हवास मज तू!
भाग -३२
भाग -३२
मागील भागात :-
नव्याला शौर्याबद्दल वाईट स्वप्न पडते आणि तिच्या काळजीने ती अस्वस्थ होते. शशांकदेखील तिच्या काळजीत पडतो. पण तसे न दाखवता तो शौर्या ठीक असेल असे नव्याला समजावतो.
आता पुढे.
"निवी, असं काही नाहीये. तू तुझ्या डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. तिची एक्साम तिच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुला आणि मलाही ठाऊक आहे. तेव्हा हा विषय सोडून दे. तसेही दोन दिवसानंतर ती कॉल करेलच आणि बहुतेक पुढल्या आठवड्यात परत देखील येईल. तेव्हा कूल डाऊन." तो तिला समजावत म्हणाला.
"एक आठवडा म्हणजे वन वीक, म्हणजे सेव्हन डेज म्हणजे तब्बल वन हँड्रेड अँड सिक्सटी एट अवर्स! बापरे! डॅड इतके दिवस मी तिची कशी वाट बघू यार? मला तिला लगेच भेटावेसे वाटते आहे. असे वाटतेय की काहीतरी जादू व्हावी आणि दी लवकरच इथे येऊन जावी." ती ओठ दुमडत छोटासा चेहरा करून म्हणाली.
"नौटंकी, एका आठवड्याने फारसे काही बिघडणार नाहीये. तेव्हा हा हिशोब सोड आणि परवा मिस्टर दाससोबत जी मिटिंग ठेवली आहे त्याचे प्रेजेंटेशन तयार करायला लाग." तिच्या डोक्यात टपली मारत शशांक म्हणाला.
"ओके बॉस. तुम्ही म्हणाल तसे. आफ्टरऑल बॉस इज आल्वेज राईट." ती खुर्चीवरून उठत म्हणाली.
"निवी.." ती जात असताना त्याने हाक मारली.
"हं?" त्याच्याकडे वळत ती.
"शौर्याची काळजी मलाही आहे. पण ती बरी आहे हे समजून घे. कारण काही असतं तर ती किमान माझ्याशी तरी बोलली असती. आमच्यात तेवढी बॉण्डिंग नक्कीच आहे." तो मृदू आवाजात बोलत होता.
"हम्म."
"मिस्टर दाससोबतची ही मिटिंग खूप इम्पॉर्टन्ट आहे. त्यामुळे ती तू एकटीने हॅन्डल करावीस अशी माझी इच्छा आहे. हवे तर विहानला सोबतीला घेऊ शकतेस. त्यालाही इथल्या सर्व कामकाजाची माहिती असायला हवी. शेवटी तुम्हा दोघांनाच तर हे सर्व सांभाळायचे आहे." तो त्याच अंदाजात पुढे म्हणाला.
"डॅड, असा काय बोलतोस रे?" ती हळवी झाली.
"खरं तेच बोलतोय. ही कंपनी उभी करण्यात किती मेहनत लागली याचा तुला कदाचित अंदाज नसेल. रक्ताचं पाणी करून, दिवसरात्र राबून आपण इथवर पोहचलोय. चांगले, वाईट सगळेच दिवस मी अनुभवले आहेत. पण आता पुरे गं. आता मला रिटायर्डमेंट घ्यायची आहे.
कंपनी, इस्टेट, पैसा.. या सर्वात शौर्याला तर काडीचाही इंटरेस्ट नाहीय. तेव्हा या सगळ्याची जबाबदारी तुझ्यावरच आहे आणि विहानच्या सोबतीने ती तू योग्य रीतीने निभावशील यात शंका नाही. म्हणून त्याला सोबतीला घे असं बोलतोय."
"डॅड, मी माझी जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेन पण तू इतक्यात रिटायर्ड व्हायचे बोलू नकोस ना. प्लीज." त्याच्या गळ्यात हात गुंफत गालाला गाल घासून ती म्हणाली.
"लाडोबा, अशी वागलीस की वाटतं माझी छोटूशी निवी आहेस तू. मी ऑफिसला असलो की दिवसभर शौर्याच्या मागे मागे फिरणारी आणि मी घरी परतल्यावर असेच गळ्यात हात गुंफणारी, गालाला गाल घासून पापी घेणारी माझी इवलीशी निवी." त्याच्या डोळ्यात आपसूकच पाणी तराळले.
"तुला दी ची खूप आठवण येत आहे ना? आय नो, यू आर मिसिंग हर. बट डोन्ट वरी, पुढच्या विकमध्ये येईल ती आणि एक आठवडा म्हणजे फार काही नाही बरं. ओन्ली सेव्हन डेज." त्याच्या गालाची पापी घेत ती म्हणाली.
