Feb 23, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -तीन.

Read Later
हवास मज तू! भाग -तीन.

हवास मज तू.

भाग -तीन.


"तुमचं बोलून झाले असेल तर तुम्ही जाऊ शकता." तिच्या बोलण्याने तो एकदम भानवर आला.


"नो, नो. नाही." विहान भांबावून गेला. "मे आय सीट?" त्याने प्रश्नार्थक तिच्याकडे पाहिले.


"येस, प्लीज." ती अजूनही तिच्या ॲटीट्युड मध्ये होती."मॅम मी हे काही पॉईंट्स काढलेत. तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्हाला योग्य वाटले तरच आपण ते ॲड करूयात." आपला नोटपॅड तिच्या समोर ठेवत तो.


"आपण?" त्याच्यावर नजर स्थिरावत ती.


"हां, आपण. हा प्रोजेक्ट तुम्ही आणि मी एकत्र करतो आहोत हे एसके सर तुम्हाला बोलले नाहीत का?" तिच्याकडे बघून त्याने विचारले.


"एसके सर? यू मिन शशांक सर?"


"हं तेच."


"हं तेच म्हणण्याइतकं सहज नाहीये हे. एसके इज अ ब्रँड नेम. ते कोणीही एवढया सहजतेने घेऊ शकत नाही. गॉट इट? तुम्हाला इथे जॉईन होऊन केवळ एक दिवस होत आलाय आणि तुम्ही असे वागता आहात की जन्मापासूनच या कपंनीशी जुळला आहात." तिच्या चेहऱ्यावर थोडासा राग उमटला होता.


"आय एम सॉरी. मी ते सहज बोलून गेलो. यापुढे असे होणार नाही." तो खजिल होत म्हणाला.


"इट्स बेटर." ती.


"मॅम, एक विचारू? तुम्ही अगदी जन्मापासून या कपंनीशी जुळला आहात का हो? म्हणजे तुम्हाला या कपंनीबद्दल खूप अभिमान आहे असं जाणवतंय म्हणून विचारतोय." तो चाचरत बोलत होता.


"यू माईंड युअर ओन बिझनेस, ओके? माझ्या मध्ये पडायची गरज नाहीये. जिथे आपण काम करतो ना त्या जागेबद्दल आदर हवा प्रत्येकाला." त्याच्याकडे डोळे रोखून ती म्हणाली."सॉरी." तो चेहरा पाडून म्हणाला. तेवढ्यात दारावर टकटक झाली.


"मॅम, आत येऊ?" हातातील ट्रेमध्ये दूध, नाश्ता आणि फ्रुट्स सलाड घेऊन दारात उभी असलेली रिसेप्शनीस्ट विचारत होती.


"हो, ये." नव्याने होकार देताच तिने ट्रे टेबलवर आणून ठेवला आणि स्मित करून ती निघून गेली. खरे तर शशांकनेच तिला नव्याकडे पाठवले होते.


"मे आय?" प्लेटमधील सफरचंद बघून विहानला राहवले नाही. तिच्या होकाराची वाट न बघताच त्याने एक तुकडा तोंडात टाकला.


"भुक्कड." ती हळूच पुटपुटली.


"ॲक्च्युली मॅम, ॲपल इज माय वीक पॉईंट. मला फार आवडतं. आणि तसेही मी आज काही खाऊन आलेलो नाहीये. उपाशी असलो की त्रास होतो मला." हळूहळू ट्रे मधील सर्व पदार्थ घशात घालत तो बोलत होता. नव्याकडे बघायचे तर त्याला भानही उरले नव्हते. सगळे खाऊन झाल्यावर त्याने तिच्याकडे पाहिले. तिचे काळेभोर डोळे त्याच्यावरच रोखलेले होते.


"सॉरी, ते मी.. भूक लागली होती म्हणून भरभर खाऊन टाकलं." अपराधीपणे तो म्हणाला.


