Feb 29, 2024
प्रेम

हवास मज तू भाग -१७

Read Later
हवास मज तू भाग -१७
हवास मज तू!
भाग -१७

मागील भागात :-

विहानसाठी देवीला साकडे घातल्यामुळे नव्या देवीच्या दर्शनाला अनवाणी जाते. घरी परतल्यावर ललिता तिला त्याबद्दल विचारते.
रात्री असलेल्या पार्टीमध्ये विहान नव्याला प्रपोज करण्याचा विचार करतो.

आता पुढे.


स्वतःची स्तुती केल्यानंतर तो बाहेर आला.

'डिअर नव्या, आय एम कमिंग. तू आज कशी दिसते आहेस ते बघायला मी खूप एक्सायटेड आहे.'

मनात बोलत त्याने कारचा दरवाजा उघडला. सिटबेल्ट ऍडजस्ट करून त्याने म्युझिक सिस्टिम सुरु केली. आवडीची गाणी ऐकत फ्रेश मुड घेऊन त्याची कार पार्टीच्या ठिकाणी निघाली होती.

*****


"मम्माऽऽ " नव्याचा आवाज तिच्या खोलीतून थेट बाहेर हॉलपर्यंत येत होता.


"निवी, काय झाले?" ते ऐकून सुनंदा आत आली.


"मॉम, आय एम कन्फ्यूज्ड." चेहऱ्यावरचे केस बाजूला करत ती म्हणाली. तिच्या बेडवर कपड्यांचा खच पडला होता.


"पार्टीला काय घालून जायचे ते मला काहीच कळत नाहीये." सुनंदाचा प्रश्नचिन्ह असलेला चेहरा बघून ती म्हणाली.


"वेडाबाई, ही काही तुझी पहिली पार्टी थोडीच आहे की तुला कळत नाहीये? गेल्या वर्षभरापासून अशा कित्येक पार्ट्या तू अटेंड करत आली आहेस." सुनंदा हसत म्हणाली.


"मम्मा, रिअली आय निड युअर हेल्प. प्लीज सांग ना काय घालू?"


"विहानसाठी काही स्पेशल घालायचे आहे का?" तिच्या कपड्यांच्या ढिगाऱ्यात हात घालत सुनंदाने हळूच विचारले.


"तुला ना काही सांगायलाच नको. आत्ता जर इथे दी असती तर मला तुझ्या हेल्पची गरज पडली नसती." तिने उगीचच तोंड फुगवले.


"ए लाडूबाई, उगाच तोंड फुगवू नकोस. हा ड्रेस बघ, तुला मस्त दिसेल." एक ड्रेस हातात घेत सुनंदा.


"च्याक, अजिबात नाही." दाताखाली जीभ दाबत आवाज करून ती उद्गारली.


"हा?"


"ना." मान हलवत ती.


"मग हा?"


"अहं."


"मग हा तरी."


"नाही गं."

सुनंदाने किमान नऊ दहा ड्रेस तिला काढून दिले पण तिचा नन्नाचा पाढा थांबत नव्हता.


"मी वैतागले बाई. माझी साडी नेसून जातेस का?"


"काहीही हं मम्मा. ऑफिस पार्टीला साडी कशी नेसणार ना?" ती.


"मग जे घालायचे ते घालून लवकर बाहेर ये. शशांक तर केव्हाच गेलेत." वैतागून सुनंदा बाहेर आली.

ती गेल्यावर बरोबर अर्ध्या तासात नव्या बाहेर आली.


अंगावर निळ्या रंगाचा सिक्वेन्सचा स्लीव्हलेस ड्रेस. त्याची लांबी गुडघ्याच्या थोडी खाली असलेली. अगदीच शॉर्ट नसला तरी तो पायघोळ देखील नव्हता.

जात्याच सुंदर असलेल्या तिला मेकअपची फारशी गरज नव्हतीच त्यामुळे अगदी हलका आणि थोडासा चकाकणारा मेकअप केला होता. डोळ्यांचा स्मोकी लुक आणि ओठांवरची गुलाबी लिपस्टिक तिच्या सौंदर्यात चार चांद लावत होते. केसांची हाय पोनिटेल आणि कपाळावरून गालावर रेंगाळणारी एक कर्ली बट.

