Mar 04, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -पाच.

Read Later
हवास मज तू! भाग -पाच.
हवास मज तू.
 भाग पाच.

मागील भागात आपण वाचले की नव्यासाठी आणलेले जेवण विहान खाऊन टाकतो आणि उपाशी राहिल्यामुळे नव्याची शुगर कमी होऊन तिला चक्कर येते. डॉक्टर तिला दोन दिवस आराम करण्याचा सल्ला देतात त्यामुळे तिचे प्रोजेक्ट शशांक विहानच्या हाती सोपवतो.

आता पुढे.


"डॅड, आय नो द्याट. पण मला सांग, आपल्यासमोर एखादा भुकेला व्यक्ती असता तर आपण काय केलं असतं? त्या विहानच्या डोळ्यात भूक स्पष्ट दिसत होती सो मी त्याला खाऊ दिले. मला काही त्रास झाला तर डॅड, तू आहेस रे माझ्याबरोबर. पण मिस्टर विहानला कोणीच नाही रे. डॅड, तू माझ्यावर रागावला नाहीस ना?" तिने डोळे किलकीले करून त्याच्याकडे पाहिले.
त्याने मंद हसून तिच्या गालावरून हात फिरवला.


'मुलगी आता मोठी झालीय.' त्याच्या डोक्यात आले.

"नो स्वीटहार्ट, मी तुझ्यावर रागावेन का? पण काळजी वाटते ना राणी? तू स्वतःकडे केव्हा लक्ष द्यायला शिकशील? थांब, शौर्यालाच कॉल करून इकडे बोलावून घेतो. ती असली की तिचे बरोबर ऐकतेस तू." त्याने तिला दम भरला.


"नो डॅड, प्लीज. दी ला नका ना सांगू. ती माझा चांगलाच क्लास घेईल आणि छोटीशी आहे ना रे मी? मग तरी तुम्ही सगळे मलाच ओरडता. जा बाबा असं कुठे असतं का?" ती गाल फुगवून म्हणाली.


"ओ लाडोबा, छोटीशी आहेस होय? सकाळी कसले भारी प्रेजेंटेशन दिलेस, माहितीये का तुला?" तिचे गाल ओढत शशांक.


"खरंच तुला आवडलं?" नव्याचे डोळे चमकत होते.


"हम्म. बिझनेस मधले बारकावे उत्तमरित्या शिकते आहेस तू. आता लवकरच ही कपंनी तुम्हा दोघींच्या हाती द्यायला मी मोकळा होणार आहे." शशांक हसून म्हणाला.


"नो डॅड, मला इतक्यात तरी मालकीण बनायचे नाही आहे, त्यामुळे तू अशा रिटायर्ड व्हायच्या गोष्टी करू नकोस हं." ती.

"आणि काय रे? हा नवा प्रोजेक्ट मिस्टर विहान नीट हॅन्डल करेल ना रे? नाहीतर माझी संपूर्ण मेहनत पाण्यात जाईल." चेहरा लटकवत ती.


"डोन्ट वरी. मी त्याला अपॉइंट केलंय म्हणजे त्याच्यात काहीतरी आहे म्हणूनच ना? तू प्रोजेक्टची काळजी करू नकोस आणि हो, आत्ता आठवलं. तुला सकाळी त्याच्याबद्दल काही सांगायचे होते ना? काय सांगायचे होते?" त्याला अचानक सकाळची गोष्ट आठवली.


"फार असं काही नाही रे. तेवढं इम्पॉर्टन्ट नाहीये ते. फरगेट इट." तिने तो विषय का टाळला तिलाच कळले नाही.


"ओके देन, तू आराम कर. मीही जरा फ्रेश होतो." तिच्याजवळून उठत शशांक म्हणाला. तो वळला तसे तिने डोळे मिटले.

*****

रात्री सर्व जेवण करायला एकत्र बसले होते. खरं तर हा त्या घरचा नियमच होता. सकाळी नाही तर किमान रात्री तरी सर्वांनी एकत्र जेवायचे.

शशांकने चपातीचा पहिला घास तोंडात टाकायला आणि त्याचा मोबाईल वाजायला एकच गाठ पडली.


