Feb 26, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -३४

Read Later
हवास मज तू! भाग -३४
हवास मज तू!
भाग -३४

मागील भागात :-
शौर्या अचानकपणे ऑफिसमध्ये अवतरते. विहानला पाहिल्याबरोबर त्याच्या प्रेमात पडल्याचे ती नव्याला सांगते. त्या बरोबरच ती ऑफिसमध्ये जॉईन होत आहे हेही सांगते.

आता पुढे.

"काही न कळवताच अशी अचानक कशी आलीस?"


"अचानक आले म्हणून तर मी प्रेमात पडले." विहानवर नजर रोखून ती उत्तरली.


"आय वॉन्ट टू जॉईंन अवर बिझनेस. अचानक शिक्षणातील रस आटून मला बिझनेस करावासा वाटला आणि मी परतीची वाट धरली आणि आता आजपासून मी इथे जॉईन होतेय." कुणी काही बोलायच्या आत शौर्या शशांकला स्पष्टीकरण देत गोड हसली.


"वॉव! द्याट्स ग्रेट न्यूज. तू इथे जॉईन होशील तर आनंदच आहे.यासाठी मी केव्हाचा तुझ्या मागे लागलो होतो. पण आजवर तुला आपला बिझनेस, पैसा यात काहीच रस नव्हता." शशांक खूष होत म्हणाला.


"हो. पण आता माझे विचार बदललेत. मीही बदलले. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे म्हणतात, मलाही तो नियम लागू होतोय. ती.


"शौर्या तुझ्यातील हा बदल स्वागतार्ह आहे. आय एम हॅपी फॉर धिस." शशांकचा चेहरा उजळला.


"मॅम, वेलकम टू अवर कंपनी." विहान तिच्याकडे बघून म्हणाला तशी ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली.


"थँक्स डिअर. इथला चार्ज घेतल्याबरोबर माझं पहिलं काम तुझ्या प्रमोशनचं असेल. आय प्रमोटेड यू ऍज अ चीफ मॅनेजर. फक्त त्यासाठी तुला एकच काम करावे लागेल." त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखून ती म्हणाली.


"मला कळलं नाही." काहीसा असहज होत तो म्हणाला.


"लग्न. तेही माझ्याशी. तू इथला चीफ मॅनेजर आणि बदल्यात माझ्याशी लग्न. बोल डील मंजूर आहे?" शौर्याने अचूक निशाणा साधला आणि त्यामुळे तो त्या क्षणापुरता गोंधळून गेला.

"दी?"

"शौर्या? तू काय बोलते आहेस तुला कळतंय तरी का? विहान आणि निवी.."


"तुम्ही थोडावेळ गप्प बसणार का डिअर एसके?" शशांककडे एक जळजळीत नजर टाकत ती म्हणाली.


"हं, तर विहान मी तुला ही ऑफर देतेय. ती तुला मान्य आहे का?" अगदी प्रेमळ सुरात तिने विहानला प्रश्न केला.


"सॉरी मॅम, पण मी हे स्वीकारू शकत नाही. म्हणजे माझे नव्यावर प्रेम आहे ते केवळ पैशासाठी असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.

नव्या एसके सरांची मुलगी आहे हे सुद्धा मला कालपर्यंत ठाऊक नव्हतं. सॉरी टू से मॅम, पण माझं प्रेम असं विकाऊ नाहीये की कोणीही ऑफर देईल आणि मी पैशासाठी ते स्वीकारेल." शांत पण ठाम भूमिकेत विहानने तिला स्पष्ट नकार दिला.


"शौर्याला नकार देण्याची तुझी हिंमत कशी झाली?" त्याचे कॉलर पकडून तिने रागाने विचारले.


"याची शिक्षा तुला नक्की मिळणार. आत्ता या क्षणापासून मी तुला बडतर्फ करते आहे." त्याला ढकलत ती म्हणाली.


"दी, व्हाट्स रॉंग विथ यू? तू का अशी वागते आहेस? आणि हे असे बडतर्फ वगैरे? हे कुठल्या नियमात बसतेय?" नव्या तिला जाब विचारत म्हणाली.


"माय कंपनी, माय रुल्स." शौर्या खांदे उडवत म्हणाली.
"ही कंपनी माझी आहे आणि इथे मी म्हणेल तेच होईल." तिने आपले शब्द पुन्हा रिपीट केले.


