Login

हवास मज तू! भाग -१२

खरेच का प्रेम फसवे असते? वाचा प्रेमाची नवी कथा.


हवास मज तू!
भाग -बारा.

मागील भागात :-

नव्या आणि विहान तयार केलेल्या प्रोजेक्टची डील ऐन वेळी कॅन्सल होते आणि त्यामुळे शशांक भयंकर चिडतो. या अपयशाची जबाबदारी स्वतःवर घेऊन विहान परत दुसरे प्रोजेक्ट तयार करतो.
आता पुढे.


'देवा, सगळं नीट होऊ दे. डील नाही मिळाली तरी चालेल पण विहानची नोकरी जाऊ देऊ नकोस. असं जर केलंस ना, तर संडेला मी अनवाणी तुझ्या दर्शनाला येईन. आय प्रॉमिस.' कधी नव्हे ते आज ती देवाला साकडे घालत होती.

मनोमन प्रार्थना करताना तिचे हात कसे जोडले गेले
तिलाच कळले नाही. क्षणभर जोडलेल्या हाताकडे बघून ती चमकलीच. आज पहिल्यांदा तिने शशांक किंवा आपली कंपनी यांना वगळून विहानला निवडले होते.


विचार करण्यात गुंग असताना शशांकच्या बुटाचा आवाज तिच्या कानावर आला आणि तिने कान टवकारले. शशांक आणि विहान ऑफिसमध्ये पोहचले होते. काही न बोलताच ते दोघे तिच्या केबिनसमोरून शशांकच्या केबिनमध्ये गेले.


"मिस नव्या, केबिनमध्ये या." इंटरकॉम वरून तिला कॉल आला तशी ती लगेच गेली. हृदयाची धडधड वाढली होती.

ती आत आली तेव्हा शशांक निर्विकार चेहऱ्याने त्याच्या खुर्चीवर बसला होता तर विहानच्या चेहऱ्यावर देखील कसलेच भाव नव्हते. दोघांच्या तोंडून चकार शब्द देखील बाहेर पडला नव्हता. ते शांत क्षण तिला आणखी काळजीत पाडत होते.

"सर, डील फायनल झाली ना?" तिने भीतभीतच विचारले.

"खूप विश्वास होता ना तुम्हाला तुमच्या कलीगवर? मग त्यालाच विचारा." शशांकचा आवाज कठोर झाला होता.

"म्हणजे? मिस्टर विहान काय झाले?" कापऱ्या आवाजात तिने विहानकडे पाहिले. त्याची नजर खाली वळली होती.

"मिस्टर विहान,आतातरी काही बोलणार आहात का?" तो काहीच बोलत नाही हे बघून तिने पुन्हा प्रश्न केला.

"काय बोलणार? बोलण्यासारखं काही उरायला हवं ना? मिस्टर विहान, तुम्हाला तुमच्या कलीग कम बॉसला काही सांगायचे असेल तर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन सांगा. मला काही वेळासाठी जरा एकटं राहायचं आहे. अँड डोन्ट वरी, आय एम फाईन." त्याने शेवटचे वाक्य नव्याकडे बघून म्हटले.

त्याचा इशारा समजून ती तिच्या केबिनमध्ये परतली. डोके जरासे जड आल्यासारखे वाटत होते. तिच्या मागोमाग विहानदेखील आत आला.

"मिस्टर विहान, काय झाले ते सांगणार आहात का? डील आपल्य हातून गेली का?" विचारताना तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिच्या डोळ्यातील पाणी बघून त्याच्या काळजात एकदम चर्रर्र झाले.

"असं कसं होईल?" तिच्या जवळ येत तो म्हणाला.

"म्हणजे..?" तिचे हृदयाची स्पंदने जोरात वाढायला सुरुवात झाली.

"सगळं संपलं असं वाटत असताना कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला होता, तो विश्वास असाच कसा गमवेन मी?" तो हळूच तिच्या कानात कुजबुजला.

"माझा जीव जाईल अशाने. स्पष्ट काय ते बोल ना." ती कासावीस होत म्हणाली.

