Feb 29, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 3

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 3

हे बंध रेशमाचे....भाग 3

............


दुसरा दिवस अर्धा होऊन गेला तरी वृषालीताईंच आप्पांशी बोलणं झालं न्हवतं. त्यामुळे त्या अस्वस्थ होत्या.नेहाने सर्वाना जेवायला बोलावलं. आजचा सगळा स्वयंपाक तिने स्वतः केला होता. वृषालीताईना तिने आग्रहाने जेऊ घातलं.आज आप्पासाहेब देखील कितीतरी दिवसांनी व्यवस्थित जेवले होते.त्यामुळे नेहाच्या चेहऱ्यावर आपण केलेल्या जेवणाचं समाधान होत..सर्वाना वाढून मग तिने सुद्धा जेऊन घेतलं..आणि नंतर दामू काकांना आवरायला सांगून ती बाहेर दिवाणखान्यात आली.आप्पासाहेबांकडे घरातल्या बाहेरच्या कामासाठी नोकर चाकर होते परंतु नेहाने कधी त्यांना नोकरासारखं वागवलं नाही.ती सगळ्यांशी प्रेमाने बोले.कोणी आजारी असेल तर त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करी.औषध आणून देई.श्रीमंतांची लेक म्हणून मिरवण्यात तिला कसलाच गर्व न्हवता. उलट जेवताना देखील काम करणारी सगळी माणस जेवली आहेत की नाही याची खात्री करून मगच ती जेवत असे..त्यामुळे सगळ्यांचाच तिच्यावर फार जीव होता.....


........….........

 

नेहा दिवाणखान्यात आली तेव्हा वृषालीताई पुस्तक वाचत होत्या..नेहाला आलेली बघुन त्यांनी पुस्तक मिटून ठेवलं. नेहा त्यांच्या बाजूला येऊन बसली...


"छान झालं होतं हो सगळं जेवण, खरच अगदी निलिमा करायची तशीच चव आहे तुझ्या हाताला". वृषाली ताईंनी प्रेमाने तिचा हात हातात घेत म्हटलं.

"हो म्हणतात खरं अस सगळेजण, की तुझ्या हाताला आईसारखी चव आहे..पण ते...ते..मला कस माहीत असेल......मला तिचा चेहरसुद्धा आठवत नाही हो".......एक जोराचा हुंदका आला तिला...आईच्या आठवणीने नेहाच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

वृषालीताईंनी तिला मायेने जवळ घेतलं आणि थोपटलं... संगीता आत्या नि आप्पांच्या नंतर आज पहिल्यांदाच कोणतरी मायेचं माणूस भेटल्यासारखं नेहाला वाटलं.त्यांनी थोडा वेळ तिला शांत होउ दिल.नेहाला आता बर वाटत होतं.संगीता आत्याने तिला कधीच आईची उणीव भासू दिली न्हवती.पण कधीतरी एखादी आठवण निघाली की तिच्या डोळ्यात आसवं उभी राहत...

"मी जरा शेजारी आत्याकडे जाऊन येते," अस म्हणत नेहा उठली. "आप्पानी विचारलं तर सांगा ह मी आत्याकडे गेलेय म्हणून." 

"हो, सांगते हा..." वृषालीताई म्हणाल्या तस नेहा निघून गेली..वृषालीताईंच्या मनात आलं खरच किती भाबडी आणि निरागस आहे पोर !!!...मलाच तिचा लळा लागलाय बहुतेक... अस म्हणून त्या स्वतःशीच हसल्या.....आत्ता नेहा घरात न्हवती त्यामुळे हीच संधी साधून त्यांनी आप्पांशी बोलायचं ठरवलं....


..................... ....


"आत येऊ का ?" आप्पांच्या स्टडी रूममध्ये डोकावून वृषालीताईंनी विचारलं

"अरे, वहिनी अहो परवानगी कसली ,या ना बसा"
खुर्चीकडे हात करत आप्पा म्हणाले

"नाही म्हटलं तुमचं काम चालू असेल तर म्हणून विचारलं.." वृषालीताई खुर्ची वर बसत म्हणाल्या
"थोडं बोलायचं होत...नेहा आत्ता घरात नाही त्यामुळे बोलता येईल व्यवस्थित म्हणून आले"....

"वहिनी तुम्ही कोणत्या कामासाठी आलायत हे मला माहितेय, पण खरं सांगू का माझं मन अजून तयार नाही हो लेकीला माझ्यापासून लांब पाठवायला..."

"अहो लांब कुठे, कोणा परक्याच्या घरी जाणार आहे का ती ? .....आमचं घरही तीचंच घर आहे."

...............


आप्पासाहेबांच्या डोळ्यासमोर त्यांची पत्नी नीलिमा गेली तेव्हाचा प्रसंग उभा राहिला....

श्रीकांत  :    "आप्पा अरे आम्ही घेऊन जातो ना तिला मुंबईला....वृषाली तिच्यावर आईसारखी माया करेल."

आप्पा  :  " तुमच्या दोघांबद्दल हि खात्री आहे रे मला..पण मी तरी आता कोणाकडे बघुन जगू ??....राहूदे नेहाला इथेच...ती असताना माझं दुःख थोडं तरी कमी होईल..."

श्रीकांत  :  " ठीक आहे अप्पा....आम्हालाही तुझं दुःख कळतंय...पण आम्ही आहोत तुझ्या पाठीशी कायम....अप्पा मी तुला आज वचन देतो , नेहाला मी सून म्हणून आमच्या घरी घेऊन जाईन....तिला आम्ही कधीच पोरकी होऊ देणार नाही.."

त्याही परिस्थितीत श्रीकांतरावानी घेतलेला निर्णय बघून अप्पांच मन हलकं झालं होतं.....


..............................

"पण वहिनी खरच आज श्रीकांत हवा होता...नेहाचं त्याला किती कौतुक होत...नेहाला पाहून त्याला खरच फार आनंद झाला असता..." आप्पा डोळ्यातली आसवं पुसत म्हणाले...

" होय हो, त्यांची ही इच्छा होती की आपल्या घरात नेहाच सून म्हणून आली पाहिजे..आणि मी त्यांना वचन दिलय तस."


"आणि म्हणूनच तुमच्याशी बोलायला मी आले , पण नेहसमोर बोलणं मला जमलं नसत..म्हणून ती संगीता ताईंकडे गेल्यावर तुमच्याशी बोलायला आले"


"वहिनी माझी काहीच हरकत नाहीये या लग्नाला...नेहा तुमचीच आहे.... अहो पण आनंदचं काय ? .....त्याला आवडेल का आमची नेहा ?"

 

आप्पांच्या या बोलण्यावर वृषालीताईंपुढे मोठा प्रश्नच पडला होता.....खरच आनंद तयार होईल का नेहाशी लग्न करायला......????


क्रमशः......

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//