Feb 29, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 15

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 15

हे बंध रेशमाचे - भाग 15 

दुसऱ्या दिवशी नेहा ,अप्पासाहेब आणि बाकीचे नातेवाईक पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. निघताना नेहाने वृषालीताईंना नमस्कार केला. तिची नजर आनंदला शोधत होती.पण तो मात्र सकाळीच लवकर आवरून हॉस्पिटलला गेला.नेहा इकडे तिकडे बघत होती. वृषालीताईंच्या ते लक्षात आलं तसं त्यांनी सकाळीच तो हॉस्पिटलला गेल्याचं तिला सांगितलं.तशी ती जराशी खट्टू झाली निदान आम्ही निघताना तरी त्याने निरोप द्यायला यायला हवं होतं असं तिला वाटलं...सर्वजण गाडीत बसले.जिव्हाळा बंगला हळू हळू दृष्टीआड होऊ लागला.....


..................................

दिवस हळूहळू पुढे सरकत होते. देशमुखांच्या गावी असणाऱ्या घराचं काम जवळ जवळ पूर्ण होत आलं.दार, खिडक्या, खोल्या, भिंती यांना रंग द्यायचं काम चालू झालं. आप्पासाहेबांनी तसं आनंदला फोन करून कळवलं. त्याप्रमाणे त्यानं कोणते कलर कुठे द्यायचे ते त्यांना व्यवस्थित सांगितलं .त्यानुसार पुर्ण घराला बाहेरून छान उपव्हाईट रंग देण्यात आला.हॉल , किचन , देवघर पिस्ता कलर आणि पर्पल कलरच्या शेडने रंगवले गेले..खोल्यांमध्येही छान लाईट शेड्स दिल्या गेल्या. घराची उभारणी चांगली झाली. आता फक्त ते सजवायचं काम बाकी  होतं. त्यासाठी पुढच्या आठवड्यात आनंद गावी येणार होता. येताना तो पेंटींग्स , काही पुस्तकं, शोपिसेस आणि लाईट्सच सामान घेऊन येणार होता.एप्रिल महिना जवळ जवळ संपत आला.इकडे नेहाने वर्षासाठी लागणारी पापड, लोणची, मुरांबे संगीता आत्या आणि गंगा मावशीच्या मदतीने घालून ठेवले.लग्नासाठी आता जेमतेम वीस दिवस राहिले होते.आपण गेल्यानंतर आप्पाना काही कमी पडू नये म्हणून तिनं त्यांच्यासाठी सगळं करून ठेवलं. अप्पासाहेब रोज आनंदच्या घराचं काम बघायला जात. आपली लेक आता या घरात सून म्हणून येईल त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात असं त्यांना वाटे.घरासाठी पाण्याची व्यवस्था , लाईटच कनेक्शन सगळं त्यांनी करून घेतलं..


..............................

पुढच्या आठवड्यात आनंद गावी गेला. त्याआधी त्याने मोठी गाडी करून घरात लावायचं सामान पाठवलं होतं. आप्पानी गडी माणसांकडून ते सामान उतरवून तिथेच आत घरात ठेवायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी आरामात सगळं लावू अस म्हणून आप्पानी त्याला आपल्या घरी नेलं. जेऊन रात्री त्याला लवकर झोपायला पाठवलं कारण त्याची होणारी धावपळ आप्पाना कळत होती.दुसऱ्या दिवशी त्यांनी आनंद आणि नेहाला घर लावायला पाठवलं आम्ही नंतर येतो तुम्ही पुढे व्हा अस सांगून त्यांना नवीन घरी जायला सांगितलं.दोघेही नवीन घरी आले. आनंदने बाकी माणसांना सांगून सोफा , खुर्च्या , टेबल सगळं लावून घेतलं . सामानातून पेंटींग्स काढली आणि कुठे लावायची याचा तो विचार करत होता.


"आपण इथे लावूया का पेंटींग्स छान दिसेल " नेहा बोलली
तिनं दाखवलेल्या जागेवर त्यानं पाहिलं त्यावर ती म्हणाली
"फ्रेम छान आहे बाहेरून आल्यावर प्रसन्न वाटेल ती बघितल्यावर..." 


थोडा विचार करून तो चालेल म्हणाला.त्यानं माणसांकरवी तिथे फ्रेम लावून घेतली.मग ते दोघं रूम मध्ये गेले एक नेचर पेंटींग्स तिथे लावलं.आणलेलं आरसा असलेलं कपाट आणि वोर्डरोब तिथे ठेवुन घेतला.दुसऱ्या एका खोलीत स्टडी टेबल आणि एक कपाट ठेवलं..त्यामध्ये आनंदने आणलेली पुस्तकं वर्गवारी करून दोघांनीही व्यवस्थित लावली.घराची एकेक बाजू बघून कुठे काय छान दिसेल ते बघत दोघेही वस्तु लावत होते.त्यानिमित्ताने दोघे एकत्र आले.आनंद फारसा बोलत नसला तरी नेहाला त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता..ती आपली त्याच्या मागून फिरत होती.तो काय सांगतो , कसं काम करून घेतो ते डोळ्यांनीच निरखत होती.असेच दोघे चालत चालत मागच्या बाजूला आले.थोडं पुढे जाणार तोच नेहाच्या लक्षात आलं की रंगकाम करताना थोडा रंग लादीवर सांडला होता.आनंदच तिकडे लक्ष नव्हतं.तो पडेल भितीने तिने त्याला पटकन मागे खेचलं.दोघांना काही कळायच्या आत दोघही खाली पडली.अजूनही नेहानं त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता.त्याला काहीच कळेना..तिनं असं अचानक ओढल्यामुळे त्याला राग आला.

