हवास मज तू!भाग -३९

वाचा नव्या आणि शौर्याची कथा.
हवास मज तू!
भाग-३९

मागील भागात :-
शौर्या पबमध्ये गेल्यावर शिरीनच्या आठवणीत हरवते. तिच्या वागण्यामुळे दुःखी झालेली ती ड्रिंक करायला लागते आणि स्वतःच्याच नशेत डुबून जाते.

आता पुढे.

शौनकशी झालेली तिची ही पहिली भेट. शिरीन आठवली तशी शौर्याला ती भेटही स्पष्टपणे आठवून गेली. आज तिला समजलं कि शौनकशी झालेली ती भेट अचानक नव्हती तर शिरीनने मुद्दाम घडवून आणली होती.


हे सारे आठवत तिने समोर असलेला दुसरा पेगही घटाघटा घशात रिता केला. त्यानंतर तिसरा, चौथा.. आणि काही वेळातच पूर्ण बाटली रिकामी झाली. आता आजूबाजूला असलेला गोंधळाचा आवाज तिच्या कानावर येणे बंद झाले होते.

ती तिच्याच नशेत मशगुल झाली होती आणि थेट समोरच्या टेबलवरची एक नजर तिची ही दशा न्याहाळत होती.


"हेय! ब्युटीफूल, कॅन वी डान्स?" तिच्या स्लीव्ह्जलेस दंडाकडे बघून चावळलेला एक रोमियो हात समोर करत म्हणाला.


"डान्स? विथ मी? शुअर." ती तोल सावरत उठून उभी राहण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

तिच्या या अवस्थेचा फायदा घेत त्याने तिच्या कमरेत हात टाकला आणि आपल्याजवळ खेचले.


'सपाकऽऽ' त्यासरशी त्याच्या गालावर एक जोराचा आवाज झाला.

"हाऊ डेअर टू टच मी?" त्याही स्थितीत त्याची कॉलर पकडून तिने त्याला एक ठोसा दिला.


"यू बिच, माझ्यावर हात उगारतेस? थांब तुला चांगलीच अद्दल घडवतो." तिच्यावर तो हात उगारायला जाणार तोच त्याचा हात कोणीतरी हवेतच वरच्यावर पकडला.


"सॉरी ब्रो, जस्ट चिल." मघापासून समोरच्या टेबलवर बसून नजर शौर्यावर ठेवून असणारी व्यक्ती आता पुढे आली होती.


"ए, तू आमच्यामध्ये येऊ नकोस. तिने माझ्या गालावर मारायची हिंमत कशी केली? आता मी तिला सोडणार नाही." तो रोमियो रागात म्हणाला.


"त्याआधी तू काय केलेस ते मी बघितले आहे आणि तू जिच्याबद्दल बोलतो आहेस ना ती माझी फियान्सी आहे. आमच्यात थोडे वाद झालेत म्हणून ती रुसून एकटी पीत होती, तर तू तिचा गैरफायदा घ्यायला निघालास? खरं तर मलाच तुला सोडायचं नाहीये, पण तरीही सोडतोय." त्याने त्याला बाजूला ढकलत म्हटले.


"सॉरी." तो ओशाळून म्हणाला.


"हे मला नको, मॅडमना म्हण."

"सॉरी मॅम." त्याने शौर्याची माफी मागितली आणि पुन्हा गर्दीत मिसळला.

"व्हॉट सॉरी? आता घाबरला का? तुला तर मी सोडणार नाही." ती पुन्हा त्याच्यावर झेपावत म्हणाली तसे त्या व्यक्तीने तिला मागे ओढले.


"बेबी..बेबी, जस्ट चिल. तो तुला सॉरी बोलतोय ना? तेव्हा सोडून दे. आता तरी घरी चलशील ना? इतका राग बरा नव्हे गं." अगदी मुलायम स्वरात बोलून त्याने तिचा हात पकडला आणि गर्दीतून वाट काढत बाहेर आणले.


