हवास मज तू!
भाग-८३
भाग-८३
मागील भागात :-
नव्याची शुद्ध परत येते. ती शौर्याशी चुकीची वागतेय याची तिला जाणीव होते.
आता पुढे.
नव्याची शुद्ध परत येते. ती शौर्याशी चुकीची वागतेय याची तिला जाणीव होते.
आता पुढे.
"निवी, बच्चा तू का रडते आहेस?" गालावरच्या अश्रुंना पुसत शशांकने मृदू स्वरात विचारले.
"डॅड, मी खूप वाईट मुलगी आहे ना रे? एकदम बॅड गर्ल टाईप?" अलगद डोळे उघडत तिने त्याला प्रतिप्रश्न केला.
"नाही बाळा, तू वाईट कशी असशील? कधीकधी परिस्थिती अशी असते की काय चूक आणि काय बरोबर याचा आपल्याला अंदाज लावता येत नाही."तिच्या हाताला हळुवारपणे कुरवाळत तो म्हणाला.
"निवी, तू अशी का बोलतेस? तू वाईट कुठे आहेस? वाईट तर शौर्या आहे ती तुझ्या, यांच्या, सर्वांच्या जीवावर उठलीय. माझेच काहीतरी चुकले असेल. मीच तिला चांगले संस्कार द्यायला कमी पडले." सुनंदा हळवी होत म्हणाली.
"नाही गं मम्मा, अशी बोलू नकोस. दी माझ्या जीवावर नव्हे तर मी तिच्या जीवावर उठले होते. जे विष मी प्यायले ना ते मी तिला देणार होते. माझ्याच हाताने, माझ्या बहिणीला. एवढी कशी गं मी क्रूर होऊ शकते? तिच्याशी असे कसे वागू शकते?" तिला पुन्हा हुंदका आला.
"निवी?" सुनंदा आणि शशांक दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होते.
"दी केवळ विहान तिचा व्हावा म्हणून असे वागतेय की आणखी काही याचे उत्तर माझ्याजवळ नाहीय. पण मी मात्र तिच्या वागण्याला प्रत्युत्तर म्हणून खूप खालची पातळी गाठलीय.
तिने विहानने नकार दिला म्हणून त्याला कपंनीच्या बाहेर केले, डॅडला घरी बसवले पण मला कंपनीतून कमी केले नाही. ती कुठे राहतेय हे आपल्याला माहिती नाही पण तिने आपल्याला आपले घर सोडायला लावले नाही.
एका बाजूने विचार केला तर ती खूप चुकीची आहे असं वाटतेय तर दुसऱ्या बाजूला वाटतं की चुकीची असेल तरी ती आपल्याला कुठे फार त्रास देतेय? उलटपक्षी मला त्रास झालेला बघून तीच तर मला इथे घेऊन आलीय."
"तू तिचा जरा जास्तच पॉजिटीव्हली विचार करते आहेस असे तुला वाटत नाहीये का? आपल्याशी काय घडतंय हे सगळं दिसत असतानाही तू असा कसा विचार करू शकतेस?" सुनंदा फणकाऱ्याने म्हणाली. तिला नव्याचे म्हणणे पटले नाही हे स्पष्ट दिसत होते.
"मॉम, मृत्यूला अगदी जवळून भेटलेय गं मी. असं म्हणतात की मृत्यू समोर असला की माणसाला केवळ सत्य जाणवतं. मलाही हे जाणवलेय की दी अशी वागतेय त्या मागे काहीतरी वेगळं कारण असावे. तिला जर खरेच विहान हवा असता तर तिने आणखी काही केले असते पण ती तर काहीच करत नाहीये." नव्या तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
"एका आठवड्याच्या कालावधीत माझा नवरा आणि मुलगी हॉस्पिटलमध्ये भरती होतात. त्याची कंपनी त्याच्या हातून जाते. ऑफिसमध्ये लेकीला अपमानस्पद वागणूक देऊन तिचे डिमोशन केल्या जाते. हे सर्व केवळ एका आठवड्यामध्येच घडते आणि तरीही तू म्हणतेस की तिने काहीच केले नाही?" बोलताना सुनंदाचा श्वास फुलला.