" कशाला ओढलंस मला ...?" ...त्यानं विचारलं.

तिन पटकन त्याचा धरलेला हात सोडून दिला.मग तिनं समोरच सांडलेल्या रंगाकडे बोट दाखवलं तस त्याच्या लक्षात आलं आपण पडू नये म्हणून तिची खटपट चालली होती.पण तरी आता आम्ही दोघ पण पडलो.त्याला या गोष्टीचं हसू येत होतं.त्याच्या गालावरच हसू पाहून नेहाला वाटलं..' हम्म साहेबांना हसता येत तर..' तो कितीतरी वेळ आपल्याच तंद्रीत होता.शेवटी नेहाने त्याला हात लावून हलवलं..आणि ती उठून उभी राहिली..

"उठताय ना ?" तिनं त्याला आधारासाठी हात पुढे केला.पण त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच उठला.कामगारांना सगळ्या सूचना देवून ते बाहेर आले.आणलेल्या सामानातून त्याने झोपाळा बाहेर काढायला सांगितलं.तसं तिचं तिकडे लक्ष गेलं.लाकडी फर्निशिंग केलेला छोटा झोपाळा... त्याला लावण्यासाठी आणलेल्या डिझाईनच्या साखळ्या...ते बघून ती खुश झाली.गडी माणसांकडून त्यानं तो झोपाळा लावून घेतला.सगळं घर बऱ्यापैकी लावून झालं होतं.दोघेही पुन्हा आप्पासाहेबांकडे आले.नेहाला वाटत होतं की त्याला विचारावं तो 'माझ्याशी असं का वागतो.'पण त्याला अस विचारायची तिची हिंमत होईना.पुन्हा तो आपल्यावर चिडेल या भीतीने ती गप्प राहिली.आवश्यक त्या गोष्टी आप्पाना सांगून तो संध्याकाळी मुंबईला जायला निघाला. आजचा पुर्ण दिवस नेहा आणि आनंद दोघेही एकत्र होते.त्याचं ते दिसणं , बोलणं तिला भुरळ पाडत होतं. तो गेला तरी आजच्या दिवसभराच्या आठवणीत ती रमली होती..तिच्या अंगठीतला हिरा आज नव्याने चमकतोय असं तिला उगीचच वाटलं......!!!!


...................................

मितालीला मात्र आनंदच वागणं पटत नव्हतं.तो कामासाठी गावी गेला की तिला चैन पडत नसे.तो आपल्याला स्वीकारू शकतो असं तिच्या वेड्या मनाला अजूनही वाटत होतं.पण आनंदच्या दृष्टीने लग्न म्हणजे फक्त सोपस्कार होते. साखरपुडा आणि घराच्या कामाच्या गडबडीत त्याला हॉस्पिटलकडे बघायला वेळ मिळाला नव्हता.त्यामुळे गावी जाऊन आल्यानंतर त्याने स्वतःला हॉस्पिटलच्या कामात आणि अभ्यासात गुंतवून घेतलं.त्यामुळे मितालीशी देखील त्याच बोलणं होईनास झालं.शेवटी एक दिवस कंटाळून ती हॉस्पिटलला त्याला भेटायला आली.रिसेपशनिस्टकडे त्याची केबिन विचारून त्याला भेटायला निघाली. अपॉइंटमेंट शिवाय सर भेटत नाहीत असं तिनं सांगून पण तिचं न ऐकता मिताली दुसऱ्या मजल्यावरच्या त्याच्या केबिनकडे गेली.दारावर नॉक वगरे न करता ती थेट त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.पण त्याच लक्ष नव्हतं.तो आपल्या कामात बिझी होता.

"हॅलो मिस्टर , काय आमची आठवण आहे की नाही तुम्हाला ..."  मिताली 

तिच्या अशा अचानक येण्याने तो दचकला.

"मितु तू ?? दरवाज्या नॉक करून येता येत नाही का दुसऱ्याच्या केबिनमध्ये जाताना ...."   तो रागाने बोलत होता.

"नाही केलं मग काय झालं..माझ्या मित्राचं केबिन आहे मी कधीही येऊ शकते..." ती अगदी छान मुड मध्ये होती

"हे बघ मितु..मी तुझा मित्र आहे .पण हॉस्पिटलच्या वेळेत मला कोणीही असं आलेलं चालत नाही..तुला
 रिसेपशनिस्टने सांगितल नाही का...? " तो अजूनही शांत झाला नव्हता.


"राहू दे ना यार...ती बोलली मला but मीच आले.काय होतंय चल ना आपण बाहेर जाऊ..खूप दिवसात नाही कुठे गेलो नाही...चल ना...."  मिताली

"नाही मला कामं आहेत.पुढच्या महिन्यात रिसर्च प्रबंध सबमिट करायचाय त्याचं टेन्शन आहे एक तर....तू जा प्लिज..." तो काहीशा समजवण्याच्या सुरात म्हणाला

"चल रे...ते करशील नंतर ..." असं म्हणत ती त्याच्याजवळ  आली आणि त्याचा हात पकडून त्याला उठवू लागली.तस त्याने तिचा हात झिडकारला.

"तुला एकदा सांगून कळत नाही का...? मला काम आहे ..You just get out...." तो जोरात ओरडला. 

तशी ती दोन क्षण बघतच राहिली आणि तिथून रडतच बाहेर निघुन गेली..


क्रमशः...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//