"श्श! असं नको ना बोलूस. तुझ जीव माझ्यासाठी खूप प्रेषिअस आहे." तिच्या ओठावर बोट टेकवत तो म्हणाला.

दोघे खूप जवळ आले होते. डोळे डोळ्याला भिडले होते. त्याच्या बोटाचा तिच्या ओठाला स्पर्श झाला आणि गोठल्यागत ती तशीच उभी राहिली. त्याला काय वाटले कुणास ठाऊक पण त्याने तिला अलगद मिठी मारली.

"नव्या, फायनली ही डील आपल्याच कंपनीला मिळालीय. तू माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लागला." तिला मिठी मारत तो तिच्या कानात म्हणाला.

त्याची मिठी, त्याचे कानातील बोल.. हृदय जणू बंदच पडले क्षणभर. आधीच गोठल्यागत झालेली ती आता अगदी स्तब्ध झाली होती.

"क..काय म्हणालास तू?" त्याच्यापासून दूर होत तिने विचारले. कसेबसे तिच्या तोंडून ते शब्द फुटले.

"हेच, की आपली डील फायनल झालीये. तो मेहता आपण सादर केलेल्या प्रेसेंटेशनचा डाटा चोरून आपल्यावर कल्टी मारू पाहत होता, पण आता सगळं सॉर्ट आऊट झालेय. मे बी ते प्रोजेक्ट आपल्याला मिळाले हे आत्तापर्यंत जाहीर देखील झाले असेल."

"ग्रेट यार! पण मग एसके सर का चिडलेत?"

"आय डोन्ट नो, कदाचित तुला घाबरवण्यासाठी." तो मंद हसला.

"विहान दुष्ट, हसू नकोस. मी खरंच घाबरले होते."

"का? डील हातातून जाईल म्हणून?"

"अहं, कदाचित तुला इथून जावे लागेल म्हणून. तुला गमवायची हिंमत माझ्यात नाहीये." ती बोलली तसे त्याने रोखून तिच्याकडे पाहिले.

"का?" तिच्या नजरेत आरपार बघत त्याने विचारले.

"आय डोन्ट नो." तिची नजर किंचित खाली झुकली.

"मग शोध त्याचे उत्तर. असं म्हणतात की शोधलं तर सापडतं. तुलाही सापडेल ते." मिश्किल हसत तो तिच्या केबिनबाहेर पडला.
तो गेला आणि तिने स्वतःला खुर्चीवर झोकून दिले.

'त्यात काय शोधायचंय? मला तर ते स्पष्ट दिसतेच आहे. माझ्या नजरेने बघ, तुलाही दिसेल ते.' एक दीर्घ श्वास घेऊन तिने डोळे मिटले.

मघाशी त्याने मारलेली मिठी तिला आठवली. त्या मिठीत वावगं असे काहीच नव्हते. कदाचित आवेगाने त्याच्या हातून ते घडले होते, तिच्या अंगावर मात्र ते आठवून रोमांच उभे राहिले.

'कदाचित प्रेम म्हणतात ते हेच. त्याला हरवण्याच्या भावनेनेच किती घाबरले होते मी? विहान तुला गमवणे शक्य नाही. आता मीच तुझ्यात हरवत चालले आहे.'

"नव्या मॅम, कुठे हरवलात?" तिच्या समोर वाजलेल्या चुटकीच्या आवाजाने तिने डोळे उघडले. बघते तर समोर विहान उभा.

'आता तर तुझे भासदेखील व्हायला लागलेत.' स्वतःला टपली मारत ती मनात म्हणाली.

"खरंच मी इथे आहे. एसके सरांनी आपल्या सगळ्यांना बोलावून घेतले आहे. चला आत."

'याला आता माझ्या मनातील सुद्धा ऐकू येते का?' तिच्या मनातील प्रश्न काही संपत नव्हते.

"नव्या मॅम, विचार करायला भरपूर वेळ आहे. सध्याच्या घडीला ऑफिस महत्त्वाचे आहे. चला." तो पुन्हा म्हणाला तसे डोक्याला हात लावून ती उठली आणि त्याच्या मागोमाग गेली.