"दी आली ना की मी तिला कुठे कुठेच जाऊ देणार नाही. खूप फिरलीय ती. आता पुरे झाले. आपल्या घरात तिला बांधिस्त करून ठेवेन. म्हणजे ती आपल्याला सोडून पुन्हा कुठे जाऊच शकणार नाही." ती हसून म्हणाली.
"हम्म. तुझी बहीण आहे ती. तिने तुझं ऐकायलाच हवं. बरं फॅमिली ड्रामा पुरे झाला. त्यात तुला एक महत्त्वाचे सांगायचे राहूनच गेले." शशांक.
"आता काय?" बाजूला होत ती.
"बिझनेस मधील सर्वांत महत्त्वाची बाब. ती म्हणजे आपले पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ मध्ये मिक्स करायची नाही. जगासमोर आजवर आपण दोघं जसे प्रोफेशनली वागत आलो आहोत तेच वागणे मला तुझ्या आणि विहानकडून अपेक्षित आहे. मला काय म्हणायचे आहे ते तुझ्या लक्षात येत आहे ना?"
"येस माय डिअर डॅड.. सॉरी. येस सर." ती जीभ चावत म्हणाली.
"गुड गर्ल. नाऊ गो अहेड अँड कॉन्सन्ट्रेट ऑन वर्क." त्याने तिला अंगठा दाखवला तशी ती स्मित करून त्याच्या केबिनबाहेर पडली.
"विहान, या फाईल्स चेक कर. त्यात काही बदल करायचे असल्यास ते तू नोट करून घे." नव्या विहानला सांगत होती. तिने त्याला तिच्या केबिनमध्ये बोलावून घेतले होते.
"ओके मॅम. यू डोन्ट वरी. मी चेक करतोय."
"हा प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टन्ट आहे. त्यात कंपनीसोबतच
आपल्या दोघांच्या भविष्यासाठी देखील फार उपयोगी पडणार आहे." त्याला समजावत ती.
"म्हणजे?"
"म्हणजे आपल्या दोघांचा एकत्रित मिळून केलेला हा पहिला प्रोजेक्ट असेल. तो सक्सेस झाला तर आपल्या प्रमोशनचेही चान्सेस वाढतील." ती मिश्किल हसत म्हणाली.
"मॅम, ही तुमची कंपनी आहे. तुम्हाला अशा प्रमोशनची काय गरज?" तिच्याकडे बघून तो आश्चर्याने म्हणाला.
"हे केवळ तुला ठाऊक आहे, जगाला नाही आणि आज मी ज्या पोस्टवर आहे ते केवळ माझ्यातील कॅलिबर मुळे आहे. माझ्या नावामुळे नाही."
"ओह, सॉरी. मला असे नव्हते म्हणायचे. प्लीज गैरसमज करून घेऊ नको ना."
"गैरसमज नाही रे. मी तुला रिऍलिटी सांगते आहे. डॅड इथे प्रत्येकाला समान संधी देतात फक्त समोरच्याला त्याचे सोने करता यायला हवे. आज मी या खुर्चीवर आहे, तुझ्या मेहनतीने उद्या तू सुद्धा या खुर्चीचा भागीदार होऊ शकशील." ती त्याला स्पष्टीकरण देत म्हणाली.
"मी तुझ्या समोर गेलेला तुला आवडेल?" तिच्या डोळ्यात बघत त्याने प्रश्न केला.
"ऑफकॉर्स! तुला मोठा पल्ल्यावर पोहचल्याचे मला बघायचे आहे." ती.
"तुला किती मोठा पल्ला हवाय ते सांग. तू म्हणशील तर एसके सरांची खुर्ची सुद्धा ताब्यात घेईन मी. पण तुला ते चालेल का?" तिच्यावर नजर रोखत त्याने विचारले.
"मिस्टर विहान, त्या खुर्चीपर्यंत पोहचायला खूप मेहनत करावी लागेल. इतक्या सहज ती कुणाला मिळणार नाही कारण सध्या आपली तेवढी लायकीच नाहीये." ती हसून उत्तरली.
"आय एम सॉरी. तुला राग तर नाही ना आला? मी फक्त गंमत केली. खरंच." चेहऱ्यावर निरागसतेची झालर चढवत तो म्हणाला.
"नाही रे. राग का येईल? मोठी स्वप्न बघणे कायद्याने गुन्हा थोडीच आहे?" ती दिलखुलास हसत म्हणाली.