"एक मिनिट, मी तुझ्यासोबत का येऊ?" त्याचा हात झिडकारत ती म्हणाली.

"शौनक आहेस ना तू? आणि तुझ्या डोळ्याला काय झाले? तुझे डोळे तर तुझ्या काळ्या मनासारखे काळे काळे होते ना? ते घारे का दिसत आहेत?" त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.


"तुझे शौनकवर प्रेम आहे का?" त्याने हळवेपणाने विचारले.


"प्रेम? माय फूट. त्याच्यावर कोण प्रेम करेल? ही इज अ चिटर. माझं प्रेम तर फक्त माझ्या निवीवर आहे." ती नशेत बडबडत होती तरी तिच्या डोळ्यात पाणी आले.


"म्हणजे फ्रेंड आहे म्हणायचा?"


"तो त्या लायकीचा नाहीये." झोकांड्या खात ती उत्तरली.


"फ्रेंड तर शिरीन होती. बेस्ट, बेस्ट, बेस्ट फ्रेंड. पण तिनेही धोका दिला." ती जोराने रडायला लागली.


"यू नो, ब्रॉऊन आईज.. नेव्हर एव्हर ट्रस्ट ऑन गर्ल्स. मुली चांगल्या नसतात. शिरीन इज व्हेरी बॅड. तिने मला फसवलं." तिने पुन्हा गळा काढला.


"ब्राऊन आईज?" त्याने प्रश्नार्थक पाहिले.


"तुझे नाव रे. मी ठेवलंय. तुझे डोळे ब्राऊन आहेत म्हणून." ती फिसकन हसली.

"एय, तू मला दोन दोन का दिसत आहेस? आत्ताच तर एकटा होतास ना? तुझे डोळे पण चार झाले." ती पुन्हा बडबडायला लागली.


"जर झेपता येत नाही तर इतकी प्यायचीच कशाला?" तिचा तोल जातोय हे बघून त्याने तिला सावरले.

"आणि आधी हे जॅकेट घाल. अशा ठिकाणी असे तोकडे कपडे घालून येशील तर लोक त्याच नजरेने बघतील ना?"

"आधी आपली नजर सुधारायची आणि नतंर मला डोस पाजायचे कळलं का? मला नकोय तुझे जॅकेट. आय एम क्वाईट कम्फर्टेबल इन माय ड्रेस." त्याचा जॅकेट त्याच्या अंगावर फेकत ती म्हणली.


"ठीक आहे. आत बस." कारचा दरवाजा उघडत तो म्हणाला. ती बसली तसे दार बंद करून तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला.


"मी ड्राइव्ह करू? खूप दिवस झालेत ड्रायव्हिंग केली नाही." बाहेर येऊन त्याचा खिडकीतून आत मान घालत तिने विचारले.

"नको गं बाई. आपल्याला दोघांनाही जिवंत राहायचे आहे." डोक्यावर हात मारून बाहेर येत तो म्हणाला आणि त्याने तिला परत बाजूच्या सीटवर आणून बसवले.

या वेळेला ती गाल फुगवून गप्प बसली.


"स्टॉप द कार." दहा मिनिटाने ती ओरडली तसे त्याने कार थांबवली. तिला उलटी येत होती ते बघून त्याला कसेतरी व्हायला लागले.


"पाणी?" तिच्या हातात बाटली देत तो म्हणाला.

"शी..हे पाणी नाहीय तर दारू आहे." चुळ भरल्यानतंर त्या बाटलीकडे टक लावून ती म्हणाली.

"बघ इथे मला काहीतरी दिसतेय." तिच्या हातात हलणाऱ्या बाटलीकडे बघत ती.

"काय? पाणी दारू आहे हे दिसतंय का?" त्याला हसू येत होते.


"नाही, एक सिक्रेट आहे. कोणाला सांगू नकोस, पण मला माहित आहे. शक्तिमान ही गंगाधर है." ती बारीक आवाजात त्याला म्हणाली.