******

"..सकाळी मी जास्तच रिॲक्ट झालो होतो असे तुम्हा सर्वांना वाटले असेल, पण तसे केले नसते तर आपल्या कंपनीतील या हिऱ्याचे तेज आपल्यासमोर आलेच नसते." ती आत गेली तेव्हा शशांक बोलत होता.

"मिस नव्या,तुम्ही तुमच्या कलीगवर विश्वास ठेवला म्हणून मी त्याला परत एक संधी देऊ केली आणि त्याचे फलित तुम्हा सर्वांसमोर आहे. फायनली डील आपल्यालाच मिळालीय आणि त्याचे सर्व क्रेडिट फक्त आणि फक्त विहान तुला जातेय. मिस्टर विहान रिअली यू आर अ स्टार! असाच नेहमी चमकत रहा."

सर्वांसमोर शशांक त्याच्यावर स्तुतीसुमंनाची उधळण करत होता. हीच तर खास स्टाईल होती त्याची. जर सर्वांसमोर तो एखाद्याला ओरडू शकत होता तर त्याच्या दुपटीने कौतुक देखील करत होता.


"सर, तुम्ही मला परत संधी दिलीत हा तुमचा मोठेपणा आहे. थँक यू सो मच." चेहऱ्यावर अदबीचे भाव घेऊन विहान नम्रपणे म्हणाला.

"हेच तुझं मला फार आवडतं. आजकाल एवढा साधेपणा, अशी सादगी कुठे आढळते? तुझी ही क्वालिटी लवकरच तुला एक मोठा माणूस व्हायला मदत करेल. तेव्हाही पाय असेच जमिनीवर असू दे म्हणजे झालं." त्याच्या खांद्याला थोपटत शशांकने एक नजर नव्यावर टाकली.
स्तुती तर विहानची होत होती त्याचा आनंद मात्र तिच्या चेहऱ्यावर उमटत होता.

"..आणि टीम, या यशाचा आनंद साजरा करायला आपण येत्या रविवारी पार्टी आयोजित केली आहे, सो बी रेडी फॉर द्याट." पार्टीची घोषणा झाली आणि सर्वांनी जल्लोष करायला सुरुवात केली.


"तुला चालेल ना संडेला सेलेब्रेशन?" सगळे आपल्या जागेवर निघून गेल्यावर शशांक नव्याला विचारत होता. त्याने मुद्दाम तिला थांबवून घेतले होते.

"असं काय विचारतोस? मला काय प्रॉब्लेम असेल?" ती नजर चोरत म्हणाली.

"मला काय माहित? मला वाटलं की तुमचं पुन्हा काही सेलिब्रेशन वगैरे असेल." तो मिश्किल हसत म्हणाला.

"डॅड असं काही नाहीये."ती म्हणाली खरी, चेहऱ्यावर मात्र लालिमा पसरत होता.

"निवी, विहान इज अ नाईस गाय. बंदे मे दम है, तुला आवडतो की नाही माहित नाही, मला मात्र आवडलाय." मंद हसत तो म्हणाला तेव्हा चक्क लाजली ती.

"डॅड, म्हणजे तसा आवडतो मला तो. पण त्याला काय वाटतं ते माहित नाही." अडखळत का होईना पण पठ्ठीने बापाला सांगून टाकले.

"त्याला काय वाटायचं? त्याच्याही डोळ्यात तेच दिसतंय जे तुझ्या डोळ्यात दिसत आहे. एंजॉय युअर लाईफ. जेव्हा सिरिअसली हे नातं पुढे न्यावेसे वाटेल तेव्हा सांग. मी आहेच तुझ्या पाठीशी."

"जेव्हा सिरिअसली म्हणजे व्हॉट? आय एम क्वाईट सिरीयस अबाऊट धिस." पुढच्याच क्षणी एकदम तडक तिचे उत्तर आले आणि शशांक जोरात हसायला लागला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
******

🎭 Series Post

View all