्यासाठी नाही तुझ्या बाबांसाठी तरी या लग्नाला हो म्हण.....अरे श्रीकांत गेले तेव्हा तू निदान मोठा तरी होतास पण नेहाची आई गेली तेव्हा ती पोर चार वर्षांची होती रे फक्त.... खरंतर आम्ही तेव्हाच तिला इकडे आणणार होतो...पण आप्पा नको म्हणाले..."


एवढं बोलून त्यांनी आनंदला श्रीकांतरावांनी कोणत्या परिस्थितीत आपासाहेबाना वचन दिलं ते सांगितलं...त्यामुळे लग्न होण्याने आप्पासाहेब देखील नेहाच्या बाबतीत निश्चिन्त होणार होते आणि ज्या आईच्या मायेसाठी नेहा आसुसलेली होती ती माया वृषालीताई करतील याची आप्पाना खात्री होती .....त्यांनी आनंदला सगळं समजावून सांगितलं..

"ठीक आहे आई...तुझ्या आणि बाबांसाठी म्हणून मी हे लग्न करायला तयार आहे..तू तस कळव आप्पा काकांना ..."

अस म्हणून आनंद घरात जायला निघाला...."पण नेहासारखी गावंढळ मुलगी माझी बायको कधीही होऊ शकत नाही "....अस त्यानं मनाशी ठरवलं....आणि तो आपल्या रूम मध्ये निघून गेला.


..............................


दुसऱ्या दिवशी सकाळी मिताली आनंदच्या घरी आली. त्यावेळी आनंद आणि वृषालीताई नाश्ता करत होत्या..

"एक मेंबर वाढलाय बरं का नाश्त्याचा..." ती आत येत म्हणाली 

"ये ग ये....बरं झालं आलीस मी तुला फोनच करणार होते.." वृषालीताई म्हणाल्या

"का ते ?" मितालीने खुर्चीवर बसत विचारलं
"तूझ्या मित्राचं लग्न आहे आता...मग तयारी नको का करायला ..." त्या हसत म्हणाल्या

"काय ....?" मितालीने चमकून आनंदकडे पाहिलं ..."खरच आनंद ...?

तो त्यावर काहीच बोलला नाही.खाली मान घालुन तो खात होता....
"त्याला काय विचारतेस , आता मला तुझी मदत लागेल हा खरेदी, लग्नाची तयारी, सजावट.....येशील ना ?" वृषालीताईंनी तिच्या हातावर हात ठेवत विचारलं..

"हो येईन ना ...." खरतर आनंदने काहीतरी बोलावं या अपेक्षेने ती त्याच्याकडे पाहत होती...पण तो काही न बोलता नाश्ता करून हॉस्पिटलला निघून गेला...थोड्या वेळाने मिताली देखील घरी गेली.वृषालीताईंनी आप्पासाहेबांना फोन करून आनंदचा होकार कळवला.....

 

...........................

 

मिताली देसाई ....!!! आई वडिलांची एकुलती एक मुलगी... दिसायला देखणी, कोणालाही भुरळ पाडतील असे डोळे....गोल चेहरा..केसांचा बोबकट... बिनधास्त आणि कोणाच्यातही पटकन मिक्सअप होणारी...लहानपणापासून शहरात वाढलेली त्यामुळे काहीशी अटिट्युड असलेली...पण तरीही प्रेमळ...  आनंद भेटल्यापासून तीही त्याच्यात रमत चालली होती..आनंद तिला आवडला होता..तिचाही नकळत ती प्रेमात पडली होती आनंदच्या....!!! त्यांचं भेटणं , बोलणं, बाहेर फिरायला जाणं यामुळे कदाचित आपणही आनंदला आवडत असू..अस तिला वाटलं होतं.पण आज आनंदच्या लग्नाचा विषय कळल्यावर मात्र तिला वाईट वाटलं...तिला राहून राहून अस वाटत होतं की या सगळया साठी आनंदने विरोध करावा..पण तो काही न बोलताच निघून गेला होता..घरी आल्यावर ती आपल्या रूम मध्ये जाऊन खूप रडली...आनंद आवडल्याचं ती घरी तिच्या मॉम डॅडना सुद्धा सांगणार होती...पण त्या आधीच आनंदच लग्न ठरल्यामुळे तिला काय करावं सुचेना...

