Feb 23, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -३३

Read Later
हवास मज तू!भाग -३३
हवास मज तू!
भाग -३३

मागील भागात :-

मिस्टर दाससोबत मिटिंग साठी तयार केलेल्या फाईलवर शशांकची सही घेण्यासाठी जात असताना विहानला एक व्यक्ती धडकते. ती व्यक्ती कोण असेल? वाचा आजच्या भागात.


"आय एम सॉरी. मे आय हेल्प यू?"

फाईल्स गोळा करायला तो खाली वाकला तेव्हा त्याच्या सोबत खाली वाकत त्या व्यक्तीने विचारले.

त्या नजरेशी त्याची नजर भिडली आणि अचानक धक्का लागल्यागत तो जागेवरच खिळून उभा राहिला.


पायात हाय हिल्स, ब्रँडेड जीन्स, त्यावर चेक्सचे महागडे शर्ट, गव्हाळ वर्णाचा चेहरा, त्यावरचा न्यूड मेकअप, ओठावर हलक्या रंगाची लिपस्टिक, डोळ्यावर गॉगल आणि मोकळे सोडलेले केस..आणि या सर्वावर मात करणारा तिचा आत्मविश्वास!

"सॉरी हं. माझं लक्ष नव्हतं." जमा केलेल्या फाईल्स त्याच्या हातात देत ती म्हणाली.


"इट्स.. इट्स ओके. थँक यू." डोळ्यांची उघडझाप करत विहान कसेबसे बोलला.


"यू आर व्हेरी हँडसम गाय! आय लाईक यू."

त्याच्या गालाला हलकेच पिंच करून तिने एक फ्लायिंग किस दिली आणि डोळ्यावरचा गॉगल बाजूला करून हळूच एक डोळा मारत नव्याच्या केबिनचे दार उघडले.

हा अंदाज त्याच्यासाठी नवीन होता. एखाद्या मुलीने स्वतःहून जवळीक साधत अशी फ्लायिंग किस वगैरे.. त्याला ते आठवून अंगावर शहारा आला.

केसातून हात फिरवत नकळत त्याने तिने स्पर्श केलेल्या गालावरून हात फिरवला. आनंदात असताना नेहमी वाजवत असलेली त्याची शीळ मुखावाटे आपोआप बाहेर पडली.

"विहान सर, अहो आज ऑफिसमध्ये चक्क शीळ वाजवताय?"

प्यूनच्या आवाजाने त्याचे गोलाकार फिरणारे ओठ एकमेकांवर चिपकले आणि स्मित करून गप्प होत तो शशांकच्या केबिनकडे निघाला.

******

"दीऽऽ?" केबिनचे दार उघडले तसे दाराकडे बघून नव्या किंचाळलीच.


"ओ माय डिअर डार्लिंग निवी. कशी आहेस?" शौर्या धावतच तिच्याकडे आली.


"ओ माय गॉड! इज इट ट्रू? की मी स्वप्न बघत आहे?" शौर्याला प्रत्यक्षात समोर बघूनही नव्याचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.


"इट इज ट्रू निवी. आय एम बॅक." तिला मिठीत घेत शौर्या हसून म्हणाली.


"माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. प्लीज मला एक चिमटी काढतेस?"

"चिमटी काढून तुला हर्ट कसे करू? तुझ्यासाठी नो चिमटी, ओन्ली किशी." तिच्या गालावर ओठांनी आवाज करत एक पापी घेत ती म्हणाली.


"म्हणजे दी तूच आहेस. अशी किशी तर तूच घेऊ शकतेस." अत्यानंदाने नव्याने तिला परत मिठी मारली.

"दी, मी तुला किती मिस करत होते यार? असे वाटत होते की काहीतरी जादू व्हावी आणि तू माझ्यासमोर असावीस." डोळ्यातील ओल टिपत ती म्हणाली.


"मग मी आले की नाही बघ. आपण कितीही दूर असलो तरी तुझी साद माझ्या अंतर्मनापर्यंत लगेच पोहचते." तिचे गाल ओढत ओठावर एक गोड हसू घेऊन शौर्या खुर्चीवर जाऊन बसली.


