गुड मॉर्निंग मॅडम. उठा लवकर सकाळ झाली. काॅलेजमध्ये जायला उशीर होईल. आरव मनस्वीला उठवत होता. अग बाई लेट होइल. उठ लवकर आरव तिला परत परत सांगत होता. पण ती उठायच नाव घेत नव्हती. आरवाला माहित होतं ती अशी उठणार नव्हती. मग त्याने अलगद तीच्या डोक्यावरून पांघरूण काढल. व तीच्या कानाजवळ जाऊन मनी म्हणून जोराने हाक मारली. आइइइइइइइग करत मनस्वी उठुन बसली. काय अरे निट झोपू सूद्धा देत नाहीस मला आता तर डोळा लागला होता माझा. तोही तूला बघता आला नाही. मनस्वी बोलत होती. आरव बिचारा तीला बघतच राहीला. ती पुन्हा झोपायच्या तयारीत होती तोच आरव ओरडला सात वाजून गेले लेट होईल आवरा लवकर. काय म्हणत मनस्वी उठुन उभी राहिली. व आरव वर ओरडत म्हणाली आणि तू मला आता उठवतोस. माणूस आहेस की राक्षस. बिचारा आरव ती च तोंड बघत राहीला. व स्वताशी पुटपुटला काय मुलगी आहे ही माझ्यात घरी येऊन मला दादागिरी दाखवते. मनस्वी आवरायला पळाली होती. तोही आवरायला गेला. आरव व मनस्वी दोघे एकत्र रहायचे. त्याच नात मैत्रीच होत. दोघेही एकाच गावचे होते. आरव कामानिमित्त मुंबईला आला होता. गावी त्याचे आईवडील राहायचे. आरवाला मुंबईत येऊन सात वर्षे झालेली होती आणि मनस्वीला फक्त सहा महिने झाले होते. आरवच मुंबईत एका काॅलेजमध्ये कॅन्टीन होते. आणि त्याच काॅलेजमध्ये मनस्वी शिकत होती. असाच सहा महिन्यापुर्वी आरव कमी संपवून घरी परत येत होता. त्याची कार सरवीसिगला दिल्या कारणाने तो आज लोकलने आला होता. लोकल यायला खूप अवधी होता म्हणून तो एका बाजूला उभा राहून नेटवर सरफीग करत होता. तेवढ्यात त्याला कोणतरी रडतय असा भास झाला. त्याने मागे वळून पाहिले तर एक अठरा एकुणिस वयाची मुलगी रडत होती. तिने अंगावर सलवार सुट घातलेला होता. दिसायला ती सुंदर होती. तिच्या हातात एक भलीमोठी बॅग होती. बहुतेक त्यात कपडे असावेत. ती का बरे रडत होती? अस काय तिच्याबरोबर घडल होत म्हणून आरव तिला आपल्या बरोबर घेऊन आला होता बघुया पुढील भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा सुरक्षित रहा.
Hiii iam shrutika Banauulikar frm Goa. This is my first story in Ira blogging. Iam dam sure that their Will be many mistakes. Bt I'll try my best in next part of my story to give my best. Txx to ira.