Mar 01, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -४३

Read Later
हवास मज तू!भाग -४३
हवास मज तू!
भाग -४३

मागील भागात :-
ऑफिसमधील पूर्ण स्टॉफ विहानच्या बाजूने उभा राहतो आणि त्याला शौर्याने परत कामावर घ्यावे अशी बाजू मांडतो. त्याला नकार देत शौर्या सर्वांना ऑफिस प्रोटोकॉल पाळायला सांगते. नव्या मात्र आपल्या पदाचा राजीनामा देत तिथून निघून जाण्याचा मार्ग निवडते.

आता पुढे.

सो, थिंक ऑन इट अँड को -ऑपरेट विथ मी. कारण कितीही सोंगे घेतली तरी पैशाचे सोंग नाही वठवता येत, हे तुला ठाऊकच असेल.

"आता तू जाऊ शकतेस आणि कामाला लागू शकतेस. ऑल द बेस्ट."

शौर्याने तिला हलकेच डोळा मारला आणि ओठावर हास्याची चादर ओढून घेतली.

******
"नव्या, मी तर म्हणेल की माझ्यासोबत न येता शौर्या मॅमचे प्रपोजल तू स्वीकारावेस. तुझ्यावर ओढवलेल्या प्रसंगातून बाहेर काढण्याऐवजी मी तुला एकटीला सोडून जातोय असा विचार करू नकोस. किंवा तुला आर्थिक गरज आहे म्हणून कंपनी सोडू नकोस असे मी म्हणत नाहीये. तर तू इथे असलीस तर तुझ्या दी कडे तुझे लक्ष असेल शिवाय तिच्या काळ्या कारस्थानाची आपल्याला माहिती असेल." विहान तिला समजावून सांगत होता.

"विहान.."

"नव्या, हे बघ, मी तुझ्यासोबत कायम आहे, असेन. पण सध्या इथे पाय टाकू शकणार नाही. तेव्हा तूच इथे घडणाऱ्या गोष्टी मला सांगू शकशील ना?

या कंपनीशी मी केवळ महिनाभर जुळलोय तरी चुकीची व्यक्ती एसके सरांच्या खुर्चीवर बघून अंतःकरण तीळतीळ तुटतेय गं. काही झाले तरी ही कंपनी मला.. म्हणजे आपल्याला शौर्या मॅमच्या हातून सोडवायची आहे. तू मला साथ देशील ना?" तिच्या डोळ्यात एकटक बघत तो म्हणाला.


"विहान, खरं तर हे मी बोलायला हवे. मला तुझी साथ हवीय रे. नाहीतर मी पूर्णतः कोलमडून पडेल." तिला एक हुंदका आला.


"ए वेडाबाई, असं नाही बोलायचं. मी आहे ना सोबत? मी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. जरी ही कंपनी तुझ्या बहिणीच्या मालकीची असली तरी त्याचे खरे दावेदार एसके सर आहेत, हे विसरू नकोस."

"तुला सांगू?" ती डोळे पुसत म्हणाली. "डॅड ला खुर्चीचा मोह कधीच नव्हता. उलट कालच ते मला बोलले होते की लवकरच ते ऑफिसचे काम सोडतील आणि मग सारं काही आपल्या दोघांना सांभाळावे लागेल.

खरं तर मला ते पटलं नव्हतं. कारण खुर्चीचा मोह मलाही नाहीये. पण दी सध्या अशाप्रकारे वागतेय तर ते नकोसे झालेय रे. डॅडशी तिने जे काही केलेय ते मी कधीच विसरणार नाही. या कंपनीतून तिला बाहेर काढायला मी काहीही करेन."

"नव्या?"

"विहान, आपण लग्न करायचं?" त्याला पुढे बोलू न देता तिने प्रश्न केला.

"हं?" त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला कळेना.


"म्हणजे मला माहिती आहे की यावेळी हा प्रश्न चुकीचा आहे. पण मला वाटतं की आपण लीगली एकत्र असलो तर दी फार काही करू शकणार नाही. तसेही हे सगळे तिने तू तिला मिळावास म्हणून केले ना? पण जर आपण दोघं एक झालो तर ती पुढे काही करणार तरी नाही." त्याच्यावर नजर रोखत ती म्हणाली.