"ओके. हे दूध देखील पिऊन घ्या." तिने ग्लास त्याच्यासमोर ठेवला.


"नो, आय डोन्ट लाईक मिल्क." तो स्मित करून.


"पिऊन तर बघा, आवडेल तुम्हाला. तसेही दूध आपल्या हेल्थसाठी अत्यंत आवश्यक असते." ती खोचकपणे म्हणाली.


"ओह रिअली? तुम्ही म्हणताय तर पितो की." त्याने गटकन ग्लासभर दूध गळ्यात रिचवले.


"थँक यू." चेहऱ्यावर तृप्तीचे भाव घेऊन तो म्हणाला.


'याला घरी काही खायला मिळत नाही का?' ती मनात पुटपुटली.


"ॲक्च्युली लवकर निघण्याच्या घाईत काही खाणे झालेच नाही आणि एवढं सगळं बघून मी कंट्रोल करू शकलो नाही. घरी प्रेमाने खाऊ घालणारे कोणी नाहीये ना." तो एवढासा चेहरा करून म्हणाला.


"ओह." ती.


"इथे मी एकटाच असतो." तिने काही विचारायच्या आत तो सांगू लागला.


"फॅमिली?" नव्याचा प्रश्न.


"नो फॅमिली." त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची एक लकेर उमटली.


"म्हणजे?" तिच्या डोळयात कुतूहल.


"म्हणजे?" तो हसला जरासा. "इट्स अ लॉन्ग स्टोरी. सांगेल केव्हातरी. बरं मी कामाला लागतो. नाहीतर सर ओरडायचे." तो हसत उठला.


तिचेही ओठ नकळत रुंदावले. तो जायला उठला आणि त्याचं वेळी अचानक तिला गरगरायला लागले.


"नव्या मॅम, रिअली थँक्स फॉर द फुड." दाराजवळून परत वळून तो म्हणाला आणि त्याची नजर तिच्यावर गेली.


"मॅम, काय झालेय? आर यू ओके?" तिच्याजवळ धावत जात विहान ओरडला. नव्या जवळजवळ टेबलवर कलंडली होती."त्याने अलगद तिला आपल्या कवेत पकडले आणि तिथेच बाजूच्या सोफ्यावर झोपवले. त्याच्या ती इतक्या जवळ होती की क्षणभर त्याचा श्वास थांबलाय की काय असे वाटत होते. काय करावे त्याला कळत नव्हते तरी प्रसंगवधान राखून त्याने शशांकला कॉल केला."मिस नव्या." शशांक तिच्या कपाळावर हात ठेऊन तिला आवाज देत होता. त्याने बाजूला पाहिले टेबलवर रिकामी प्लेट दिसत होती. म्हणजे तिने आत्ताच काही खाल्ले होते तरी त्रास कसा झाला हे त्याला कळत नव्हते. तिच्या डॉक्टरांना फोन करून त्याने लगेच रिसेप्शनीस्टला आत बोलावले.


"मी मिस नव्यासाठी फुड घेऊन यायला सांगितले होते. कसले फुड त्यांना खाऊ घातलेस?" शशांक जरा रागानेच तिला विचारत होता.


"सर, तुम्ही जे बोललात तेच मी आपल्या कॅन्टीन मधून घेऊन आले. मी स्वतःच इथे आले होते सर. हवे तर विहान सरांना विचारा." रिसेप्शनीस्ट जराशी घाबरत म्हणाली.


"मग तरी काय झाले? प्लेट तर रिकामी आहे म्हणजे पोट रिकामे नाहीये." पॅनिक होत शशांक.


"सर ते.."


"हां, मिस्टर विहान, तुम्ही इथेच होतात ना? मिस नव्याने खाल्लंय ना सगळं?" विहान काही बोलू पाहत होता पण त्याला मध्येच थांबवत शशांकने त्याला प्रश्न केला.


