Mar 02, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -३०

Read Later
हवास मज तू! भाग -३०
हवास मज तू!
भाग -३०

मागील भागात :-

नव्या चुकीच्या मुलाच्या प्रेमात असल्याचे शौर्याला तिची मैत्रिण शिरीनकडून कळते. तिच्या काळजीपोटी काय करावे हे शौर्याला उमगत नाही.

आता पुढे.

"शौर्या, ते फोटोज डिलिट झाले आहेत. बट बिलीव्ह मी. माझी नजर धोका खाणार नाही, हे मला माहिती आहे. देअर वाज अ कॅप्शन विथ द्याट पीक.
'..अँड फायनली आय फाउंड माय लव्ह!
हॅश टॅग बर्थडे सेलिब्रेशन विथ माय ब्युटीफूल लेडी.'

एक्झाक्टली हेच ते कॅप्शन. मला हे ठामपणे आठवतंय कारण मी आत्ताच ते रीड केले आहे."

शिरीन विश्वासाने सांगत होती आणि ते ऐकून शौर्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडू लागला होता.


"शिरीन असं नको व्हायला. तो मुलगा कसा आहे तुला माहिती आहे ना?" स्वतःचा मोबाईल हातात घेत ती अधीरतेने बोलत होती.

"शौर्या, काम डाउन डिअर. मला माहिती आहे म्हणूनच तर तुला मी हे सांगितले ना." शिरीन तिला धीर देत म्हणाली.


शौर्याने तिचा व्हाट्सअप सुरु केला. त्यात विहान घरी आल्यानंतर त्याची उडालेली तारांबळ, त्याच्या साजरा केलेला वाढदिवस यांचे रसभरीत केलेल्या वर्णनाचे डझनभर मेसेज तिच्या इनबॉक्स मध्ये येऊन पडले होते.

ते सगळं वाचताना तिला आनंद होण्याऐवजी त्रास होऊ लागला. सर्व मेसेज भराभर वरती स्क्रोल करत तिने नव्याने पाठवलेले फोटो बघायला सुरुवात केली.

विहानच्या वाढदिवसाचे फोटो, त्याने तिला रिंग घातलेल्या बोटाचा फोटो.. सारेच फोटो नजरेसमोरून सरकत होते. प्रत्येक फोटोत एकच साम्यता. त्यात झळकणारा नव्याचा हसरा चेहरा आणि विहानचे ओझरते रूप. एकाही फोटोमध्ये तो स्पष्ट दिसत नव्हता.


"शिरीन, लुक. या एकाही फोटोत त्याचा चेहरा नीट दिसत नाहीये. तरीही तो तोच आहे हे तू खात्रीपूर्वक सांगू शकतेस का?" शौर्या उत्तराच्या प्रतीक्षेत तिच्याकडे बघत होती.


"येस डिअर, आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर अबाऊट हिम. ही तुझी यंगर सिस्टर, तिचा ड्रेस, तिथले लोकेशन सारं काही सेम टू सेम मॅच होतेय." शिरीन पूर्ण खात्रीनिशी बोलत होती.

"याने असे करायला नको होते शिरीन. ही इज प्लेईंग विथ माय इनोसंट निवी. तो तिचा एखाद्या प्याद्याप्रमाणे वापर करतोय. पण मी त्याला हे करू देणार नाही." बोलता बोलता तिचा श्वास लागला.

"शौर्या, आर यू ऑलराईट?"


"देअर इज नथिंग ऑलराईट इन माय लाईफ. सगळं लाईफ मेस झालंय. तेव्हा मी ऑलराईट कशी असू शकेन शिरीन?" तिचे डोळे भरून आले.

"शौर्या.."


"शिरीन, आय वॉन्ट टू गो बॅक टू इंडिया. ॲज अर्ली ॲज पॉसिबल." डोळ्यातील अश्रुंना तिथेच रोखत ती म्हणाली.


"शौर्या, युअर्स एक्साम्स आर गोइंग ऑन.."


