Feb 23, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -३६

Read Later
हवास मज तू!भाग -३६
हवास मज तू!
भाग -३६

मागील भागात :-
घरच्यांचा रोष पत्करून शौर्या शशांकला भेटते. ती तिच्या वागण्याबद्दल माफी मागुन त्यामागचे कारण थोडक्यात सांगते.

आता पुढे.


₹माझ्यावर इतकं प्रेम करणारी निवी आता केवळ तिरस्कार करतेय. उद्या विहानबद्दल सत्य कळून तिला लढावं लागलं तर त्याचा त्रास होऊ नये याची मी पूर्वतयारी करून घेते आहे असं समज.

आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याविरुद्ध लढणं सोपं नसतं ना रे?" तिच्या डोळ्यातील थेंब त्याच्या हाताला स्पर्शून गेला.


"अजून तुला बरंच सांगायचे आहे. तू लवकर बरा हो. मग आपण बोलू." डोळे पुसत ती म्हणाली.


"तो तुला त्रास द्यायचाय म्हणून असा वागतोय का गं?" त्याने हळवे होत विचारले.


"कदाचित हो किंवा नाहीही. सध्या मात्र तो आपल्या निवीच्या भोळेपणाचा आणि तुझ्या विश्वासाचा फायदा घेऊन आपल्या बिझनेसमध्ये शिरू पाहत होता, म्हणून मी त्याला कामावरूनच काढून टाकलेय.

आता इतक्यात तरी तो काही करणार नाही. पण तरीही काही दिवस मला आपलं ऑफिस स्वतः सांभाळावे लागेल." ती.


"आई आणि सुनी तुझ्यावर खूप चिडले असतील ना गं?"

"स्वाभाविक आहे. तुझ्यासारख्या प्रेमळ माणसाला मी हॉस्पिटलला पोहचवलंय तर मग त्यांना राग येईलच ना? आजी तर आता यापुढे माझा चेहराही बघणार नाही म्हणाली." ती हसून म्हणाली पण तिच्या चेहऱ्यावरची वेदना त्याला जाणवत होती.


"शौर्या, तू स्वतःला एकटी समजू नकोस. मी कायम तुझ्या सोबत आहे."


"मला ठाऊक आहे रे. जग इकडचे तिकडे झाले तरी तू माझ्या सोबतीने असशीलच. पण सध्या एक गोष्ट लक्षात घे की यातलं घरात कोणालाच काही सांगू नकोस. सगळ्यांना खूप त्रास होईल. कदाचित विश्वास देखील बसणार नाही. निवी तर विहानच्या प्रेमात ठार वेडी झालीये. इतकी की विहानविरुद्ध ती काहीच ऐकून घेणार नाही. त्यामुळे सध्यातरी घरच्यांसमोर तुला माझ्याशी कडवटपणा घ्यावाच लागेल, तेवढा तू घे.


काका, मी आता निघते. तुझ्याशी बोलून थोडे रिलॅक्स झालेय. तू मात्र टेन्शन घेऊ नकोस. घरातल्या सर्वांना हवा आहेस तू.. आणि मला सुद्धा." त्याचा हात सोडवत ती जायला उठली.


"प्रिन्सेस.." ती वळली तसे त्याने तिला आवाज दिला.


"आय रिअली प्राऊड ऑफ यू बेटा. लव्ह यू." त्याचे डोळे भरून आले होते.


"डिअर एसके, शौर्याचे सुद्धा तुम्हा सर्वावर खूप प्रेम आहे. लव्ह यू." एवढे बोलून ती घाईतच बाहेर पडली. तिथे आणखी जास्त वेळ थांबली असती तर अश्रुंना थोपवू शकली नसती.

"काकू, आजी तुम्ही काकांना भेटायचे असेल तर भेटू शकता." ती खोलीबाहेर आली तेव्हा सर्वच तिची बाहेर वाट बघत होते. नर्स सुद्धा त्यांच्यासोबत बाहेर थांबली होती.

शौर्या गेली आणि सर्वच आत आले.

"शशी, कसा आहेस तू?"

"मी बरा आहे. थोडावेळ आराम करावेसे वाटतेय." ललिताच्या प्रश्नावर हळुवार डोळे मिटत तो म्हणाला.


"सर, शौर्या मॅडम बिझनेसविषयी पुन्हा काही बोलल्या नाही ना?" विहान काळजीने विचारत होता.

शशांकने डोळे उघडून त्याच्याकडे नजर टाकली. त्याच्या काळ्या डोळ्यात फसवेगिरीचे कुठलेच भाव त्याला दिसत नव्हते. दिसत होती ती फक्त त्याच्याविषयची काळजी!

'माझी नजर धोका खातेय का?' त्याने स्वतःला प्रश्न केला.

'आक्षेप घेण्यासारखे विहान आजवर कधीच चुकीचे वागला नाही. त्याच्या डोळ्यात कधीच लालसा दिसली नाही. मग शौर्या असे का म्हणतेय? कोण बरोबर आहे? माझ्या निवीवर जीव ओवाळून टाकणारी शौर्या की निवीसोबत सध्या ठामपणे उभा असलेला विहान?'


"सर, शौर्या मॅडम, चुकीचे वागत आहेत हे आपल्याला दिसत आहे तरी आपण गप्पच राहायचं का? कायदेशीरपणे आपण त्यांना नोटीस देऊ शकतो. हवे तर तुमच्या वकीलाशी मी बोलून बघतो. डोन्ट टेक इट अदरवाइज पण तुम्हाला असे त्रासात नाही बघवत आहे हो." त्याच्या डोळ्यात पाणी होते.


"विहान योग्यच बोलतोय डॅड. आपल्या वकिलांशी बोलायला हवे. व्हॉट यू थिंक?" नव्या विहानची साथ देत म्हणाली.


"त्याचा काही उपयोग नाहीये. कारण मुळात आपला सर्व बिझनेस हा तिच्याच नावाचा आहे. आजवर मी जरी बॉस म्हणून वावरत असलो तरी खरी मालकीण तर तीच आहे. तिच्याविरुद्ध कसा आवाज उठवायचा?" तो विहानचे भाव निरखत म्हणाला.


"पण काही तर पर्याय असेल? एवढी मोठी कंपनी हातची कशी जाऊ देणार?" विहान.


"मुलांनो. या विषयावर आपण नतंर बोलू आता सध्या आपल्यासाठी शशांक बरा होणे हे जास्त गरजेचे आहे." सुनंदा त्याला थांबवत म्हणाली.


"हो आँटी तुम्ही बरोबर बोलत आहात. तुम्ही सगळे बोलत बसा. मी जस्ट आलोच. नव्या मी थोडया वेळात येतोय. सरांकडे लक्ष ठेव." तिच्या खांद्यावर हलकी थाप मारून तो खोलीबाहेर आला.

******

"मिस शौर्या केळकर, सो, फायनली तू इथे आलीसच. नाही का?" वेटिंग रूमच्या बाहर कॅबची वाट बघत पाणी पीत उभ्या असलेल्या शौर्याजवळ येऊन तो म्हणाला.


"हो, तसेही मी येणारच होते. पण तुझ्या अपेक्षेपेक्षा आधीच येऊन पोहचले. हो ना मिस्टर विहान.. सॉरी मिस्टर शौनक कारखानीस?" त्याच्यावर नजर रोखून ती म्हणाली.


"ओह! माझे नाव अजूनही तुझ्या लक्षात आहे तर?" तो छद्मी हसला.

"तू विसरण्यासारखा आहेस तरी कुठे? माझ्या डोळ्यात तुझा चेहरा स्कॅन केल्यागत फिट झालाय." तिने त्याला प्रत्युत्तर दिले.

"व्हेरी इंप्रेसिव्ह." ओठ रुंदावून तो म्हणाला. "बाय द वे, तू ही खेळी चांगली खेळलीस. पण किती वाईट ना? की तुझ्याच खेळीत तू स्वतःच फसलीस? घरातल्या, आपल्या वाटणाऱ्या लोकांच्या नजरेतून उतरण्याची फिलिंग खूप हर्ट झाले असेल ना गं?" तिच्या जखमेवर मीठ चोळत असुरी आनंदाने तो पुन्हा हसला.


