हवास मज तू!भाग -३८

वाचा नव्या आणि शौर्याची कथा
हवास मज तू!
भाग -३८

मागील भागात :-
विहान मुद्दाम नव्यासमोर शौर्याला ती किती वाईट आहे हे साबित करण्याचा प्रयत्न करतो. सोबतच तो शौर्याला शिरीनचे सत्य सांगतो. डोक्यातील गोंधळ बाजूला सारण्यासाठी शौर्या शेवटी पबमध्ये जाते.

आता पुढे.


आजवर ज्या मुलीला बेस्ट फ्रेंड मानले ती तिची मैत्रीण नव्हतीच. उलट शौनकच्या कटात सामिल असलेली ती त्याचीच मावसबहीण होती.

'इतके दिवस एकत्र राहून मला तिचा कधीच कसा संशय आला नाही?'

हातातील पेग घशात रिचवून ठणकणाऱ्या डोक्याला तिने गच्च पकडले. तिच्या नजरेपुढे शिरीनचा हसरा चेहरा तरळू लागला होता.


शिरीन.., तिची फ्लॅटमेट. तिची बेस्ट फ्रेंड. ती गोव्याची. पक्की कॅथालिक. पण मैत्रीच्या नात्यात धर्म कधीच आड आला नव्हता. महाराष्ट्रीयन नसूनही ती इतकं सफाईदारपणे मराठी कसे बोलते याचे शौर्याला नेहमीच आश्चर्य वाटे. पण शिरीनचे ठरलेले उत्तर.. गोवा महाराष्ट्राला लागून आहे मग मराठी येणारच ना? त्यात तिचे आजोळ महाराष्ट्रातले आहेत हे ती एकदा बोलली होती. त्याचा तिच्याशी असा संबंध असेल असे शौर्याला कधीच वाटले नव्हते.


जीला बेस्टी म्हणून ती आजवर मिरवत होती, ती फक्त तिच्या स्वार्थापोटी सोबत होती असा संशयसुद्धा शौर्याला कधी शिवला नव्हता, पण आज विहान तिला जे बोलला त्यावरून शिरीनचा वेगळ्या बाजूने विचार करायला शौर्याला भाग पडत होते. तिचे मन भूतकाळात डोकावू लागले होते.


"हेय शौर्या, वेट. तिकडे फुटबॉल मॅचेस सुरु आहेत आणि तू बुक्स घेऊन काय करते आहेस? ग्राउंडवर चल ना." लायब्ररीकडे जाणाऱ्या शौर्याला शिरीनने वाटेत रोखले होते.


"नको यार, माझे रेकॉर्ड्स कंप्लिट व्हायचे आहेत आणि बरेच वर्क सुद्धा पेंडिंग बाकी आहे. त्यामुळे मी लायबरीत बसतेय. तू जाऊ शकतेस." तिला नकार देत शौर्या म्हणाली.


"कसली बोरिंग आहेस यार? तुला माहिती आहे या मॅचचे अट्रॅक्शन कोण आहे ते?"


"नाही, आणि मला जाणून घ्यायचे पण नाहीये."


"तू त्याला बघितले नाहीस म्हणून असे बोलतेस. मी तुझ्यापेक्षा एका वर्षाने सिनिअर आहे त्यामुळे मला सारं माहितीये. आय बेट, तू त्याला भेटशील तर परत परत भेटत राहशील." शिरीन.


"अच्छा त्याला बघितल्यामुळे तू लास्ट इयर फेल झालीस तर? मग तर आता मुळीच नको." शौर्या खट्याळपणे हसली.


"छे गं. इथे मी शिकायला थोडेच आलेय? एंजॉय करायला आलेय. फेल होईल तर तेवढेच एक वर्ष एंजॉय करायला मिळेल असा माझा सिंपल फंडा आहे." ती डोळे मिचकावून म्हणाली.

"ए चल ना गं. तसेही आज पिटर नाहीये. तो सोबत असला की मॅच एंजॉय करायला मजा येते."


"म्हणजे तो नाहीये म्हणून मी हवीय?" शौर्याने डोळे मोठे करून विचारले.


"तुला हवे ते समज." तिला जवळजवळ खेचून नेत ती म्हणाली.

दोघी गेल्या तेव्हा मॅच रंगात आली होती. शौर्याचे लक्ष मात्र लायबरीत अडकले होते. इथून कसे सटकायचे असा विचार करत असतानाच तिच्या पायाशेजारी बॉल येऊन धडकला.


"पास द बॉल." त्या पाठोपाठ एक आवाज देखील कानावर आला.

लायब्ररीच्या विचारातून बाहेर येत तिने समोर पाहिले. काळ्याभोर डोळ्यांचा, गव्हाळ वर्णाचा पिवळ्या जर्सी मधला तरुण तिला बॉल पास करायला सांगत होता.

तिने पायाने चेंडू उडवत मैदानात फेकला आणि खेळ परत सुरु झाला.

"हेय शौर्या, व्हॉट अ शॉट! आर यू फुटबॉल प्लेअर?" शिरीनने आश्चर्याने विचारले.

"हम्म."

"रिअली?"

"शाळेत असताना मी खेळायचे." निर्वीकारपणे ती उत्तरली.

"वॉव! मग आत्ता का खेळत नाहीस?"

"आय डोन्ट नो. मला नाही आवडत."

"ओके. पण म्हणजे तुला या गेममधलं कळत असेल ना? आपण कोणती टीम जिंकेल ते गेस करूया का?" शिरीन.


"मी ज्या टीमला बॉल पास केला तीच." शौर्या हसून म्हणाली आणि त्याच वेळी त्या काळे डोळे असलेल्या मुलाने शेवटचा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

"ओ माय गॉड! शौर्या तुला एवढं परफेक्ट कळतं?" शिरीन डोळे मोठे करून तिच्याकडे पाहतच राहिली आणि शौर्या केवळ हसली.

"चल, तुझ्या मनासारखं झालं ना? आता मला लायब्ररीत जाऊ दे."

"वेट, शौर्या तो आपल्याकडेच येतोय."

"कोण?"

"तोच, येलो जर्सी. टीमचा पॉईंट ऑफ अट्रॅक्शन, आजचा मॅन ऑफ द मॅच." शिरीन त्याच्याबद्दल उत्सुकतेने सांगत होती.

"मग तूच बोलत बस. मी निघते."

"थांब तरी. काय म्हणतो ते ऐकूया."

"शिरीन, तुझा पिटर नाहीये तर तू बोलत बस ना. तसाही तो तुला आवडतोच."


"चिल यार. मी इथे इंडियन मुलं पटवायला नाही आले. तिकडे बघ, जॉन इज वेटिंग फॉर मी." एका मुलाकडे हात हलवून ती म्हणाली.


"हाय शिरीन." शौर्या पुढे काही बोलणारच होती की तो काळ्या डोळ्यांचा मुलगा समोर आला.


"हाय. काँग्रॅच्यूलेशन्स डिअर." त्याचा हात हातात घेत ती म्हणाली.


"काँग्रॅच्यूलेशन्स." शौर्याने सुद्धा त्याचे अभिनंदन केले.


"थँक यू." तो हसला खरा पण नजरेत अनोळखी भाव होते.


"मिट माय फ्रेंड, शौर्या अँड शौर्या ही इज शौनक.." शिरीन दोघांची ओळख करून देत होती की शौनकने तिला मध्येच थांबवले.

"शौर्या? मिन्स इंडियन?" आश्चर्याने तो.


"हम्म इंडियन अँड फ्रॉम महाराष्ट्रा." शिरीन हसली.


"व्हॉट? महाराष्ट्रा? मराठी?" त्याने शौर्याकडे पाहिले.

"हो." ती उत्तरली.


"मी सुद्धा. अशी इतक्या दूर आपल्या भागातील माणसं भेटली की बरं वाटतं ना?" तो म्हणाला.

"खरंच."


"शौर्या, यू कॅरी ऑन. मला जॉनशी थोडं बोलायचं. बाय, सी यू सून." शौर्याच्या उत्तराची वाट न बघता ती निघूनही गेली.


"मी माझी ओळख करून द्यायला विसरूनच गेलो. मी शौनक, तसे मला सर्वजण एसके म्हणतात. तू सुद्धा म्हणू शकतेस."