"नाही.. म्हणजे तेच सांगायचेय मला." शशांकची काळजी बघून विहानदेखील घाबरला होता."एक्सक्युज मी. व्हेअर इज शी?" तो पुढे काही बोलेल तेवढ्यात डॉक्टर अमित आत आले होते.

शशांक आणि अमित दोघं पूर्वीपासूनचे मित्र होते आणि आता नव्याचे डॉक्टरसुद्धा.


"प्लीज, सर्व बाहेर थांबा. मला पेशंटला चेक करायचे आहे." आत उपस्थित असलेल्या सगळ्यांना ते म्हणाले. त्याबरोबर सर्व आपापल्या जागेवर गेले.


"सर, मला काही बोलायचे आहे." विहान खाली बघत म्हणाला.


"विहान , आपण नंतर बोलूया. आता डॉक्टर आले आहेत तर काळजीच काही कारण नाही." शशांक म्हणाला तसा मग विहान पण आपल्या डेस्ककडे निघून गेला.


"शशी, नव्याची शुगर ड्रॉप झालीये. तिने आज काही खाल्ले नव्हते का?" डॉक्टरांनी शशांकला आत बोलवत विचारले.


"अमित, अरे कसे शक्य आहे? थोड्यावेळापूर्वीच तर तिच्यासाठी खायला पाठवले होते आणि बघ ना ही प्लेट सुद्धा रिकामी आहे. मग तू असं कसं म्हणू शकतोस?" शशांकने उलट प्रश्न केला.


"आय डोन्ट नो. पण सध्या तिच्या पोटात काही नाहीये म्हणून तिला चक्कर आली हे खरंय. मी एक सलाईन लावलेय. त्यानंतर नर्स परत एक लावतील. नंतर मात्र तिला घरी पाठवून दे. आणि ऐक सध्या दोन दिवस तरी तिला घरीच आराम करू दे. सध्या काळजीचे काही कारण नाहीये. पण तिला असे फुड स्किप करू देऊ नकोस. कितीही इमरजन्सी असली तरी सुद्धा. ओके?" डॉक्टर अमित.


"चल मी निघतो. नर्स आहे इथे. तू निश्चिन्त अस." डॉक्टर निघून गेल्यावर शशांकने पुन्हा नव्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. डोळ्यात पाणी दाटल्यासारखे झाले होते.


सिस्टर, मॅमना शुद्ध आली की मला कळवा." तो म्हणाला.


"हो सर. अर्ध्या तासात त्यांना बरे वाटेल." नर्स उत्तरली.


शशांक आपल्या केबिनमध्ये बसला होता. नव्याला अशा अवस्थेत बघून त्याचे काळीज फाटत होते. पण साध्या तो ऑफिसमध्ये होता. तिथे त्याच्यातील बाबा जागा होणे योग्य नव्हते म्हणून तो गप्प होता. त्याच्या डोळ्यासमोर नव्याच्या टेबलवरची ती रिकामी प्लेट गोल गोल फिरत होती.


*****


विहान हातात फाईल घेऊन बसला होता. पोटात काही न गेल्यामुळे नव्याची ही अवस्था झालीय हे कळायला त्याला वेळ लागला नाही. खरं तर नव्याला तसे बघून तोही भांबावून गेला होता. पण शशांकची तिच्याप्रती दिसलेली काळजी बघून जास्त चकित झाला होता.


"शशांक सर असेच आहेत का?" बाजूच्या टेबलवर असलेल्या विनीतकडे बघून त्याने विचारले.


"असे म्हणजे कसे?" विनीत.


"म्हणजे इतके केअरिंग? आपल्या स्टॉफसाठी एवढं कोण करतं ना?" विहान.


काय उत्तर असेल विनीतचे? वाचा पुढील भागात.

:

क्रमशः

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे. *

*****

कथा आवडतेय ना? मग लाईक्स आणि कमेंट्सची कंजुषी का करताय राव? जरा येऊ द्या की तुमचे कमेंट्स अन लाईक, तेव्हाच मला कळेल ना तुम्हाला कथा कशी वाटतेय ते.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//