"हं?" काही न कळून तो.


"स्टुपिड म्हणजे शौनकच विहान आहे आणि विहान म्हणजेच शौनक आहे." त्याला पटवून देत ती..


"म्हणजे?"


"म्हणजे तुला नाही कळले ना? निवीला पण कळत नाहीये. त्याच्या प्रेमात ती आंधळी झाली आहे. पण मी त्याला सोडणार नाही. शिरीनला पण नाही." ती रस्त्याने धावायला लागली.


"अगं एऽऽ काय करतेस?" तिला पकडत तो म्हणाला.


"शौनकला पकडतेय." त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत ती.


"पण आपल्याकडे कार आहे ना? आपण कारने त्याला पकडू. चल." तिला पुन्हा आत नेवून बसवत तो म्हणाला.


"आय लव्ह एसके." आत बसल्यावर मध्येच ती पुन्हा रडायला लागली.

"तो माझा आयडल आहे आणि मीच त्याला आज हॉस्पिटलमध्ये जायला भाग पाडलं. माझ्यामुळे त्याला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते." तिचा सूर वाढीला लागला.

"शौर्या इज व्हेरी बॅड, व्हेरी बॅड." ती स्फून्दत होती.


"नो, शौर्या इज अ गुड गर्ल. खूप चांगली मुलगी आहे ती. मी तिला ओळखतो ना." तिच्या हातावर हात ठेवून तो अलवारपणे म्हणाला.


"तू ओळखतोस तिला?" तिने डोळे मोठे करून विचारले.


"हम्म. खूप चांगल्याप्रकारे." तो किंचित हसून उत्तरला.


"आता डोळे मिटून रिलॅक्स हो. शौनक भेटला की मी तुला उठवेन." त्याने तिच्याकडे बघून स्मित केले.


तिलाही त्याचे बोलणे बहूतेक पटले असावे. कारण मान डोलावत ती डोळे मिटून सीटला रेलून बसली.

"शौर्या, वेकअप. घर आलेय." कार पार्क केल्यावर तो तिला हलवून जागे करत होता. तिला मात्र गाढ झोप लागली होती. त्यामुळे ती काहीच प्रतिसाद देत नव्हती.


ती उठण्याची वाट बघून थकल्यावर शेवटी त्याने तिला आपल्या हातावर पकडले आणि तसाच तो त्याच्या घरात प्रवेशला. बेडरूममध्ये घेऊन जात त्याने तिला हळूच बेडवर ठेवले. तिच्या पायातील सॅन्डल्स काढून बाजूला ठेवल्या आणि अंगावरून पांघरून घालत तो बाथरूममध्ये गेला.


बाहेर आला तेव्हा शौर्या कुस बदलून झोपली होती. त्याने आवाज न करता आपला वार्डरोब उघडला आणि अंगावर शॉर्ट्स घालत सोफ्यावर बसून तिला निरखू लागला.


ती अगदी निवांत झोपली होती. मनातील कल्लोळ दूर सारायला बाहेर पडलेली ती कदाचित खरंच शांत झाली होती. कारण आता चेहऱ्यावर कसलेच टेंशन आणि कोणतेही दडपण दिसत नव्हते.


त्याने तिच्या अंगावर पांघरूण घातले होते त्यामुळे तिचा चेहराच तेवढा दिसत होता. तिचा कमालीचा सौम्य चेहरा, त्यावर आलेल्या केसांच्या एकदोन बटा.. किती सात्विक भासत होती ती!

पंधरा मिनिटांपूर्वी अविरत बडबड करणारी ती हीच का? असा त्याला प्रश्न पडला आणि त्या प्रश्नासरशी त्याच्या ओठावर स्फूट हसू उमटले.

तिच्याकडे टक लावून बघतच तो सोफ्यावर आडवा झाला. निद्रादेवीने त्याला कधी तिच्या कुशीत घेतले त्यालाही कळले नाही.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

********


🎭 Series Post

View all