"सुनंदा शांत हो ना." शशांक तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
"कशी शांत होऊ शशी? उलट मला तर आश्चर्य वाटतंय की एवढं सारं घडूनही तू इतका शांत कसा?"
"सुनी, एक विचारू? शौर्या जर तुझी सख्खी मुलगी असती तरी तू तिचा इतकाच रागराग केला असतास?" त्याचा प्रतिप्रश्न.
"तुला काय म्हणायचे आहे? शशी, आजवर मी निवी आणि शौर्यामध्ये भेदभाव करताना तू कधी पाहिलेस का? उलट निविपेक्षा जास्त मी तिच्यावर जीव लावला. पण ती जे वागतेय त्याचा अर्थ काय काढू? माझ्या सोन्यासारख्या कुटुंबाला तिने नजर लावली आहे." ती पुन्हा रडायला लागली.
"सुनी, नको ना रडूस. प्लीज." नव्याचा हात सोडून तो आता तिच्याकडे वळला.
"एक्सक्युज मी, मे आय कम इन?" दाराजवळ आलेल्या आवाजाने दोघांनी तिकडे वळून पाहिले. तो यश होता. हातात एक छानसा गुलाबाचा पुष्पगुच्छ आणि ओठावर स्मित लेवून तो दरवाज्यात उभा होता.
"हां, या ना." याला कुठेतरी पाहिल्याचे आठवून शशांकने त्याला आत घेतले.
"तुम्ही तेच ना? जे मघाशी शौर्यासोबत इथे होतात?" त्याचे येणे सुनंदाला रुचले नव्हते हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते.
"हो. मी.."
"मिस्टर पाटील?" तो काही बोलणार तोच नव्या त्याच्याकडे बघत आश्चर्याने म्हणाली.
"ओह येस. हाय मिस नव्या? हाऊ आर यू नाऊ? नक्कीच बरे वाटत असेलअशी आशा आहे. हे पुष्पगुच्छ खास तुमच्यासाठी." हातातील पुष्पगुच्छ बाजूच्या टेबलवर ठेवत तो म्हणाला.
"थँक यू सर आणि मी खरेच बरी आहे." मंद स्मित करत ती उत्तरली.
"डॅड, हे मिस्टर यश पाटील. आपल्या कंपनीची डिल यांच्या कंपनीशीच झालीय. हे तिथले सीईओ आहेत." त्याची ओळख करून देत ती म्हणाली.
"ओह! हॅलो मिस्टर पाटील. आजवर मी केवळ मिस्टर दास यांनाच भेटलोय म्हणून तुम्हाला ओळखू शकलो नाही. आय एम सॉरी अँड ग्लाड टू मीट यू."त्याच्याशी शेकहॅन्ड करत शशांक म्हणाला.
"सेम हिअर. तुमच्याशी काम करण्याचा अनुभव यावा म्हणून तर मी डिल फायनल केलीय. आय एम बिग फॅन ऑफ यू सर." तो म्हणाला.
"थँक यू. ऐकून बरं वाटलं पण सध्या मी कंपनीत राहिलो नाहीय. माझे तिथले सीईओपद संपुष्टात आले आहे. आता तिथला सगळा कारभार माझी मोठी मुलगी शौर्या केळकर सांभाळतेय." शशांक म्हणाला.
"होय तिसुद्धा खूप हुशार आहे. आय मीन त्या खूप हुशार आहेत." स्वतःचे शब्द सांभाळत तो म्हणाला.
शौर्याचे नाव घेतल्यावर त्याचा चेहरा चमकतोय असे नव्याच्या ध्यानात आले आणि तिच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू उमटले. त्याला बघून तिला उगाचच विहानची आठवण झाली.
