हवं असलेलं मातृत्व.. भाग -14

डॉक्टर विकास ला समजावतात...

भाग -14



डॉक्टर " बघ विकास एक डॉक्टर म्हणुन सांगतेय. प्रॅक्टिकली विचार कर आणि निर्णय घे. "

कीर्ती " काय डॉक्टर ? " कीर्तीच्या चेहऱ्यावर खुप टेन्शन असत.

डॉक्टर " एक तर आय वी एफ आणि दुसरं म्हणजे दत्तक घेणं !"

कीर्ती " काय !"

डॉक्टर " हो!"

विकास डॉक्टर च बोलणं ऐकुन शांत बसतो काही क्षण.

डॉक्टर " विकास.... अरे विकास.... काय झालं ? "

विकास " काही नाही डॉक्टर ! पण आय वी एफ, शेवटी..? "

डॉक्टर " शेवटी माहित आहे तुला काय बोलायचं ते ? "

कीर्ती " ह्म्म्म ,, "

विकास " शेवटी कीर्ती च्या गर्भाशयात तांत्रिक गोष्टीचा वापर करूनच बाळ ठेवता येईल ना ? "

डॉक्टर " हो !\"

विकास " आणि जर ते करून सुद्धा नाही झालं तर ? "

कीर्ती विकास च्या चेहऱ्या कडे पाहते.

डॉक्टर " बघ विकास मी हे बोलत नाही कि तु बाप होऊ शकत नाही , जर ट्रीटमेंट केली तर होईल. किंवा ?"

विकास " किंवा नाही ही होईल! बरोबर. ""

डॉक्टर " तु प्रॅक्टिकली विचार कर !"

विकास " प्रॅक्टिकली च बोलतोय !"

कीर्ती " आपण आधी ट्रीटमेंट करू, मला माहित आहे होईल करून. "

डॉक्टर " हो कीर्ती तु बोलतेयस ते मी नाही म्हणत नाही आहे. होउदे चांगली गोष्ट आहे. नाही तर मग दुसरा मार्ग स्वीकारा. "

कीर्ती " दुसरा मार्ग ?? " आणि कीर्ती विकास कडे पाहते.

विकास " तु काळ्जी करू नकोस ! " विकास कीर्तीला समजावत म्हणतो.

डॉक्टर " बघा विचार करा. एकमेकांच्या सहमतीने जो काही असेल तोह निर्णय घ्या.!".

विकास " हो डॉक्टर, आणि थँक्स समजावल्या बद्दल !"

कीर्ती " ओके डॉक्टर जे असेल ते आम्ही कळवू !"

आणि विकास नि कीर्ती, डॉक्टर च्या कॅबिन मधुन निघतात. कीर्ती बाहेर येते. गाडीत बसते बराच वेळ ति शांत असते. विकास गाडी चालु करतो. तिचं माईंड फ्रेश व्हावं म्हणुन तिच्या आवडीचे गाणी तोह लावतो.

कीर्ती " नको रे विकास प्लीज ते बंद कर ?"

विकास " ऐकशील तर बरं वाटेल तुला. आणि तुझ्यावर आवडीचे गाणी लावलेत !"

कीर्ती " हो थँक्स,,, पण माझा मुड नाही आहे.!"

विकास " मुड व्हावा म्हणुन च तर लावलेत गाणी !"

कीर्ती डोळे बंद करून सीट वर टेकलेली असते.

कीर्ती " तुला खरंच वाटत का मी कमी पडली आहे ? "

विकास " नाही,, मनापासून नाही ! उलट माझ्या मुळे तु नाराज आहेस . "

कीर्ती " अजिबात नाही !"

विकास " तु सांग आपण काय करायचं ? "

कीर्ती " उलट मीच तुला विचारणार होती आपण काय करसयच ! काय निर्णय घ्यायचा ? "

विकास " मला अस वाटत आपण एकदा आई ला सुद्धा विचारूया कि काय करायचं !"

कीर्ती " ठीक आहे , पण जो निर्णय असेल आपण एकमत घ्यायचा. "

काही वेळात गाडी बिल्डिंग खाली येते. कीर्ती नि विकास थोडा वेळ गाडीतच थांबतात.

कीर्ती " थँक्स विकास,,!" कीर्ती आज विकास ने जी साथ दिली त्या बद्दल त्याचे आभार मानते.

विकास " नवरा आहे साथ तर देणार ना !"

आणि कीर्ती गाडीतून उतरते. खिडकीत आई विकास नि कीर्ती ची वाट पाहत असतात. तितक्यात दारावरची बेल वाजते.

आई " आले वाटत ! आई अंबाबाई सगळं काही नीट असदे " स्वतःशीच बोलतात.

आणि आई दरवाजा खोलतात. घरात जेवणाचा ठरल्याप्रमाणे बेत केलेला असतो त्याचा सुवास सर्वीकडे पसरलेला असतो.

विकास " अरे वाह जेवणाचा छान वास येतोय गं आई ?"

विकास खुश होऊन बोलतो.

कीर्ती " हो हो आधी आत तर चल!"

आई " हो जेवण केल आहे मस्त. बसा तुम्ही मी पाणी आणते!"

अस बोलुन आई पाणी घेऊन येतात.

कीर्ती विकास तुम्ही फ्रेश व्हा मी चहा ठेवते छानसा.

कीर्ती " आई थांबा मी करते.!"

आई " दमून आली असशील ना? तु थांब मी करते. "

अस बोलुन आई चहा ठेवायला जातात. काही वेळातच कीर्ती आणि विकास फ्रेश होऊन बाहेर येतात.



..,. क्रमश.....









🎭 Series Post

View all