"शिरीन, कधी कधी आयुष्य आपली अशी परीक्षा घेतो की त्यापुढे इतर सारे काही गौण वाटायला लागतं. सध्या माझी तीच अवस्था झालीये. कॉलेज एक्साम्स पेक्षा मला ही एक्साम जास्त महत्त्वाची आहे." ती एका वेगळ्याच निर्धाराने म्हणाली.


"शौर्या, बघ उगाच आतातायीपणा करू नकोस. थोड्यावेळासाठी हे सगळं बाजूला सार आणि कॉलेजला जायची तयारी कर. ओके ना? मी सुद्धा तयार होऊन आलेच." शिरीन तिच्याजवळून उठत म्हणाली.

शिरीन गेली पण शौर्या तशीच बसून विचारांच्या गर्तेत हरवली होती. आता काय करावे? तिला काहीच सुचत नव्हते. राहून राहून नव्याचा हसरा चेहरा डोळ्यासमोर तरळत होता.


तिची लाडकी नव्या प्रेमात पडलीय हे तिलाच तर सर्वात आधी उमगले होते. विहान तिच्या आयुष्यात आल्यापासून तिच्यात किती बदल झाला होता हे ती इतक्या दुरूनसुद्धा अनुभवत होती. क्षणभर वाटलं नव्यालाच कॉल करून सांगावे की ज्या मुलाच्या प्रेमात तू आकंठ बुडाली आहेस तो तुझा केवळ वापर करतोय. पण ती यावर विश्वास ठेवेल का? या प्रश्नाचे उत्तर 'नाही% असेच येत होते.

'निवी, काय केलेस यार हे? कुठल्या मुलाला तू निवडलेस? पण तुझा काय दोष? तू तर निरागस अशी कोवळी कळी, माझा गोड बच्चा आहेस तू. कुणावरही चटकन विश्वास टाकतेस. माणसं ओळखता येत नाही गं तुला म्हणून त्याने तुला जाळ्यात अडकवलंय.' शौर्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले होते.

कितीही प्रयत्न केला तरी नव्याचा नंबर डायल करण्याची हिंमत तिला होत नव्हती.

'एसके!' तिच्या डोळ्यापुढे एकच पर्याय उरला. मिस्टर शशांक केळकर. पण तो तरी इतक्या सहज कसा विश्वास ठेवेल? विहानसोबत गेल्या महिन्याभरापासून तो काम करतोय. त्याच्यावर तो किती इम्प्रेस्ड झालाय हे तिला ठाऊक होते.

'पण मी त्याची प्रिन्सेस आहे. तो माझ्यावर का विश्वास ठेवणार नाही? त्याला ठेवावेच लागेल.' तिने घाईघाईत डायल लिस्टमधून शशांकचा नंबर बाहेर काढला.

'मी प्रिन्सेस असेल तरी निवी त्याचा जीव आहे. विहानने त्यांच्या डोळ्यावर खोट्या प्रेमाची बांधलेली पट्टी तो उघडू शकेल का?' विचारांच्या गर्दीने तिच्या डोक्यात वादळ उठले आणि कुणाला कॉल करायच्या आत तिच्या हातातील मोबाईल खाली गळून पडला.


"आय एम रेडी. व्हाट्स अबाऊट यू?" दहा मिनिटांनी शिरीन आपले आवरून बाहेर आली. तिचा आज पेपर नव्हता पण एक्स्ट्रा क्लासमुळे तिलाही कॉलेजला जायचे होते.

तिचा काहीच प्रतिसाद नाही हे बघून शिरीन जवळ आली तर शौर्या बेडवर पडली होती आणि हातून निसटलेला मोबाईल खाली पडून त्याची बॅटरी बाहेर निघाली होती.

"शौर्याऽऽ" शिरीन घाबरून किंचाळली.

"शौर्या व्हॉट हॅपन्ड डिअर?"तिला असे बघून शिरीनच्या हृदयाचे ठोके वाढले होते.

तिने लगेच तिच्या बॉयफ्रेंडला हॅरीला कॉल करून बोलावून घेतले. तसाही तो तिला पीकअप करायला निघाला होता त्यामुळे वाटेत असल्याकारणाने पाच मिनिटात त्यांच्या फ्लॅटवर पोहचला.

"शिरीन, व्हाट्स द मॅटर?" आल्या आल्या त्याने प्रश्न केला.