"स्वप्न बघायला हवीतच. पण ज्याच्यामुळे आपण आहोत त्याच्या पुढे जाण्याचे माझे स्वप्न कधीच नसेल. नव्या, एसके सरांमुळे मी इथे आहे आणि आता तुझ्या रूपात माझं आयुष्यदेखील इथेच आहे.
माझ्यासाठी ते नेहमीच देवासारखे आहेत आणि स्वतःला आपण आपल्या देवाच्या स्थानी ठेवू शकत नाही ना? आपले स्थान कायम खाली असते, त्यातही आपण समाधानी असतो. मी आयुष्यभर माझ्यासाठी देवमाणूस असणाऱ्या या महान व्यक्तीच्या हाताखाली काम करायला तयार आहे. त्यांच्यापेक्षा मोठं व्हायची माझी कधीच लालसा नसेल."
तो बोलत होता आणि त्याचा एकेक शब्द नव्या आपल्या हृदयात सामावून घेत होती.
"विहान, तू किती सच्च्या मनाचा आहेस रे? आजचे तुझे हे पुन्हा नवे रूप माझ्यासमोर आलेय आणि मी परत तुझ्या प्रेमात पडलेय. आय लव्ह यू टू मच." त्याच्या जवळ येत ती म्हणाली. त्याचे विचार ऐकून डोळ्यातून उगीचच दोन थेंब गालावर उतरले.
"तू अशी जवळ आलीस की मग मला तुला मिठीत घ्यावेसे वाटते. सांग ना, का इतके प्रेम करतेस माझ्यावर?" तिच्या कमरेभोवती हात गुंफत तो म्हणाला.
"ते तू स्वतःला विचार. का दरवेळी मला आपल्या प्रेमात पडायला भाग पाडतोस?" त्याच्या मिठीत शिरत ती हलकेच उद्गारली.
"नव्या मॅडम.." तिच्या कानाजवळ हळुवार फुंकर घालत त्याने साद दिली.
"हम्म."
"आपण सध्या मिस्टर दाससमोर सादर करायच्या प्रोजेक्टवर बोलायला एकत्र आलो आहोत. मग तुमची परवानगी असेल तर आता सुरु असलेला प्रोजेक्ट काही वेळासाठी थांबवायचा का?" त्याने मिश्किलीत विचारलेल्या प्रश्नावर त्याला धक्का देत ती त्याच्या मिठीतून दूर झाली.
"विहान तू असा गोड गोड बोलून मला गुंडाळतोस ना की मग मी आपसूकच तुझ्या मिठीत खेचल्या जाते." त्याला चापटी मारत ती तिच्या जागेवर येऊन बसली.
"स्वीटू, मी तेच सांगतोय. आपले पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन एकत्र आणायला नको. कामाच्या वेळी केवळ कामच करूया." लॅपटॉपवर नजर टाकत तो म्हणाला.
"अगदी डॅडसारखा बोललास बघ. तो आत्ता मला हेच सांगत होता. तू डॅडची कॉर्बन कॉपी आहेस रे. खूपदा तुझे आणि त्यांचे विचार मॅच होतात आणि मग मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडल्याचा भास होतो."
"वेडीच आहेस तू. आता कामाकडे लक्ष दे मी काही नोट्स काढून तुला मेल केलेत ते बघून घे." तो स्मित करून म्हणाला आणि ती त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर पुन्हा भाळली.
*******
"विहान, सर्व काही ओके आहे. आपली दोन दिवसांची मेहनत आज नक्कीच त्याचे फळ देणार आहे बघ. तू तुझे काही वर्क राहिले असेल तर आटोपून घे. अर्ध्या तासात आपल्याला मिस्टर दासना भेटण्यासाठी निघायचे आहे." नव्या त्याला सांगत होती. फायनली मिटिंगचा दिवस उजाडला होता.
"येस, त्याचे फळ नक्कीच मिळेल. मी या फाईल्सवर सरांची सही घेऊन येतो. मग थोड्या वेळाने निघुयात." तो केबिनबाहेर येत म्हणाला.
तो बाहेर यायला आणि कुणीतरी अचानक त्याच्याशी धडकायला एकच गाठ पडली. त्यासरशी त्याच्या हातातील फाईल्स खाली पडल्या.
"आय एम सॉरी. मे आय हेल्प यू?"
फाईल्स गोळा करायला तो खाली वाकला तेव्हा त्याच्या सोबत खाली वाकत त्या व्यक्तीने विचारले.
त्या नजरेशी त्याची नजर भिडली आणि अचानक धक्का लागल्यागत तो जागेवरच खिळून उभा राहिला.
कोणाला बघून विहानला धक्का बसला असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*फोटो गुगल साभार.*
******
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*फोटो गुगल साभार.*
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा