तो आणि त्याच अस्तित्व भाग ५.......

This story is all about man and his existence In our life. The one who plays many roles in our life.

आणि जर का तो राक्षस मेला तर माझ्या हातुन खून झाल्याने मला शिक्षा होईल. माझ आयुष्य बरबाद होइल. काय होईल माझ ती केवीलवाणा चेहरा करीत आरवला विचारत होती. आरव पण थोडा घाबरला होता. पण त्याने तीला तसे दाखवले नाही. हे बघ तसेच काही झालेल नसेल तु जास्त विचार करु नकोस. आता तु शांत झोप आपण उद्या काय ते बघू.आरवने तीला समजावत बेडरूममध्ये पाठवले व तो स्वतः हाॅलमध्ये झोपी गेला. मनस्वीला झोप येत नव्हती कशी येणार म्हणा . तिच्यासोबत एवढ सगळ घडल होत की तिच्या जागी दुसर कोण असत तर आत्महत्याच केली असती. तीच्या डोळ्यासमोर घडलेले प्रसंग येत होते. बीचारीचे संपूर्ण अंग थरथरत होत. एकाकी पडली होती ती. इकडे आरव पण तीचाच विचार करत होता. मग त्याला काहीतरी सुचल त्याने आपला फोन उचलला व wtsapp वर कोणालातरी मेसेज केली. एक दहा पंधरा मिनिट तो कोणाशी तरी चेटींग करत होता. Thank God म्हणत त्याने फोन बाजुला ठेवला व निश्चित होवून तो झोपी गेला. इकडे मनस्वी तळमळत होती. पुर्णपणे खचून गेली होती ती ........ पहाटे कधी तरी तिला डोळा लागला....... मनस्वी उठतेस ना.. आरव तीला उठवत होता हो झाले कपडे धुउन ....... ती घाबरत उठली व इकडे तिकडे बघु लागली. कपडे कसले कपडे आर यु ओके त्याने तीला वीचारल.... न नाही काही नाही ती उदगरली. मी ठीक आहे. ती थोडे चाचरत बोलली. बर ते ठीक आहे तु fresh हो. मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे. हो मी आलेच म्हणत ती बाथरूम मध्ये गेली. इकडे आरव तयार होण्यासाठी रुममध्ये गेला. हे बघ तूझा चहा आणि नाष्टा इकडे ठेवलाय खाउन घे. आणि हो तुला एक चांगली बातमी सांगायची आहे. कसली बातमी तीने आश्चर्याने त्याला विचारले तुझ्या हातुन कोणताच गुन्हा झालेला नाही i mean murder वैगेरे काही झालेला नाही. काय sssssssss म्हणजे तो माणूस जीवंत आहे? पण तुला कसे कळले कुणी सांगितले तुला? तु खोटे तर सांगित नाहीस ना? ती त्याला प्रश्ननावर प्रश्न विचारीत होती. अग हो थांब थांब आधी ऐकून तर घे माझा एक मित्र आहे आपल्यच गावी राहतो आणि हो तो सुद्धा तुझ्या बाबांसारखा......... I mean त्याचा पण गावात थोडा पावर आहे. पण तो कुणाच वाइट करत नाही. एक मीनीट त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली... तु सलीम बद्दल तर बोलत नाहीस ना ? अरेच्या तु ओळखतेस त्याला त्याने कुतूहलाने तीला विचारले. अरे हो मीही त्याच गावात राहते हे तु विसरतो आहेस. मी त्याला परसनली ओळखते. खुप मदत केली होती त्याने मला काॅलेजात. कसली मदत त्याने वीच्यारले? अरे असच एक मुलगा रोज छेड काढायचा तेव्हा त्याने त्याला चांगला दम दिला होता. ते सोडून आधी मला सांग काय म्हणत होता तो ........... अग बाई थांब जरा सांगतो सगळ मी व तो रात्री चेटींग करत होतो. आणि हो तो माझा अत्यंत विश्वासू मीत्र आहे सो मी त्याला सगळ खर काय ते सांगितले. मग त्याने रातोरात सगळी माहिती काढली. तेव्हा त्याला कळल की त्या माणसाच नाव सर्जेराव असून तो एकदम नीच माणूस आहे. गेले दोन दिवस तो हाॅसपीटल मध्ये होता. आणि काल सायंकाळी त्याला डीसजाज देण्यात आला. त्यामुळे तुला आता घाबरायची गरज नाही. आहे........ 

मनस्वी एकदम खाली बसली तिच्यावरच एक भल मोठे ओझे गेले होते. तु माझ्यावर खुप उपकार केलेस मी जन्मभर तुझी ऋणी राहीन. ती आरवला कृतनेने पहात म्हणाली ... हो झाले तुझ सुरू तो आपल्या हातात वाॅच घालत म्हणाला.. हे बघ तुझी उपकाराची भाषा झाली असेल तर fresh होउन ये आपण बरोबर नाष्टा करु चल पटकन....... मला उशीर होतोय..... म्हणजे तु कुठे चांलास आणि मी एकटी कशी राहु..... कुठे म्हणजे कॅन्टीन मध्ये अरे हो तुला माझ्या बद्दल काहीही माहिती नाही ना अरे हो ती पण म्हणाली. मी माझच रडगाणे तुला सांगत राहिले तुझी सांधी विचारपूस सुद्धा केली नाही...... अग असुदे मी आता सांगतो ना माझ स्वताच एक लहानस कॅन्टीन आहे एका काॅलेजात त्यामुळे मी सकाळी बाहेर पडतो व रात्री घरी येतो. आणि आता मला उशीर होतोय तु एक काम कर आरामात नाष्टा कर मी येतो बाय म्हणत तो गेला सुद्धा. ती बीच्यारी त्याला पहात राहीली...... नाष्टा करुन झाल्यावर ती सोफावर येवून बसली सहज तीच लक्ष टीपोयवर गेल तीथे खूप धुळ साचलेली होती. मग तीने आजुबाजूला पाहीले संबंध हाॅलमध्ये पसारा झालेला होता. सगळ्या वस्तु अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. मग तीच्या मधील स्त्री जात जागृत झाली तीने झाडु हातात घेतला व ती साफसफाई करु लागली. तीने पटापट पूर्ण हाॅल साफ केला. मग तीने कीचन व बेडरूम पण साफ केला एवढ करता तोवर एक वाजुन गेला होता. मग तीने आंघोळ उरकलीउरकली आता तीला सपाटून भुक लागली होती........ तेव्हड्यात दाराची बेल वाजली..........