Mar 03, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -सहा.

Read Later
हवास मज तू! भाग -सहा.

हवास मज तू!

भाग -सहा.


मागील भागात आपण पाहिले की बरी झालेली नव्या ऑफिसमध्ये येते. तिथे विहान तिला झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो आणि तिला डिनरसाठी आमंत्रित करतो. ती त्याचा प्रस्ताव स्वीकारेल का? वाचा आजच्या भागात.

आता पुढे.

"काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल बरं?" नव्याचा प्रश्न.


"आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल?" तिच्याकडे बघून तो.


"हं?" त्याच्या अनपेक्षित आमंत्रणावर काय बोलावे तिला कळले नाही.


"हो, म्हणजे आपल्या सक्सेसफुल झालेल्या प्रोजेक्टसाठी सेलेब्रेशन तो बनता है ना?" तो हसून म्हणाला. "आणि या वेळी तुमच्या डिशमधील मी काहीच खाणार नाही. खरंच."


तो चेहऱ्यावर असे भाव घेऊन म्हणाला की स्वतःवर कितीही आवर घातला तरी नव्याला हसू आवरले नाही. ती खळखळून हसायला लागली.तिचे ते खळखळून हसणे, हसताना हलकेच गालावर आलेली बट कानामागे घेऊन जाणे.. तो तिच्याकडे नुसता बघत होता. पहिल्या भेटीतच ती त्याच्या मनात भरली होती. आता नजरेनेच तिला तो हृदयात समावू बघत होता.


"मिस्टर विहान, कुठे हरवलात?" हसता हसता ती म्हणाली तसा तो भानावर आला.


"अहो, प्रत्येक प्रोजेक्ट फायनल झाला आणि डील सक्सेस झाली की एसके सरच सर्वांना पार्टी देतात. इथला रुलच आहे तो." ती त्याला सांगत होती.


"हो, ते असेल हो. पण हा आपला एकत्र पहिला प्रोजेक्ट होता ना. पहिलाच प्रोजेक्ट, त्यात मिळालेले यश म्हणून त्याचे सेलिब्रेशन म्हणतोय मी. आज डिनरला याल ना तुम्ही? प्लीज नाही म्हणू नका." त्याच्या डोळ्यातले काकूळतीचे भाव बघून तिलाही त्याचे मन मोडवत नव्हते.


"ओके. मी माझ्या मम्माला विचारून कळवते." तिच्या उत्तरावर तो प्रश्नार्थक बघत राहिला.


"म्हणजे रात्री घरी तिचा स्वयंपाकाचा काही स्पेशल प्लॅन आहे का ते बघून तुम्हाला कळवते. नाहीतर मग मला ओरडा पडेल ना?" ती त्याचा प्रश्नार्थक चेहरा बघून म्हणाली.


"अच्छा. मी वाट बघेन." तो हसून उठत म्हणाला. "आता माझ्या कामाला लागतो नाहीतर मला ओरडा पडेल."


"मिस्टर विहान.." दाराजवळ पोहचलेल्या त्याला तिने हाक दिली. "अहो, तुमचा नंबर माझ्याकडे नाहीये. मग तुम्हाला कसं कळवू?" तिचा निरागस प्रश्न ऐकून त्याचे ओठ पुन्हा रुंदावले. दोघांनी नंबर एक्सचेंज केल्यावर तो त्याच्या कामाला निघून गेला.


******

"निवी, ते दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुलासोबत तू डिनरला जाणार आहेस?" घरी आल्यावर नव्याने सुनंदाला सांगितले त्यावर ती तिलाच उलट विचारत होती.


"अगं, तो चांगला आहे आणि त्याने पहिल्यांदा विचारल्यावर नाही कसे म्हणायचे ना? तूच सांग?" नव्या तिला म्हणाली.


"हम्म." सुनंदाने हुंकार भरला.


"रिलॅक्स मॉम. मी कपंनीच्या ओनरची मुलगी आहे हे त्याला नाही कळू देणार." तिने सुनंदाला आश्वस्त केले त्यावर सुनंदा हलकेच हसली.