"पण दी तू अचानक कशी आलीस? म्हणजे तुझी एक्साम सुरु आहे. तू घरी काही कळवलं नाहीस. घरी न येता परस्पर ऑफिसला आलीस. सोबत तुझे सामान देखील नाही. हे काहीतरी वेगळं वाटत नाहीये का?"


"हम्म. थोडं वेगळं वाटू शकतं. पण कधीतरी बदल हवाच असतो की नाही?आणि काही बदल चांगले असतात बरं."

"वॉव! माय स्वीट सिसो, मी किती हॅपी आहे म्हणून सांगू? थांब मी डॅडला कळवते. तोही तुला खूप मिस करतोय." तिने मोबाईल हातात घेतला.


"नो निवी, आधी मला तुला काही सांगायचेय." तिचा मोबाईल खाली ठेवत शौर्या.

"दी?"


"लुक एट मी. मला सांग, मी तुला कशी दिसतेय?" गालावर हात ठेवून तिने विचारले.


"एकदम क्लास. ब्युटीफूल. लेडी विथ ब्युटी अँड ब्रेन टुगेदर अशी एकदम ग्रेसफूल दिसते आहेस." नव्याने हसून कॉम्प्लिमेंट दिली.

"खरंच?"


"गळाशप्पथ!" नव्या म्हणाली तसे खळखळून हसत शौर्याने स्वतःला खुर्चीत झोकून दिले.


"निवी, तुला एक सिक्रेट सांगायचंय." तिच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत शौर्या.


"हम्म. सांग ना."


"आय एम इन लव्ह! मी प्रेमात पडलेय." ओठावर भलीमोठी स्माईल आणत ती म्हणाली.


"आँ? कधी? कुठे? आणि मला आत्तापर्यंत साधं सांगितलं देखील नाहीस?"


"श्शू.. अशी ओरडू नकोस. मला माझ्या आयुष्यातील बेस्ट मोमेन्ट एंजॉय करू दे." ओठावर बोट ठेवून डोळे मिटत ती खुर्चीला रेलून बसली.


"दी, आय एम क्वाएट एक्साईटेड. प्लीज त्याच्याबद्दल मला सांग ना. तो तुला कुठे भेटला? लेट मी गेस.. कॉलेजच्या आवारात? की एक्झाम हॉलमध्ये?

थांब मीच सांगते. तुम्ही दोघं एकमेकांना अचानक आदळलात. तुझ्या हातातील पुस्तकाची पाने खाली पडल्यामुळे अस्त्याव्यस्त उडताहेत, तो तुला ते गोळा करून देतोय आणि त्याच्या घाऱ्या डोळ्यात तू अगदी हरवून गेलीहेस.. एकदम फिल्मी स्टाईल.

तुमच्या लव्ह स्टोरीची अशीच सुरुवात झालीय ना? माझा गेस बरोबर आहे की चूक?" तिच्या गळ्यात हात गुंफत नव्या उत्सुकतेने विचारत होती.


"अर्ध बरोबर आणि अर्ध चूक." तिच्या नाकाला ओढत शौर्या किंचित हसली.

"आम्ही दोघं नकळत एकमेकांना आदळलो हे खरं आहे. पण माझ्या नाही तर त्याच्या हातातील फाईल्स खाली पडल्या. मी त्याला ते उचलून देत असताना आमची नजरानजर झाली आणि त्याच्या काळ्याभोर डोळ्यात मी अलगद अडकले.

अँड ऑफकॉर्स, तो सुद्धा. पहिल्याच नजरेत दोघांच्याही हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या आणि मनातच प्रेमाची कबुलीही दिली.

उफ्फ! निवी.. तो चेहरा आणि ती नजर माझ्या हृदयात घट्ट रुतून बसलीय. डोळ्यासमोर नसला तरी मनातून तो चेहरा बाजूला ढळतच नाहीये गं.

आय एम सो हॅपी निवी. आय एम इन लव्ह. आय एम इन लव्ह." ती उठून एक गिरकी घेत म्हणाली.


"वॉव दी, मी सुद्धा खूप खूष आहे. मला सांग ना, तुला तो कुठे भेटला?" तिची उत्सुकता शिगेला पोहचली.


