हवास मज तू! ( ट्रेलर )

खरंच का प्रेम फसवं असते? छे! प्रेम तर प्रेम असते! एका प्रेमाची नवी कथामालिका.


हवास मज तू!

अशीच एक नयनरम्य सायंकाळ. आसमंतात उधळलेले नानाविध रंग. प्रेमाची लाली चढलेल्या प्रेयसीच्या गालाप्रमाणे लाल झालेला सूर्याचा गोळा.

अस्ताला तर जाणारच तो. पण तत्पूर्वी त्याने जी रंगाची उधळण केलीय ते क्षण कुपीत जतन करण्याच्या प्रयत्नात असलेली ती.. ती म्हणजे या कथेची नायिका! 

अन तिला न्याहाळणारा तो. अलगद, सहज होणारी तिची हालचाल अनिमिष नजरेने टिपणारा तो. तिची ही अदा त्याला कुठेतरी आवडणारी.. हृदयात अलगद सामवाणारी.


"आवडतेस तू मला. सांग ना मीही आवडतो का तुला?"

त्याच्या प्रश्नावर झुकलेल्या नजरेनेच तिने दिलेला होकार अन जिंकल्याच्या भावनेने त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या जल्लोषाचा झंकार!

"येशील माझ्यासोबत सोडून सगळी बंधनं?" त्याचे खोल श्वास घेऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारणं.

"वेड्या, प्रेमात पडले तेव्हाच तर तुझी झाले मग कशाला या प्रश्नांची चाळवन? मी तुझीच आहे. कायमच. एकदा विश्वास ठेवून तर बघ."

त्याचे चकाकणारे डोळे, तिची ती ठाम नजर.
त्याच्या जिंकण्याचा पुन्हा एकदा झालेला गजर..

त्याच्यासाठी प्रेम म्हणजे जिंकणं, जिंकणं अन केवळ जिंकणं..
तिच्यासाठी प्रेम म्हणजे त्याग, बलिदान अन समर्पण!

असं म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं नि आमचं अगदी सेम असतं.
आणि जर हेच प्रेम फसवं असेल तर?

पण खरंच का प्रेम फसवं असतं?

छे! प्रेम तर प्रेम असतं!


वाचा अशाच एका प्रेमाची नवी कथामालिका..
हवास मज तू!

आजपासून फक्त आपल्या ईरावर.

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

🎭 Series Post

View all