हे बंध रेशमाचे -भाग 1

A love story between a village girl and a well educated city boy.

हे बंध रेशमाचे ....भाग 1

        " छान आहे हो मुलीचा फोटो " वृषालीताई फोटो न्याहाळत संगीता ताईंना म्हणाल्या. 
         वृषालीताई कितीतरी वर्षांनी गावी आल्या होत्या. मुलाच्या शिक्षणामुळे त्यांना येणं जमलंच न्हवतं.. आणि म्हणूनच गावी आल्यानंतर आधी त्या संगीता ताईंना भेटायला आल्या होत्या..संगीता ताईंचे नि जोशी घराण्याचे चांगले संबंध होते..नेहाची आई गेल्यानंतर त्यांनीच तिचा सांभाळ केला होता आईची माया दिली होती....

आप्पासाहेब जोशी हे कोल्हापूर जवळच्या एका गावातलं बडं प्रस्थ होतं. नेहा ही आप्पासाहेबांची एकुलती एक लेक..आईविना पोर म्हणून संगीता ताईंनी नेहाला आपली लेक समजून वाढवलं होत.. आणि म्हणूनच वृषालीताई आधी आतपासाहेबांकडे न जाता संगीत ताईंकडे आल्या होत्या. बोलता बोलता नेहाचा विषय निघाला तस संगीता ताईंनी तिचा फोटो आणून वृषाली ताईंना दाखवला...

"मुलं कधी मोठी होतात कळतंच नाही " 
"काय करते मग नेहा सध्या"..वृषालीताईनी फोटो परत देत विचारलं..


संगीताताईंनी बोलायला सुरुवात केली.."आमची नेहा फार गुणाची आहे बरं, आता कॉलेज पूर्ण झालं.. गावातल्या अनाथ आश्रमाच्या मुलांसाठी काम करते.. त्यांना वस्तू देते , खाऊ देते, गोष्टी सांगते... खरच फार जीव आहे तिचा सगळ्यांवर...

संगीताताई अस बोलत असतानाच  "आत्या आत्या" म्हणत नेहा संगीताताईंकडे येते..
वृषालीताईंची लक्ष नेहाकडे जात......गोरा रंग, लांबसडक वेणी, चाफेकळी सारख नाक, नाजूक जीवणी.. पंजाबी ड्रेस आणि दोन्ही बाजूला खांद्यावर व्यवस्थित पिन लावलेली ओढणी....फोटो पेक्षाही कितीतरी सुंदर दिसत होती नेहा..!!


" ए आत्या काय ग मला कंटाळा आला घरात..." नेहा संगीता ताईंच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.., "बाबांकडे सारख कोण ना कोण येत असत..माझ्यासाठी तर वेळचं नाही त्यांना".....


."अग बाळा चालायचंच... त्यांचं कामच आहे ना ते, बरं यांना ओळ्खलस का ?.."

अस म्हणून संगीता ताईंनी नेहाची आणि वृषालीताईंची ओळख करून दिली..नेहाने लगेच वृषालीताईना वाकून नमस्कार केला. तस त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला...


"अग या तुमच्याकडेच आल्यायत, साहेबांकडे काम आहे त्यांचं...त्यांना घेऊन जा तुमच्याकडे " संगीताताई बोलल्या


"बरं..." म्हणून नेहा वृषालीताईना घेऊन आपल्या घरी आली...

...........................

        'वृंदावन' .!!...वाड्याबाहेर मोठी पाटी लावली होती नावाची..! नेहा सोबत वृषाली ताईंनी त्या मोठ्या वाड्यात प्रवेश केला..... नजर सर्वत्र फिरत होती....वाड्यात मोठा दिवाणखाना होता..त्यात बैठकीची व्यवस्था केली होती.एका बाजूला स्टडीरूम होती... तर दुसऱ्या बाजूला जिना होता. समोरच एका भिंतीवर निलीमाचा फोटो लावलेला होता...नीलिमा म्हणजे नेहाची आई.नेहा चार वर्षांची असतांनाच त्या हे जग सोडून गेल्या होत्या. दिवाणखान्याच्या डाव्या बाजूला आत जाण्यासाठी मोठा व्हरांडा होता. त्याला लागूनच आत मध्ये चार खोल्या होत्या...


"तुम्ही बसा हं, मी बाबांना सांगून येते तुम्ही आलायत म्हणून " नेहाच्या बोलण्यासरशी वृषालीताई भानावर आल्या.

नेहा आप्पासाहेबांना बोलवायला स्टडीरूम पर्यंत गेली आणि तिच्या लक्षात आलं,"अरेच्चा आपण त्यांचं नावचं विसरलो की, पुन्हा वृषालीताईंजवळ येत तिने विचारलं "कोण आलयं म्हणून सांगू ?'"

"मुंबईहून वृषाली देशमुख "....त्यांनी सांगितलं.


तशी ती स्टडी रूम मध्ये गेली. तिने आप्पासाहेबांना निरोप दिला.तसे ते लगबगीने उठले.आलेल्या लोकांना आपण उद्या बोलू यावर.अस म्हणत ते उठून दिवाणखान्यात आले. 

आप्पासाहेबांनी वृषालीताईंना पााहिलं आणि  त्या्ना हात जोडून नमस्कार करत तेे म्हणाले, "वहिनी कशा आहात तुम्ही ?, नि कधी आलात इकडे?"..त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद असे संमिश्र भाव होते.. आप्पासाहेबांच्या पाठोपाठ नेहा सुद्धा दिवाणखान्यात आली.....

क्रमशः.....

ही माझी पहिलीच कथा आहे.त्यामुळे कॉपी पेस्ट करताना काही शुद्धलेखनाच्या चुका झाल्या असतील तर वाचकांनी समजून घ्यावे ही विनंती. या कथेचे सर्व हक्क लेखिका म्हणून माझ्याकडे आहेत.त्यामुळे कथा आवडल्यास नावसाहित शेअर करावी. कथेचे पुढचे भाग पोस्ट करण्यात येतील..हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा.

🎭 Series Post

View all