कानात लोंबकळणारे नाजूक डायमंड आणि हातातील ब्रेसलेट! पायात उंच टाचेचे हिल्स आणि ती एकदम परफेक्ट रेडी.

तिचे हे रूप अगदी मोहक भासत होते. ती बाहेर आली तशी ललिताने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून कानामागे नेत बोटं मोडली तर सुनंदानेही तोंड भरून कौतुक केले.


"खूप सुंदर दिसते आहेस. आजच्या पार्टीची जान तूच असणार आहेस बघ."

"नो वे मम्मा, मला काही पार्टीची जान व्हायचे नाहीये. मी स्वतःसाठी तयार झालेय." सुनंदाकडे बघून ती हसली.

"बाय गर्ल्स, मी निघते. ड्राईव्हर काका माझी वाट बघत आहेत."


"निवी, आज चक्क ड्राईव्हर काका?" सुनंदाचा प्रश्न.


"हम्म. तुझी मुलगी इतकी सुंदर तयार होऊन कार चालवेल तर कित्येक तरुण जखमी होतील. त्यामुळे ही काळजी. बरोबर ना निवी?" ललिताच्या व्यक्तव्यावर निवी खळखळून हसली.


"टोटली रॉंग. तुझ्या लाडक्या लेकाने मला स्ट्रिक्टली सांगितलंय की एकटं यायचं नाही. त्यामुळे, ओके? निघू मी?" ती हात हलवत कारमध्ये बसलीसुद्धा.


"आई, आज तर त्या विहानची विकेट पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघाच तो आज तिला प्रपोज करतो की नाही ते." निवीचे मोहक रूप आठवून सुनंदा ललिताकडे बघून म्हणाली.


"सुने, तू खरंच निवीची आई आहेस ना? स्वतःच्या मुलीबद्दल असं बोलतेस?" ललिताचा चेहरा गंभीर झाला. ते बघून काहीतरी चुकल्यासारखं वाटून पडलेल्या चेहऱ्याने सुनंदाने तिच्याकडे पाहिले.


"माझ्या तर डोक्यात होतं की.." चेहऱ्यावरचे गंभीर भाव तसेच ठेवत बोलता बोलता ललिता थांबली.


"काय?"


"की पुढच्या रविवारी माझ्या होणाऱ्या नातजावयाला जेवायला घरी बोलवावे."


"कोणाला?" अचंबित होऊन सुनंदा.


"तोच गं. आपल्या निवीचा विहान. तुला काय वाटलं?" ललिता हसली तसे सुनंदाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.


"आई, तुम्हीपण ना? मला पार घाबरवून टाकलत हं."


"सुनेने सासूला घाबरायलाच हवे. शास्त्र असते ते."ललिता म्हणाली आणि लगेच तिथे दोघींच्या हास्याची कारंजी फुलली.

******

"काका, प्लेलिस्ट मधले \"होशवालों को खबर क्या\" गझल लावा ना." अर्ध्यात पोहचल्यावर नव्याने ड्राईव्हर
काकांना सांगितले.


"वा! छोटया मॅडम, आज अचानक जगजीत सिंग?" त्यांच्या प्रश्नावर ती मंद हसली.

'होशवालों को खबर क्या
बेखूदी क्या चीज है,
इश्क किजीये फिर समझीए
जिंदगी क्या चीज है..'

त्या आवाजातील जादू तिला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होती. तिथे फक्त ती होती आणि सोबतीला होता तिचा विहान.

त्याच्यासाठी तिने घातलेले साकडे, देवीच्या मंदिरापर्यंत अनवाणी केलेली परिक्रमा, त्याच्यामुळे कंपनीला मिळालेली डील आणि त्याच्यामुळेच साजरे होत असलेले आजचे क्षण.

इतक्यात जे काही घडत होते त्यात केवळ तोच होता. प्रत्येक घटनेशी तोच जुळला होता. ऑफिस, घर, मनात, बाहेर, वास्तवात, आभासी जगात केवळ आणि केवळ तोच तर होता. आताही मिटल्या डोळ्यात ती त्यालाच साठवत होती.


