हवी ती जागा

हवी ती गोष्ट हव्या त्या वेळी मिळाली की होणारा आनंद वेगळाच असतो
कवितेचे नाव : हवी ती जागा
विषय : सुखाची परिभाषा
स्पर्धा राज्यस्तरीय कविता स्पर्धा , मुंबई संघ


आयुष्यात वेगवेगळ्या वेळी
वेगवेगळ्या जागा आवडीच्या पक्क्या ठरलेल्या होत्या.
शेवटी सुखाची परिभाषा म्हणजे,
हवी ती जागा हव्या त्या वेळी मिळणेच नाही का.
लहानपणी
आईच्या मांडीवर ,
शाळेत
ठराविक बेंचवर .
तरुणपणी
एकांतातल्या शोधात
बागेत झाडाखाली किंवा झुडुपा मागे
कधी गच्चीवर
कधी जिन्यात पायरीवर
तर कधी लायब्ररीत
आता ऑफिस मध्ये
ठराविक टेबलं जवळची
जिथून सगळ्या फायली दिसतील अशी,
कितीतरी जागा मनामध्ये घर करून बसल्या आहेत,
जिथं तू आणि मी भेटलो होतो,
पहिल्यांदा
घेतल्या होत्या सगळ्या आणाभाका
जीवन भराच्या सोबतीच्या,
आता मावळतीला
आहे एक खुर्ची हक्काची
मागे पुढे झुलणारी,
तरीही आहे एक जागा
नेहमी मनात घर करून असलेली
नाही भेटली ती जागा
तर होतो जीव कासावीस
म्हणून,
सकाळी सकाळी
उठल्या उठल्या
सगळी हातातली
काम सोडून
धाव घेतो तिकडे
आणि ओरडतो,
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
खाली आहे कारे
का कुणी गेलं आहे आत ???