Mar 02, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -दोन

Read Later
हवास मज तू! भाग -दोन
हवास मज तू!
भाग -दोन.

"पण सर नव्याने खूप मेहनतीने तिचे प्रेजेंटेशन तयार केले आहे. सो ते तिलाच प्रेजेंट करू दिलेले योग्य राहिल." काहीसा चाचरत विनीत म्हणाला.


"तीच मेहनत तिने वेळेवर येण्यासाठी पण घ्यायला हवी होती. सोड ते. यू प्रोसिड ऑन." मिस्टर केळकर.

"एक्सक्युज मी.. " तेवढ्यात नव्या पळतच आत आली. "मी आलेय. दोन मिनिटं उशीर झालाय, सॉरी. पण मी लगेच प्रेजेंटेशन सुरू करते." बोलताना तिला धाप लागली होती.

मिस्टर केळकरांनी एकवार तिच्याकडे पाहिले आणि मग नाखुशीनेच तिला परवानगी दिली.

"थँक यू सर." तिने त्यांच्याकडे बघून स्मित केले आणि विनीतकडून प्रोजेक्टरचा ताबा घेतला.

अर्धा तास ती प्रेजेंटेशन देत होती. एखाद्या कसलेल्या एम्प्लॉयी सारखा आत्मविश्वास तिच्यात संचारला होता. सकाळपासून वाटणारी भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती.

".. अँड धिस इज ऑल. इफ एनीवन हॅव एनी क्वेरीज प्लीज आस्क. तुमच्या शंका दूर करायला आवडतील मला." ती आत्मविश्वासाने म्हणाली तसे केळकरांच्या ओठावर हलके स्मित उमटले.

"मला काही बोलायचे आहे." कुणीच काही बोलत नाही हे बघून शेवटच्या खुर्चीवर बसलेल्या तरुणाने हात वर केला.

"येस, प्लीज." ती.

"शंका नाही, पण मला जे वाटतंय ते मी सांगू इच्छितो. मॅम, तुमचा कॉन्सेप्ट मला पटलाय. पण तरी काही ठिकाणी थोडं खटकतेय. तुम्ही सांगितलेल्या चौथ्या पॉईंट मध्ये आपण असं केलं तर.." तो बोलत होता आणि ती त्याच्याकडे बघतच राहिली.

"एक्सक्युज मी? तुम्ही?" त्याचे बोलणे मध्ये तोडत ती.

"मिस नव्या, ही इज मिस्टर विहान. आपल्याकडे कालच नव्याने अपॉइंट झालेत. नव्या तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. मला थोडे बोलायचे आहे आणि मिस्टर विहान पंधरा मिनिटांनी तुम्ही सुद्धा या. तुमचे मत आपण तिथेच डिस्कस करूयात." आपल्या केबिनकडे निघत मिस्टर केळकर म्हणाले.

नव्या देखील त्यांच्या मागोमाग केबिनमध्ये गेली. 

ते आपल्या खुर्चीवर बसले. समोर टेबलवर त्यांची नेमप्लेट होती. 'मिस्टर शशांक केळकर.' नव्या त्या नेमप्लेटकडे बघत उभी होती.

'मिस्टर एसके तुम्ही मला आता ओरडणार आहात का? ओरडा एकदाचे. तुमचा ओरडा खायला मी तयार आहे. बरं झालं तुम्ही कॉन्फरन्स हॉल मध्ये मला काही बोलला नाहीत. नाहीतर माझी काय इज्ज्जत राहिली असती?' ती मनात परत बडबड करायला लागली.

शशांकची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. तिचा गोंधळलेला चेहरा बघून त्याला हसू येत होते पण त्याने आपला चेहरा निर्विकार ठेवला.

"मनातील बोलून झाले असेल तर तू बसू शकतेस." तिच्याकडे बघतच तो म्हणाला.

"सॉरी सर. थँक यू." ती त्याच्या पुढयात बसत म्हणाली.

