Feb 22, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -२१

Read Later
हवास मज तू! भाग -२१
हवास मज तू!
भाग -२१

मागील भागात :-
विहान नव्याला त्याच्यासोबत एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो. तिथे ते त्याचा वाढदिवस साजरा करतात. पण त्याच्यासाठी काही गिफ्ट आणले नाही म्हणून नव्या नाराज होते.
आता पुढे.


"हॅपी बर्थडे विहान. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत." त्याला शुभेच्छा देत तिने त्याच्या गालाला केकवरची क्रीम लावली.


"थँक यू सो मच." तो म्हणाला.

"तुला सांगू? आजचा बर्थडे माझ्या आयुष्यातील सर्वात खास आहे. कारण एका खास व्यक्तीबरोबर मी तो सेलिब्रेट करतोय. थँक्स टू यू नव्या. तू आलीस म्हणून हे शक्य झाले." तो थोडासा हळवा झाला होता.


"तू बोलावलेस तर मी येईनच ना. पण आधी माहिती असतं तर काहीतरी गिफ्ट आणले असते." तिचे मन गिफ्टमध्येच अडकले होते.


"माझ्यावर एवढा विश्वास? की मी चल म्हटल्याबरोबर तू लगेच माझ्यासोबत येशील?" त्याने तिच्यावर नजर रोखली.


"हम्म. लाईफमध्ये काही व्यक्ती तेवढ्या इम्पॉर्टन्ट असतात की त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवावा वाटतो. पण काही व्यक्ती अशा असतात जे त्यांचा बर्थडे असूनदेखील या कानाची त्या कानाला खबर लागू देत नाही." तिने परत नाक फुगवले.


"नव्या मी सॉरी बोललो ना? अगं मला तुला सरप्राईज द्यायचे होते." कानाला हात लावत तो म्हणाला.


"ठीक आहे रे. बरं मला सांग, तुला काय गिफ्ट हवे?" ती.


"अरे व्वा! असे गिफ्ट मागितले की सहज मिळते होय? मग तर मागावेच लागेल." तो मिश्किलने म्हणाला.


"तू मागून तर बघ." त्याच्यावर नजर खिळवून ती उत्तरली.


"नव्या.."

अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव जाऊन एक गंभीर भाव आले. आवाजातील अवखळपणा देखील नाहीसा झाला होता आणि नजर थेट तिच्या नजरेत आरपार भिडली होती.


त्याच्या गंभीर स्वरात घातलेल्या सादेने तिच्या हृदयाची स्पंदने आपोआप वाढीला लागली. त्याच्या आरपार गेलेल्या नजरेने जणू ती संमोहित झाली होती.

"खूप दिवसापासून तुझ्याशी बोलायचं होतं. ओठावर येणारा प्रत्येक शब्द तुला सांगायचा होता. पण कसे सांगू ते सुचत नव्हते." तो तिच्याजवळ येत म्हणाला.

त्याचा स्वर स्थिर होता. शब्दांची जुळवाजुळव करायची गरजच नव्हती. जे होते ते स्पष्टपणे त्याच्या डोळ्यात दिसत होते.

नव्याचा श्वास मात्र वाढला होता. तो काय बोलणार आहे हे कदाचित तिलाही ठाऊक होते, नव्हे ते ऐकायलाच तर ती त्याच्यासोबत इथवर आली होती. पण तरीही स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते.

"नव्या.." त्याने अलवार स्पर्श करत तिचा हात हातात घेतला.


"तुला पहिल्यांदा भेटलो आणि त्याचवेळी तुझ्या प्रेमात पडलो. त्यावेळी मला ठाऊकदेखील नव्हते की मी जिथे काम करणार आहे तिथे तू माझी हेड म्हणून आहेस. कामामुळे आपण परत परत भेटत गेलो आणि तुझ्यावरचे माझे प्रेम अधिक वृद्धिंगत होत गेले. फक्त ते कधी सांगायची मात्र हिंमत झाली नाही."