"डॅड, जेवताना नो मोबाईल. रुल विसरला आहेस का तू?" तो कॉल उचलणार तोच त्याच्या हातून नव्याने मोबाईल घेतला. 


"नाही मी कोणताच नियम विसरलेलो नाही. पण कधी कधी काही स्पेशल व्यक्तींसाठी तो मोडावा लागतो." तिच्या हातून मोबाईल स्वतःकडे घेत शशांक.


"स्पेशल व्यक्ती?" ओठांचा चंबू करून नव्या.


"हम्म. सी." त्याने मोबाईल स्क्रिनवरचे नाव तिला दाखवले.


"नो डॅड, प्लीज कॉल घेऊ नकोस." ती पॅनिक होत म्हणाली पण तोवर त्याने मोबाईल स्पीकरवर टाकला होता.


"हेय, डिअर एसके. कॉल रिसिव्ह करायला एवढा वेळ का लागला?" पलीकडून एक गोड आवाज ऐकू आला.


"हॅलो माय लिटल एसके, अगं माझ्यामुळे नव्हे तर तुझ्या लाडकीमुळे उशीर झालाय." शशांक हसून म्हणाला.


"व्हॉट? निवीमुळे? हेय निवी व्हॉट हॅपन्ड डिअर? आर यू ऑलराईट ना?" मघाच्या गोड स्वराचे आता काळजीत रूपांतर झाले होते.


"येस. आय एम ॲब्स्यूल्यूटली फाईन दी. तू डॅडचे काही ऐकू नकोस. बस थोडीशी चक्कर आली होती." नव्या चाचरत बोलली.


"काय? तुला चक्कर आली आणि मला साधं कुणी कळवलं सुद्धा नाही? इट्स नॉट फेअर. निवी, तुझी कोणीच काळजी घेत नाही का? कितीवेळा सांगितलं आहे की निवीकडे दुर्लक्ष करायचे नाही आणि तरीसुद्धा?" काळजीने भरलेल्या तो आवाज कातर झाला होता.


"शौर्या, बाळा शांत हो बघू. निवी इज बेटर नाऊ. आम्ही आहोत अगं तिच्याकडे लक्ष द्यायला." इतका वेळ शांत असलेली सुनंदा बोलली.


"हो बाळा. तू काळजी करू नकोस. तुला माहिती आहे ना आपली निवी कशी वेंधळी आहे ते? म्हणून तिला चक्कर आलेली. आता एकदम ओके आहे." ललिता फोनवर आली तसे शौर्याच्या डोळ्यातील पाणी गालावर आले.


"आज्जी, तुला माहितीये, आज ना सारखी माझी पापणी उडत होती. मनात वाटत होतं की काहीतरी वाईट घडणार आहे आणि निवीला असं झालं. मग काय समजू यार मी." तिचा हुंदका फुटला.


"शौर्या, तू आमची शूर मुलगी आहेस आणि अशी रडतेस काय? निवी आता एकदम ओके आहे आणि यापुढे असं काही घडणार नाही याचं प्रॉमिस देतो तुला, ओके? काम डाऊन डिअर." शशांक तिला समजावत होता.


"आय मिस यू. आय मिस यू ऑल. स्पेशली निवी." आवंढा गिळून शौर्या म्हणाली.


"आम्हालाही तुझी आठवण येते गं राणी. तुझी एक्झाम आटोपली की भेटूया आपण. लव्ह यू बेटू." तिला फ्लायिंग किस देत शशांक.


"शौर्या लव्हज यू ऑल. बरं बाय. माझी क्लासची वेळ झालीय, सो मला जायला हवं. निवी, प्लीज टेक केअर डिअर." तिने बाय म्हणून कॉल कट केला.


"रडवलंस ना तू शौर्याला." नव्याच्या ताटात चपाती वाढत सुनंदा म्हणाली.


"मी काय केलंय आता? दी तुमच्यावर ओरडली म्हणून तुम्ही मला ओरडणार आहात का?" पिटुकला चेहरा करून निवी.


"अगं, तुला चक्कर आली हे तिला सांगायला नको होतेस." ललिता.


