Feb 24, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 4

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 4

हे बंध रेशमाचे - भाग 4


"दादा आत येऊ का ?" गीता मावशींनी दारातूनच आनंदला विचारलं ."तुमचा नाश्ता आणलाय".


"या या ठेवा तिथे.. मावशी मी हॉस्पिटलला जातोय. एक ऑपरेशन आहे आज.. दुपारी तिकडचे जेवेन.." आनंद म्हणाला


" बरं" गीता मावशी म्हणाल्या


"आईचा काही फोन आला होता का तुम्हाला, कधी येणारे ??" ..आनंदने विचारलं.."काल माझा पूर्ण दिवस हेक्टिक होता तिला फोन पण नाही करता आला".......

 

"नाही हो दादा, आला असता तर मी बोलले असते की तुम्हाला..मला जाताना सांगून गेल्या दोन दिवसानी येईन परत....मला वाटत त्या आज संध्याकाळ पर्यंत येतील." मावशींनी सांगितलं.

 

"बघू आता, जमलतर मी करेन फोन तिला"........
..... खरतर आई म्हणजेच वृषालीताई घरी नसल्यामुळे त्याला एकट्याला घरात नकोस झालं होतं....त्यामुळे तो जास्तीतजास्त  वेळ हॉस्पिटलमध्येच घालवत होता.


...........................

 


नाश्ता ठेऊन मावशी निघून गेल्या.. आनंद हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार होत होता...........उंचापुरा, देखणा....घारे डोळे ,कुरळे केस....कोणालाही पटकन छाप पाडेल अस व्यक्तिमत्व..... काहीसा रागीट पण तितकाच प्रेमळ स्वभाव....आणि तितकीच तीक्ष्ण बुद्धिमत्ता....!!!!! आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची असलेली जाणीव .....त्यामुळे वागणं बोलणं अगदी व्यवस्थित आणि टापटीप..... कपाटातून त्यांने डार्क नेव्ही ब्लू कलरचा शर्ट आणि अफव्हाईट कलरची पॅन्ट  बाहेर काढली...आणि चेंज केले....हातात रोलेक्सच घड्याळ घातलं..आपल्या आवडत्या परफ्युमचा स्प्रे उडवला...मावशींना येतो सांगून तो हॉस्पिटलला निघून गेला.....


.......................

 

 

आनंद हा वृषालीताई आणि श्रीकांतराव यांचा एकुलता एक मुलगा.....श्रीकांतराव हे एक प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ होते.गावातील लोकांना कमी खर्चामध्ये चांगले उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी त्यांनी 'संजीवनी हॉस्पिटल' उभारलं होत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे आनंद देखील MBBS झाला..त्याला न्यूरॉसर्जन व्हायचं होत....त्यामुळे MS साठी त्याला श्रीकांतरावांनी  शिक्षणासाठी त्याला अमेरिकेला पाठवायचं ठरवलं. आनंदच्या शिक्षणाचा आपल्या हॉस्पिटलला ,आपल्या लोकांना उपयोग व्हावा अस श्रीकांतरावांना फार वाटत होतं.........पण आनंदचे परदेशी जाऊन शिकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले......


................


आनंदची परदेशी जाण्याची पुर्ण तयारी झाली होती. पासपोर्ट, व्हिसा, आणि बाकी कागदपत्रांची देखील पूर्तता झाली होती...वृषालीताईनी लाडक्या मुलासाठी लाडू, करंजी असे त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करून दिले.श्रीकांतरावांनी त्याच्यासाठी Rolex च रिस्ट वॉच घेतलं होतं.त्यामुळे स्वारी भलतीच खुश होती.आनंद अमेरिकेला जायचा दिवस उजाडला. त्याची फ्लाईट संध्याकाळी सातची होती.तरी चेकिंग , बॅग्सवरती टॅग लावणे, document चेकिंग यासाठी विमानतळावर दोन तास आधी पोहचणे गरजेचे होते.त्यांच्या इथून विमानतळ अर्ध्या तासांवर होते.त्यामुळे दुपारचं जेऊन झाल्यानंतर 4 वाजता निघू अस ठरलं.....