"हे काय? आत्ताच. जस्ट पाच मिनिटांपूर्वी. तुझ्या केबिनबाहेरच. आय थिंक, तो इथूनच बाहेर पडला असावा आणि तेव्हाच मला धडकला आणि त्याच क्षणी मी प्रेमात पडले." तिचा चेहरा चमकत होता.

"दी, आर यू सिरीयस? आत्ता तर इथून फक्त विहान बाहेर गेला होता. तू त्याला धडकलीस?"


"तो कोण होता ते खरंच मला माहित नाही. विहान असेल तर तोच सही. तसेही नावात काय ठेवले आहे?
बट निवी, आय रिअली लव्ह्ज हिम. लव्ह एट फर्स्ट साईट! तुला कळतंय ना?" ती अजूनही तिच्याच फिवरमध्ये होती.


"दी, तू माझी मस्करी करते आहेस ना? मी सुद्धा काय गं तुझ्या बोलण्यात आले? आता हे पुरे झाले हं. मी विहानला इथे बोलावून घेतेय. मग तुम्ही दोघं निवांत बोला. त्यापेक्षा आपण दोघी डॅडच्या केबिनमध्ये जाऊया. तिथे त्या दोघांशीही तुला भेटता येईल." नव्या हसत म्हणाली.


"तुला काय वाटतंय, मी मस्करी करतेय?" अचानक शौर्याच्या बोलण्याचा टोन बदलला.

"आय एम क्वाइट सिरीयस स्टुपिड. मी खरंच त्याच्या प्रेमात पडलेय आणि तोही माझ्यात हरवला होता. निवी, मला तो हवाय. ऑन एनी कॉस्ट."

"दी, हे काय बोलते आहेस तू? माझं विहानवर प्रेम आहे. रादर वी बोथ लव्ह इच अदर. ही प्रपोज्ड मी. तुला हे सारं ठाऊक आहे ना?" नव्याच्या चेहऱ्यावरचा रंग फिका पडू लागला.

"आय डोन्ट केअर. त्याचे तुझ्यावर प्रेम आहे की तुझे त्याच्यावर, मला काहीही फरक पडत नाही. मला तो आवडलाय आणि तो मला हवाय. बस्स! इट्स इनफ." ती तोऱ्याने म्हणाली.


"दी.. प्रेम असं जबरदस्तीने नाही गं होत." निवी कापऱ्या स्वरात बोलायचा प्रयत्न करत होती.


"हे तू मला शिकवायची गरज नाही. तुला काय वाटतं? तू या कंपनीशी जुळली आहेस म्हणून तूच तेवढी हुशार? तुलाच सारं काही येतं? आजपासून नव्हे तर आत्ता या क्षणापासून या कंपनीत मी प्रवेश केलाय. तुझ्यापेक्षा मी किती बेटर आहे हे लवकरच तुला कळेल."


"दी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. प्लीज असं नको ना बोलूस. तू माझ्यापेक्षा बेटर आहेस हे प्रूव्ह करायची काहीच गरज नाहीय. विहानचे माझ्यावर प्रेम आहे आणि हेच खरं आहे गं." नव्या रडवेली झाली.


"तुझा त्याच्यावर एवढा विश्वास आहे? तो एसकेच्या केबिनमध्ये आहे ना? चल मग. तिथेच खऱ्या खोट्याचा निवाडा होईल." छद्मीपणे हसत शौर्या खुर्चीवरून उठली.

******

"शौर्या, माय प्रिन्सेस! व्हॉट अ प्लिजन्ट सरप्राईज?" त्या दोघी आत येताच शशांकने उठून तिला कडकडून मिठी मारली.

"काही न कळवताच अशी अचानक कशी आलीस?"

"अचानक आले म्हणून तर मी प्रेमात पडले." विहानवर नजर रोखून ती उत्तरली.

"आय वॉन्ट टू जॉईंन अवर बिझनेस. अचानक शिक्षणातील रस आटून मला बिझनेस करावासा वाटला आणि मी परतीची वाट धरली आणि आता आजपासून मी इथे जॉईन होतेय." कुणी काही बोलायच्या आत शौर्या शशांकला स्पष्टीकरण देत गोड हसली.

तिच्या बोलण्यावर शशांकची काय प्रतिक्रिया असेल? वाचा पुढील भागात.
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*फोटो गुगल साभार.*
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//