"मला वाटलं की तुम्ही तिला आधीच संगितलं आहे म्हणून मी क्लिअर केलं." जीभ चावत ती.


"आता ती तिकडे दिवसभर जीवाला घोर लाऊन घेणार." ललिताचा चेहरा पडला.


"हं, आता सगळे मलाच ओरडा. सगळ्यांचं प्रेम फक्त दीदीवर. मी कोणाला आवडतच नाही ना?" चेहरा लटकवून नव्या.


"अगदी खरं बोललीस. शौर्या तर आम्हा सर्वांची खूप लाडकी आहे." चपातीचा घास तोंडात टाकत शशांक नव्याच्या चेहऱ्यावरचे भव टिपत म्हणाला.


"असू दे. तुमचं तिच्यावर कितीही प्रेम असेल ना तरीसुद्धा दीचे फक्त माझ्यावर प्रेम आहे. तुम्हा सर्वांपेक्षा मीच तिची लाडकी आहे." ती वाकुल्या दाखवत शशांकला म्हणाली तसे सर्व हसले.

"निवी, तू म्हणतेस ते अगदी शंभर टक्के खरं आहे गं. तुम्हा दोघींचे प्रेम आयुष्यभर असेच राहू दे. आम्ही असू किंवा नसू, तुम्ही दोघी मात्र कायम एकमेकींसोबत राहा." सुनंदाच्या डोळ्यात पाण्याचे थेंब तराळले.

"मॉम, डोन्ट बी सो इमोशनल. आम्ही एकमेकींना कधीच अंतर देणार नाही." उष्ट्या ओठांनी सुनंदाची पापी घेत निवी म्हणाली. इतका वेळ गंभीर झालेले वातावरण आता थोडे निवळले होते. 

*****

"मे आय कम इन मॅम?" केबिनच्या दारावरची टकटक ऐकून नव्याने मान वर केली. दारात विहान उभा होता.

दोन दिवसानंतर ती ऑफिसला परत जॉईन झाली होती आणि म्हणूनच तिला भेटायच्या उद्देशाने तो तिथे आला होता.


"ओह, मिस्टर विहान? कम इन." तिने गोड स्मित करून त्याला परवानगी दिली.


"नव्या मॅम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी." तो तिच्याकडे बघून म्हणाला.


"अरे, सॉरी फॉर व्हॉट? उलट मला तुम्हाला काँग्रॅच्यूलेट करायचे आहे." त्याच्याकडे बघून हसत तिने आपला हात समोर केला.


"काँग्रॅच्यूलेशन्स मिस्टर विहान. तुमच्या मेहनतीमुळे आपले प्रोजेक्ट सक्सेस झाले आणि डील देखील फायनल झालीय. अँड ऑल क्रेडिट गोज टू यू ओन्ली." ती मनापासून त्याचे अभिनंदन करत होती. 


"थँक्स अँड सॉरी अल्सो." तिच्या हातात हात मिळवत तो म्हणाला.


"अरे? अजूनही तुम्ही त्या सॉरी मध्ये अडकूनच आहात होय?" तिने डोक्यावर हात मारला.


"हो नव्या मॅम. माझ्या मनातील गिल्ट गेला नाहीये. त्या दिवशी माझ्यामुळेच तुम्हाला चक्कर आली. खरंच सॉरी." तो तिच्यासमोर कान पकडून उभा होता.


"इट्स ओके. आता मी अगदी ठणठणीत आहे." ओठ रुंदावत ती.


"पण तुम्ही मला माफ केले हे मी कसे समजू ना?" त्याचा चेहरा अगदी भोळा दिसत होता.


"मग आता प्रूव्ह करून दाखवावे लागेल का?" ती हसून.


"होय." विहान.


"काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल बरं?" नव्याचा प्रश्न.


"आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल?" तिच्याकडे बघून तो.


"हं?" त्याच्या अनपेक्षित आमंत्रणावर काय बोलावे तिला कळले नाही.

:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
******
काय असेल नव्याचे उत्तर? वाचा पुढील भागात. तोवर स्टे ट्यून्ड!


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//