"हम्म. तुझे म्हणणे मला पटतेय. पण.. "


"पण काय? की कंपनी राहिली नाही म्हणून तुही मला सोडून जाणारेस?"


"काही काय गं बोलतेस? तुला प्रपोज केले तेव्हा तरी तू सरांची मुलगी आहेस हे मला ठाऊक होते का?" तो अलवारपणे म्हणाला.


"मग आपण लग्न करायचे ना?"


"हे बघ नव्या, कोणताही निर्णय इतक्या तडकाफडकी घ्यायचा नसतो. मला माझ्या आयुष्यात तू किती महत्त्वाची आहेस हे मलाच माहिती आहे. पण इतक्यात लग्न करायला नको."


"विहान?"

"राणी, मला चुकीचे समजू नकोस ना. या विषयावर आधी आपण सरांशी बोलूया. त्यांना या निर्णयाबद्दल काय वाटतेय हे जाणून घेणे सुद्धा तेवढेच इम्पॉर्टन्ट आहे. लग्न केल्याने जर सर्व प्रॉब्लेम्स सुटत असतील तर मी आत्ता एका पायावर उभा आहे. पण तसं नाही करू शकत ना गं.

शौर्या मॅम खूप हुशार आहेत. त्या पुढची खेळी कसे खेळतात यावर आपली चाल ठरवावी लागेल."तो त्याच्या तंद्रित बोलून गेला.


"दी आपल्याशी खेळ खेळत आहे?" त्याचे बोलणे ऐकून नव्या म्हणाली.


"आपले आयुष्य म्हणजे एक डावच असतो की नाही? कोणीतरी राजा, कुणीतरी राणी आणि इतर प्यादे असतात. त्या अनुषंगाने मी बोलतोय.

बरं सध्यापुरते हे बाजूला ठेव आणि कामाला जा. नाहीतर उशिरा जॉईन झालीस म्हणून मॅम तुलाही फायर करतील." तो किंचित हसून म्हणाला.

"आणि ऐक ना, मी सायंकाळी तुला भेटायला येईन.तेव्हा बोलूया. बाय." ती ऑफिसमध्ये जायला निघाली तेव्हा तिला बाय करत त्याने फ्लायिंग किस दिले.

*****

"सो, हाऊ वाज द मिटिंग?" समोर बसलेल्या कीर्ती आणि विनीत कडे पाहून शौर्या विचारत होती.


"मिटिंग व्यवस्थित पार पडली पण मिस्टर दास.." बोलता बोलता विनीत थांबला.


"काय झाले? मिस्टर दास काय म्हणाले?"


"ॲक्च्युली वी ट्राईड अवर बेस्ट. पण बहुतेक त्यांना हे प्रेजेंटेशन रुचले नाही." विनीत अडखळतोय हे बघून कीर्ती पुढे बोलायला लागली.


"रुचले नाही म्हणजे काय?"

"म्हणजे ते स्पष्ट असे काही बोलले नाही. त्यांचे बॉस पर्सनली या प्रोजेक्टमध्ये लक्ष घालणार आहेत असं कळलंय. सो त्यांना वाटले होते की आपल्या कंपनीतून सुद्धा एसके सर मिटिंग अटेंड करतील.

आम्ही त्यांना सरांच्या मेडिकल इमर्जन्सी बद्दल सांगितले तर त्यांनी त्यांच्या सीईओशी चर्चा करून दोन दिवसांची मुदत वाढवून दिलीय."


"कालचे दोन दिवस म्हणजे आजचा उद्या, राईट?" शौर्या"येस मॅम. सर खरच उद्या ही मिटिंग अटेंड करू शकतील का?" कीर्तीने विचारले.


"नाही. असा काहीच चान्स नाहीये. बट डोन्ट लूज द होप. ती मिटींग मी अटेंड करेन." शौर्या म्हणाली तसे दोघेही तिच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागले.


