हवं असलेलं मातृत्व... भाग -15

विकास कीर्तीला त्याचा निर्णय कळवतो.

भाग -15




विकास आणि कीर्ती काही वेळातच फ्रेश होऊन बाहेर येतात.

आई " मग काय बोलले डॉक्टर ? " आई विचारतात.

कीर्ती " झालं सगळं बोलणं डॉक्टरांशी !"

विकास " मी च बोलुन घेतल डॉक्टरांशी, त्यांनी सांगितलं कि ट्रीटमेंट करून मुलं होईल च ह्याची खुप कमी ग्यारंटी आहे ! पण दोन गोष्टी आहे ज्या प्रकारे तुम्ही आई बाबा होऊ शकतात.!"

आई " काय आहे ? "

विकास " ते बोलतात जो निर्णय असेल तोह तुम्ही प्रॅक्टिकली विचार करून घ्या !"

आई " हो पण काय ? "

विकास " बघ तु उगाच चिडू नकोस ऐकल्यावर ! आणि जे काय असेल पटत कि नाही ते सांग!"

आई " पण तु सांग तरी ?"

विकास " त्यांनी सांगितलंय कि एक तर तांत्रिक गोष्टीचा वापर करून म्हणजे आय वी एफ आणि दुसरं म्हणजे दत्तक. "

आई विकास च बोलणं ऐकुन थोडा वेळ शांत बसतात. कीर्ती आणि विकास दोघ एकमेकांच्या चेहऱ्या कडे पाहतात. विकास कीर्तीला धीर देतो.

कीर्ती " आई... " काय झालं शांत बसलात ?

आई " नाही गं काही !"

कीर्ती " तुम्हाला पटलं नाही का ? "

आई " मी काय बोलणार, सर्वस्वी तुम्हा दोघांन चा प्रश्न आहे ! सौंसार तुम्हा दोघांचा आहे !"

विकास " तस नाही घरातली मोठी व्यक्ती म्हणुन तुला विचारलं मी ? "

आई " ह्म्म्म..!"

कीर्ती " आई तुम्हाला पटलं तर सांगा !"

विकास " मला तु तुझा निर्णय कळव आई, घरात एकत्र राहतो आणि आई म्हणुन तुला विचारलं मी ? "

आणि विकास आत रूम मध्ये जातो. विकास सगळी धडपड कीर्ती साठी करत असतो. तिची आई होण्यासाठी ची धडपड विकास ला दिसत असते.

कीर्ती " हे काय असा खिडकीत जाऊन का उभा आहेस ? "

विकास " असंच !"

कीर्ती " अस कस, तु आईंच्या उत्तरांची वाट पाहतोयस ना ?"

विकास " असंच काहीस समज !"

कीर्ती " ह्म्म्म... " आणि कीर्ती हसते.

विकास " हसायला काय झालं ?"

कीर्ती " तु नको टेन्शन घेऊस मला माहित आहे आई जे काय उत्तर देतील ते चांगलच असेल !"

विकास " इतक्या सहजा सहजी तु कस काय म्हणू शकतेस ? "

कीर्ती " मी ह्या काही दिवसात आईंना खुप चांगल ओळखलंय ! त्यांनी माझी सोबत सासु नाही तर आई बणुन दिली !\"

विकास " मला माफ कर कीर्ती ! मी तुला नको नको तस बोललो. माझं मन दुखावलं म्हणुन माझ्या वागण्याने तुझं ही मन मी दुखावलं !"

कीर्ती " नवरा बायको च नातं असतच अस, तु नको काळ्जी करुस. "

विकास " तुझी आई होण्यासाठी ची धडपड मी पाहतोय. आणि मी कोणत्याही निर्णयात मी तुझ्यावर सोबत मित्र म्हणुन असेन.!"

कीर्ती " थँक्स विकास !"

विकास " मला तुला माझा निर्णय कळवायचं आहे !"

कीर्ती " काय, कोणता निर्णय ? "

विकास " आपल्या बाळासाठीचा ! आपण बाळ दत्तक घेऊ !"

कीर्ती त्याच्या कडे आश्चर्याने पाहते. तिला वाटलं नव्हत कि विकास इतक्या सहजतेने हा निर्णय घेईल. कारण स्वतःच मुलं आणि दत्तक मुलं ह्यात खुप फरक असतो. दत्तक मुलं आपलं म्हणुन सांभाळणं आणि त्याला स्वतःच वडील म्हणुन नाव देण, एक स्त्री सोडली तर पुर्षाला ते कठीणच असत.

कीर्ती " खरंच विकास !" कीर्ती च्या चेहऱ्यावर एक वेगळीच ख़ुशी असते.

विकास " हो आणि...? "

कीर्ती " आणि काय ?? "

विकास " आणि आपण मुलगी दत्तक घेऊ तेही लहानस पिल्लु...!"

कीर्ती अजुन खुश होते कारण विकास मुलगा नाही तर मुलगी दत्तक घ्यायचा म्हणतो.

कीर्ती " मी खुप खुश आहे..!"

विकास " आपण आपला हा निर्णय आई ला ही सांगू आणि डॉक्टर ला ही कळवून देऊ. आणि एका चांगल्या अनाथ आश्रमात जाऊन बाळ दत्तक घेण्यासाठी चौकशी करू. "

कीर्ती त्याच्या ह्या निर्णयाने खुप खुश होते. ते दोघ ही आई ला सांगण्यासाठी आई च्या रूम मध्ये जातात.

कीर्ती जरा घाबरलेली असते. जो काही निर्णय घेतलंय तोह आई ऐकल्यावर काय बोलतील ह्याची धाकधूक कीर्तीच्या मनाला होती.


.....क्रमश.....



🎭 Series Post

View all