हवं असलेलं मातृत्व.. भाग -४

विकास ला कस समजावू हे कीर्तीला समजत नसत.

भाग -४


विकास " हो तुला च विचारणार , कारण तुझ्यावर मुळे आपल्याला डॉक्टर कडे जावं लागलं. "

कीर्ती " माझ्या मुळे कि आपल्या मुळे, बाळ होण्याचं निर्णय दोघांचा आहे ना.? "

विकास " हो माहित आहे पण, तुझ्या मुळे जावं लागलं डॉक्टर कडे !"

कीर्ती " पुन्हा तेच बोलतोयस ? हे बघ मला माहित आहे. तुझं मन दुखावलंय ! पण डोन्ट वरी आपण मिळून मार्ग काढु.

विकास " तुला काय बोलायला सोप्प वाटतंय. कारण तुला बरं वाटल असेल ना त्या डॉक्टर च्या समोर माझा अपमान झाला ते ! "

कीर्ती " कसला अपमान काही काय बोलतोयस? उलट कळलं तरी नक्की काय कारण आहे ते.!"

विकास " बघ आता तूच कबूल केलास ना ? "

कीर्ती " काय ? मला कळेल असं बोल. "

विकास " तुला कळलं ना कि तु ओके आहेस. दोष तुझ्यात नाही. "

कीर्ती " तु आता काही बोलतोयस ! तुलाच कळत नाही ये.! आपण शांत पणे सविस्तर नंतर बोलु. चल आता वर !"

कीर्ती त्याला शांतपणे वर घेऊन जाते. डोर ची बेल वाजवते.

आई दरवाजा खोलते. त्या दोघांची चेहरे पाहुन तिला अंदाज आलेला असतो.

आई " ह्म्म्म! या.. "

विकास तवातवा ने आत रूम मध्ये निघुन जातो.

आई " ह्याला काय झालं ? "

कीर्ती " काही नाही ओ आई ! मी आलेच. " असं बोलुन कीर्ती आत विकास ला समजवायला रूम मध्ये जाते.

विकास " काय झालं, मला एकटं सोड ! "

कीर्ती " अरे तु असं तडक आत आलास ! आई विचारत होत्या तुला काय झालं असं आत यायला.!"

विकास " मग सांगायचं ना !"

कीर्ती " तु असं का वागतोयस, फ्रेश होऊन बाहेर ये. चहा करते गरम. "

विकास काही च बोलत नाही. कीर्ती त्याला सांगुन बाहेर येते.

आई " काय झालं, हा असा आत का गेला ? काही झालं आहे का तुमच्यात ? " आईचे अनेक प्रश्न असतात कीर्तीला.

कीर्ती " काही नाही आई, तोह जरा थकलाय म्हणुन.!"

आई " ह्या आधी थकून त्याने काही असा वागला नाही तोह ? "

कीर्ती " येईल तोह बाहेर मी बोलावलंय त्याला !"

आई तिच्या कडे रागाने बघतात. कीर्ती निमूटपणे आत किचन मध्ये जाते.

थोड्या वेळात विकास फ्रेश होऊन बाहेर येतो. डायनिंग टेबल वर बसतो. कीर्ती त्याला चहा गरम करून देते.

आई " काही देऊ का रे खायला ? " विकास ला विचारते.

विकास " नको काही ? "

आई " बरं ! काय झालं? "

विकास " कशा बद्दल ? "

आई " अरे डॉक्टर काय बोलले ? गेलेलात ते ! "

विकास " विचार तिलाच !"

आई " तिच्या पेक्षा तूच सांग मला काय ते ? "

विकास " हा विषय आताच काढायचा आहे का तुला आई ? " चिडत विकास म्हणतो.

कीर्ती त्याच्या कडे पाहत असते.

आई " माझ्यावर का चिडतोयस ? आणि आता नको विचारू तर मग कधी विचारू.? "

कीर्ती " आई...आई... आता नको म्हणजे आपण रात्री थोड्या वेळाने बोलु ना ! " आई ना समजावत ति बोलते.


...... क्रमश.....


🎭 Series Post

View all