"व्हाय आर यू लेट टुडे? तुला माहिती होते ना की आजचे प्रेजेंटेशन किती इम्पॉर्टन्ट होते ते? पुन्हा एक सेकंद जरी उशीर झाला असता तरी तुझा चान्स गेला असता." तिच्याकडे बघून तो.

"सॉरी सर. ॲक्च्युअली रस्त्यात एक गाय आडवी आली आणि त्यानंतर माझी कार बंद पडली सो.. "

"आर यू सिरीअस निवी? एका गायीमुळे तुला उशीर झाला?"

"डॅड, आता तूही माझ्यावर विश्वास नको ठेऊ." त्याने निवी म्हटले आणि ती डोळ्यात पाणी आणून बोलू लागली. "एकतर आपल्या घरातील दोन महान स्त्रिया, त्या नाश्त्यासाठी मागे लागल्या. त्यांच्यामुळे आधीच उशीर झाला. त्यात ती गाय आणि मग एका सायकोने कारला दिलेली धडक. तरी यातून सहीसलामत मी ऑफिसला आले. केवळ दोन मिनिटांचा उशीर झाला मला. तरी कौतुक सोडून कसला रागावतोस रे. खरंच खडूस एसके म्हणतात ना तुला ते अगदी खरे आहे. तुला ना बरोबर सुट होतं ते." ती सुसाट सुटली.

"मिस नव्या. " घसा खाकरत तो करड्या आवाजात म्हणाला.

"सॉरी सर." तिने जीभ चावली. भावनेच्या भरात जरा जास्तच बोलून गेल्याचे तिला जाणवले.

"निवी, तुला माहिती आहे ना की तू ब्रेकफास्ट स्किप करायचा नाहीस, तरी तू अशीच निघाली होतीस? यू नो की.. "

"येस डॅड, आय नो की आय एम डायबिटीक. पण मग तू तरी का एवढ्या सकाळी सकाळी प्रेजेंटेशन ठेवतोस रे? तुला माहितीये ना की मला झोप किती प्रिय आहे ते? मग लवकर उठले की माझ्या झोपेचे खोबरं होते आणि मग सगळा गोंधळ उडतो. दी असताना असं नाही व्हायचं." ती निरागसपणे म्हणाली.

"निवी, म्हणूनच मी हे करतो. तुला चांगल्या सवयी लागाव्यात ना म्हणून. शौर्याने तुला जास्त लाडावून ठेवले आहे, त्यातून तू बाहेर पडायला हवीस यासाठी. तुला चांगले माहिती आहे की तू इथे आपल्या कपंनीत कामाला आहेस ते केवळ माझी मुलगी म्हणून नाही तर तुझ्यात ती कॅपॅबिलीटी आहे म्हणून. आपल्या एसके कंपनीत सगळ्यांना सारखे रुल्स आहेत. मला, तुला आणि संपूर्ण स्टॉफला. सो बी केअरफुल फॉर नेक्स्ट टाइम. ओके? आता जा तुझ्या केबिनमध्ये. थोड्यावेळाने विहानला पाठवतो. तो काय म्हणतो ते ऐकून घे."

"डॅड, त्याच्याबद्दलही मला बोलायचे होते." विहानचे नाव काढले तसा सकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला.

"त्याबद्दल नंतर बोलूया. त्याला मी पंधरा मिनिटांनतर बोलावले होते, सो तो येईलच आता. त्याचे म्हणणे ऐकून घेतो. नंतर तुम्ही तुझ्या केबिनमध्ये डिस्कस करा. ओके?" घड्याळाकडे बघत तो म्हणाला तशी ती उठली. आपले बॉस वेळेचे कसे पक्के आहेत हे तिला चांगलेच ठाऊक होते.

ती गेली आणि विहान आत आला. त्याला जे बदल आवश्यक वाटत होते ते त्याने शशांकसोबत डिस्कस केले.

"मिस्टर विहान, तुम्ही जे सांगितले ते पटलंय मला. पण मिस निव्याशी एकदा बोलून घ्या. हा प्रोजेक्ट ती हॅन्डल करते आहे आणि आता यापुढे तुम्हा दोघांना एकत्र काम करायचे आहे. त्यामुळे तुमचे म्हणणे तिलाही पटायला हवे." शशांक.

"ऑफ कॉर्स सर. मी आत्ताच मॅडमची भेट घेतो." विहान उठत म्हणाला.

"ओके. होप हे न्यू प्रोजेक्ट सक्सेसफुली स्टार्ट होईल."
"नक्कीच सर." एक स्मित करून तो बाहेर गेला.

******
मोबाईल वायब्रेट झाला तसे शशांकने कॉल रिसिव्ह केला. त्याच्या ओठावर मंद स्मित उमटले होते.

"हॅलो, खडूस एसके. तुमच्या नव्याचे प्रेजेंटेशन आवडले ना?" पलीकडून सुनंदा बोलत होती.

"सुनी, आपली निवी नेहमीच सिक्सर मारते, माहितीये ना तुला?" तो हसून म्हणाला. "आणि काय गं? खडूस खडूस काय लावले आहेस? माझी मुलगी सुद्धा मला तेच म्हणत असते." तो.

"डिअर एसके तू खरंच खडूस वागतोस कधी कधी. मग तेच म्हणणार ना तुला? तुला माहितीये का? आज निवी तिचा ब्रेकफास्ट स्किप करून ऑफिसला आलीये. केवळ ज्युस प्यायलीय ती. तिचा प्रॉब्लेम ठाऊक आहे ना तुला? मग का असं सकाळी सकाळी तिला त्रास देतोस?"

"सुनंदा, निवी माझीही मुलगी आहे हे विसरू नकोस. आपला एवढा मोठा कारोबर पुढे शौर्या आणि तिलाच सांभाळायचा आहे, मग चांगल्या सवयी तिला लागायला हव्यात ना? आणि तू काळजी करू नकोस, तिच्या केबिनमध्ये नाश्ता पाठवायला सांगितलेय मी." तो.

"थँक यू." ती.

"सुनी, शौर्या नाहीये म्हणून तू निवीला जास्त प्रोटेक्ट करू नकोस हं. तिलाही तिची काळजी घेता यायला हवी." तिला समजावत शशांक बोलत होता.

"हम्म." ती.

"चल, ठेवतो. कामं पडलीहेत. बाय लव्ह यू." त्याने कॉल कट केला आणि लॅपटॉप मध्ये डोके खुपसले.

******

"मे आय कम इन?" निवीच्या केबिनवर टकटक करत विहान विचारत होता.

"हम्म. कम." मान वर न करताच ती उत्तरली.

"ॲक्च्युअली नव्या मॅम, आय एक सॉरी. सकाळी जरा जास्तच रुडली बोललो मी. म्हणजे मी मिटिंग अटेंड करण्याच्या घाईत होतो आणि त्यात तुम्ही अचानक ब्रेक लावला." तो उभ्यानेच तिच्याकडे बघत बोलत होता. 

"मी तुम्हाला एक्सप्लॅनेशन मागितले?" त्याच्या चेहऱ्यावर नजर गाढत तिने विचारले.

तिच्या गव्हाळ चेहऱ्यावरचे काळेभोर डोळे त्याच्या हृदयाचा ठाव घेत होते. त्या डोळ्यात अडकल्यासारखा तो तसाच उभा राहिला. चेहऱ्यावर आलेली बट, बोलून झाल्यावर दातांच्या मध्ये पेन ठेऊन त्याच्यावर स्थिरावलेली तिची नजर त्याला संमोहित करत होती.

"तुमचं बोलून झाले असेल तर तुम्ही जाऊ शकता." तिच्या बोलण्याने तो एकदम भानवर आला.

"नो, नो. नाही." विहान भांबावून गेला. "मे आय सीट?" त्याने प्रश्नार्थक तिच्याकडे पाहिले.

"येस, प्लीज." ती अजूनही तिच्या ॲटीट्युड मध्ये होती.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *

******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//