"असे काय बघताय? तुम्ही दोघांनी प्रेजेंटेशन चांगल्या प्रकारे सादर केले म्हणून तर त्यांनी दोन दिवसाची मुदत वाढवून दिलीय. मग तुमच्या कष्टाचे चीज व्हायला नको?" तिने त्यांना उलट प्रश्न केला.

"अँड डोन्ट वरी. मी हा प्रोजेक्ट स्पॉईल करणार नाही. इथे जास्त वावरत नसले तरी बिझनेस कसा करायचा ते मला कळतं. जन्मापासूनच माझ्या धमन्यातील रक्तात हा बिझनेस अगदी बेमालूमपणे मिसळलाय."

तिने आश्वासक शब्दात म्हटले तसे दोघांच्या चेहऱ्यावरचे टेंशन निवळल्या सारखे झाले.


"पण मॅम, या प्रोजेक्टची सर्व तयारी नव्याने केली होती. तेव्हा तुम्ही तिला सोबत घेऊन गेलात तर बरं होईल. म्हणजे तिचे क्रेडिट तिला मिळायला हवे असे आम्हाला वाटते." कीर्तीच्या बोलण्याला विनीतने दुजोरा दिला.


"प्रोजेक्ट तिने तयार केला असेल तरी प्रेजेंट तुम्ही दोघांनी केलाय आणि त्यामुळे समोरची पार्टी इंटरेस्टेड आहे. तेव्हा त्याचे क्रेडिट तर तुम्हालाच मिळायला हवे. ते काय म्हणतात ना? हाजीर तो वजीर. जस्ट लाईक द्याट.

उद्याची मिटिंग जर सक्सेस झाली तर त्याचा फायदा तुम्हालाच होईल. माणसाने कधी आपल्या फायद्याचा पण विचार करायला हवा, राईट ना? आता जा आणि काही बारीकसारीक त्रुटी वगैरे असतील तर त्या दूर करून मला मेल करा. उद्याचे प्रेजेंटेशन अगदी टॉप वन व्हायला हवे."


"येस मॅम. आम्ही परत एकदा चेक करून घेतो." विनीत उठत म्हणाला.

"द्याट्स गुड." ती स्मित करत म्हणाली.

*******

"कीर्ती, शौर्या मॅम जे बोलल्या ते तुला पटतंय का? म्हणजे नव्या आणि विहानच्या मेहनतीचा लाभ आपण घ्यायचा? हे कितपत योग्य आहे?" लॅपटॉपवर काम करत असताना विनीत तिला विचारत होता.


"म्हटलं तर मलाही ते पटत नाहीये पण प्रॅक्टिकली विचार केला तर असं वाटतं की काय हरकत आहे? म्हणजे जर एसके सरांनी सुरुवातीला आपल्याला यात इन्क्लूड केलं असतं तर आपणसुद्धा हे प्रेजेंटेशन तयार करू शकलो असतो. पण त्यांनी नव्या आणि विहानला प्रेफर केलं.

मागे मेहताच्या वेळी नव्याचे प्रोजेक्ट विहानला मिळाले आणि त्यात त्याचा फायदा झाला. महिन्याभरात तो सगळ्यांच्या वरती गेला. यावेळी आपल्यालाही काही फायदा होईल तर बरंच आहे."

"कीर्ती, नव्या आपली फ्रेंड आहे. तू असा कसा विचार करू शकतेस?" विनीत तिला आश्चर्याने म्हणाला.


"विनीत, तुला कदाचित मी स्वार्थी वाटत असेल तर सॉरी रे." त्याच्याजवळ सरकत कीर्ती म्हणाली.
"पण बघितलेस ना, मॅम काय म्हणाल्या? हाजीर तो वजीर असंच ना?

सी, आपण काही तिचा प्रोजेक्ट चोरून किंवा काही काड्या करून आपल्या नावावर शो करत नाही आहोत तर मॅमनी आपल्याला सांगितलेय म्हणून आपण केलंय. मग जर त्याचा काही फायदा झाला तर का नाकरायचं?" कीर्ती त्याला उलट विचारत होती.

कीर्तीचे म्हणणे विनीतला पटेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//