"डॅड, ही अशी काय वागतेय? तू ओनर आहेस आपल्या कंपनीचा. तू काहीतरी बोल ना." नव्याने रडत शशांककडे पाहिले.

शशांक मात्र थिजल्यासारखा जागेवरच उभा होता. त्याच्या लाडक्या शौर्याचे हे रूप त्याला अनोळखी होते. त्याला काही बोलायचे होते पण शब्दच अचानक गोठले होते.

"यू आर डुईंग मिस्टेक, मिस नव्या. या कंपनीचे मालक हे नाहीत तर मी आहे. एसके इज नॉट स्टॅन्ड फॉर शशांक केळकर. इट्स अ ब्रँड नेम अँड इट्स स्टॅंड ओन्ली फॉर शौर्या केळकर.. शौर्या मयंक केळकर. शशांक काका, मी बरोबर बोलतेय ना?" शशांककडे तिरकसपणे बघून ती म्हणाली.

"बघ, तो काहीच बोलत नाहीये म्हणजे त्यालाही हे पटलेय." ती परत नव्याकडे वळली.


"काका, आजवर तू खूप काम केलेस. आता तुला इथून सुट्टी घ्यायची वेळ आलीये. तेव्हा आजपासून ही खुर्ची माझी. एसके म्हणजेच शौर्या केळकरची."

रिकाम्या असलेल्या शशांकच्या खुर्चीवर आरामात रेलून बसत तिने पायावर पाय ठेवले.आणि टेबलवरच्या 'एसके' नेमप्लेटवरून बोट फिरवत फिसकन हसली.


"डॅड अरे, तू बोल ना काहीतरी." स्तब्धपणे उभ्या असलेल्या शशांकला हलवत नव्या म्हणाली.

अचानक शशांकला दरदरून घाम फुटला आणि छातीमध्ये एक कळ दाटून आली.


"शौर्या.." तो कसेबसे एवढेच शब्द उच्चारू शकला आणि तिथेच कोसळत असताना नव्याने त्याला सावरले.


"काका, तुला काय झालेय?" घाईने त्याच्याकडे येत शौर्या काळजीने म्हणाली."


"डोन्ट टच माय डॅड. तुझ्यामुळे त्याला त्रास होतोय हे तुला कळत नाहीये का?" नव्या तिच्यावर जोरात ओरडली.


"निवी, डोन्ट बी पॅनिक. मी डॉक्टरांना बोलावून घेतेय."


"ओह खरंच? तुझी ही हमदर्दी तुझ्याचजवळ राहू दे.
मला त्याची गरज नाहीये." नव्या तिला तिरस्काराने म्हणाली.


"नव्या, तुमच्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचं की नाही हे मला ठाऊक नाही. पण या घडीला सरांना हॉस्पिटलची गरज आहे तेव्हा आपल्याला जायला हवं." विहान तिला म्हणाला.


"हो. तू बरोबर बोलतो आहेस. विहान, तू येशील ना सोबत?" नव्या डोळ्यातील पाणी थोपवत म्हणाली.


"नव्या, हा प्रश्न तरी आहे का? मी कायम तुझ्यासोबत आहे. चल आपण निघूया." शशांकला घेऊन जाताना त्याने मुद्दाम शौर्याकडे पाहिले.


"हॅलो, अंकल.. काकांना बहुतेक स्ट्रेस मुळे माइल्ड अटॅक आलाय. निवी त्याला घेऊन हॉस्पिटला पोहचते आहे. प्लीज त्यांची काळजी घ्या."


डॉक्टर अमित, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आणि शशांकचा मित्र असलेल्या त्याला कॉल करून शौर्या खुर्चीवर बसली. तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. नव्या तिला आपल्यासोबत येऊ देणार नाही हे तीला ठाऊक होते. बाहेर सगळ्यांसमोर तमाशा नको म्हणून तीही वाद न करता शांत होती.


इकडे सगळा ऑफिस स्टॉफ जमा झाला होता. आतापर्यंत आतमध्ये काय घडलेय याची कोणालाच काही कल्पना नव्हती. इंटरकॉम वरून कॉल करून शौर्याने सर्वांना आत बोलावून घेतले.


"मी शौर्या केळकर. तुम्ही मला ओळखताच. काकांना बरं नसल्यामुळे काही दिवस आता मीच तुमची बॉस आहे. सर्वाना उद्देशून ती म्हणाली.