त्याच्या हातात तिचे हात. तिच्या नजरेत त्याची नजर. त्याच्या ओठांची होणारी हालचाल. तिच्या कानातून थेट हृदयात सामावणारे त्याचे स्वर!

ती त्याचा शब्दन शब्द अंतरात उतरवून घेत होती. इतक्या दिवसांपासून सुरु असलेला जीवाचा आटापिटा, मनीची तगमग सारे काही याचसाठी तर होते. ती काही न बोलता केवळ ऐकत होती. आता मध्ये बोलून त्याच्या बोलण्यात खंड पाडायचा नव्हता.


"माझ्याबद्दल तुलाही काहीतरी वाटते आहे हे मला जाणवत होतं." आपले बोलणे त्याने पुढे सुरु ठेवले.

"पण तूही कधी ते बोलली नाहीस. कदाचित मी आधी व्यक्त व्हावे अशी तुझी अपेक्षा असेल आणि ते स्वाभाविकही होते. आज त्याच अपेक्षेने तुला सांगतो आहे, नव्या माझे तुझ्यावर खूप खूप खूप प्रेम आहे. तुझेही माझ्यावर प्रेम आहे ना?"

त्याच्या बोलण्यातून त्याच्या भावना स्पष्टपणे दिसत होत्या. तिच्या चेहऱ्यावर मंद हसू फुलले होते. हाच तर तो क्षण ज्याची ती आतुरतेने वाट बघत होती.


"सांग ना नव्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?" तिचे दोन्ही हात हातात घेऊन त्याने परत प्रश्न केला. उत्तरादाखल तिने खाली नजर करून होकारार्थी मान हलवली. तिच्या मुखातील शब्द ओठावर येण्यापूर्वीच गोठले होते.

तिच्या चेहऱ्यावरची नजर तसूभरही न हलवता तो तिथेच गुडघ्यावर खाली बसला. जीन्सच्या पॉकेट मधून एक छोटीशी डायमंड रिंग काढून तिच्यासमोर धरली.

"नव्या तुझे फॅमिली स्टेटस मला ठाऊक नाही. माझ्याबद्दल तुलाही फारसे काही माहित नाही तरी आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय. आपल्यातील हे नाते असेच पुढे न्यायला तुला आवडेल का? तू कायमची माझी होशील? माझ्याशी लग्न करशील?"


त्याच्या अनपेक्षित प्रश्नाने तिच्या चेहऱ्यावर लाली फुलली. आज तो त्याच्या प्रेमाचा इजहार करेल याची तिला कल्पना होती. पण हे असे अचानक लग्नासाठी प्रपोज? तिचा तर तिच्या कानावर विश्वासच बसेना.


भर उन्हात थेंबभर पाण्यासाठी आसूसलेल्या मनावर अचानक मुसळधार पावसाची बरसात व्हावी तसे तिला झाले होते. त्या पावसात न्हाऊन निघत मन अगदी तृषार्त झाले होते.

"सांग ना नव्या, विल यू मॅरी मी?" तो अजूनही डोळ्यात अर्जव घेऊन तिच्या होकाराची वाट बघत होता.

"हम्म. आजन्म तुझ्यासोबत रहायला मला आवडेल. विहान, तू हवा आहेस मला. माझा म्हणून. कायमचा." ती गोड हसून म्हणाली.

"ओ माय गॉड! नव्या तू हो म्हणते आहेस? खरंच? ओह गॉड! माझा तर विश्वासच बसत नाहीये की तू इतक्या चटकन मला होकार देशील. आय एम सो हॅपी टुडे. आय लव्ह यू, लव्ह यू अ लॉट!"

त्याने उभे होत तिला घट्ट मिठी मारली. आता ती त्याला त्याच्यापासून क्षणभरही दूर नको होती.