"आय डोन्ट नो ॲक्झाक्टली, बट आय थिंक देअर इज अ नीड टू हॉस्पिटलाईज हर." ती आताही घाबरली होती.

"डोन्ट वरी, शी विल बी फाईन." तिला दुजोरा देत तो म्हणाला.

थोड्याच वेळात ते दोघे शौर्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तपासाअंती तिचे ब्लडप्रेशर अचानक वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि काही औषधं देऊन संपूर्ण दिवस निरीक्षणासाठी हॉस्पिटमध्ये भरती ठेवले.


"शिरीन,काळजी करू नकोस, मी आता बरी आहे. तेव्हा तू जाऊ शकतेस." थोडे स्टेबल झाल्यावर शौर्या शिरीनला म्हणाली.

"बेबी, आर यू शुअर?" तिचा हात हातात घेत शिरीन.

"याह, आय एम ॲब्सल्यूटली फाईन आणि काही लागलेच तर काळजी घ्यायला इथे नर्स आहेतच. सो डोन्ट वरी. अँड हॅरी, थँक्स डिअर." तिने हॅरीकडे बघून स्मित केले तसे त्यानेही हसून तिला प्रतिसाद दिला.


"शौर्या, टेक केअर. मी काही वेळाने येईलच." तिच्या हातातून हात सोडवत शिरीन जायला निघाली आणि काहीसे आठवून परत माघारी आली.

"शौर्या, तुझा मोबाईल. स्विच ऑफ आहे. तुझ्या घरच्यांचा कॉल आल्यावर काय सांगायचे हे न कळल्यामुळे मी तो ऑन केला नाही."
तिच्या शेजारी मोबाईल ठेवून शिरीन हॅरीसोबत निघून गेली.

शौर्याने मोबाईल कडे नजर टाकली आणि डोळे मिटून घेतले. इथे येण्यापूर्वी काय घडले हे तिला आठवत होते. शशांकला कॉल करून सांगावे या विचारात असतानाच अचानक तिला घेरी आली होती आणि हातून मोबाईल खाली पडला होता.

तिच्या मिटलेल्या डोळ्याच्या कोणातून अश्रुंचे काही थेंब गालावर ओघळले. डोळ्यासमोर शशांक आणि नव्याची पुसटशी आकृती उभारत होती.

'आय लव्ह निवी अँड आय लव्ह यू टू. मला तुम्हा दोघांनाही त्रासात पहावयाचे नाहीये. त्यामुळे सध्यातरी मी काहीच सांगू शकत नाही. डिअर एसके, आय एम सॉरी.' तिचा हुंदका दाटून आला.


"यंग गर्ल, आर यू इन अ स्ट्रेस?" तिला चेक करायला आलेल्या डॉक्टरांनी हसऱ्या चेहऱ्याने विचारले.

"नो, नॉट एट ऑल." कसनुसे हसून ती उत्तरली.

"तुझा ब्लडप्रेशर एकदम वाढला होता. तेव्हा काही स्ट्रेस असेल तर त्याला इथेच सोडून तुझ्या घरी जा. इतक्या यंग एज बीपी शूट व्हायला नकोय. आता सगळं नॉर्मल लिमिट्स मध्ये आहे. पण काही दिवस तुला मेडिसिन प्लस रेग्युलर चेकअप करत रहावे लागेल."

"येस डॉक्टर." तिने मान डोलावली.

******
"दीऽऽ" नव्याच्या किंचाळीने बाजूला झोपलेले शशांक आणि सुनंदा उठून बसले.

"निवी, काय झालेय?" तिच्या अंगावर दरदरून फुटलेला घाम बघून तिला पाणी देत घाबरून विचारले.

"मम्मा, डॅड.." ती अजूनही घाबरली होती.

"हं बेटा, बोल. काही वाईट स्वप्न पाहिलंस का?" शशांक तिला थोपटत म्हणाला.

स्वप्न? हम्म. स्वप्नच होते. पण डॅड ते खूप भयानक स्वप्न होते." ती रडवेली होत उत्तरली.


नव्याने स्वप्नात काय पाहिले असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*फोटो गुगल साभार.*
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//