"लेट्स सी. आताच्या क्षणाला मला फक्त एसके ची खुर्ची वाचवायची होती. पुढे या जाळ्यात कोण अडकेल ते कळेलच." ती स्मित करून म्हणाली.


"आता पुन्हा अडकायला कोण उरलयं? तो प्रश्नार्थक म्हणाला.

"तुझी पूर्ण फॅमिली माझ्या जाळ्यात अडकलीय. तुझी आजी, काकू, काका आणि तुझी लाडकी बहीण नव्या. नाही, तुम्ही काय म्हणता? निवी!

माझ्या प्रेमात पार वेडी आहे ती. एक नंबरची भोळी मुलगी आहे बिचारी. तिचंच कसं होईल याचे मला टेन्शन येते ग. तू इतकी स्ट्रॉंग, आत्मविश्वासाने खाचाखच भरलेली, माणसांना चेहऱ्यावरून ओळखणारी आणि तुझी ही निवी इतकी गं कशी भाबडी? तिला जगरहाटी शिकवली नाहीस का गं?

मला तर कधी कधी भीती वाटते की तुझ्या माझ्या या खेळात बिचाऱ्या तिचा नाहक बळी जायचा." तो लहानसा चेहरा करून डोळे मिचकावत म्हणाला.


"शौनक, माझ्या बहिणीच्या भावनांशी खेळू नकोस हं. हे खूप महागात पडेल तुला. तिच्या निरागसतेचा फायदा घेऊन तू तिला अडकवले असलेस तरी मी आता इथे आली आहे. तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही." त्याची कॉलर पकडत ती म्हणाली.

"जस्ट रिलॅक्स. आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत. तुले असे वागणे शोभत नाही आणि तुला काय वाटतं गं? तू स्वतःहून इथे आलीस? बावळट मुली, मी मुद्दाम तुला इथला तमाशा बघायला बोलावून घेतलंय.

माझ्या वाढदिवसाचे फोटो मी चुकून इन्स्टास्टोरीला लावले नव्हते तर मुद्दाम पोस्ट करून डिलीट केले होते. तुला दिसावेत आणि बहिणीच्या काळजीने तू इथे धावत यावीस म्हणून. इथे येऊन तुला वाटलं की तू जिंकलीस. बट सॉरी यार, हा शौनक असा सहजासहजी हरणाऱ्यातील नाहीये." तो पुन्हा खदाखदा हसायला लागला.

"शौनक, हे करून तुला काय भेटतेय? का असा वागतो आहेस?" तिने चिडून त्याची कॉलरवरील पकड पुन्हा घट्ट केली.

"एक सुकून! वेगळाच आनंद." तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत तो म्हणाला.

"इतक्यात जिंकण्याचीसवय झालीये गं मला. प्रत्येक डाव जिंकण्याची मजा आणि त्याची नशा काही औरच असते, ते तुला नाही कळायचे.

आणि एक सांगू? आता मी काहीच करणार नाहीय. जे करेल ती तुझी लाडकी बहीण आणि माझ्या बुद्धीबळाच्या डावातील माझी आवडती राणी करणार आहे. तुला डेमो बघायचाय? एकच सेकंड हं." त्याने तिला हळूच डोळा मारला.


"शौर्या मॅम, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मी कधीच तुमचा होऊ शकणार नाही. कारण माझे नव्यावर खूप प्रेम आहे. स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम आहे."

शौर्याला आपल्या जवळ खेचत तिच्या ओठावरून बोट फिरवून तिची लिपस्टिक स्वतःच्या ओठावर लावली त्याने पुन्हा तिला थोडे दूर सारले. तो काय करतोय हे क्षणभर तिला कळलेच नाही.समोरून येणाऱ्या नव्याने मात्र त्याच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या तिला पाहिले आणि विहानचे बोलणे देखील ऐकले.

खरे तर तिने ऐकावे म्हणूनच तो मुद्दाम जोराने बोळायला लागला होती.

"दीऽऽ, काय करते आहेस तू?" शौर्याला मागून ओढत निवी रागाने म्हणाली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//