"विहान.." नव्या कसेबसे म्हणाली. त्याने अचानक मारलेल्या मिठीवर कसे रिॲक्ट व्हावे तिला समजत नव्हते.


"आय एम सॉरी." तो लगेच तिच्यापासून दूर झाला.

"ॲक्च्युली मी खूप एक्साईटेड झालोय त्यामुळे ही मिठी अँड ऑल. बट नव्या आय एम रिअली सो हॅपी. धिस इज माय बेस्टेस्ट बर्थडे गिफ्ट फॉरेव्हर. लव्ह यू डिअर." त्याने परत तिचे हात हातात घेतले. यावेळी त्याच्या डोळ्यातील थेंब तिच्या हातावर निखळला.


"विहान, तू रडतो आहेस?"


"वेडे, आनंदाश्रू आहेत गं हे. तुला कल्पना नाहीये की तुझ्या होकाराने माझे हृदय किती फुललेय. असं वाटतंय की तुला उचलून गोल गोल फिरवावं, संपूर्ण जगाला ओरडून सांगावं. नव्या आणि विहान फक्त आणि फक्त एकमेकांचे आहेत.जगातील कुठलीच शक्ती त्यांना कधीच वेगळं करू शकत नाही."


"वेडा झाला आहेस का? आपल्याला कोण वेगळं करेल? माझ्या फॅमिलीतील तर कोणीच नाही आणि तुझ्या फॅमिलीत तर तुझ्या आईशिवाय कुणी आहेच नाही. मग असा का बोलतो आहेस?" नव्या त्याला एक हलका फटका देत म्हणाली.


"खरंच वेड लागलंय यार. तू लावलंस. प्रेम हे असं वेडं करणारं असतं का गं? असेल तर या वेडेपणात मी खूप आनंदी आहे." तो म्हणाला.


"विहान तुझे हे वागणे खूप अनपेक्षित आहे. तू असाही असशील असे कधीच वाटले नव्हते. पण मला तुझे हे रूप फार आवडलेय." ती त्याच्याकडे बघून हसली.

मी असाच आहे गं. तू पूर्णपणे मला ओळखलेच कुठे? तुला सांगू? मला ना हे सगळे स्वप्नवत वाटते आहे. मला एक चिमटा काढशील?" त्याच्या प्रश्नावर तिला हसायलाच आले.


"असे स्वप्नवत तर मला वाटायला हवे, ते तुलाच वाटते आहे. अगदीच खुळा आहेस तू."


"जसा आहे तसा आता तुझाच आहे. तूच ते एक्सेप्ट केले आहेस." तो मिश्किल हसला आणि तिने हसून डोक्यावर हात मारून घेतला.


"नव्या."


"हं?"

"कॅन आय हग यू? मला तुला एक मिठी मारायची आहे. माझ्या स्वप्नातील स्वप्नपरी प्रत्यक्षात समोर आहे की मी स्वप्नातच आहे हे बघायचे आहे." त्याने आपले हात फैलावत तिला म्हटले.

ती अलगद त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या छातीवर डोके ठेवताच एका लयीत सुरु असणारे त्याचे श्वास तिला जाणवत होते. त्याच्या हृदयाचे स्पंदन तिच्या स्पंदनाशी एकरूप होत होते.

"आय लव्ह यू नव्या. बियांड द लिमिट." तिच्या पाठीवरचे हात घट्ट करत तो तिच्या कानात कुजबुजला.

त्याच्या मिठीतील तो क्षण संपूच नये असे वाटत असताना त्याने अलवार स्पर्शाने तिला मीठीतून दूर केले.

"आता निघायचं? बरीच रात्र झालीये. मी इथे एकटा राहत असलो तरी तुझी फॅमिली तुझी वाट बघत असेल ना?" तो काळजीने म्हणाला.

"हम्म. जायला तर हवेच." ती नाईलाजाने मान हलवत तयार झाली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*****


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//