"आज मिस नव्या एका नविन प्रोजेक्ट संदर्भात मिस्टर दासना भेटायला जाणार होत्या पण आता ते शक्य होणार नाही. मिस्टर विनीत आणि मिस कीर्ती, नव्याऐवजी तुम्ही दोघं ही मिटिंग अटेंड करावी अशी माझी इच्छा आहे.

तेव्हा हे प्रेजेंटेशन बघून तुम्ही थोडा स्टडी करून घ्या
आणि पुढल्या अर्ध्या तासात मिटिंग साठी निघा आणि तिथला फीडबॅक द्यायला विसरू नका. ऑल द बेस्ट फॉर युअर फर्स्ट इम्पॉर्टन्ट मिटिंग."

त्यांना बोलायची एकही संधी न देता सौम्य स्वरात मिटिंगचे महत्व पटवून देत तिने त्यांना रवाना केले.

"बाकी तुम्ही सर्व घरी गेलात तरी चालेल. उद्यापासून मात्र सर्वांनी आपल्या नियमित वेळेत हजर रहा. बॉस बदलला असला तरी आपल्या पॉलिसी त्याच असतील हे सर्वांनी लक्षात ठेवा."

सगळ्यांना आजची सुट्टी जाहीर करत तिने शशांकचा लॅपटॉप आणि पेनड्राइव्ह स्वतःच्या ताब्यात घेतला आणि कॅब बुक करून ती तिच्या हॉटेलकडे निघाली.


न्यूयार्कला जाण्यापूर्वी एक वर्ष तिने शशांकसोबत ऑफिस सांभाळले होते त्यामुळे तिथल्या स्टॉफ मेंबर्सना ती ओळखीची होती. तिच्या निर्णयावर कोणाला काही वावगे वाटले नाही आणि त्यामुळे कसलाच विरोध न
करता तिच्या सूचना पाळत सर्व घरी परत निघाले.


********

"अंकल, काका आता बरा आहे ना?" कॅबमध्ये बसल्यावर तिने डॉक्टरांना फोन केला.


"हो. तू म्हणालीस तसा सौम्यच धक्का होता. हे असं काही होईल याची कल्पना तू मला दिली होतीस हे एका अर्थी बरंच झालं. पण शौर्या हे करणं गरजेचे होतं का? तू अचानक बिझनेसमध्ये का रस घेत आहेस?" डॉक्टर अमितने तिला प्रश्न केला.


"त्याचे उत्तर मी तुम्हाला इतक्यात देऊ शकणार नाही. पण अंकल मी काकांना भेटू शकते का?" तिने डोळे पुसत कातर स्वरात विचारले.


"शशी सध्या आऊट ऑफ डेंजर आहे पण तू समोर दिसलीस की कसा रिऍक्ट होईल सांगता येत नाही. शिवाय तुझ्या घरचे देखील तुझ्यावर चिडले असतील. तेव्हा तू इथे येऊ नयेस असंच मी म्हणेन." अमित तिला समाजवत म्हणाला.


"एकदा? फक्त एकदा भेटू द्या ना. हवे तर मी त्याच्याशी बोलणार सुद्धा नाही. समोरही जाणार नाही. दुरूनच बघून निघून जाईन. पण अंकल एकदा येऊ द्या ना हो." ती तळमळीने म्हणाली.


"ओके, ठीक आहे. बट बी केअरफुल. हार्ट पेशन्टशी डील करताना जरा सांभाळून रहा. मी शशीचा मित्र आहे आणि तू चुकीचे वागणार नाहीस हे ठाऊक आहे म्हणून तुला एक संधी देतोय."


"थँक यू अंकल." आलेल्या हुंदक्याला आवरत तिने कॉल कट केला.

हॉटेलमध्ये पोहचल्यावर थोडे फ्रेश होऊन ती हॉस्पिटलला निघाली. तिथे गेल्यावर सुनंदा, ललिता सर्वांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे तिला काहीच कळत नव्हते. आत्तापर्यंत वागत आलीय ते चूक की बरोबर या फंदातही तिला पडायचे नव्हते. यावेळी तिला फक्त तिच्या लाडक्या काकाला एकवार नजर भरून पहायचे होते.

तिची ही इच्छा पूर्ण होईल का?की पुन्हा नव्या वादाला सामोरे जावे लागेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*फोटो गुगल साभार.*
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//