"हॅलो , मिताली हिअर "
"बोल...."
"संध्याकाळी कॉफीसाठी भेटूया का ? ....मला बोलायचंय तुझ्याशी ...."
"Ok.. मी तुला कॉल करतो माझी ओपीडी संपल्यानंतर "
"हो चालेल.मी तुला कॉफीशॉपचा अड्रेस मेसेज करते."
"Ok बाय "
आनंदशी प्रत्यक्ष बोलल्याशिवाय तिला चैन पडणार न्हवतं..त्यामुळे तिनं त्याला संध्याकाळी भेटायला बोलवलं...


..........................................


"बोल कायतरी "..........कॉफीशॉपमधून बाहेर दिसणारा व्ह्यू पाहत असणाऱ्या आनंदला मिताली म्हणत होती..

"काय बोलू ..."

"तुझं लग्न ठरलं यावर तुला काहीच म्हणायचं नाहीये का ? " ......ती काहीसं चिडून विचारलं

"नो ऑपशन....alredy सगळं ठरलंय...मी बोलून काहीच होणार नाहीये ..."

"अरे पण .....म्हणून तू काय फक्त ग्रॅज्युएशन झालेल्या आणि एका गावातल्या मुलीशी लग्न करणारेस ? "

"हे बघ आई बाबांची तशी इच्छा होती की माझं आणि नेहाचं लग्न व्हावं...पण ती फक्त आईची सून असेल माझी बायको नाही....."

"मलाही वाटत होतं माझी लाईफ पार्टनर ही एक इंडिपेंडंट मुलगी असावी..जी स्वतःच्या पायावर उभी असेल.. तिला स्वतःच मत असेल ..पण आता मला नेहाशी लग्न करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही..काहीही झालं तरी आईची इच्छा माझ्यासाठी महत्वाची आहे...." आनंद बोलला

"एक विचारू ?" 

"हं....."

"नेहाशी तुझं लग्न ठरलं नसत तर लाईफ पार्टनर म्हणून तू माझा विचार केला असतास का ? "

तिचा हा प्रश्न त्याच्यासाठी अनपेक्षित होता...तो काहीच न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिला....
.
"आनंद बोल ना...केला असतास का माझा विचार ???..."....ती अगतिक होऊन विचारत होती.

"मितु मी तुझ्याबद्दल असा विचार कधीच केला नाही ग..तू माझी बेस्ट फ्रेंड होतीस आणि कायम राहशील " आनंदला खरतर काय बोलावं हे सुचत न्हवतं

"Ok तुझ्यासाठी मी कायमच तुझी फ्रेंड आहे..तू मला कधीही बोलावू शकतोस...And am will be there..!! डोळ्यात आलेलं पाणी कसोशीने तिने थांबवलं होत...


...................................


आनंदच्या होकारामुळे आप्पासाहेबांना आभाळ ठेंगण झालं होतं.त्यांनी सगळ्यात आधी ही बातमी संगीतताईंना सांगितली.त्यादेखील खुश झाल्या....नेहाला त्यांनी लहानच मोठं केल होत.त्यामुळे आपली नेहा लांब जाणार या विचारानेच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.आप्पासाहेबांनी घरातल्या नोकर माणसांना ,त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना सगळ्यांना नेहाचं लग्न ठरल्याची बातमी दिली.सगळेजण फार खुश झाले. आनंदच्या गावी असणाऱ्या घराचं काम आता सुरू होणार होते.. जुनं घर पाडून त्याच जागी नवं घर उभं राहणार होतं.. घराला पुन्हा एकदा नव्याने घरपण मिळणार होत.....!!!! घराच्या कामासाठी आनंद आणि त्याचा मित्र लवकरच गावी येणार होते......

 

क्रमशः......

 

काही कामामुळे भाग पोस्ट करायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व..कथेतून कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार सादर केले जात नसून गावातील मुलं देखील तितकीच हुषार आणि टॅलेंटेड असतात हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.. फक्त आपला दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे.तरी वाचकांनी कथा वाचन चालु ठेवावं ही नम्र विनंती...अजून खूप बदल नेहा आणि आनंदच्या लग्नानंतर होणार आहेत..त्यामुळे कथेचे पुढील भाग वाचकांना नक्की आवडतील अशी आशा करते.धन्यवाद...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//