"मला माहितीये गं राणी. शशांकला वाटतं की जगाने त्याच्या लाडक्या लेकीला तिच्या नावाने ओळखावे. त्याच्या नाही. म्हणून तो हे कोणाला सांगायचे टाळतो. त्याच्या मताचा तू आदर करावास एवढीच माझी इच्छा आहे." तिचे गाल ओढत सुनंदा.


"येस माय स्वीट मम्मा. माझ्या लक्षात आहे ते. आतातरी त्याला होकार कळवू ना?" तिच्या गळ्यात हात गुंफत नव्या.


"हो. एंजॉय युअर डिनर." सुनंदाने तिचा गालगुच्चा घेतला. ******

"हाऽय, मला उशीर तर नाही ना झाला?" ठरलेल्या ठिकाणी येत नव्याने विहानला विचारले.


तो दहा मिनिटे आधीच येऊन पोहचला होता. हॉटेलमध्ये एकटा न जाता तिची वाट बघत बाहेरच थांबला होता. तिचा आवाज आला तसे त्याने वळून पहिले. समोर असलेल्या नव्याकडे बघून त्याचे डोळे दिपले होते.


 तिच्या गोऱ्या अंगावर गुडघ्यापेक्षा थोडा लांब असलेला काळ्या रंगाचा ड्रेस अगदी शोभून दिसत होता. हाय पोनी, कानात छोटूसे स्टड, डोळ्यात काजळ आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप.. त्यातही तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. बोलताना झालेली गुलाबी ओठांची हालचाल हाय! विहान तर पुरता गारदच झाला.


"हॅलो मिस्टर विहान, कुठे हरवलात?" त्याचे काहीच उत्तर न आलेले बघून ती परत बोलली.


"लूकिंग ब्युटीफुल!" भानावर येत त्याने कॉम्प्लिमेंट दिले.


"थॅंक यू." ती गोड हसून उत्तरली. "सो, आत जायचं?" त्याच्याकडे बघून ती.


"येस ऑफ कॉर्स." विहान .


"बाय द वे, मिस्टर विहान यू अल्सो लूकिंग हँडसम हं." आत वळता वळता ती म्हणाली तसा त्याचाही चेहरा खुलला.


"थँक्स मॅम." उजळलेल्या चेहऱ्याने तो तिच्या मागोमाग आत गेला.


"सो, नव्या मॅम, तुम्हाला काय ऑर्डर करायला आवडेल?" त्याने बुक करून ठेवलेल्या टेबलभोवती दोघे बसले होते.


"मिस्टर विहान, तुम्ही मला आमंत्रित केले आहे, सो तुम्ही ऑर्डर केलेले चालेल मला." ती.


"नो नव्या मॅम, यू आर माय गेस्ट सो तुम्ही मेनू डिसाईड करा." तो किंचित हसून म्हणाला.


"मिस्टर विहान, प्लीज. मला सारखं सारखं मॅम नका हो बोलू. असं काही ऐकलं की मग ती ऑफिसमधली फीलिंग येते. जस्ट कॉल मी नव्या. आय थिंक, मी काही तुमच्यापेक्षा वयाने मोठी नसावी." शेवटचे वाक्य बोलताना तिसुद्धा थोडेसे हसली.


"ओके मॅम."


"मिस्टर विहान? परत मॅम?" तिचा चेहरा इवलासा झाला.


"सॉरी, ते तुम्ही 'मिस्टर विहान' बोललात की ऑफिसमधल्या नव्या मॅम समोर आहेत हेच वाटतं आणि आपोआप तोंडून निघून जातं. ऐका ना, तुम्ही मला केवळ विहान म्हणा, मग मी सुद्धा तुम्हाला मॅम म्हणणार नाही." त्याने त्याची बाजू मांडली.


"ओके, डील फायनल." ती हसत म्हणाली तसा तोही हसला. तिचा हसरा चेहरा असाच नजरेत कैद करून ठेवावे असे वाटत होते.