"मॅडम, हॉटेल आलेय." ड्राईव्हर काकांच्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली.


"काका, मॅडम नका हो म्हणू. तुम्ही बेबी म्हणालात की कानाला खूप भारी वाटतं." गोड हसून ती.

"बरं बेबी." त्यांनीही स्मित केले. ती लहान असताना पासून हे काका त्यांच्याकडे कामाला होते. त्यामुळे त्यांच्यात एक बॉण्डिंग होते आणि म्हणूनच नव्याने ऑफिस जॉईन केल्यापासून शशांकने तिचा ड्राईव्हर म्हणून त्याला रुजू केले होते.

"काका, तुम्ही जा आता. यायचे झाल्यास मी तुम्हाला कॉल करेल किंवा डॅडसोबत येईन." कारमधून बाहेर येत ती म्हणाली.

*******

ती आत प्रवेशली तेव्हा ऑफिसचे संपूर्ण टीम मेंबर्स तिच्याआधीच उपस्थित होते. कीर्ती आणि विनीत तर अगदी मॅचिंग मॅचिंग दिसत होते.

तिच्या आत येण्याने सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. आजचे तिचे एकंदरीत दिसणे सर्वात उठून दिसत होते.


"हाय ब्युटीफुल! लूकिंग सो प्रीटी." कीर्ती आणि विनीत तिच्याजवळ आले.

"लव्हबर्ड्स, तुम्ही सुद्धा खूप भारी दिसताय हं. एकदम परफेक्ट मॅच." त्यांच्याकडे बघून ती गोड हसली.

ती हसली तसे कीर्ती चक्क लाजली.


"नव्या, आय वॉन्ट टू शो यू वन थिंक." ती बोलताना देखील लाजत होती.


"काय?" तिचे लाजणे बघून नव्याला हसू येत होते.


"काल विनीतने मला प्रपोज केले." बोटातील अंगठी दाखवत कीर्ती म्हणाली. यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती.


"वॉव! इट्स ग्रेट न्यूज यार. काँग्रॅच्यूलेशन्स!" नव्या.

"थँक यू." गोड हसत कीर्ती.

"लिसन ना. ॲज अ फ्रेंड, मला तुला एक ॲडव्हाइस द्यायची आहे." आता ती थोडी गंभीर झाली होती.


"काय?" नव्यानेही तिच्याकडे गंभीर होत बघितले.


"विहान." ती.


"त्याच्याबद्दल काय?" नव्याच्या काळजात उगाच धडधडायला लागले.


"तुला तो आवडतो हे आम्हाला माहितीये. तुला तो हवा असेल तर तूच त्याला प्रपोज कर. नाहीतर हातून कधी निसटून जाईल तुला कळणार देखील नाही." डोळ्यानेच बाजूच्या ग्रुपकडे इशारा करत ती म्हणाली.


कीर्तीने केलेल्या इशाऱ्याकडे नव्याने बघितले. ऑफिसमधील इतर मुली विहान भोवती घोळका करून उभ्या होत्या आणि तो देखील त्यांच्याशी हसून बोलत होता. ते बघून तिच्या चेहऱ्यावर राग चढू लागला होता.


"बघितलेस ना? सगळ्या मुली त्याच्यामागे कशा लागल्या आहेत ते. एखाद्या सुंदर मुलीने त्याला पटवले तर तोही नाही म्हणणार नाही. आफ्टरऑल मेन्स विल बी मेन्स." कीर्ती हळू आवाजात कुजबुजली.


"हू केअर्स?"
आपली पोनिटेल जोरात हलवत नव्या विनीत जवळ जावून उभी राहिली. विहानला असे मुलींसोबत बघून राग तर आला होता पण यावेळी तिला व्यक्त होता येत नव्हते.


"विनीत, कॅन वी डान्स?" म्युझिक वाजू लागली तसे तिने विनीतसमोर हात पुढे केला.


तिला आलेला राग शांत होऊ शकेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//