 

"सावकाश जा रे, आणि पोचल्यावर फोन कर. नि फ्लाईट चेंज झाल्यावर पण "....वृषालीताईं अश्रू भरल्या डोळ्यांनी आनंदला सांगत होत्या..


"अग तो काय कायमचा नाही चालला तिकडे 2 वर्षांचा  तर प्रश्न आहे " श्रीकांतराव वृषालीताईंची मस्करी करत होते.खरतर त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं.पण त्यांनी ते दाखवलं नाही.

 

"आई, बाबा काळजी नका करु. मी फोन करत जाईन रोज...तुम्ही दोघांनीही काळजी घ्या तुमची..पोचल्यावर कळवतो".. आनंद म्हणाला


श्रीकांतराव आनंदला सोडायला विमानतळावर जाणार होते. त्यामुळे आज त्यांनी ड्रायव्हरला सुट्टी दिली होती....आनंदने बॅग्स गाडीत ठेवल्या आणि पुढच्या सीटवर येऊन बसला. वृषालीताईंना आणि काम करणाऱ्या मावशींना बाय करून ते दोघे निघाले.....श्रीकांतराव गाडी चालवत होते. हसत, गप्पागोष्टी करत बापलेकाची गाडी निघाली होती.तिकडे गेल्यावर कसा अभ्यास करायचा, कस राहायचं याच्या सूचनाही ते आनंदला देत होते........इतक्यात समोरून.....भरधाव येणाऱ्या ट्रकची धडक त्यांच्या गाडीला बसली.....काही कळायच्या आतच आनंद बाहेर रस्त्यावर फेकला गेला...त्याच्या डोक्याला मार बसला होता त्यामुळे तो बेशुद्ध पडला.........आणि श्रीकांतराव....??? ट्रकची धडक इतकी जोरदार होती की श्रीकांतराव जागीच मरण पावले होते......एव्हाना चांगलीच गर्दी जमली होती.....त्यातल्या काही जणांनी आनंदला आणि श्रीकांतना हॉस्पिटलमध्ये निलं... त्याच्याजवळच्या मोबाईलवरून हॉस्पिटलने घरी फोन करून अपघाताची बातमी दिली....वृषालीताईंच्या पायाखालची तर जमीनच सरकली.......धगधगत्या मनाने मावशींना सोबत घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या..एव्हाना दुसऱ्या अम्ब्युलन्स मधून श्रीकांतरावांना आणण्यात  आले......त्यांना बघून वृषालीताईंनी एकच टाहो फोडला.......पती जागीच मरण पावले होते तर मुलगा मृत्यूशी झुंज देत होता.....वृषालीताईंवर मोठाच प्रसंग उभा राहिला होता.........ती रात्र त्यांच्या अश्रूंनी न्हाऊन निघाली होती.......

 


दोन दिवसांनी आनंद शुद्धीवर आला...समोर त्याला आई दिसत होती... पण बाबा कुठायत असा प्रश्न त्याला पडला होता...

 

आनंद :    आई , बाबा कुठायत ?? फार लागलंय का त्यांना ?.....सांग ना 

 

वृषालीताईना जोराचा हुंदका आला...त्या पदराने  तोंड लपवून त्याच्या समोरून बाहेर आल्या...शेवटी डॉक्टरनीच पुढाकार घेऊन आनंदला डॉ. श्रीकांत गेल्याची बातमी दिली..आनंदला मोठा धक्का बसला होता....


.....................

 

या सगळ्यातून बाहेर पडायला आनंद आणि पर्यायाने वृषालीताईंना देखील फार वेळ लागला.या सगळ्या गोष्टींमुळे आनंद एकलकोंडा आणि चिडचडा झाला होता...... डॉ. श्रीकांत नसल्यामुळे आनंद वरती संजीवनी हॉस्पिटलची जबाबदारी आली होती..त्यामुळे त्याने परदेशी जायचा विचार सोडून दिला आणि हॉस्पिटलच्या कामात लक्ष द्यायला सुरुवात केली.आई, तो आणि हॉस्पिटल एवढंच आता त्याचं जग उरलं होत......

 


क्रमशः....

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//