Feb 24, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 5

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 5

हे बंध रेशमाचे - भाग 5


.........

डॉ.आनंदची गाडी हॉस्पिटलच्या गेट मधून आत आली. संजीवनी हॉस्पिटलचा बोर्ड दिमाखात झळकत होता.सिक्युरिटी गार्डकडे गाडीची किल्ली देऊन त्याने गाडी पार्क करायला सांगितली आणि तो आत गेला.आनंद आपल्या केबिन मध्ये आला.श्रीकांतरावांच्या फोटोला त्याने नमस्कार केला आणि आपल्या चेअर वरती येऊन बसला..फोन करुन त्याने नर्सला बोलावलं.


"सर आत येऊ ?"....नर्स


"येस, प्लिज , सो आजचे काय अपडेट्स आहेत ?"आनंदने विचारलं 


तस त्या नर्सनी आनंदच आजच शेड्युल सांगितलं

"ओके ,आज वार्ड नं 4 मधल्या पेशंटच ऑपरेशन आहे..


"येस सर, पेशंट नं 2 च्या हाताचं ऑपरेशन आहे..मि. शिंदे म्हणून आहेत...


" हम्मम, मग त्यांच्या रिपोर्ट्सची फाईल कुठाय ? आज त्यांचं ऑपरेशन आहे म्हटल्यावर त्यांच्या रेग्युलर चेकअप आणि बाकीच्या टेस्टचे रिपोर्ट माझ्या टेबल वर असायला हवेत....कुठायत मग ते ? ."....आनंदने काहीशा रागाने नर्सला विचारलं.


"सॉरी सर, ते राहील चुकून "


"कामं करता की झोपा काढता...फाईल 10 मिनिटात माझ्या टेबलवर मला हवीय..या तुम्ही"....नर्स घाबरून केबिनच्या बाहेर गेली.. 


गेले वर्षभर आनंद संजीवनी हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळत होता.त्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण लागायची..आपल्या कामाच्या बाबतीत तो फार काटेकोर होता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये देखील तशीच शिस्त सर्वाना लागली होती..


.........................

 

संजीवनी हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीकांत सोबत काम करणारे इतरही डॉक्टर्स होते. ते आनंदला कामात मदत करित असत...डॉ.साठे, डॉ.परांजपे , डॉ.देसाई या सगळ्यांसोबत आनंद हॉस्पिटल सांभाळत होता. सगळे डॉक्टर त्याच्यापेक्षा सिनिअर होते पण तरीही हॉस्पिटलचा हेड म्हणून आनंदलाच काम पाहावे लागत असे. त्यातल्या त्यात डॉ.परांजपे श्रीकांतचे जवळचे मित्र होते त्यामुळे आनंदला ते सर्वतोपरी मदत करत...संजीवनी हॉस्पिटलची इमारत 5 मजली मोठी होती. प्रत्येक विभागानुसार सर्व डॉक्टर्स तिथे होते..तसेच बाहेरून व्हिजिट साठी देखील डॉक्टर येत असत..नर्स, वोर्डबॉय ,सफाई कामगार असा मोठा स्टाफ होता. शिवाय नव्याने रुजू झालेले काही डॉक्टर्स , इंटर्नशिप साठी येणारे विद्यार्थी , पेशंट्स ,त्यांचे नातेवाईक त्यामुळे हॉस्पिटल कायम गजबजलेलं असे....


...................

 

"ऑपरेशन अगदी छान झालंय , काळजीच काही कारण नाही .." ऑपरेशन थेटर मधून बाहेर येत आनंद पेशंटच्या नातेवाईकांना सांगत होता...

"त्यांना दोन दिवसांनी चेकअप करून घरी सोडण्यात येईल."..अस सांगून आनंद तिथून निघून गेला..

पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांशी आनंद त्यांचातलाच एक होऊन बोलत असे..त्यामुळे पेशंटच अर्ध दुखणं त्याच्या केवळ बोलण्यानेच बर होई. कामाच्या बाबतीत त्याला कोणताही हलगर्जीपणा चालत नसे..पण इतर वेळी तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे....

..................


ऑपरेशन झाल्यावर आनंद केबिनमध्ये आला..त्याच्या केबिन मध्ये डॉ. श्रीकांतचा मोठा फोटो लावला होता.त्या फोटोसमोर जाऊन आनंद उभा राहिला...रोज आल्यानंतर तो त्यांच्या फोटोला नमस्कार करून कामाला सुरुवात करी...आई घरी नसल्याने त्याला अजूनच एकटं वाटत होतं...त्यामुळे तो स्वतःला कामात गुंतवून ठेवी. हॉस्पिटल संभाळण्या सोबतच तो MS चा अभ्यास देखील करत होता.....'बाबांची किती इच्छा होती आपण परदेशी जाऊन शिकावं म्हणून.....पण त्यांचं स्वप्न आता आपण पूर्ण करू '.....आनंद आपल्याच विचारात उभा होता..


ट्रिन ट्रिन.....फोनच्या आवाजाने तो भानावर आला..

"हॅलो सर, आईसाहेबांचा फोन आलाय..कनेक्ट करून देते"..पलीकडून रिसेपशनिस्ट बोलत होती.

"ओके" .....आनंद

"हॅलो, हॅलो हा आई बोल "

" अरे तुझा फोन लागला नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये केला, जेवलास का तू ?" .....वृषालीताईनी विचारलं

" नाही अजून , खाईन आता काहीतरी. मी ऑपरेशन थेटर मध्ये होतो आत्ताच फ्री झालोय... तू कधी येणारेस ? ...मला एकट्याला कंटाळा आलाय घरी" आनंद बोलला


"अरे घराच्या कामाचं अजून झालं नाही ते ठरवायला वेळ जातोय... आप्पासाहेब बघतो म्हणालेत....मी उद्याचा दिवस राहून परवा येते"..वृषालीताईंनी सांगितलं


" चालेल, पण लवकर ये मी वाट बघतोय. चल मी ठेवू फोन ?" 


नेहाबद्दल आत्ताच आनंदला सांगावं का या विचारात त्या होत्या....
"हॅलो आई, आहेस ना तू की कट झाला फोन.. हॅलो...

" हो आहे.आपण बोलू मग  मी घरी आल्यावर ठेवते फोन ".....अस बोलून वृषालीताईंनी फोन ठेवला.


नेहाबद्दल आनंदला कसं सांगावं या विचारात वृषालीताई पडल्या होत्या....

 

क्रमशः.....

 


कथा कॉपी राईट कायद्या अंतर्गत येत असून कोणी ही लेखकाच्या परवानगी शिवाय या कथेचा कोणत्या ही प्रकारे कोठे ही वापर करू शकत नाही. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे!
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//