'तो माझ्या फोनची वाट बघत असेल, मला कॉल करून थकला असेल. पार्टीत काय झाले हे जाणून घ्यायला तो केवढा उत्साही होता? आणि आता माझ्याबद्दल कळले असेल तर तो काळजीत पडला असेल का?' मनात विचार करत तिने सुनंदाला हाक दिली.
"मॉम, मला माझा मोबाईल देतेस का?"
'मोबाईलवर त्याच्या मेसेज आणि कॉलचा नुसता पाऊस पडला असेल. त्याला मी काय उत्तर देऊ?' विवंचनेत तिने मोबाईल हातात घेतला.
ते उघडल्यावर मात्र तिचा चेहरा पार पडला. त्याचा एकही मेसेज किंवा कॉल तिला आला नव्हता. एवढेच नव्हे तर तिचा शेवटचा नेसेज देखील त्याने पाहिला नव्हता.
"मिसिंग विहान?"
शशांकशी बिझनेसबद्दल गप्पा मारत असताना त्याची नजर नव्याकडे गेली. तिच्या हातातील मोबाईल आणि उतरलेला चेहरा बघून तिच्या मनात काय चाललेय याचा त्याला अंदाज आला.
"नो.. मिन्स..ॲक्च्युली येस." ती मान हलवून म्हणाली. "तुम्ही एकमेकांना ओळखता?" तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होता.
"येस. वी आर फ्रेंड्स, रादर बेस्टफ्रेंड्स." तो हसून उत्तरला.
"त्याने मला कधी सांगितले नाही." ती आश्चर्याने म्हणाली.
"ॲक्च्युली आमची इतक्यातच फ्रेंडशिप झालीय." तो पुन्हा हसला.
"तुमच्याकडे जॉबसाठी तो आला होता का?" तिचा परत प्रश्न.
"अं? हो. म्हणजे मीच त्याला तशी ऑफर केली. काय
ना तो हुशार मुलगा आहे. तेव्हा त्याला कसे सोडायचे ना? एसके सर तुम्हीच सांगा ॲज ॲन एम्प्लॉयी म्हणून तो कसा आहे? म्हणजे तुमच्याकडे त्याचा कामाचा अनुभव आहे म्हणून विचारतोय." त्याने शशांकला विचारले.
"गुड. हुशार आहे. ही इज अ क्लेव्हर बॉय." बोलताना हृदयात काहीतरी टोचल्यासारखे त्याला वाटले.
"मिस नव्या, तुम्ही दोघांनी तर एकत्र काम केलेय. तुमचा काय अनुभव आहे तो सांगा ना." तिला गळ घालत यश.
"डॅड म्हटला तसा तो हुशार आहे. फार लवकर तो पुढे गेला होता."
"आणि नात्यांच्या बाबतीत कसा आहे? म्हणजे तुम्ही दोघं नात्यात आहात. एकमेकांवर प्रेम करता असं कळलं म्हणून विचारतोय. त्याच्यासाठी तुम्ही काहीही करू शकता, तोही तुमच्या सारखाच आहे का?"
त्याच्या शेवटच्या वाक्याने ती जराशी चपापली.
"तुम्ही नक्की बिझनेसमन आहात ना? की पोलिसात आहात?" नव्याने डोळे मोठे करून विचारले.
"गुड सेन्स ऑफ ह्युमर हं." तो हसला.
"मी बिझनेसमनच आहे. आता एवढया मोठया कंपनीत त्याला कामाला ठेवायचे म्हणजे चौकशी करायला नको का? म्हणून विचारतोय बाकी काही नाही. तसे इथून जाताना त्याला मी भेटेलच. तुम्हाला त्याला काही निरोप द्यायचा असेल तर सांगा. मी पोहचवेन." ओठ रुंदावून यश म्हणाला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा