Login

हवास मज तू! भाग -२५

वाचा नव्या आणि विहानची एक अनोखी प्रेमकथा.
हवास मज तू!
भाग -२५

मागील भागात :-
ऑफिसमध्ये शशांक विहानचा बर्थडे सेलिब्रेट करतो. या अनपेक्षित सेलिब्रेशनने विहानला भरून येते. इकडे ललिता आणि सुनंदाला विहान साठी काय करू नि काय नको असे झालेले असते.
आता पुढे.


थोड्यावेळाने पुन्हा फोन व्हायब्रेट झाला तसे कुणाचा कॉल आहे हे न बघताच तिने कानाला फोन लावला.


"तुम्ही दोघी मला छळायचे थांबवणार नाही आहात का? असे कराल तर मी आता पुढचा कॉल घेणारच नाही बघा." तिचा स्वर वैतागलेला होता.


"मॅम प्लीज, असं काही करू नका ना. दिवसभरातून मी तर पहिल्यांदा कॉल करतोय." पलीकडून विहानचा आवाज कानावर येताच नव्याने जोरात जीभ चावली.


"विहान, तू? सॉरी अरे. मला वाटलं की माझ्या घरून कॉल आहे. रिअली सॉरी यार. खरंच." तिला काय बोलावे तेच कळत नव्हते.


"ओके ओके. काम डाऊन. ऍक्च्युली मला तुला भेटायचं होतं म्हणून कॉल केलाय. भेटू शकतो ना?" त्याचा प्रश्न.


"अं? हो. भेटूया ना. ये की केबिनमध्ये." ती उत्तरली आणि पुढच्याच क्षणी केबिनच्या दारावर टकटक झली.


'म्हणजे, मी लगेच हो म्हणेल याची याला पूर्ण गॅरंटी होती म्हणायची.' त्याला समोर बघून ती मनातच हसली.


"मॅम, इथे तुमच्या सह्या हव्या आहेत." त्याने हातातील फाईल तिच्यासमोर ठेवली.

"मॅम, सही करताय ना?" त्याच्याकडे एकटक बघत असलेल्या तिच्या डोळ्यासमोर एक चुटकी वाजवून त्याने तिची तंद्री मोडली.


"अं? हो, हो. कुठे सही करू?" गडबडून तिने हातात पेन घेतला.

"नव्या, सगळं ठीक आहे ना? आणि मघाशी फोनवर कसल्या त्रासाबद्दल बोलत होतीस? मला सांग, तुला कोणी त्रास देत आहे का?" सहीसाठी उचललेला तिचा हात स्वतःच्या हातात घेत त्याने प्रेमळ स्वरात तिला विचारले.

"नाही अरे. मला कोण त्रास देईल? माझी आजी आणि आई मला सारखं कॉल करत होत्या म्हणून थोडीशी चिडले होते. बस्स!" त्याच्या स्पर्शाने शहारात ती उत्तरली.

"ओके, मग ठीक आहे. यू कॅरी ऑन." तिच्या हातावरची पकड ढिली करत तो.


"हे काय? इथे तर सर्वच ठिकाणी सह्या झाल्या आहेत? तू जुनी फाईल घेऊन आलाहेस का?" कपाळावर आश्चर्याचे जाळे घेऊन तिने प्रश्न केला.


"हम्म. खरं तर हो." त्याच्या उत्तराने ती त्याच्याकडे रोखून बघू लागली.

"ए, अशी बघू नकोस ना. तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला निमित्त काढून आलो." तो निरागसपणे म्हणाला आणि तिला जोरात हसू आले.


"नव्या, प्लीज डोन्ट लाफ. मला खरंच तुझी आठवण येत होती यार. समोर असूनदेखील आपण एकमेकांशी नीट बोलू शकत नाही याचे मला वाईट वाटतेय." त्याच्या स्वरातून त्याच्या भावानांची तीव्रता दिसून येत होती.


"ए, सॉरी रे." वाईट वाटून तिने लगेच कानाजवळ हात नेला.


"सॉरी नको म्हणूस ना. ऐक ना नव्या, आज आपण कुठेतरी बाहेर भेटूया? तू म्हणशील तिथे. हवं तर थोड्याच वेळासाठी." त्याच्या नजरेत अर्जव होते.


"नाही रे. आज नाही जमणार. आज घरी खूप स्पेशल असे एक गेस्ट येणार आहेत. सो आज नको, पुन्हा कधीतरी."

"ओह. सॉरी. तू तुझ्या फॅमिलीसोबत राहतेस हे मी विसरूनच गेलो होतो. यू एंजॉय विथ युअर फॅमिली अँड द्याट स्पेशल गेस्ट. येतो मी." तिच्या समोरची फाईल घेऊन तो उठत म्हणाला.


"विहान, ते स्पेशल गेस्ट कोण आहेत हेही तू विचारले नाहीस ना?"


"कोण? तुझी दी आलीये का? म्हणजे आजवर तीच तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे हे ऐकून झालेय म्हणून गेस करतोय."


"दी बद्दल जेलसी फील करतोस होय?" त्याच्या उत्तरावर ती मिश्किल हसली.

"मी का जेलस होवू?" तो बोलला खरा पण चेहऱ्यावर नाराजी होतीच.


"यू आर राईट. दी माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे पण आज तिच्यासारखीच स्पेशल व्यक्ती घरी येतेय. तुला माहितीये कोण?" ती उठून त्याच्याजवळ येत म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला गोंधळ बघून तिला हसू येत होते.


"कोण?" त्याने नजरेनेच विचारले.


"माझ्या आजीचा होणारा लाडका नातजावई." ती मिश्किल हसत उत्तरली.


"म्हणजे?" गोंधळून तो.

"म्हणजे माझ्या मॉमचा होणारा सन इन लॉ. आता कोण असेल ते तूच गेस कर." तिच्या ओठावरचे खट्याळ हसू तसेच होते.

"अच्छा. तुझ्या बहिणीचे लग्न ठरले तर? काँग्रट्स." तो बोलायचे म्हणून बोलला.

"स्टुपिड." तिने हसून त्याला एक फटका मारला.

"मी तुझ्याबद्दल बोलतेय. घरच्यांनी आज तुला डिनरसाठी इन्व्हाईट केले आहे." त्याच्या नाकावर टिचकी देत ती म्हणाली.

"काय? हे कसे शक्य आहे? म्हणजे मी कसा येऊ शकतो ना?" त्याचा गोंधळ जराही कमी झाला नव्हता.


"कसे येऊ म्हणजे? मी तुला घ्यायला येईन ना. तू त्याची काळजी करू नकोस." ती.

"अगं पण.."

"आता पण नाही नि बिण नाही. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान तू रेडी रहा. मी तुला पिकअप करायला येईल."

"नव्या पण." तो अजूनही तयार नव्हता.

"ए, असा मोडता नको ना घालूस. तुला भेटायला घरचे खूप एक्साईटेड आहेत. मम्मा आणि आजी तर तुझ्यासाठी काय खायला करायचे म्हणून मला फोन करून सारखे विचारत आहेत." त्याच्या ओठावर बोट ठेवत ती म्हणाली.


"सगळे इतक्या प्रेमाने मला बोलावत आहेत तर मी नाही कसे म्हणणार ना?" तिच्या बोटावर ओठांचा स्पर्श करत तो म्हणाला.


तिने लाजून बोट बाजूला केले आणि त्याच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करू लागली. पण तोवर त्याच्या मजबूत हातांचा विळखा तिच्या कमरेवर पडला होता.


"विहान.." तिचे श्वास वाढीला लागले होते.


"हं?" तिच्या नजरेत नजर मिळवत तो हळुवारपणे म्हणाला.


"म्हणजे तू येतो आहेस हे पक्के आहे ना?" श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत ती.


"हो. येतोय तर. पण मला थोडेसे अनकॉम्फर्टेबल वाटतेय गं. म्हणजे फॅमिली, फॅमिली मेम्बर्स या सगळ्यांशी संबंध केव्हाच तुटलाय. त्यामुळे.."

"मी आहे ना." त्याचे बोल अर्धवट थांबवत ती म्हणाली.

"विहान आता माझं कुटुंब तुझे होणार आहे. तू स्वतःला असे एकटे समजू नकोस ना. तू घरच्यांना एकदा भेट तरी. तू त्यांना पहिल्यांदा भेटतो आहेस असे तुला वाटणार देखील नाही."


"हो. तूच इतकी गोड आहेस तर तुझी फॅमिली सुद्धा तशीच असेल ना." तो तिच्या आणखी जवळ येत म्हणाला.


"विहान, आय थिंक आपण ऑफिसमध्ये आहोत. तर.."


"तर काय?" त्याला तिचा रोख कळत होता तरीही मुद्दामच त्याने विचारले.


"तर स्टे अवे फ्रॉम स्वीट्स. तसेही मी डायबिटीक आहे, सो त्याचा तुला आणखी त्रास व्हायचा." त्याला दूर ढकलत ती हसून म्हणाली.


"यापुढे असं बोलू नकोस. तुझा त्रास मला कधीच होणार नाही." तो क्षणात हळवा झाला.

"मी मस्करी केली रे."

"यापुढे अशी मस्करी चुकूनही करू नकोस. नव्या तुला कळणार नाही की तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टन्ट आहेस. तेव्हा तुझ्या आजारपणाबद्दल असं कधीच बोलायचं नाही. कळलं ना?" त्याचा ओला स्वर तिच्या काळजाला भिडला होता.

"विहान आय लव्ह यू सो मच. तुला माहिती आहे? माझ्या घरी प्रत्येकजण माझी काळजी घेतो. सर्वांची मी खूप लाडकी आहे. सगळे माझ्यावर प्रेम करतात. तरीही तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल जे प्रेम आणि काळजी दिसते ना ती या सर्वांपेक्षा कणभर जास्तच भासते रे.

तू कायम असाच माझ्यावर प्रेम करत राहशील ना? माझ्याऐवजी कधी तुला दुसरं कोणी आवडणार तर नाही ना?" ती स्फुन्दायला लागली.


"वेडी आहेस का गं? तू माझ्यासाठी काय आहेस तुला अजूनही कळले नाहीये का गं? नव्या तू माझं पहिलं प्रेम आहेस आणि तूच माझे शेवटचे प्रेम देखील. आयुष्यात कितीही वादळं आली ना तरी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन." आवेगाने तिला मिठीत घेत तो म्हणाला.


"थँक यू." त्याच्या मिठीत विरघळत ती मुसमूसत म्हणाली.


"चला, मॅडम फाईलवरच्या सह्या झाल्या असतील तर मी इथून जातो. माझे पेंडिंग वर्क बाकी राहिले आहे." तिला हलक्या हाताने स्वतःपासून दूर करत तो म्हणाला.


"ओके. आता जा पण मी तुला साडेसातला घ्यायला येतेय हे लक्षात ठेव. तुझ्या बिल्डिंगचा ऍड्रेस तेवढा मला मेसेज कर." खुर्चीवर बसत ती म्हणाली.

तिला होकार देऊन तो हसत केबिनच्या बाहेर पडला खरा पण डोक्यात काहीतरी वेगळेच सुरु होते.

शशांकच्या केबिनजवळ पोहचातच त्याचे पाय अचानक थबकले आणि मनात एक विचार करत तो आत डोकावला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*******

🎭 Series Post

View all