"सो मिस नव्या, प्लीज ऑर्डर समथिंग." तिच्यासमोर विहानने मेनुकार्ड ठेवले. तिनेही त्यावरून नजर फिरवत तिला आवडणाऱ्या जेवणाची ऑर्डर दिली.


"आईस्क्रीम?" जेवण होत आले तसे त्याने विचारले.


"हम्म. व्हाय नॉट? चालेल मला."


"कोणतं?"


"तुला आवडेल ते." ती सहजतेने बोलून गेली. तिच्या तोंडून असा एकेरी उल्लेख ऐकून तो मात्र तिच्याकडे बघतच राहिला.


"अरे म्हणजे मला आईस्क्रीम प्रचंड आवडतं. त्यामुळे मी कोणतेही खाऊ शकते." तिने परत एक गोड स्मित केले.


त्यावर दिलखुलास हसून त्याने आईस्क्रीम ऑर्डर केले.


आईस्क्रीम खातच होती की तिचा मोबाईल वाजायला लागला. 'डॅड कॉलिंग.' त्याने तिच्या नकळत वाचले.


"सॉरी, मला कॉल घ्यावा लागेल." त्याच्याकडे बघून दिलगिरी व्यक्त करत तिने रिसिव्हचे बटण प्रेस केले."हॅलो डॅ.."


"हॅलो, निवी. कुठे आहेस तू? आणि केव्हा परतणार आहेस?" तिला पुढचं बोलुही न देता शशांक प्रश्नाचा मारा करत होता.


"डॅड, मी फ्रेंडसोबत डिनरला आलेय नि मम्माला सांगून आलेय."


"बट निवी.."


"डॅड, डोन्ट वरी. अर्ध्या तासात परत येतेय मी. तुम्ही जेवून घ्या. बाय." मोबाईल ठेवून ती कसंनूसं हसली.


"पजेसिव्ह डॅड, हं?" तिचे बोलणे ऐकत असलेला तो.


"फक्त पजेसिव्ह? खूप जास्त प्रोटेक्टिव्ह सुद्धा. त्यांना वाटतं की मी अजूनही छोटूशी नव्या आहे." ती मंद हसून म्हणाली.


"बट यू आर लकी वन. तुझ्यावर इतकं प्रेम करणारे बाबा तर आहेत." त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना तिच्या नजरेने टिपले होते."हे अगदी खरंय हं. पण सध्या मी एकटी आहे म्हणून हे जास्तच चाललंय." ती आईस्क्रीमचा आस्वाद घेत म्हणाली.


"म्हणजे?" तो.


"अरे, माझी ताई. ती इथे नाहीये ना म्हणून माझे लाड चाललेत. ती असली की सगळं घर केवळ तिचे लाड करण्यात गुंतले असते." ती.


"जेलसी हं?"


"नो, नॉट. उलट दी असली ना की मला कोणाचीच गरज नसते. ती आणि एकटी तीच मला पुरेशी आहे. शी लव्हज मी मच मोअर द्यान एनीवन." दी बद्दल बोलताना तिचे डोळे चकाकत होते.


"ग्रेटच. तुम्हा दोघींचे नाते तर फार सुरेख आहे. बाय द वे कुठे असतात त्या? म्हणजे लग्न वगैरे झाले आहे का?" त्यालाही नव्याच्या बहिणीबद्दल जिज्ञासा निर्माण झाली.


"लग्न? छे रे. ती शिकतेय. बाहेरच्या शहरात असते. बरं आता निघायचं का? दिलेल्या वेळेत जर मी घरी नाही पोहचले ना तर खरंच माझे डॅड इथे पोहचतील." ती आपली पर्स सांभाळत उठली.


बील पे करून दोघेही हॉटेलबाहेर आले. दोघांच्याही मनात अजूनही खूप काही बोलायचं होतं. पण वेळ कसा निघून गेला कळलेच नाही.


बोलतील का दोघे त्यांच्या मनातलं? वाचा पुढील भागात. तोपर्यंत स्टे ट्यून्ड!

:

क्रमशः

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे. *

******


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//