"एसके?" स्मित करून तिने त्याच्याकडे पाहिले.


"एसके मिन्स इनीशियल्स ऑफ शौनक कारखानीस. पण तू हे ऐकून का हसलीस?"


"काही नाही." ती.


"म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. तू सांगू शकतेस. तसेच काही फनी असेल तर तुझ्यासोबत मी सुद्धा हसेन." तिला सहज करत तो म्हणाला.

"इट्स नॉट फनी. ॲक्च्युली मुंबईत आमची एक छोटीशी कंपनी आहे, 'एसके इंटरप्राईजेस.' तू तुला एसके म्हटलेस म्हणून मला हसू आले. एसके इज अ ब्रँड नेम व्हिच ओन्ली स्टॅंड फॉर अवर कंपनी." ती हसून उत्तरली.


"ओ माय गॉड! तू एसके कंपनीला बिलॉंग करतेस? त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.


"हम्म." ती हसली.


"अगं, मग तू इथे काय करतेस? तुमचा एवढा मोठा बिझनेस आहे तो कोण सांभाळतो?" तो कुतूहलाने विचारत होता.


"मला बिझनेस मध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये. तिथे माझे पेरेंट्स आहेत. फॅमिली आहे. त्यामुळे मी टेन्शन फ्री आहे. जे आवडते ते शिकत असते. आताही सहज एमबीए करावेसे वाटले म्हणून इथे आहे. पण पुढे जाऊन मला कोणी आमचा बिझनेस सांभाळ म्हटलं तर माझ्याच्याने ते नाही होणार." ती.


"वेडीच आहेस. मला तर खूप मोठा बिझनेसमॅन व्हायचे आहे म्हणून मी इथे आहे. पुढे जाऊन मलाही माझी एसके कंपनी उघडायची आहे." तो भारावल्यागत बोलत होता आणि तू पुन्हा हसली.

"हसू नकोस यार. खरंच ते माझे स्वप्न आहे."


"सॉरी, पण खरंच मला हसू आले. म्हणजे मी तुला बोलले ना की 'एसके' आमचा ब्रँडनेम आहे. तेव्हा दुसरी कंपनी तेच नाव कसे वापरू शकेल ना?" ती म्हणाली.


"ओके, पण तरीही मला माझे स्वप्न पुरे करायचेच आहे आणि मी ते करेनच." तो ठामपणे म्हणाला.


"विश यू गुडलक." शौर्या स्मित करून म्हणाली.


"ओह, अजुनपर्यंत तुम्ही दोघं इथेच आहात काय? शौर्या तू लायब्ररीमध्ये जाणार होतीस ना?" त्यांचे बोलणे सुरु असताना शिरीन परत आली.


"अरे हो. मी विसरलेच होते. बाय, बाय. सी यू." ती त्यांच्यातून निघून जात म्हणाली.

"क्या बात है? आज चक्क एका भारतीय मुलीशी इतका वेळ बोलत बसला? वन इंडियन फालिंग लव्ह विथ अनादर इंडियन असं काही आहे का?" शिरीन त्याची फिरकी घेत म्हणाली.

"अशा फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीय. पण ही मुलगी जरा वेगळी आहे. माझ्या कामात येईल." शिरीनला डोळा मारत तो निघून गेला.

******

शौनकशी झालेली तिची ही पहिली भेट. शिरीन आठवली तशी शौर्याला ती भेटही स्पष्टपणे आठवून गेली. आज तिला समजलं कि शौनकशी झालेली ती भेट अचानक नव्हती तर शिरीनने मुद्दाम घडवून आणली होती.


हे सारे आठवत तिने समोर असलेला दुसरा पेगही घटाघटा घशात रिता केला. त्यानंतर तिसरा, चौथा.. आणि काही वेळातच पूर्ण बाटली रिकामी झाली. आता आजूबाजूला असलेला गोंधळाचा आवाज तिच्या कानावर येणे बंद झाले होते.

ती तिच्याच नशेत मशगुल झाली होती आणि थेट समोरच्या टेबलवरची एक नजर तिची ही दशा न्याहाळत होती.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार
******

🎭 Series Post

View all